Monday, February 5, 2018

परफ्युम्सची सुगंधी दुनिया: 'डी परफ्युमरी'- देवांग भिडे

व्यवसायानिमित्त अनेक व्यावसायिकांना भेटण्याची संधी मिळते. आणि ही संधी कधी कधी खूप काही शिकवूनही जाते. वेगवेगळे आदर्श समोर आणते, वेगळ्या पद्धतीने जग पाहायला शिकवते...
अशी  एक संधी थोडक्यात सांगायचं तर आपल्याही नकळत बरचं काही सांगून जाते. 
असाच काहीसा अनुभव आज या ब्लॉगमार्फत तुमच्याशी शेअर करणार आहे.

खरं सांगायचं तर आजपर्यंत अनेक उद्योजक आणि व्यावसायिकांबद्दल लिहित आले, त्यांच्या व्यवसायाचा USP या लेखणीद्वारे लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि मला खूप नवीन शिकता आलं. कुणी सर्व्हिस इंडस्ट्री मध्ये तर कुणी प्रोडक्ट इंडस्ट्री मध्ये, कुणी अनेक वर्ष नोकरी करून नवीन काहीतरी शिकून व्यवसायात आलेले, तर कुणी नोकरी सांभाळून व्यवसाय करणारे, कुणी शिक्षण झाल्या झाल्या व्यवसायात उतरणारे अगदी तरुण उद्योजक... असे एक ना अनेकजण या कामानिमित्त परिचयाचे झाले. आणि व्यवसाय करणं तसही फार सोप अजिबात नसल्यामुळे सगळ्यांच नेहमीच कौतुक वाटत आलं आहे.
   
पण, तुम्हाला वाटेल... मी आज हे नव्याने का सांगतेय?

       याचं कारण असं की, मघाशी म्हंटल्याप्रमाणे अनेक  उद्योजकांना भेटले मात्र शाळेत असल्यापासून जो व्यवसाय करतोय अशा तरुण उद्योजकाविषयी आणि अर्थात त्याच्या व्यवसायाविषयी आज लिहिणार आहे. 
    कारण, तरुण उद्योजक म्हंटलं की सर्वसाधारणपणे, आपल्या डोळ्यासमोर येतं की शिक्षण झाल्यावर आजकाल अनेक तरुण मुलं नोकरीकडे न वळता व्यवसायाकडे वळतात त्याप्रमाणेच एखादा उद्योजक असेल... तर असं अजिबात नाही. 

खरतरं शाळेत असल्यापासूनच ज्याच्या व्यवसायाची नकळत सुरुवात झाली तो म्हणजे मुलुंडचा  देवांग भिडे. देवांग अगदी लहान वयापासून म्हणजेच आठवीत असल्यापासून व्यवसाय करतोय. तेव्हा ते विशेष असं व्यवसायाचं स्वरूप नव्हतं. पण तरी त्या व्यवसायाकडे वळणाऱ्या पायऱ्याच होत्या. व्यवसाय करताना आपल्या विचारांचा आणि तत्वांचा पाया मजबूत असला की उंच झेप घेणं शक्य होतं. आणि जर आपल्या घरीच व्यवसायाची पार्श्वभूमी असेल तर त्या दिशेने आपली पाऊलं सहज पडू लागतात. देवांगच्या ही घरी व्यवसायाची पाश्वर्भूमी असल्यामुळे त्याला लहानपणी शाळेत असताना एक व्यवसायाच्या दृष्टीकोनातून विचार करण्याची मानसिकता घरीच मिळाली. आणि तो या संधीचं किंवा संधी वजा मार्गदर्शनाचं सोनं करतोय याचाही प्रत्यय येतो. 
मूळात देवांग काम करतोय हे त्याच्या आवडत्या परफ्युम्सच्या क्षेत्रात. लहानपणापासून त्याला स्वतःला परफ्युम्स, अत्तरांची मनापासून आवड होती. आठवी, नववीत असताना तो शाळेत परफ्युम मारून जायचा त्यामुळे त्या परफ्युम्सची आणि अत्तरांची चर्चा होऊ लागली. आणि त्याचे मित्र, पालक, शिवाय  शिक्षकांकडून या अत्तरांची मागणी वाढू लागली. 
आणि असा छोट्या प्रमाणावर का होईना देवांग चा व्यवसाय सुरु झाला. ज्याला अर्थात घरातल्या सगळ्यांचा पाठींबा होता. सोबत त्याच्या घरातल्या याच व्यवसायाची पार्श्वभूमी सुद्धा. त्याने व्यवसाय करताना त्याच्या शालेय अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष केलं नाही, याउलट फक्त परफ्युम्स विकणं इथपर्यंत त्याचा विचार कधीच मर्यादित राहिला नाही. तर सतत आपण विकत असलेल्या अत्तरांचा, परफ्युम्सचा सुद्धा अभ्यास करणं, मार्केटचा अभ्यास करणं हे तो लहानपणापासून करत आला आहे. 
याचं त्याच्या अभ्यासामुळे आज त्याने स्वतःने नवीन परफ्युम्सचे त्याच्या सुगंधाचे कन्सेप्ट्स (संकल्पना) तयार केले आहेत. शाळेनंतर कॉलेजमध्ये सुद्धा त्याचा हा परफ्युम विकण्याचा साईड बाय साईड व्यवसाय सुरूच होता. शाळेनंतर, कॉलेज आणि मग कॉलेज बाहेरचे ग्राहक ...अशापद्धतीने देवांगने स्वतः च्या जिद्दीने त्याच्या व्यवसायाचा आलेख उंचावला आहे. आणि अवघ्या बारावीत असताना तो एका बिझनेस फोरम मध्ये जॉईन झाला. यावरूनच आपल्या लक्षात येईल वाचकहो की, व्यवसाय करण्याची आणि ती निभावण्याची स्पष्टता त्याच्या विचारात लहानपणापासून होती. त्याप्रमाणे त्याने मेहनत सुद्धा घेतली आहे. आणि आजही घेत आहे. 
त्याच्या कंपनीच नाव आहे 'डी परफ्युमरी'. आणि त्याच्या परफ्युम्सची खासियत म्हणजे त्या  परफ्युम्सचा  सुगंध. 

त्याच्या काही परफ्युम्स वर खास नजर....










सध्या देवांग बी.कॉम चे शिक्षण घेत आहे.आणि पुढील भविष्यात तो  एक मोठा  इव्हेंट लाँच करणार आहे. 



त्याचे महाराष्ट्र, पुणे या ठिकाणी डीस्ट्रीब्यूटर सुद्धा आहेत. त्याची परफ्युम्स फक्त मुंबईत नाही तर गुजरात, बंगलोर, उदयपुर, नागपूर, बीड अशा सर्व ठिकाणी पोहोचली आहेत. त्याचा ग्राहक वर्ग फक्त मुंबई पुरता मर्यादित नाही.  
शिवाय तो आता कोर्पोरेट फ्रॅग्र्न्स, काही कोम्बो डीझाइन्स अशा सगळ्या गोष्टींवर काम करतो आहे. आणि यासाठी त्याचा खास असा रिसर्च नेहमीप्रमाणेच चालू आहे.
     जाता जाता...त्याची  व्यवसाय करतानाची क्रिएटीव्हीटी सांगायला निश्चितच आवडेल...एकदा देवांगला ८५ अत्तराच्या बाटल्यांची ऑर्डर मिळाली होती. जर कोणी दुसरी व्यक्ती असती तर त्याने कदाचित सगळ्या अत्तरांचा सुगंध हा सारखाच ठेवला असता. पण देवांग ने मात्र  ८५ अत्तराच्या बाटल्यांमध्ये ८५ वेगवेगळे सुगंध देण्याचा प्रयत्न यशस्वी करून दाखवला. यात नमूद करण्यासारखी गोष्ट अशी की, ती ऑर्डर फक्त ८५ अत्तराच्या बाटल्यांची होती आणि त्यांनी त्याला ८५ वेगळे सुगंध देण्यासाठी सांगितलेही  नव्हते. पण त्याने स्वतःहून ही ऑर्डर अशा नाविन्यपूर्ण विचाराने लक्षात राहील अशी  पूर्ण केली. 

आहे की नाही कौतुक वाटेल असा वेगळा आदर्श आणि एक तरुण उद्योजक?

तुमच्या प्रतिक्रिया नेहमीप्रमाणे माझ्यापर्यंत पोहोचतीलच...याची खात्री आहे. याच positive note वर आज लेखणी इथेच  थांबवतेय...
पण हो, वेगवेगळ्या अत्तरांविषयी आणि सुगंधाविषयीची खास  माहिती लवकरच घेऊन येतेय.  
पुन्हा एकदा...माझी लेखणी तर्फे देवांग ला आणि त्याच्या कंपनीला अर्थातच 'डी परफ्युमरीला'  खूप खूप शुभेच्छा !!! 

Contact details
Devang Bhide
9769764098