गायत्री: Hi, शिवानी..सर्वप्रथम, 'माझी लेखणी' तर्फे तुझ्या नव्या व्यवसायाकरता खूप खूप शुभेच्छा !!
शिवानी: धन्यवाद गायत्री....
आज तुझ्या व्यवसायाबद्दल, त्याच्याशी संबंधित नव्या प्लान्स बद्दल आणि एकूणच शिवानीचंं मानसशास्त्राशी कसं नात जोडलं गेलं आहे हे सुद्धा आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
सर्वप्रथम वाचकांना सांगायला आवडेल की, शिवानीचं मानसशास्त्राशी एक वेगळंं नात आहेच पण मानवी मनाचा अभ्यास करताना आणि ते जाणून घेताना मनाचा आणि आपल्या शरीर स्वास्थ्याचाही जवळचा संबंध आहे हे तिने ओळखलं आहे. त्यामुळे काऊन्सिलिंग सायकॉलाॅजीस्ट
आणि एक आहारतज्ञ या नात्याने तिच्या या नव्या व्यवसायात ती काम करणार आहे. त्यामुळे काऊन्सिलिंग करताना पेशंटचा आहार आणि मनाचे स्वास्थ्य अशा दोन्हींचा विचार करून ती पुढे जाणार आहे.
पण व्यवसाय जरी नवा असला तरी अनेक वर्षांच्या अनुभवाची जोड सोबत घेऊन ती यात उतरत आहे.
गायत्री: सायकॉलॉजी या क्षेत्रात करियर करायचं कधी ठरवलंस?
शिवानी: मला मानसशास्त्र आणि जर्नालिझम या दोन क्षेत्रांची आवड होती. तेव्हा जरा मनाचा गोंधळ होत होता. त्यामुळे मी अॅपटीट्युड टेस्ट केली. तेव्हा त्या टेस्ट्स पाहून माझं मलाच वाटलं की, अशा पद्धतीचंं काम मी करावंं. शिवाय त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे 'मानसशास्त्र' या विषयाची व्याप्ती समजली. आणि त्या क्षणी 'मानवी मनाचा अभ्यास करावा लागेल' अशा क्षेत्रात करियर करून खूप वेगळंं समाधान मिळेल याची माझी मलाच खात्री पटली. आणि म्हणून मी या क्षेत्राकडे वळले.
गायत्री: अरे वा!! मला तुझ्या या वाक्याचंं खरचंं खूप कौतुक वाटतंय, कारण आपल्याला स्वतःला आवडणाऱ्या आणि पैशापेक्षा सर्वात आधी समाधान देणाऱ्या क्षेत्रात करियर करायचा तुझा निर्णय आणि हा विचार नक्कीच कौतुकास्पद आहे.
शिवानी: हो...thank you...गायत्री.
यात मला आणखीन एक गोष्ट सांगायला आवडेल ते म्हणजे सायकॉलॉजीशी वेगळंं नातंं असण्यामागे एक कारण म्हणजे मी माझ्या आयुष्यात काही माणसंं अशी पाहिली होती ज्यामुळे मानवी मनाचा अभ्यास करावासा मला वाटला कारण, ज्यांना काही मानसिक त्रास असतात त्यांना आपण जर मदत करू शकलो तर...किंवा मानसिक अनास्था आलेल्यांना आनंदी मनाकडे घेऊन जाण्याचा कठीण मार्ग जर आपण सोपा करू शकलो तर आपल्याला आनंद वाटेल...असा विचार मनात यायचा. आणि अशा व्यक्तींना ज्यांना काही त्रास आहेत..उदा. depression, hallucinations, delusions असे काहीना काही मनोविकार असलेल्या व्यक्तींना मला मनापासून मदत करावीशी वाटते. त्यामुळे कुठेतरी नकळत या विचारांमुळे सुद्धा मानसशास्त्र हा विषय मला जवळचा वाटला आणि आजही वाटतो...
गायत्री: खरंय...आपल्या निर्णयांमध्ये सुस्पष्टता येण्यासाठीच असे काही प्रसंग कारणीभूत ठरतात...ज्यात माणूस म्हणून आपण घडत जातो.
याच अनुषंगाने मला तुला हे विचारायचं आहे की, तू मानसशास्त्र या विषयातली पदवी संपादन केलीस आणि आता या विषयात काम सुद्धा करतेयस...असा एखादा प्रसंग आमच्यासोबत शेअर करशील का की, ज्यामध्ये तू स्वतः एक माणूस म्हणून घडत गेलीस असं तुला वाटतंं...
शिवानी: हो, नक्कीच...आजपर्यंत जितक्या गोष्टी पाहिल्या त्यात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की, कधी कधी आपण छोट्या गोष्टींचंं खूपचंं दुखः करत राहतो. बाहेरच्या जगातले प्राॅब्लेम्स पाहिले की, सुखाची किंमत आपोआप कळते. पण एक कऊन्सिलर या नात्याने सांगायचं झालंं तर रोज नव्याने मी जग पाहायला शिकले आहे.आणि एक माणूस म्हणून empathetic अर्थातच दुसऱ्याच्या होडीत बसून विचार करायची सवय लागली.
गायत्री: तू सायकॉलॉजी या विषयात पदवी संपादन केल्यानंतर कोणकोणते कोर्सेस केले आहेस ?
आणि अनेक वर्ष ऑन फिल्ड काम केल्यावर आलेले आणि लक्षात राहिलेले काही अनुभव आमच्या सोबत शेअर करू शकशील?
शिवानी : हो, नक्कीच. कोर्सेस म्हणशील तर मी BA Entire Psychology केल्यानंतर बरेच कोर्सेस केले आहेत..आणि त्याचा मला खरचंं खूपच फायदा झाला आहे आणि आता अधिक होतोय. मी निर्मला निकेतन मधून Therapeutic Counselling चा PG डिप्लोमा केला आहे. शिवाय Advance Diet and Nutrition (BFY Mumbai), Rational Emotive Behavioral Therapy (IPH Thane)चा कोर्स केला आणि आता मी क्लिनिकल सायकॉलाॅजी मध्ये मास्टर्स करत आहे.
आणि अनुभव सांगायचे म्हटले तर, मी जेव्हा रिहॅब मध्ये काम करत होते तेव्हा लक्षात राहील असा एक प्रसंग घडला. माझा एक पेशंट होता...तो खुर्चीत बसला होता. मी त्याच्या शेजारी जाऊन बसले तेवढ्यात तो खूप मोठ्या आवाजात अक्षरशः ओरडला. आणि म्हणाला की तुम्ही इथे कसे बसलात ... तो बसला आहे ना...
ते ऐकून मी खरचंं दचकले. त्यांना hallucinations चा त्रास होत होता. त्यामुळे त्यांना ती व्यक्ती सगळीकडे दिसत होती.
आणि एक प्रसंग असाही आठवतोय की, एकदा आई आणि मुलगा असे दोघंं माझ्याकडे आले. आणि त्या आई ने मला सांगितलं की तो खूप Hyper Active आहे...शिवाय तो चिडला की सगळ्यांना मारतो. हे ऐकून मी थेट त्या आईलाच प्रश्न विचारला. काठीने मारायची अॅक्शन त्याने सर्वात आधी कुठे पाहिली आहे? तेव्हा त्याची आई क्षणभर थांबली आणि तिचा ऑकवर्ड झालेला चेहरा बरचंं काही सांगत होता. खरतरं मीच त्याला काठीने मारते.
मी त्यांना विचारलं..Then why do u need me? तुमचं उत्तर तुम्हाला मिळालं आहे. Your Child is mirroring you...
गायत्री: खरयंं...
आणि आता पुढचा प्रश्न तुझ्या नव्या कोऱ्या व्यवसायाबद्दल....
तू व्यवसाय करते आहेस. To be specific मागच्याच महिन्यात तुझ्या व्यवसायाची सुरुवात झाली आहे...
त्याबद्दल सर्वात आधी अभिनंदन...
गायत्री: तुझ्या व्यवसायाची रूपरेषा नेमकी कशी आहे?
शिवानी: मी freelance consultant आहे. डाएट आणि सायकॉलाॅजिकल असंं दोन्ही प्रकारचंं काऊन्सिलिंग मी करतेय. कारण मनाचा आणि शारीरिक आरोग्याचा सुद्धा तितकाच जवळचा संबंध आहे. सध्या मी appointment basis काम करतेय. आता डोंबिवली, पुणे, आणि कल्याण अशा तीन ठिकाणी माझं काम सुरु आहे.
गायत्री: वाह!! क्या बात है!!
प्रत्येक व्यवसाय वेगळा असतो....प्रत्येक व्यावसायिकाची एक खासियत असते...
तुझ्या व्यवसायाचा यूएसपी म्हणजे तू यात मानसिक आरोग्याचा विचार करताना शारीरिक आरोग्याचा सुद्धा विचार करून काऊन्सिलिंग करणार आहेस.बरोबर ?
शिवानी: हो
गायत्री: वा मस्त...खूप छान ...आणि भरपूर शुभेच्छा !!
शिवानी : धन्यवाद !!
गायत्री: ऑन फिल्ड काम केल्याचा दांडगा अनुभव पाठीशी घेऊन तू व्यवसायाकडे वळते आहेस...त्या सगळ्या कोर्सेस चा आणि अनुभवाचा व्यवसायात तुला कसा फायदा होतोय...काय सांगशील?
शिवानी : खरचंं अनुभवाचा खूपच फायदा होतो हे मी आता अनुभवतेय. खरतरंं प्रत्येक क्षेत्रात एथिक्स( Ethics) ही असतातच पण जिथे पेशंटच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न येतो तेव्हा आम्हाला खूप गोष्टी सांभाळाव्या लागतात. त्यांची माहिती ही आम्हाला सिक्रेट ठेवायची असते. तर अशी तत्व अर्थात एथिक्स सांभाळून काम करायला शिकले.
गायत्री: खूपच महत्त्वाचंं म्हणाली आहेस तू आत्ता....प्रत्येक प्रोफेशनची एथिक्स वेगळी असली तरी ती असतात.
गायत्री: आता आपण एक छोटी रॅपिड फायर घेणार आहोत...फक्त एका शब्दात किंवा एका वाक्यात उत्तर द्यायचं आहे...
शिवानी: ohh...interesting...चालेल.
गायत्री: तुझ्यासाठी मानसशास्त्र म्हणजे.......
शिवानी: बिस्कीट टू माय चाय
गायत्री: तुझा success mantra........
शिवानी: Ethics and Dedication
गायत्री: काऊन्सिलिंग करताना सोपी वाटणारी एखादी गोष्ट......
शिवानी: Human Mind is very complex त्यामुळे यात सोपं असं काहीच नाही.
गायत्री: काऊन्सिलिंग करताना कठीण वाटणारी एखादी गोष्ट......
शिवानी: अनेकांचा खूप मोठा गैरसमज असतो की आपण एखाद्या काऊन्सिलर ची मदत घेतोय म्हणजे आपण वेडे आहोत.
आणि मन हा अवयव दिसत नाही त्यामुळे त्यावर झालेला आघात बरा करण खूपच मोठ आव्हान आहे.
आता शेवटचे दोन प्रश्न ...........
गायत्री: तुझ्या व्यवसायातले तुझे पुढचे प्लान्स काय आहेत??
शिवानी: आता फ्रिलान्सिंग बेसिस वर करणार आहे. पण हळूहळू हीच practice वाढवत घेऊन जायची आहे. शिवाय भविष्यात स्वतःच क्लिनिक काढायचा विचार आहे...
गायत्री: उत्तम......
गायत्री:आजही २१ व्या शतकात कोणी काऊन्सिलरची मदत घेत असेल तर त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन आजही विचित्र आहे......
समाजाच्या या विषयातल्या मानसिकतेत काय आणि कसा बदल होण्याची गरज वाटते....
तुझं या विषयात एक काऊन्सिलर या नात्याने काय मत आहे......
शिवानी: खरयंं आजही कोणी काऊन्सिलरची मदत घेत असेल तर त्या व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असतो...आणि तो चूकीचा आहे. कारण जर आपल्याला ताप आला तर आपण डॉक्टरकडे जातो. अगदी त्याचप्रमाणे, कधी मानसिक असंतुलन तर कधी thought process मध्ये बदल झाले, किंवा गोष्टी चूकीच्या दिशेने जायला लागल्या तर आपण मनाच्या डॉक्टरांकडे जातो.
पण समाज या मनाच्या डॉक्टरांच्या विषयाला मात्र सहजासहजी स्वीकारत नाही. खरतरं, याठिकाणी काऊन्सिलर हा सल्लागार नसतो तर तो फक्त पेशंट ला रिअॅलिटीची जाणीव करून देतो, त्याला स्वतः मनाने उभं करायला मदत करतो. अनेकवेळा लोकं काय म्हणतील या विचाराने अनेकजण गरज असूनही काऊन्सिलरकडे जात नाहीत. त्यांना भीती असते ती त्यांनी सांगितलेली माहिती कुठेतरी लिक होण्याची. पण मी या ब्लॉग मार्फत सांगू इच्छिते पेशंट ची व्यक्तिगत माहिती, त्यांनी सांगितलेली माहिती आमच्याकडून कधीच लिक होत नाही. त्यामुळे समाजाने या सगळ्या गैरसमजातून आता बाहेर येण्याची गरज आहे...आता बऱ्यापैकी जागरूकता निर्माण झाली आहे. पण तरी काही समज-गैरसमज आजही आहेत.
धन्यवाद शिवानी....तुझी मेहनत, त्यामागचा अभ्यास आणि पुढे वाढवत न्यायच्या व्यवसायाची स्वप्न शिवाय त्यामागचं तुझं धेय्य यासाठी तुला पुन्हा एकदा माझी लेखणी तर्फे खूप खूप शुभेच्छा !!!
शिवानी: धन्यवाद गायत्री...आणि गायत्रीची लेखणी...
contact :
Shivani Prashant Ambekar
Psychological counselor and Nutritionist
9819366618
shivaniprashant28@gmail.com