Showing posts with label जंगल बुक जंगल गप्पा. Show all posts
Showing posts with label जंगल बुक जंगल गप्पा. Show all posts

Sunday, February 12, 2017

जंगल बुक जंगल गप्पा भाग ६

जंगल बुक जंगल गप्पा भाग ६

पूर्वरंग :
गायत्री: खरंय...ऐकां ना, आपण ५ मिनिटं जरा थांबूया का? तहान लागलीये. पाणी पिते.

मैत्रेयी: गायत्री, जंगलात कधी हरववलीस आणि तुला तहान लागली असेल आणि पाणी नसेल तर एक झाड सांगून ठेवते...

गायत्री: oyee...दुष्ट. असं काय बोलतेस. मी हरवले तर ? ओह्ह्ह..बापरे.

मैत्रेयी: अगं उदाहरण म्हणून सांगतेय गं...पुढे लागेल एक झाड माहूरवेल म्हणून. त्या खोडाला स्लॉट केला की त्यात अगदी स्वच्छ पाणी मिळेल.

गायत्री: ओह्ह...असं पण आहे इथे ...सही यार. निसर्गाची किमया अफाट आहे.

(पायी ट्रेल करताना आम्ही ५ मिनिटांची विश्रांती घेतली आणि मग पुढे प्रवास सुरु केला. पुढचा पायी ट्रेल पुढच्या भागात.)

यापुढे....५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर गायत्री आणि मैत्रेयी यांचा पायी ट्रेल परत सुरु होतो.

गायत्री : चला, निघूया. मैत्रेयी, आता काय काय पाहायचं आहे?

मैत्रेयी: आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टींच निरीक्षण करत पुढे जायचं...कारण...पायी ट्रेल म्हणजे micro habitat पाहत पाहत आपण पुढे जाऊ शकतो...सगळ्याच गोष्टींच निरीक्षण करत पुढे जाऊया म्हणजे पायी ट्रेल यशस्वी होऊ शकतो.

गायत्री: ok madam....जशी आपली आज्ञा....

मैत्रेयी: बास हं आता...ते बघ, तो ऐन वृक्ष आहे. त्याला पानं नाहीत त्यामुळे आपण तो खोडावरून ओळखू शकतो.

(गायत्री जवळ जाऊन खोडाचं निरीक्षण करते)

गायत्री : हे खोडं जरा वेगळ वाटतयं गं...

मैत्रेयी: निरीक्षणशक्ती चांगलीच सुधारली आहे madam तुमची...मी आता त्याबद्दलचं सांगणार होते. त्याला ‘क्रोकोडाइल बार्क ट्री’ म्हणतात. कारण मगरीच्या पाठीसारखा भास याठिकाणी होतो.


गायत्री: ohhh...भारी. इथे केवढी ऐनची झाडं आहेत गं...ते बघ तिथे पण आहेत.

मैत्रेयी: आपल्याला जंगलात ऐन हे सगळ्यात जास्त प्रमाणात नेहमीच पाहायला मिळतील. आणि अर्जुन सुद्धा. तिथे दिसतंय का? ते बघ...तिथे चारोळी, तेंदू आणि काय आहेत ते ? चल...तिथे जवळ जाऊन पाहूया...

हं....गायत्री, हे चारोळी, तेंदू आणि मोह आहेत....यांची फळं प्राण्याचं खाद्य असतं.

गायत्री: मैत्रेयी, ते काय आहे गं ....पिवळी फुलं ?

मैत्रेयी: तो बहावा ....पिवळा गुच्छ लांब लोंबकळणार तेच ना? त्याला ‘गोल्डन शॉवर ट्री’ सुद्धा म्हणतात...आणि अजून एक interesting खोडं दाखवते तुला....


गायत्री: मी ओळखते थांब....

दोघी पुढे जातात ....
मैत्रेयी: हा धावडा आहे....ग्रे रंगाच खोडं आहे याचं...आणि यावर पांढरे धब्बे असतात... आणि एक सिन्हा नावाच सुद्धा झाड आहे. पुढे दिसेल आपल्याला. त्या खोडाची सालं खरवडलेली असतात. पापुद्रे निघालेले असतात.

गायत्री: पण ते पांढर शुभ्र खोड कोणतं आहे ? तो धावडा नाही ना?

मैत्रेयी: हे करू आहे. करकरीत स्वच्छ पांढर खोड. आणि ते बघ गायत्री...ते ऑरकिड्स आहेत..

गायत्री: ते असं दुसऱ्या झाडावर का आलेत गं?

मैत्रेयी: हो आलेत खरे पण फक्त ते support घेतात. पण अन्न मात्र स्वतःच स्वतः तयार करतात म्हणजेच त्यांच्या मुळांमधून पाणी शोषून घेतात त्याला EPITHYTIC ROOT असं म्हणतात.

गायत्री: मैत्रेयी, कसलं भारी आहे यार हे सगळं...तू म्हणाली होतीस ते बरोबर आहे...पायी ट्रेल करायला मजा येतेय. किती किती नवीन शिकायला आणि ऐकायला मिळतंय ग. म्हणजे बघ ना...प्रत्येक झाडाची त्याच्या पानाची खासियत आहे...त्यावरून जंगलाचे प्रकार सुद्धा ठरतात....तू मध्ये म्हणाली होतीस बघं कि पानगळीच जंगल...एव्हरग्रीन जंगल याबद्दल ...मला ते मनोमनी पटतंय आता.

मैत्रेयी: hmmm....झाडांची त्याच्या पानांची खासियत तर आहेच शिवाय ऋतूनुसार सगळ बदलत असतं...त्यानुसार जंगलाचा प्रकार सुद्धा ठरतो. म्हणजे थोडक्यात काय तर सगळी ecosystem एकमेकांवर अवलंबून असते. पानगळीचं जंगल म्हणजे थंडीमध्ये पान गळतात आणि उन्हाळ्यात येतात. आणि वर्षभर पालवी असते त्याला आपण म्हणू शकतो एव्हरग्रीन जंगल...

गायत्री: मैत्रेयी, पण मला एक प्रश्न असा पडलाय कि, ही झाडं त्याचे नवे प्रकार कसे ओळखायचे? किती बारीक सारीक बदल दिसत आहेत....

मैत्रेयी: हो...ते पण ओळखायच्या पद्धती आहेत..अगदी scientific . ohhh...ops. त्याबद्दल सांगते नंतर...

गायत्री: अग काय झालं?

मैत्रेयीचा चालता चालता विष्ठेमध्ये पाय पडतो.....

हा पण पायी ट्रेलचा एक भाग आहे हा गायत्री....हाहाहा....( दोघी हसतात)

मैत्रेयी: ही विष्ठा अस्वलाची असणार.

गायत्री: तुला कसं कळल ग? आणि इथे अस्वल आहे का म्हणजे? बापरे....चल जाऊया मैत्रेयी.

मैत्रेयी: डरनेका नही madam....आणि हो, अस्वलाची विष्ठा ही चिकट गम सारखी असते. कारण त्याच्या आहारातला बराचसा भाग बेलफळाचा असतो.  त्याच्या आहारात तेंदू, बहावा आणि वाळवी असते ते यावरून लगेच लक्षात सुद्धा येऊ शकत. शिवाय सिल्व्हरिक रंगाची डोकी जेव्हा त्याच्या विष्ठे मध्ये दिसतात ती असतात वाळवीची. पोट साफ होण्यासाठी अस्वल बहाव्याच्या शेंगा खातो. आणि ऋतूनुसार त्याचं खाद्य बदलत राहतं हे सुद्धा आपल्याला यातूनच लक्षात येत राहतं.

गायत्री: ohh....असं तर सगळ्याच प्राण्यांच्या विष्ठेमध्ये काही ना काही वेगळेपण असेल त्यामुळे अभ्यासकांना नक्कीच फायदा होत असणार.

मैत्रेयी: हो अर्थात, आता बघ, चित्तळाची विष्ठा ही लहान पॅलेट प्रमाणे असते. त्याची संख्या मोजून प्राणीगणनेसाठी याचा उपयोग होतो.
 लंगुरांची माणसासारखीचं असते.

 तर नील गायीची वेगळी असते. मोठे ढीग असतात . त्याला मखर सुद्धा म्हणतात. त्यांची एक सवय असते त्या सगळ्या नील गायी एकाच ठिकाणी येऊन विष्ठा करतात.

गायत्री: ओह्ह...बापरे...बरीच नवीन माहिती मिळतेय. आपल्याला जिप्सीच्या सफरीमध्ये या गोष्टी काहीच पाहता येत नाहीत ना....

गायत्री आणि मैत्रेयी पुढे जात असतात...पायी चालता चालता निरीक्षण करत करत हे बोलणं चालू असतं.

मैत्रेयी: मांजर प्राणी वर्गातली विष्ठा ही मनुष्यप्राण्यासार्खीच (scat) असते पण त्यातला फरक एवढाच कि त्याच्या आकाराप्रमाणे ती रानमांजर, बिबळ्या,वाघ यांच्यापैकी कोणाची हे ओळखता येऊ शकत. त्यात जर राठ काळे केस दिसले तर बिबळ्याने दोन दिवसांपूर्वी रानडुक्कर खाल्लं आहे हे लक्षात येतं.

गायत्री: अगं...तू मगाशी मला काहीतरी सांगत होतीस...पद्धतीबद्दल..मी विचारलं ना तुला...झाडं कशी ओळखायची वगैरेर...मग तुझा पाय पडला. मग तू म्हणालीस नंतर सांगते...

मैत्रेयी: अग हो..हो. आठवतयं मला....हर्बेरीयम आणि बार्क ऑटोग्राफ अशा दोन पद्धती आहेत.

गायत्री: म्हणजे काय करायचं त्यात?

मैत्रेयी: झाडावर कागद ठेवायचा, पेन्सिल घेऊन खरवडायचं. ती इन प्रिंट नंतर match होतेय का ते पहायचं. हर्बेरीयम मध्ये झाडाची फुलं,पानं त्यातून पाणी काढून टाकायचं आणि ते preserve करायचं. या इन्फो कलेक्शन टेकनिक्स आहेत. गायत्री , ते बघ ....

गायत्री: बापरे ...कोणी आलं का? गायत्री पटकन मागे वळून पाहते.
मैत्रेयी: अगं कोणी आलं नाहीये....मी तुला ती वेल दाखवतेय. आता पटकन दिसली. माहूरवेल म्हणतात तिला. नाजूक असतात पण खोडाइतक्या मोठ्या असतात.

गायत्री आणि मैत्रेयी जवळ जाऊन त्याचं निरीक्षण करतात.

मैत्रेयी: गायत्री, मला सांग....general knowledge question विचारतेय....

गायत्री: अरे बापरे....अग माझ्या नावात फक्त GK आहे गं...गायत्री कशेळकर. पण बाकी सगळी गंमतच आहे.

मैत्रेयी: ते जाऊदे गं...गंमत म्हणूनच विचारतेय....
बांबूच वन हे काय आहे? झाड? गवत? की झुडूप?

गायत्री: गवत नक्कीच नाही....झुडूप पण नाही...झाडचं आहे...
Answer lock किया जाय.

मैत्रेयी: hahahha....सोलिड उत्त्तर चुकलेलं आहे गं...hahhaha.

गायत्री: एकतर मी पहिल्यांदी जंगलात आले आहे....त्यात माझं gk धन्य...त्यात तू हसं मला...

मैत्रेयी: रागवू...नको ग. hahhaha...नाही हसतं...hahahha.

गायत्री: हेच किती हसत सांगतेयस...जाऊदे..काय आहे खरं उत्तर?

मैत्रेयी: बांबुच वन हे गवत आहे. tallest गवत. ते एकाच दिशेला वाढत जातं त्यामुळे बांबुच वन सलग दिसतं. आणि सगळ्यत interesting म्हणजे ४० वर्षातून एकदा फुलं येतं आणि मग बांबू मारतो.
गायत्री: ohhh....४० वर्षातून एकदा फुलं? सही यार.

गायत्री आणि मैत्रेयी चा परतीचा प्रवास सुरु झालेला असतो.
वेळ ५.३० संध्याकाळी.

गायत्री: हा किर्र आवाज रातकिडे ना ग...

मैत्रेयी: नाही...आपल्याला रातकिडे वाटतात पण ते रातकिडे नसतात. तर शोधायला अवघड असतील असे cicada नावाचा कीटक असतो तो.

गायत्री आणि मैत्रेयी यांची जीप्सीची सफर आणि पायी ट्रेल पूर्ण होतो. आता यापुढे जंगल सफर अजून एका अनोख्या पद्धतीने करणार आहेत. यासाठी पुढचा भाग जरूर वाचा.

























































































































   


Sunday, December 4, 2016

जंगल बुक - जंगल गप्पा - भाग ५.

जंगल बुक - जंगल गप्पा - भाग ५.

पूर्वरंग : मैत्रेयी: ते? गुळगुळीत, गुलाबीसर ते ना ?

गायत्री : हिरवट खोडं आहे ना ते विचारतेय...

मैत्रेयी: होहो...तेचं मी पण तेचं म्हणतेय अगं. त्या झाडाचं नाव अर्जुन आहे.
अर्जुन आणि कदंब या झाडांखाली पाणी जास्त प्रमाणात असतं.

त्याचं झाडावर गायत्री आणि मैत्रेयीला चार चार नखांचे निशाण दिसले..ते निशाण अगदी वर पर्यंत होते..

विचारल्यावर गाईड ने सांगितलं की, यावर अस्वल चढला होता. त्यावर त्याच्या नखांचे निशाण त्यांनी पहिले...आणि जीप्सीची वेळ संपल्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास परत सुरु झाला.

यापुढे ........

जीप्सीची सफर पूर्ण करून आता गायत्री आणि मैत्रेयी पायी ट्रेलची सफर सुरु करतात..पायी ट्रेल म्हणजे थोडक्यात चालता चालता बऱ्याच गोष्टी अभ्यासकांना निरीक्षणातून लक्षात येतात. जीप्सीची सफर ही macro habitats पाहण्यासाठी होती तर पायी ट्रेल हा micro habitat पाहण्यासाठी आणि निरीक्षणासाठी असतो.

ताडोबा जंगलातला पायी ट्रेल.......

गायत्री: मैत्रेयी, मला आज पायी ट्रेलची उत्सुकता आहे गं, पण तेवढीच भीती वाटतेयं. आज तर चक्क चालत जायचं आहे...बापरे!!

मैत्रेयी: आपल्यासमोर लगेच वाघ उभा राहणार नाहीये. आणि तू फक्त प्राण्यांचा विचार नको करूस...हे बघं, ...( मैत्रेयी च वाक्य थांबवून...)

गायत्री: हो हो हो....जंगल म्हणजे प्राणी सोडून सुद्धा बऱ्याच गोष्टी येतात...आता पाठ झालंय मैत्रेयी...हाहाहाह.

मैत्रेयी: हाहाहा...पाठ झालयं तरी तेच विचारतेस. असो, घेतलसं का सगळं? आज पायी ट्रेलची तयारी आठवतेय ना?

गायत्री: Yes Boss....दुर्बीण, वही-पेन, पाण्याची बाटली घेतली आहे...आणि हो, हे शूज आणि..आणि...हं...आता एकदम मळकट कपडे घालायचे आणि निघायचं. बरोबर ना ?

मैत्रेयी: बरोबर....विद्यार्थी तसा हुशार आहे. हे घाबरण प्रकार सोडला तर...

गायत्री: हाहाहा....हो तुझं पण बरोबर आहे. बर ऐकं ना, आपण पायी ट्रेल कुठून सुरु करणार आहोत?

मैत्रेयी: ताडोबा जंगलातला सगळ्यात एव्हरग्रीन भाग म्हणजे पंचधारा आणि तिथून पुढे आपण जाणार आहोत....आणि सोबत ठाकूर म्हणून गाईड आहेत. Expert आदिवासी.

गायत्री: ohh....ठीके. म्हणजे तारू मंदिराच्या भागात ना. मस्त आहे तो area...आपण जिप्सीतून जात होतो तेव्हाच जावसं वाटतं होतं मला.

-----संपूर्ण तयारी करून गायत्री आणि मैत्रेयी ची पायी ट्रेल सुरु होते.----
वेळ दुपारी ३.३०. तारू मंदिराचा भाग. तलावाजवळच्या पायऱ्यांवर दोघी आणि ठाकूर बसले आहेत.

मैत्रेयी: गायत्री, आता कर या तलावाचं निरीक्षण....

गायत्री: oyee...काही काय...यात काय निरीक्षण? पाण्यासारखं पाणी तर आहे. तालावासारखा तलाव.....

ठाकूर: असं नाहीये ताई....खूप काही आहे इथे. तलाव ही एक परिसंस्था म्हणू शकतो. हा तर पाण्याचा मुख्य स्त्रोत आहे. काय होतं...उन्हाळ्यात पाणी आटून जातं. तेव्हा सगळ्याच प्राण्यांना याचं तलावाचा आधार असतो.

मैत्रेयी: बरोबर म्हणत्यात ते. गायत्री, तलाव म्हणजे फक्त पाणी असं आपल्याला वाटतं. पण पर्यावरणाच्या दृष्टीने, हे फक्त पाणी नाही तर आसपास दिसतेय ती दलदल,झाडं,पाण्यातले जीव,पक्षी असं बरचं काही.

गायत्री: ओह्ह्ह.....मला आत्ता नीट कळतंय तलाव म्हणजे काय? शाळेतला  पर्यावरणाचा तास एखाद्या जंगलातच व्हायला हवा...नाही का?

ठाकूर: ते बघा, त्या तलावात मध्ये एक सपाट भाग, दगड दिसतोय का?

गायत्री: हो हो....काय आहे तिथे? (उत्सुकतेने)

ठाकूर: ताडोबा तलावाची खासियत आहे ही...मध्ये ते छोटं बेट आहे. आणि तिथे मासेमारी पक्षी पण येतात.

मैत्रेयी: हो...Osprey, Pied kingfisher( कवड्याधीवर ) असतात... आता या सीझन मध्ये हाच पाहायला मिळेल.



गायत्री: तो कसा ओळखायचा?

ठाकूर: खंड्या पक्षी असतो फक्त काळा-पांढरा रंगाचा असतो.... चला आता आपण पुढे जाऊया...एक पाचं मिनिटांत ही घळ उतरून जाऊया पुढे.

(चालता चालता.....)
(पंचधारा भागात जास्तीत जास्त जांभळाची झाडं असतात. एकूणच दमट, ओलसर, थंड वातावरण जाणवत होते.)

मैत्रेयी: गायत्री, ती बघ पटकन...ROCK GECKO. पाल आहे...आपल्या घरी जेव्हा पाली येतात तेव्हा याच जातीच्या असतात...घोरपड (Lizards) सुद्धा दिसू शकेल आपल्याला.

गायत्री: ओह्ह...आज नाव समजलं.

ठाकूर: आपल्याला सरडे पण दिसतील....काही सरडे जे पुढून केशरी रंगाचे असतात आणि मागून काळे ....ते दाखवतो तुम्हाला...

मैत्रेयी: हो...बरोबर...त्याला Forest Calotes म्हणतात.

पुढे जाता जाता तलाव आणि पंचधाराच्या मध्ये...........

गायत्री: तो कोणता पक्षी आहे मैत्रेयी?

मैत्रेयी: तो...हां, विटकरी रंगाचा आहे तो नां....तो, Cinnamon Bittern. अगदी छोट्या आकाराचे असतात...बगळे असतात तेवढे.

तलावाच्या कडेवरून जात असताना झाडाच्या वरती दिसलेले दृश्य.....

गायत्री: बापरे...मैत्रेयी, अगं हे काय आहे?

मैत्रेयी: अगं घाबरू नको....खूप काड्या गोळा करून तयार केलेलं हे नेस्ट आहे...Grey Headed Fishing Eagle पक्ष्याचं नाव...

ठाकूर: आणि हो, या घरट्याची एक गंमत आहे...दरवर्षी तो नवीन असं घरट करत नाही तर यातचं बदल करत असतो....

गायत्री: ओह्ह....पायी ट्रेल मध्ये किती नवीन नवीन शिकायला मिळत गं...मजा येतेय. हे कधीच काहीच माहित नव्हत....
oops....हे काय आहे आता????

मैत्रेयी: मोठ आहे गं...ह्म्म्म....हे वारूळ आहे.

गायत्री: एवढ मोठं? almost आपल्या उंची इतकं आहे..

ठाकूर: याचं जंगलात खूप महत्त्व आहे मात्र....

गायत्री: वाळवीच? एवढं काय महत्व?

ठाकूर: झाडं जेव्हा पडतात, मरतात तेव्हा हीच तर वाळवी असते...जी सगळी साफ सफाई करते...हाहा.

मैत्रेयी: हो बरोबर आहे...अग झाडांमधलं सेल्युलोज ही वाळवी खाते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो...की जर ही वाळवी नसेल तर जंगलांमध्ये लाकडांचा ढीग जमा झाला असता.

ठाकूर: हो, आणि अभ्यासकांनी सांगितलं आहे...त्याप्रमाणे यात मुंग्यांनी कॉलनीज केलेल्या असतात..आणि आतमधलं वातावरण हे ५ ते ७ डिग्री कमी असतं..आपल्या हवेपेक्षा.

गायत्री: सही...वाळवीचं इतकं महत्त्व असेल असं अजिबात नव्हत वाटलं. मूर्ती लहान पण कीर्ती महान असं आहे बहुतेक तीचं...हाहाहा....पण मग वाळवी कोणाचं अन्न आहे..?
ठाकूर: अस्वलाचं आवडत खाद्य वाळवी....

गायत्री: ओह्ह्ह........अस्वल. अच्छा.

मैत्रेयी: eee....हे बघा ....एकदम शांत.

गायत्री: काय झालं ग?

मैत्रेयी: इथून घोरपड गेली असणार ...हो ना?

ठाकूर: बघू.....होहो. बरोबर.

गायत्री: तुम्हा दोघांना कसं कळल?

मैत्रेयी: घसरत गेल्यासारख्या खुणा आहेत बघ....आपल्याला यावरून कोणता प्राणी गेलाय हे कळू शकतं गायत्री.

गायत्री: बापरे...साप!!

ठाकूर: अहो, घाबरू नका. साप म्हटलं कि सगळ्यांना वाटत की, हा विषारीच असणार. पण असं नसत. सापांच्या बाबतीत खूप अंधश्रद्धा आहेत. हे बघा, जर खुणा वळणावळणाच्या असतील तर तो साप विषारी असतो पण अपवाद नाग. आणि बिनविषारी साप असेल तर तो सरळ जातो पण याला अपवाद आहे अजगराचा.

गायत्री: ओह्ह्ह.....हे पण किती नवीन आहे. कोणते कोणते साप विषारी असतात....?

मैत्रेयी: नाग, मण्यार आहे, फुरसं....

ठाकूर: घोणस सुद्धा....

काही वेळ न बोलता निरीक्षण करत करत पुढे जाताना अचानक.........

ठाकूर: दोघींनी थांबा....एकदम शांत.

गायत्री: काय झालं?

ठाकूर: तिथे पानांमध्ये हालचाल दिसतेय?

मैत्रेयी: हरण टोळ असणार....

गायत्री: काय?????????बापरे...हरण.....अगं चलं...मला जाम भिती वाटतेय.

मैत्रेयी: अगं....eee, सापाचा प्रकार आहे. Vine Snake. तो निमविषारी असतो. पूर्ण विषारी नाही पण बिनविषारी सुद्धा नाही.


गायत्री: अगं किती बारीक आहे....बापरे !!!!

पुढे जाताना पुन्हा एकदा अचानक रस्त्याच्या मधोमध....

गायत्री लांबूनच.....eee, तिथे पुढे नको जाऊया...आहे काहीतरी तिथे.

मैत्रेयी: काय आहे? अग, याला  SIGNATURE  SPIDER म्हणतात. X  ची खूण केलीये बघ...हीच त्याची सही.


गायत्री: ओह्ह..काही करणार नाही ना?

ठाकूर: नाही नाही....एक सोपा निसर्गाचा नियम आहे...आपण जोपर्यंत कोणत्याही प्राण्याला काही करत नाही..तोपर्यंत ते सुद्धा आपल्याला काहीही करत नाहीत...दुनिया इतनी भी बुरी नही....

गायत्री: ओह्ह्ह...हाहाहा....yes. नेहमी लक्षात ठेवीन....

ठाकूर: तर मी हे सांगत होतो... की, या कोळ्याचा मोठा आकार असतो तो मादीचा, आणि लहान असतो तो नर. मादी नराचं प्रजननानंतर भक्षण करते.

गायत्री: ओह्ह....मादी dominant आहे म्हणजे.

मैत्रेयी: इथे wood spider पण असतील.


गायत्री: इथे कायं कायं आहे यारं....मजा येतेय. वाळवीचं महत्त्व, साप, वेगवेगळी झाडं, तलाव....त्याचं महत्व किती शिकलेय आज मी. superb वाटतयं.

मैत्रेयी: अगं अजून बरचं बरचं काही आहे...

ठाकूर: हो,जंगल म्हणजे कितीही बोललो तरी कमीच.

गायत्री: खरंय...ऐकां ना, आपण ५ मिनिटं जरा थांबूया का? तहान लागलीये. पाणी पिते.

मैत्रेयी: गायत्री, जंगलात कधी हरववलीस आणि तुला तहान लागली असेल आणि पाणी नसेल तर एक झाड सांगून ठेवते...

गायत्री: oyee...दुष्ट. असं काय बोलतेस. मी हरवले तर ? ओह्ह्ह..बापरे.

मैत्रेयी: अगं उदाहरण म्हणून सांगतेय गं...पुढे लागेल एक झाड माहूरवेल म्हणून. त्या खोडाला स्लॉट केला की त्यात अगदी स्वच्छ पाणी मिळेल.

गायत्री: ओह्ह...असं पण आहे इथे ...सही यार. निसर्गाची किमया अफाट आहे.

(पायी ट्रेल करताना आम्ही ५ मिनिटांची विश्रांती घेतली आणि मग पुढे प्रवास सुरु केला. पुढचा पायी ट्रेल पुढच्या भागात.)  

Experienced  Shared By--- मैत्रेयी भावे 
Content Writer and Developer --- आर.जे गायत्री कशेळकर  
Photo Courtesy---  लतीश डेकाटे, सम्जुक्ता मोकाशी, स्नेहा वगळ, सोनल नाईक
 ------------------------------------------------------------------






















Saturday, November 19, 2016

जंगल बुक जंगल गप्पा भाग ४

पूर्वरंग : गायत्री: पण वाघ ??
मैत्रेयी: ऐकू येतंय काही? खूप लांबवरून लंगुरांचा आवाज येतोय. वाघ तिथे गेल्यामुळे ते एकमेकांना अलर्ट करत आहेत...हा त्यांचा अलार्म असतो...
गायत्री : ohh.......वाघ jus miss झाला म्हणजे. पण हो, वाघ आसपास आहे हे खाणाखुणांवरून पाहता आल यात जास्त थ्रील आहे. 
मैत्रेयी: खरयं..
 (गायत्री आणि मैत्रेयी एकमेकांना टाळ्या देतात...एक वेगळं थ्रील अनुभवल्याचा आनंद दोघींच्याही मनात असतो.)

 जंगल बुक जंगल गप्पा भाग ४


(गायत्री आणि मैत्रेयीची जीप्सीची सफर चालू आहे...जीप्सी म्हणजेच या open जीप मधून फिरण्याचा गायत्रीला खूपच आनंद झाला आहे. कारण ही सफर तिची पहिली सफर आहे. वाघाची पुसटशी चाहूल त्यांना मागच्या भागात लागल्याचं
आपण वाचलं...आता आज त्यांना काय काय नवीन गोष्टी ही जीप्सीची सफर घडवून आणतेय हे पाहूया...)

गायत्री: मैत्रेयी, इथे वाघ आहे असं मघाशी ऐकलं तेव्हाच्या थ्रिलिंग झटक्यातून बाहेरच आलेच  नाहीये गं....

मैत्रेयी: हाहाहा....होऊ शकत असं...आज आपण प्राणी पक्षी यापलीकडे जाऊन जंगलाची भौगोलिक रचना म्हणजेच टोपोग्राफी समजून घेऊया. मजा येईल. काहीतरी नवीन.

गायत्री: yes. हीच जिप्सीची गंमत मला अनुभवायची होती.

मैत्रेयी: चलो, आता त्यासाठी तलावाच्या दिशेने जाऊया..

गायत्री: तिथे पण वाघ आहे का?

मैत्रेयी: आता बास हां गायत्री....वाघच पाहायला आलीयेस का फक्त. एकदम चूप. तिथे संजय दादाच कॅन्टीन होतं. आता बंद झालं आहे. पण हा एक मोठा Landmark आहे.

गायत्री: पण संजय दादा कोण????

मैत्रेयी: जंगलातल एक कॅन्टीन होत. त्याच कॅन्टीन होतं ते.

गायत्री: अरे वाह.....इथे पण कॅन्टीन...बरोबर भूक तर लागणारच ना...शेवटी आपण माणूस आहोत...( गायत्री एकटीच बडबडत असते.)

मैत्रेयी: पूर्वी ना, आसपास राहायची सोय होती. आता बफर झोन मध्ये राहण्याची सोय आहे. इकडून मागे गेलो आणि जरा चाललो कि, तलावाच्या काठावर पायऱ्या आहेत आणि तिथेच मंदिर आहे.
  
गायत्री: मंदिर? कॅन्टीन? हे सगळचं असतं जंगलामध्ये....मला आज पहिल्यांदी कळतंय...कोणतं मंदिर? म्हणजे देव कोणता? गणपती ?

मैत्रेयी: नाही, तारू देव. असं म्हणतात की, प्रत्येक जंगलाचा एक देव असतो....तो जंगलाच रक्षण करतो असं म्हणतात. रात्रीच्या वेळी हा तारू देव घोड्यावरून येतो आणि जंगलाच रक्षण करतो असं या लोकांच म्हणण आहे...

गायत्री: ohhh...अच्छा!! मैत्रेयी, ते बघ पटकन..अगं डावीकडे....बघ. पांढर झाड आहे का ??????

मैत्रेयी: हो, करू नाव आहे त्याचं. याला घोस्ट ट्री सुद्धा म्हणतात.....( गायत्रीचे घाबरलेले हावभाव पाहून) घाबरू नकोस...गायत्री.

गायत्री: हो हो..नाही घाबरणार...प्रकाशात किती भारी दिसेल ना? बघ ना, सगळीकडे हिरवा, तपकिरी रंग आहे.......आणि मधेच हे पांढर झाड. भारीच !! निसर्गाची अनोखी किमया....  

( हे कॅन्टीन, मंदिर आणि झाड अशा काही वेगळ्या गोष्टी पाहून पुढे गेल्यानंतर पुढे दिसलेल्या काही गोष्टी....)

मैत्रेयी: गायत्री, आपण आता ज्या पुलावरून जातोय ना, त्याला साकव सुद्धा म्हणता येईल....

गायत्री: हो मी अगदी तेच म्हणणार होते तुला...कोणता area आहे गं हा...किती ग्रीनरी आहे सगळीकडे....मस्त वाटतयं.

मैत्रेयी: हो, हा पंचधारा नाला आहे. तुला थंडावा सुद्धा जाणवत असेल ना....कारण ताडोबामधला सगळ्यात थंड आणि ग्रीन असा भाग हा आहे. छोटसं amazon सुद्धा म्हणू शकतो.

गायत्री: एवढी ग्रीनरी आहे म्हणजे वेगवेगळे पक्षी, साप, सरडे बरेच असतील ना....

मैत्रेयी: हो आहेत की....पण ते आपण पायी जाणार आहोत नां तेव्हा नीट पाहायला आणि अभ्यासायला मिळतील.

( पुढे डावीकडे )

गायत्री: ते काय दिसतंय? पिंजरे आहेत का?

मैत्रेयी: हो अगं. सिमेंटच्या स्टेजवर मोठे जीर्ण झालेले पिंजरे आहेत. पूर्वीचं हे मगर प्रजनन केंद्र होतं. जेव्हा एखाद्या भागातील वैशिष्ट्य पूर्ण प्राण्यांची संख्या काही कारणांमुळे कमी होते तेव्हा त्या प्राण्याला त्या आदिवासातून बाहेर काढून स्वतंत्र देखरेखीखाली प्रजनन केलं जात. आणि त्यांची संख्या वाढवून परत नैसर्गिक आदिवसात सोडलं जात.

गायत्री: हो का? अच्छा.........

( केंद्रावरून.....पुढे डावीकडे गेल्यावर... )

गायत्री: wow....मस्त. तलाव लागलाय..तो बघ. हाच का तो तलाव ?

मैत्रेयी: गायत्री, हा ताडोबा तलाव आहे. फ्रेश water लेक. आणि हा जंगलाच्या साधारण मध्यभागी आहे.

हा मस्त तर आहेच...पण मगरी सुद्धा आहेत बरं का...हाहाहा.

गायत्री: मी आता कशालाही घाबरत नाहीये...कळलं का...हाह्हा.

मैत्रेयी: इथे सापडणाऱ्या मगरींना मार्श क्रोकोडाईल म्हणतात. पवई लेक मध्ये पण ह्याच आहेत.

( तलावाच्या आजूबाजूला दलदल होती..त्यात अनेक पक्षी, वनस्पती होत्या.)

मैत्रेयी: इथे दलदल आहे त्यामुळे waders पक्षी सुद्धा येतात. त्यात Common Sand Piper, Red Shank ,  Green Shank  हे पक्षी दिसत्यात बघ.

गायत्री तो बघ... तो करकोचा दिसतोय? त्याची चोच मोठी आहे आणि दोन चोचींमध्ये फट आहे... बघ. म्हणून त्याचं नावं Open Billed Stork आहे....

गायत्री: ohh. सही यार. eeee.......मगर आलीये बाहेर .....

मैत्रेयी: या मगरी आत्ता काठावर Sun Basking करत्यात. उबेसाठी त्या पाण्याच्या बाहेर येतात.


गायत्री: ओह्ह...बरोबर.

(त्यांना जिप्सीच्या फेरीतून यापुढे पांढरपावनी नावाचा भाग लागतो...जे माळरान म्हणून ओळखलं जातं.)

गायत्री: तसं हे ओसाड वाटतयं ना गं...

मैत्रेयी: हो, माळरान भाग आहे. चल, मचाणावर जाऊया. आणि मस्त पाणवठा पाहूया वरूनच...

 (आम्ही सगळे २ मिनिटांसाठी मचाणावर जातो. उंच मोठं लोखंडी मचाण असतं. तिथून गवा, चितळं, रानडुक्करं दिसू शकतात आणि नशीब चांगल असेल तर वाघ आणि रानकुत्रे सुद्धा दिसू शकतात. )

गायत्री: ते बघं...पटकन  तो कोणता प्राणी आहे?



मैत्रेयी: ग्रे आणि ब्राऊन रंगाची नील गाय आहे ती. तो प्राणी गायीसारखा वाटत असला तरी गाय नाही तो हरणाच्या जवळपास जाणारा प्राणी आहे. ग्रे आहे तो नर आहे. आणि ब्राऊन दिसतेय ती मादी आहे.

गायत्री: मस्त ....मचाणावरून खरचं जंगलाचा आवाका दिसतोय गं. डिस्कवरी चॅनल सारखा फील येतोय. आणि पाणवठ्यावर तर किती मोठे पक्षी आहेत ना? काळे आहेत पांढरे पण आहेत...आणि मान बघं गुलाबी ? ओह्ह...पाहिलंस का मैत्रेयी?

मैत्रेयी: yes....तो रंगीत करकोचा आहे. painted stork.

( पांढरपावनी वरून पुढे गेल्यावर दवणा waterhole लागले.)

गायत्री: लंगुर माती का खात आहेत गं ?

मैत्रेयी: हो. वनस्पतींमध्ये क्षारांचे प्रमाण खूप कमी असतं म्हणून शाकाहारी प्राण्यांची क्षारांची गरज भागत नाही. आणि त्यामुळे तीच गरज हे प्राणी ह्या मातीतले क्षार खाऊन भागवतात. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळीकडे ही माती पुरेश्या प्रमाणात नसते. त्यामुळे जंगल विभाग कृत्रिम मिठाचे ब्लॉक्स जागोजागी ठेवतात.


(पुढे जाऊन डाव्या बाजूला गायत्री आणि मैत्रेयीला बांबूच छोटं मचाण दिसतं.)

गायत्री: हे मचाण इतकं लहान का?

मैत्रेयी: हो, हे फक्त तीन माणसांकरता आहे. वन्यजीवगणनेसाठी अगदी योग्य असतात. या मचाणाचं नाव काळा आंबा आहे.

गायत्री: का पण ? काळा आंबाच का?

मैत्रेयी: या जंगलातल्या ठिकाणांची नावं काही आसपासच्या Specialities  वरून बरेच वेळा ठरतातं...आता ते बाजूला बघ. या आंब्याच्या झाडाचं खोड हे इतर आंब्याच्या खोडापेक्षा जास्त काळं आहे.

(त्याठिकाणी गायत्री, मैत्रेयी ला दिसतो तिपकिरी रंगाचा कोंबडा त्याच नाव Red Spurfowl . जंगलातल्या कोंबड्यांचा एक प्रकार.)

गायत्री: पटकनं पटकनं बघ......मैत्रेयी........तिकडे मांजर आहे का?

मैत्रेयी: हो, जंगल कॅट आहे ती. ती दिसणं म्हणजे आपण solid लकी आहोत.  
ते बघं, तिचे पगमार्क आहेतच इथे. वाघासारखेच आहेत पण आकार जरा लहान.



(पुढे काटेझरी या ठिकाणावरून जिप्सी जाते. आणि आंबट हिरा नावाचं ठिकाण लागतं जिथे परत एक मचाण आहे. )

गायत्री: ते झाड जरा वेगळ दिसतंय गं..गुरु...बोलिये...वो क्या है?

मैत्रेयी: ते? गुळगुळीत, गुलाबीसर ते ना ?

गायत्री : हिरवट खोडं आहे ना ते विचारतेय...

मैत्रेयी: होहो...तेचं मी पण तेचं म्हणतेय अगं. त्या झाडाचं नाव अर्जुन आहे.
अर्जुन आणि कदंब या झाडांखाली पाणी जास्त प्रमाणात असतं.

त्याचं झाडावर गायत्री आणि मैत्रेयीला चार चार नखांचे निशाण दिसले..ते निशाण अगदी वर पर्यंत होते..

विचारल्यावर गाईड ने सांगितलं की, यावर अस्वल चढला होता. त्यावर त्याच्या नखांचे निशाण त्यांनी पहिले...आणि जीप्सीची वेळ संपल्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास परत सुरु झाला.



पुढची सफर ----- पायी ट्रेल.

Experienced  Shared By Maitryee Bhave 
Content Writer and Developer RJ Gayatri Kashelkar    
Photo Courtesy- Maitryee Bhave, Snehal Vagal, Sonal Naik.