Friday, September 30, 2016
Thursday, September 29, 2016
overseas education
Hiiii friends, परदेशी शिक्षणाकरता ज्यांना जायचं आहे. त्याच्याशी निगडीत सर्व प्रश्नांचा
विचार करून सर्व विद्यार्थी-पालक यांना उपयोग होईल अशी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन
येत आहोत. मुलाखतीतून मार्गदर्शन करणार आहेत रुपाली ठाकूर madam.
विचार करून सर्व विद्यार्थी-पालक यांना उपयोग होईल अशी माहिती तुमच्यापर्यंत घेऊन
येत आहोत. मुलाखतीतून मार्गदर्शन करणार आहेत रुपाली ठाकूर madam.
ही मुलाखत लवकरच तुमच्यापर्यंत पोचेल..........
पण तोपर्यंत हा video तुम्ही नक्कीच पाहू शकता...आणि आम्ही माहिती देण्याआधी
त्यांना भेटू सुद्धा शकता....
त्यांना भेटू सुद्धा शकता....
Sunday, September 25, 2016
रायगडावरची कोजागिरी – भाग एक
या पावसाळ्यात आपल्यापैकी अनेकजणांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ट्रेकिंग केलं
असेल. कदाचित तुमच्यापैकी अनेकजण रायगडावर सुद्धा जाऊन आले असतील. पण परत एकदा
प्लान करायला काहीच हरकत नाही...काय ?? बरोबर ना?
कारण यावेळेची तुमची रायगडावरची सफर
अतिशय हटके आणि भन्नाट असेल यात वाद नाही. कसं काय विचारताय ?? सांगते...
कारणं अगदी point wise सांगायची झाली तर ...
1.सुप्रसिध्द संशोधक श्री. गिरीश जाधव यांच्याकडून
आपल्याला शिवकालीन ‘शस्त्र आणि शास्त्र’ याविषयीची माहिती मिळेल.
2.slide shows आणि शस्त्रांच प्रात्यक्षिक आपण पाहू शकणार आहोत.
3.सुप्रसिध्द इतिहास संशोधक आणि शिवसाहित्याचे
गाढे अभ्यासक श्री.पांडुरंग बलकवडे यांच्याकडून आपल्याला ‘छत्रपती श्री.
शिवरायांचा’ दैदीप्यमान आणि रोमांचकारी इतिहास ऐकता येईल.
4.आणि मित्रांनो, यासोबतच रायगडावरील
ऐतिहासिक स्थळांवर तर आपण जाणार आहोतच...म्हणजे बघा, कितीतरी नवीन माहिती, आणि एक
वेगळा प्रवास म्हणून तुमच्या कायम लक्षात राहील.
5.अविस्मरणीय शौर्य गाथा ऐकता
ऐकता कोजागिरी पौर्णिमेचा आनंद आणि सोबत मसाला दूध !!
इतकचं नाही तर रायगडावरच मुक्कामाची सोय !
आहे कि नाही भन्नाट आणि हटके सफर ??
आता पटकन एकूण दोन दिवसाचा प्लान कसा असेल यावर नजर घालूया...
शनिवार – १५ /१०/२०१६
पहाटे ७ वाजता- ठाणे/ शिवाजीनगर, पुणे याठिकाणी उपस्थित रहावे.
ठीक ७.३० वाजता रायगडाच्या दिशेने आपला बस प्रवास सुरु होईल..
अंदाजे ९ वाजता- चहा, नाष्टा
अंदाजे १ – जेवण
रायगडाच्या पायथ्यापर्यंत – बस प्रवास
पायथ्यापासून गडापर्यंत – गंडोला प्रवास ( रोप वे )
३.३० वाजता आपण रायगडावर असाल.
४.३० वाजता - सुप्रसिध्द संशोधक श्री. गिरीश जाधव आपल्याला शिवकालीन ‘शस्त्र
आणि शास्त्र’, slide shows आणि शस्त्रांच प्रात्यक्षिक आपण पाहू शकणार आहोत.
६.३० वाजता- चहा, snacks
७ वाजता - सुप्रसिध्द इतिहास संशोधक आणि शिवसाहित्याचे गाढे अभ्यासक श्री.पांडुरंग
बलकवडे यांच्याकडून आपल्याला ‘छत्रपती श्री. शिवरायांचा’ दैदीप्यमान आणि
रोमांचकारी इतिहास ऐकता येईल.
रात्री ९ वाजता – जेवण
ऐतिहासिक स्थळांना भेटी आणि शौर्य गाथा.
रात्री १२.३०- मसाला दूध
मुक्काम – रायगडावरच !
रविवार - १६/१०/२०१६
९ वाजता- चहा, नाश्ता
परतीचा प्रवास सुरु ......................
ठाणे येथे सहलीची सांगता .
Sooo Friends ........................BE READY
......................................
अधिक माहितीसाठी संपर्क – 9819926344/ 7506260303
organised by.....
RJ GAYATRI KASHELKAR
CONTENT WRITER AND DEVELOPER
Friday, September 23, 2016
बोलू आनंदे
संभाषण कौशल्य, संवाद अगदी इंग्रजीत सांगायचं झालं तर communication
skills अशा सगळ्याच गोष्टी
आपण नेहमी ऐकतो. पण फक्त ऐकतो आणि सोडून देतो. हा विषय सोडून देण्यापूर्वी आपण
सगळ्यांनी एक गोष्ट करून पाहूया....
आता मी ज्यांची नावं लिहिली आहेत त्यांच्याशी आपण कसा संवाद साधतो?
त्यांच्याशी रोज कसं बोलतो? हे एकदा आठवून पाहूया....
भाजीवाला/भाजीवाली? वॉचमन? कचरा उचलणारे? ऑफिसमधील शिपाई वर्ग? घरातील
कुटुंबीय?
तुम्ही आत्ता तुमचं तुमचं आठवून पाहिलं असेल....त्याचं उत्तर सुद्धा
तुमच्याकडेच राहू द्या...
पण हो...सांगायचा मुद्दा इतकाच कि आपण आपल्या आयुष्यात अशा अनेक व्यक्तींसोबत
संवाद साधत असतो..आणि हा संवाद आपली ओळख असते.आपण साधत असलेल्या संवादाचा आपल्या
व्यक्तीमत्त्वावर नकळत परिणाम होत असतो. खरतरं ते एक छान आणि छोटसं वर्तुळच
आहे. म्हणजे
उत्तम संवाद – उत्तम व्यक्तिमत्व आणि ज्याचं व्यक्तीमत्त्व उत्तम असतं ती व्यक्ती कायम सगळ्यांच्या लक्षात
राहते........
याच संभाषण आणि संवाद कौशल्य या महत्त्वाच्या विषयावर ज्ञान प्रबोधिनी
(डोंबिवली विस्तार केंद्र) संवादिनी गटातर्फे महिलांसाठी एक खास जाहीर कार्यक्रम
आयोजित केला आहे. आणि या कार्यक्रमात सौ.दिपाली श्रीराम
केळकर या ‘बोलू
आनंदे’ या विषयावर एकपात्री प्रयोग सादर करतील.
दैनंदिन आयुष्यातला संवाद, निवेदन, सूत्रसंचालन आणि
मान्यवरांचे काही किस्से तुम्ही या कार्यक्रमात ऐकू शकता............सौ.दिपाली श्रीराम केळकर यांच्याकडून.
दिनांक – २५ सप्टेंबर २०१६
वेळ : सायं ५ ते ७
ठिकाण : सत्य हॉल,जुन्या रेशन ऑफिस मागे, भागशाळा
मैदानाशेजारी, डोंबिवली पश्चिम.
अधिक माहितीसाठी संपर्क - ९९६९९७४१७४
अधिक माहितीसाठी संपर्क - ९९६९९७४१७४
आरजे गायत्री कशेळकर
Friday, September 16, 2016
sizzle desi -- खास आणि खुसखुशीत गप्पा.
शेफ पराग जोगळेकर यांच्यासोबत मारलेल्या sizzle
desi बद्दलच्या खास आणि
खुसखुशीत गप्पा...
आरजे गायत्री : Sizzle Desi हे हॉटेलचं नावच खूप interesting आहे. या नावामागची काही
गंमत??
शेफ पराग जोगळेकर : हो नक्कीच, माझ्या
मुलीने हे नाव सुचवलं आहे म्हणून अर्थातच ते मला जवळच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे
आमच्या हॉटेलचा USP या नावामध्ये आलेला आहे.
गायत्री : अरे वा !! हा USP अर्थातच, Sizzle
Desi च्या नावाची आणि पदार्थांची खासियत
आम्हाला पण जाणून घ्यायला आवडेल.....
शेफ पराग जोगळेकर: yes. नक्की. Sizzle
Desi चा USP अगदी एका
वाक्यात सांगायचा झाला तर world cuisine with desi touch. Sizzler
plate मध्ये खवय्यांना नेहमी पाहायला मिळेल असा आगळावेगळा देसी टच आपल्याकडे असतो.
गायत्री : सर, हा world cuisine
with desi touch प्रकार ऐकून इतका भन्नाट आणि हटके आहे तर खाताना किती मजा
येईल....आणि या देसी टच मध्ये नेमके कोणते पदार्थ येतात?
शेफ पराग जोगळेकर: हो...खाताना काहीतरी
वेगळ टेस्ट केल्याचा feel प्रत्येकालाच येतो...यात बघ, Paneer grilled
with garlic paper sauce, corn and cheese balls with barbeque sauce, धुवे वाली
बिर्याणी असा जरा वेगळा twist असतो. spanish paella rice या रेसिपीच सुद्धा एक वेगळ preparation या आपल्या
sizzle Desi मध्ये होत असतं. शिवाय अशा बऱ्याच veg पदार्थांसोबतच nov-veg सुद्धा
पदार्थ आहेत.
गायत्री : कमाल !! sizzleres मध्ये इतका
वेगळेपणा असू शकतो याची कल्पनाच नव्हती केली. मग या देसी फीलच्या खवय्येगिरी मध्ये
आपले मराठमोळे पदार्थ पण असतीलच ना?
शेफ पराग जोगळेकर: हो, yes. ते तर अगदी
हमखास....आपल्याकडे उपवासाचे sizzleres, भरल्या वांगीचे sizzleres, पुरणपोळी stuff
with रबडी topped with vanilla ice cream and topped with hot
chocolate sauce.
गायत्री: अफलातून.....पुरणपोळी काय...उपवासाचे पदार्थ
काय...भरली वांगी....म्हणजे आता सीझलर विथ मराठी टच आणि twist म्हणूया.....
शेफ पराग जोगळेकर: आणि हे उपवासाचे पदार्थ
आमच्याकडे चार प्रकारचे आहे....अगदी आपण घरी करतो तसे सगळेच उपवासाचे पदार्थ
आपल्याकडे आहेत....साबुदाण्याची खिचडी,वरी तांदूळ, रताळ्याचा किस, साबुदाणा वडा,बटाट्याची
भाजी, काकडीची कोशिंबीर वगैरे सगळचं...पण जेव्हा हे सगळे पदार्थ sizzling
platter वर येतात तेव्हा तो येणारा चुरर्र......र्रर्र असा आवाज
आणि एक अप्रतिम sizzling effect अनुभवायला आणि खायला
मिळतो. आणि आम्ही मागच्या वर्षी किवी, पायनॅपल,चॉकलेट हे सिझलिंग मोदक सुद्धा केले
होते. एक वेगळा प्रयोग !!
गायत्री: तुमच्या सगळ्याच कल्पना खूपच छान आहेत. हे
उपवासाचे सीझलर्स खायला मी तर येणारच आहे....नेहमी असतो का हा खास बेत?
शेफ पराग जोगळेकर: दर आषाढीला हा बेत असतो
आणि आता १९ तारखेला म्हणजेच चतुर्थीला हा बेत असणार आहे...
गायत्री : अरे वा !! सीझलिंग इफेक्ट सोबत उपवास करायला
आणि या भन्नाट उपवासाच्या पदार्थांवर ताव मारायला नक्कीच मजा येईल....
शेफ पराग जोगळेकर: yes. नक्कीच !!. always
welcome
गायत्री: आणि इथे अतिशय चांगली गोष्ट ही आहे कि
व्यवस्थित गाडीला पार्किंग आहे आणि सर्विस रोड असल्यामुळे शांतता सुद्धा जाणवते.
शेफ पराग जोगळेकर: हो...ते खरयं.
गायत्री: उपवासाचे sizzlers खायला नक्की येणारे....म्हणजे
हं १९ तारखेला...चला येते. bye.
शेफ पराग जोगळेकर: हो नक्की या. yes bye.
sizzle Desi- एक वेगळी आणि हटके खवय्येगिरी.
( पदार्थ ) मूळ संकल्पना : शेफ पराग जोगळेकर.
1,Trishul Apt, Besides
Celebration Hall, Eastern express Highway, service road,Panchpakhadi , Thane
4000602
Hotel no: 022-25339741/51
written by Gayatri
kashelkar.
DigitalMindS’pace
Wednesday, September 7, 2016
संगीत संशयकल्लोळ मधील रेवती....
डोंबिवलीसारख्या सांस्कृतिक
शहरातला जन्म. वडील पेशाने चित्रकार आणि आई शिक्षक. त्यामुळे कलेचा वारसा आणि ती
कला जपण्यासाठी घ्यायची मेहनत आणि सातत्य याचं बाळकडू घरातूनच मिळालेलं. आणि याच
संस्कारांशी प्रामाणिक राहून मेहनत घेऊन जिने
संगीत, नृत्य आणि आता अभिनय शिवाय शैक्षणिक करियर या सगळ्याचा उत्तम मेळ साधत थेट संगीत नाटकाचा मंच गाठला ती
म्हणजे अर्थातच डोंबिवलीची उमा पळसुळेदेसाई. आणि आता तिची खास ओळख म्हणजे संगीत
संशयकल्लोळ या नाटकात रेवतीची भूमिका करणारी आणि याच नाटकासाठी अखिल भारतीय
नाट्यपरिषदेचा सर्वोत्कृष्ट नाट्य अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवणारी उमा पळसुळेदेसाई.
उमाचा
संगीताचा प्रवास वयाच्या सातव्या वर्षीपासूनच सुरु झाला. सुरुवातीला पं. नारायणबुवा जोशी आणि त्यांनतर
पं. मधुकर जोशी यांच्याकडे तिने संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली. आणि विशेष
म्हणजे संगीताची कोणतीही परीक्षा न देता फक्त गुरु- शिष्य परंपरेने हे संगीताचे
तिचे शिक्षण चालू आहे. संगीतासोबतच नृत्यातही तिची विशेष आवड असल्यामुळे कथक नृत्यांगना
ज्योती शिधये यांच्याकडे तिने कथकचे प्रशिक्षण घेतले. आणि भारती विद्यापीठातून ती
कथक विशारद आहे. आता गांधर्व महाविद्यालयातून विशारद करण्यासाठी तिची तयारी सुरु
आहे.
लहानपणापासूनच गाण आणि नृत्य या दोन्ही
कलांचा सराव, रियाज, स्पर्धा, कार्यक्रम असा एकूणच मेळ साधत तिने तिच्या शैक्षणिक
अभ्यासाकडे सुद्धा कधी दुर्लक्ष केले नाही. विद्यानिकेत शाळा तर कॉलेजची चार वर्ष
रुईया मधून कला शाखा आणि शेवटच वर्ष पेंढारकर महाविद्यालातून तिने पूर्ण केलं. दहावीनंतर
मेडिकल मध्ये करियरचा विचार करत असतना उमाला वाचपेई सरांचा फोन आला आणि तिने कला
शाखेत करियर कराव असा त्यांनी सल्ला दिला. त्या नंतर तिने कला शाखेत प्रवेश
घेण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांनतर तिने तिच्या सगळ्या कलांकडे आणखीन
प्रामाणिकपणे लक्ष द्यायला सुरुवात केली. आणि तोच तिच्या आयुष्यातला टर्निग पोइंट
ठरला असे म्हणता येईल. त्यानंतर उमाने मानसशास्त्र विषयात पदवी घेऊन ती पुढील
शिक्षण आता क्लिनिकल सायकॉलोजी या विषयात
घेणार आहे. शाळा – कॉलेजांमध्ये असल्यापासूनच अभ्यास, गाण्याचा रियाज, नृत्याचा
सराव, परीक्षा शिवाय संगीत-नृत्याचे कार्यक्रम, स्पर्धा या सगळ्या गोष्टींना समान
महत्त्व देत त्यात सातत्य कायम ठेवलं. पूर्वी ज्या स्पर्धांना ती स्पर्धक म्हणून
जायची आज ती त्याच स्पर्धांना आता परीक्षक म्हणून जाते. संगीत संशयकल्लोळ या
नाटकासाठी तिची झालेली निवड ही काही तासात झालेली निवड जरी असली तरी सुद्धा
इथपर्यंत येण्याचा प्रवास हा दहा वर्षांच्या मेहनतीचा होता.
गुरु शिष्य परंपरेने गाण शिकत असताना नवीन
काहीतरी शिकण्याचा उमाचा मानस कायम होता. यामध्ये तिला रामदास कामत, रजनी जोशी,
अर्चना कान्ह्रेरे, श्रीकांत दादरकर, व शुभदा दादरकर अशा दिग्गज मंडळींचं
मार्गदर्शन लाभलं. त्यातून खऱ्या अर्थाने
तिचा नाट्यसंगीताचा प्रवास सुरु झाला. तिने
नाटयसंगीताचा डिप्लोमा पूर्ण करून त्यातही प्रथम क्रमांक मिळवला. आणि त्यावेळी ते
बक्षीस तिला दिग्गज कलाकार प्रशांत दामले यांच्या हस्ते मिळालं. नृत्य आणि
संगीतासोबतच तिला अभिनय करण्याची इच्छा आणि एक मनातून आत्मविश्वास होता.
त्यामुळे अभिनयाची सुरुवात तिहाई निर्मित
गेंडा या नाटकापासून झाली. तिहाईचे संचालक मिलिंद अधिकारी यांच्याकडून तिने
अभिनयाचे धडे घेतले. आणि त्यातील तिची प्रगती पाहून आणि रीतसर ऑडीशन देऊन तिला संगीत संशयकल्लोळ या
नाटकात रेवतीची भूमिका करण्याची संधी मिळाली.
आजही इतक्या लहान वयात इतकी मोठी संधी
मिळूनसुद्धा उमाचा सराव, रियाज, खाण्या-पिण्याची पथ्य तितक्याच ताकदीने सुरु आहेत. शिवाय लहान वयात यश
कमावले असूनसुद्धा तिचे पाय मात्र जमिनीवर आहेत. आणि याच तिच्या गुणांमुळे ती अशा
अनेक संधींच सोनं करेल यात काहीच शंका नाही.
आरजे गायत्री कशेळकर.
Subscribe to:
Posts (Atom)





