Showing posts with label पर्यटन. Show all posts
Showing posts with label पर्यटन. Show all posts

Wednesday, August 2, 2017

उद्योग सफर भाग १- सारिका प्रभुदेसाई

      आज उद्योग सफर मुलाखतींच्या सिरीजची सुरुवात करत आहोत....

आजच्या उद्योग सफर भाग-१ मध्ये उद्योजिका सारिका प्रभुदेसाई हिच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. तिच्या व्यवसायाची रुपरेषा तसंच व्यवसायातला तिचा स्ट्रगल जाणून घेणार आहोत.

 सारिकाच्या कंपनीचं नाव एसआरपी हॉलिडेज्. दोन वर्षांपूर्वी तिने ही स्वतःची ट्रॅव्हल एजन्सी सुरु केली. आज जगभरात या क्षेत्रात इतकी स्पर्धा असतानाही सारिका वेगवेगळ्या कल्पनांसह  एक उद्योजिका म्हणून यात यशस्वीरित्या कार्यरत आहे. या कल्पना राबवताना पर्यटक हा तिच्या केंद्रस्थानी असतो. त्यामुळे पर्यटकांना त्यांच्या सुट्टीचा पुरेपूर आनंद घेता येईल व त्यांची सफर अविस्मरणीय ठरेल, यावर तिचा भर असतो.  त्यामुळे उद्योजिका या नात्याने कसा आहे सारिकाचा या क्षेत्रातला प्रवास,तिची सुरुवात,तिची मेहनत या सगळ्या पैलूंविषयी आपण बोलणार आहोत. 


गायत्री: नमस्कार!! तुझं 'उद्योग सफर 'मध्ये मनापासून स्वागत.... 

सारिका: धन्यवाद गायत्री !!


गायत्री: सुरुवातीला मला तुला हे विचारायला आवडेल....की,  एस.आर.पी- अर्थातच तुझी स्वतःची ट्रॅव्हल कंपनी. कशी सुरुवात झाली?

सारिका- माझी शैक्षणिक बॅकग्राऊंड एमबीए (फायनान्स) आहे. पण लहानपणापासून मी आईसोबत भरपूर फिरले आहे . त्यामुळे माझी खरी पॅशन फिरणं, ही आहे. सुरुवातीला एमबीए (फायनान्स) केलं असल्याने मी नंतर या क्षेत्रात नोकरी सुद्धा केली. पण नंतर ख-या पॅशनकडे वळले. सुरुवातीला अनुभव मिळावा म्हणून एका ट्रॅव्हल कंपनीमध्ये नोकरी केली. पण घरच्यांचाही पाठिंबा कायम होता त्यामुळे  पुढे याच अर्थात फिरण्याच्या पॅशनला व्यवसायात रुपांतरित करायचं ठरवलं. आणि १ मे २०१५ला 'एस.आर.पी हॉलिडेज'या माझ्या स्वतःच्या कंपनीची खऱ्या अर्थाने  सुरुवात झाली. आणि 'एस.आर.पी हॉलिडेज' ची सुरुवात करण्यात माझ्या नवऱ्याचा म्हणजेच रोहन चा खूप मोठा हिस्सा आहे. त्याचा सपोर्ट कायम होता आणि आहे. 

गायत्री-  अरे व्वा! आणि  आता कंपनी सुरु होऊन दोन वर्ष झाली सुद्धा!! खूप छान.. अभिनंदन!!

सारिका, पर्यटन हा विषय आजकाल सगळीकडेच चर्चेत असतो.  प्रत्येकाला फिरायला आवडतं. आणि आजकाल रिफ्रेश होण्यासाठी प्रत्येकजण तेवढा  खास वेळही आपल्या रुटीनमधून काढत असतो . आणि त्यामुळे स्पर्धा सुद्धा अधिक प्रमाणात दिसायला लागली आहे. 

 त्यामुळे तुझी टूर इतरांपेक्षा वेगळी असावी यासाठी  तू काय विशेष मेहनत घेतेस? एखादी टूर प्लॅन करताना तू काय अभ्यास करतेस?

सारिका-  हो, स्पर्धा तर आहेच. पण मी  प्रत्येक जागेचं विशेष काय आहे, ते जाणून घेते. शिवाय ट्रॅव्हल चॅनेल्सचाही आधार घेते. पायलट टूर करण्यावर माझा नेहमीच भर असतो. मॅप्स तयार करणं आणि मग एखादी टूर प्लॅन करणं, अशी माझ्या अभ्यासाची आणि पर्यायाने व्यवसायाची पद्धत मी ठेवली आहे.



गायत्री-  आजपर्यंत कोणकोणत्या टूर्स तू नेल्या आहेस?

सारिका- . गुजराथ , केरळ, राजस्थान, लेह-लडाख. मग जंगल सफरींमध्ये ताडोबा, बांदवगड, नागझीरा, कबिनी, बंदिपूर, रणथंबोर या ठिकाणी टूर्स झालेल्या आहेत. आता अंदमान-निकोबार, कर्नाटक, हिमाचल प्रदेश.., शिवाय आंतरराष्ट्रीय टूर्ससुद्धा हळुहळू सुरु होत आहेत. 

गायत्री: वाह !! क्या बात है! अनेक ठिकाणी टूर्स झालेल्या आहेत..पण व्यवसायाची खरी सुरुवात कोणत्या टूर ने झाली?  तुझी पहिली टूर आणि पहिले क्लायंट कोण? 

सारिका : हो अगदी खरं आहे. पहिली सुरुवात खूपच महत्त्वाची असते. मी पहिली टूर गुजराथला नेलेली. मुकुंद देवधर हे माझे पहिले क्लायंट. मला त्यांचे मनापासून आभार मानायचे आहेत कारण त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. आणि सगळ्या डोक्यातला, कागदावरच्या टूर्स च्या पॅकेजेस चा खऱ्या अर्थाने श्रीगणेशा झाला.   

गायत्री-  आजच्या स्पर्धेच्या काळात टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सच्या खूप कंपन्या आहेत. अशावेळी स्पर्धेत टिकण्यासाठी प्रत्येक व्यावसायिक आपला व्यवसाय इतरांपेक्षा वेगळा ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. तर मग, एस.आर.पी हॉलिडेचा  युएसपी ( USP) काय आहे? 

सारिका-  माझ्या टूर्स जेव्हा अॅरेन्ज होतात, तेव्हा माझे क्लाएंट्स कुठेही गेलेले असतील; त्यांचा प्रवास ठरल्याप्रमाणे होणं, ही संपूर्ण माझी जबाबदारी असते. पण कधी काही अडचणी येतात आणि तेव्हा जर मी त्यांच्यासोबत तिथे नसेन, तर  त्यांच्या अडचणी सोडवायला मी फोनच्या माध्यमातून चोवीस तास अव्हेलेबल असते. आणि दुसरं आणि  सर्वात  महत्त्वाचं मला असं वाटत  जे मी नक्की 'उद्योग सफर' मध्ये शेअर करेन ते म्हणजे म्हणजे माझ्या टूर्सचं बुकींग हे सर्वांना परवडेल असंच आहे.

गायत्री: पर्यटकांच्या  SRP Holidays बद्दल च्या प्रतिक्रिया..... 






गायत्री-  या दोन वर्षात लक्षात राहिलेला असा एखादा अनुभव त्याविषयी  काय सांगशील ?

सारिका-  मी जेव्हा लेह-लडाखच्या टूर्स अॅरेन्ज केल्या होत्या, तेव्हा नेमकं तिन्हीवेळा तिथे गेल्यावर समजलं की कर्फ्यू आहे. पण दोन टूर्सच्या वेळी  मी पर्यटकांसोबत होते. तेव्हा मला स्वतःला त्यात लक्ष घालून मॅनेज करता आलं होतं. पण एका टूरच्या वेळी मात्र  मी सोबत नव्हते पण कर्फ्यूमुळे येत असलेल्या  अडचणी आणि आता त्यांनी पुढे काय करावं याविषयी मी ठाण्यात ऑफिस मध्ये बसूनच माहिती देत होते. त्यांचा प्रवास व्यवस्थित झाला .  पण आता मागे वळून पाहताना एक अनुभव म्हणून जरी सांगत असले तरी तेव्हा मात्र तो टास्क होता. फोनवरून सांगणं असेल किंवा तिथे प्रत्यक्ष असताना मॅनेज करणं असेल. कारण शेवटी पर्यटकांना कोणताही त्रास न होता त्यांचा प्रवास सुखरूप होणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. 

गायत्री: बापरे !! कर्फ्यू म्हणजे मोठीच अडचण...पण खरचं अडचण येऊनही प्रवास नीट झाला.

सारिका: हो..पुढे त्यांचा  प्रवास  व्यवस्थित  झाला . 

गायत्री- तुझ्या भारतातल्या टुर्सबाबत तू मघाशी म्हणालीस... त्यात मला विचारायला आवडेल की,  प्रवाशांना जर एखाद्या स्पॉटला भेट द्यायची असेल ज्याचा एसआरपीच्या टूर आयटर्निटीत समावेश नाही; मग त्यावेळी प्रवाशांना एसआरपीकडून एक्स्टर्नल अॅक्सेस मिळतो की प्रवाशांना स्वतःच मॅनेज करावं लागतं?

सारिका- नाही. असं अजून तरी झालेलं नाही. कारण एसआरपी अंतर्गत आयोजित केल्या जाणा-या सर्व टुर्समध्ये तिथले महत्त्वाचे स्पॉट हे कव्हर करण्याचाच प्रयत्न असतो. म्हणजे लेह-लडाखची टूर अॅरेंज करताना ती कारगीलसहित व्हावी, असंच माझं प्रवाशांना नेहमी सजेशन असतं. कारण लेह-लडाखसारख्या ठिकाणी जर आपण टूर नेत असू तर श्रीनगरपासून सुरुवात करून कारगीलला जायचं. तिथे राहायचं. तिथला कारगीलचा वॉल मेमोरियल, मग दोन नद्यांचा संगम, गुरुद्वारा, मॅग्नेटिक हिल पॉईंट असे काही महत्त्वाचे स्पॉट कव्हर करून मग पुढे जायचं. कारण हायर अॅल्टीट्युडच्या 
ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा कमी होत जातो. त्यामुळे अशा ठिकाणी प्रवास करताना प्रवाशांचा टूर स्पॅनही मोठा असणं आवश्यक आहे. जेणेकरून त्या वातावरणाशी जुळवून घेत ग्रॅड्ज्युअली प्रवास करणं शक्य होतं आणि महत्त्वाचे स्पॉटही कव्हर केले जातात.



गायत्री- छान . मध्ये तू  एक इंटरनॅशनल टूर सुद्धा अॅरेंज केलेलीस. त्याबद्दल काय सांगशील?

सारिका- अॅक्च्युअली ती बिझनेस टूर होती. 'लंडन मराठी संम्मेलन' होतं. त्यात पितांबरीने मार्केटिंग स्टॉल घेतलेला. त्यासाठी एसआरपी अंतर्गत ती टूर प्लॅन करण्यात आलेली. 

गायत्री- वा !! मस्तच.  मग या बिझनेस टूरसंदर्भात अधिक  जाणून घ्यायला नक्कीच आवडेल.

सारिका- सगळ्यात आधी पितांबरीचे MD रवींद्र प्रभुदेसाई यांचे मी मनापासून आभार मानते कि ही टूर अॅरेंज करण्याची संधी त्यांनी मला दिली. खरतरं इंटरनॅशनल टूर अॅरेंज करण्याची ती  पहिलीच वेळ होती. आणि त्यातूनही बिझनेस टूर म्हटल्यावरचं जे दडपण असतं, ते वेगळंच. मघाशी म्हटल्याप्रमाणे इंटरनॅशनल टूरची पहिलीच वेळ असल्याने लंडनमधली हॉटेल्स, त्यांचं बुकींग, तिथले साईट-सिईंग, संम्मेलनाचे क्रूझ टिकीट्स, एअरपोर्ट-टू-हॉटेल पिकअप अँड ड्रॉप याची काहीच माहिती नव्हती. मग तेव्हा संम्मेलनाच्या आयोजिका वैशाली मंत्री यांनी त्यासंदर्भात मला खूप मदत केली. पितांबरीसोबतच सुश्रेय पब्लिकेशन्सच्या ओनर श्वेता गानू मॅडम यांनी मला  मॉडर्न ऑप्टिशियन आणि भिडे लाईफस्टाईल या उद्योगसमूहांच्या  मिळून एकूण दहा जणांची टूर  प्लॅन करण्याची संधी दिली. व्हिसा आणि एअर टिकीट्सची प्रोसेस समजून घेऊन मी स्वतःच सर्वांचे व्हिसा फॉर्म भरून अप्लायही केले. मी स्वतः त्यांना एअरपोर्टवर सी-ऑफ करायलाही गेले होते. हा पहिलाच आणि खूप छान अनुभव होता. खूप काही नवीन शिकायला मिळालं. आणि मुख्य म्हणजे टूरही खूप यशस्वीपणे पार पडली.


गायत्री- खूपच छान सारिका. मग आता इंटरनॅशनल फॅमिली टुर्स आयोजित करण्याबाबत काही विचार आहे का?
सारिका- हो, नक्कीच. केनिया, भूटान, नेपाळ आणि श्रीलंका या चार देशांचे डिटेल्स आणि त्या अनुषंगाने टूर पॅकेजेस् तयार आहेत. आता जसं बुकींग होईल तशा टुर्सही मी ऑपरेट करेन.

गायत्री- वा !! एसआरपीचा आता पुढचा प्लॅन काय आहे?  
सारिका- स्पेशिअलाईज्ड टूर्स सुरू करणं, हा एसआरपीचा फ्युचर प्लॅन आहे. त्यात विद्यार्थ्यांसाठी खास वाईल्डलाईफ टूर मला अॅरेंज करायची आहे.




गायत्री- ओके.आता एक महत्त्वाचा प्रश्न- उद्योजिका आणि गृहिणी या दोन्ही जबाबदा-या तू कशा पद्धतीने हाताळतेस ?
सारिका- मुख्य म्हणजे घरच्यांचा मला माझ्या या कामासाठी पूर्ण पाठिंबा आहे. कारण उद्योजिका म्हणून काम करताना त्यातून मिळणारं उत्पन्न हे अन्प्रेडिक्टेबल असतं. कधी फायदा होतो; तर कधी तोटाही. अशावेळी घरून त्या कामासाठी सपोर्ट असणं खूप आवश्यक असतं; जो मला नेहमी मिळतो. याबाबतीत मी खूप भाग्यवान आहे असं मला वाटत.

गायत्री: धन्यवाद सारिका!! तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी 'माझी लेखणी' या ब्लॉगतर्फे खूप खूप शुभेच्छा !! 


सारिका: धन्यवाद गायत्री...उद्योग सफर मध्ये मलाही माझे काही अनुभव share करता आले. Thanku..

जाता जाता....सारिकाच्या पुढच्या  सिझनच्या  टूर्सबद्दल माहिती खास वाचकांसाठी... 
( वर्ष २०१७-२०१८....)

23 Oct - 2N 3D - Tadoba 

09 Nov - 3N 4D - Bandipur with Ranganthittu

28 Dec - 3N 4D - Badhavgarh 

11 Jan - 2N 3D - Ranthambore 

08 Feb - 2N 3D - Pench

22 Feb - 2N 3D - Bharatpur

March - Tadoba

April - Kanha and Pench

May - Tadoba and Kenya 

June - Tanzania


SRP HOLIDAYS
Contact Number: 09773328548
www.srpholidays.in



उद्योग सफर मुलाखतीत तुम्हालाही सहभागी व्हायचे असेल तर जरूर संपर्क साधा.
gmkashelkar@gmail.com

Monday, May 8, 2017

कारगिल विजय दिवस-एक अनोखी सफर

हॅलो फ्रेंड्स ...

   वर्ष जेव्हा सुरु होतं तेव्हा आपण सगळे म्हणत असतो....चला आता नवीन वर्ष, या नवीन वर्षी या..या गोष्टी करायच्या आहेत. नव्या उत्साहात आपण अनेक गोष्टी ठरवत असतो. अगदी आपल्या स्वतःच्या वैयक्तिक संकल्पांपासून ते करियर प्लान्स किंवा नवं घर, गाडी अशा खरेदीचे प्लान्स ...म्हणजे थोडक्यात काय तर असे बरेच प्लान्स आपण ठरवतो....तुम्ही सुद्धा ठरवले असतील. आणि हो, या सगळ्यात अजून एक विषय असतोच तो म्हणजे या वर्षी कुठे फिरायला जायचं?? हे सुद्धा आपण ठरवतो....कधी कधी ठरवलेली ठिकाणं बदलतात तर कधी त्याच ठरवलेल्या ठिकाणी जायचं निश्चित असेल तर आपण बुकिंग सुद्धा करून टाकतो...उन्हाळा म्हंटलं की, फिरायला जायचा प्लान तो बनता है बॉस.....हा विचार आपल्या अनेकांच्या मनात पक्का असतोच. पण कधी कधी काही कारणांमुळे उन्हाळी सुट्टी आणि फिरायला जाणं जमून येत नाही. मग आपला फिरायला जायचा प्लान अपोआपच रद्द होतो. किंवा अगदी पुढे ढकलला जातो म्हणजे थेट हिवाळ्यात. पण आज मी तुम्हाला अजून एक छान पर्याय या लेखणीतून सांगणार आहे.  कसा वाटतोय ते ठरवा....आवडला तर जरूर जा. संपर्क क्रमांक शेवटी देईनच.

तर....२६ जुलै या दिवशी  कारगिल विजय दिवस साजरा करण्यासाठी Kalpaviharr  ‌‍Traaventure सज्ज आहे. ही विशेष सफर २५ जुलै ते २ ऑगस्ट २०१७ या  दरम्यान आहे. या सफारीचा पहिला प्रवास श्रीनगर पासून सुरु होणार आहे, व त्यांनतर कारगिल.


२६ जुलै  १९९९ साली कारगिलच्या युद्धात भारताने विजय मिळवला.म्हणून हा दिवस 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. कारगिलच्या लढाईत ५२७ भारतीय जवान शहीद झाले होते. आणि १.३६३ जवान जखमी झाले होते. शहीद झालेल्या त्या वीरांना श्रद्धांजली वाहण्याचा हा दिवस अर्थातच 'कारगिल विजय दिवस'.

आपल्या सर्व भारतीयांना अभिमान वाटेल असा विजय या जवानांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता मिळवून दिला होता. त्यामुळे कारगिल मधल्या द्रास या ठिकाणी जाऊन देशासाठी खऱ्या अर्थाने जगणाऱ्या आणि जगलेल्या सैनिकांना तुम्ही श्रधांजली वाहू शकता. त्याच सोबत तुम्ही कारगिल बॉर्डर,सुरु व्हॅलि,बुद्धाचा पुतळा अशा अनेक गोष्टी तिथे पाहू शकणार आहात.

जगातला सगळ्यात मोठा 'मोटरेबल रोड' खारदुंगला पास ज्याची उंची १८,३८० फुट आहे. त्याला पार करून तिकडची थंडी अनुभवू शकता.


त्याचसोबत नुब्रा व्हॅलि याठिकाणी जाऊन दोन उंचवटे असणारे उंट तुम्ही पाहू शकणार आहात.




कॅमल सफरीनंतर कारगिल ते लेह या मधला प्रवास तुमच्या अधिकच लक्षात राहील. कारण तो एक विशिष्ट रोड ज्याचं नाव मॅग्नेटिक हिल ...ज्यामध्ये तुमची गाडी स्टेअरिंग व्हीलला हात न लावता सुद्धा चालते. असा एक वेगळा अनुभव तुम्ही तिथे घेऊ शकाल.

त्याचसोबत 3 Idiots या  चित्रपटातील पॅंगाँग लेक त्याचे बदलते रंग आणि स्वच्छ पाणी याचा अनुभव अविस्मरणीय असेल.




याचसोबत चु मोरीरी लेक, पोरझॅक मोनेस्ट्री पाहू शकाल.

                          

शांतीस्तूपा पाहू शकाल. एकूणच काय तर Kalpaviharr  ‌‍Traaventure  सोबत असलेली ही  ट्रीप वेगवेगळ्या गोष्टींनी भरलेली असेल.

अधिक माहितीसाठी संपर्क:

वैशाली देसाई - मोघे 9820684723







Friday, January 27, 2017

NAINITAL- YOUTH CAMP

                                                               युथफुल सफर नैनितालची. 


 
नवीन वर्ष सुरु होऊन आता जानेवारी महिना सुद्धा संपत आला. दिवस,वेळ सगळच पटापट पुढे जातंय. हो आणि  हे तुम्हाला पण मान्य असेलच.त्यामुळे आता जानेवारी संपून आपल्या सगळ्यांचा लाडका आणि सुट्ट्यांचा राजा असलेला मे महिना कधी येईल लक्षात सुद्धा येणार नाही. पण हरकत नाही. मे महिन्यात कुठे जायचं याचा प्लान तुम्ही आत्ताच आखू शकता.



Kalpaviharr Traaventure या मे महिन्यात अर्थात आपल्या हक्काच्या सुट्टीच्या काळात एक धमाल युथ कॅम्प नैनिताल याठिकाणी घेऊन जाणार आहेत. १८ ते २८ मे  ही या युथफुल सफरीची तारीख आत्ताच बुक करा. यात असणार आहेत बरेच साहसी उपक्रम जे आपल्याला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आवश्यक असतात. शिवाय self development साठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी अगदी योगा, मेडीटेशन, आरोग्य यावर काही लेक्चर्स सुद्धा या तरुण मंडळींसाठी असणार आहेत.  
 

या कॅम्प मध्ये असणाऱ्या ACTIVITIES वर एक नजर... 

•  Basic Rock Climbing:  Covers training in rock-scrambling, bouldering, tying of knots & hitches, rock-climbing with safety provided by belay, rappelling, and river crossing. Certificates are awarded to participants on successful completion of the camp.


•  Treks:  A gradual build-up of stamina is one of the objectives of treks. Treks start with a mere 4 km, and by the end of the camp almost all campers are able to complete the enchanting 16 km trek to Kainchi. Treks to other magnificent scenic points include Land’s End, Hanuman Mandir scenic spot on Ayarpatta Hill, Dorothy Seat / Tiffin Top, Jungle Trek, Snow View and the lofty NainaPeak.



•  Games, community singing and cultural programs.

• Yoga-based keep-fit exercises. Shramdan (selfless work offering) to inculcate dignity of labour.



•  Meditation, and talks on healthy living, character building, national problems & role of youth.
                            

या युथफुल सफरीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर लगेच बुकिंग करा.. कॅम्पमध्ये १२ वर्षावरील मुलं सहभागी होऊ शकतात.  

Tour Cost : Rs.18,500/- per person
Contact details : वैशाली देसाई-मोघे. 
Contact no: 9820684723

Thursday, December 15, 2016

सफर पक्षी निरीक्षणासाठी

सफर पक्षी निरीक्षणासाठी
पक्षी निरीक्षण करणं हा अनेकांचा आवडता छंद असतो. आपला छंद जोपासण्यासाठी अनेकजण खास या पक्ष्यांसाठी आपली भटकंती ठरवत असतात. 
अशीच एक छान भटकंती खास पक्षी निरीक्षणासाठी भिगवण या ठिकाणी तुम्ही करू शकता. 

Kalpaviharr Traaventure तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे.... 



११,१२ फेब्रुवारीला तुमची आवड जोपासणारी अगदी छोटीशी पण खूप आनंद देऊन जाईल अशी मस्त टूर.
भिगवण हे छोटसं शहर महाराष्ट्रातील पुणे-सोलापूर सीमेवर आहे. 

हे पुणे सोलापूर महामार्गावर असून पुण्यापासून १०५ किमी अंतरावर आहे तसचं याठिकाणी संथपणे येणारं उजनी धरणाचं पाणी तुम्ही पाहू शकता. 
भिगवणला पोहोचल्यावर सकाळी पहाटे मस्त बोट रायडिंगचा आणि अर्थातच त्यायोगे पक्षी निरीक्षणाचा तुम्ही आनंद घेऊ शकाल. 
याठिकाणी बरेचसे स्थलांतरित पक्षी पर्यटकांना पाहायला मिळतील. वेगवेगळी बदकं, बगळे, फ्लेमिंगो शिवाय अनेक पक्ष्यांच्या मुख्य प्रजाती इथे पाहायला मिळत असल्यामुळे फोटोग्राफीची सुद्धा मस्त संधी पक्षी निरीक्षकांना असते.


 भिगवण सोबत पुण्यापासून ७२ किमी अंतरावर असलेलं तहसील बारामती याठिकाणी ५.१४ किमी इतक्या अंतरावर विस्तारलेलं मयुरेश्वर वन्यजीव अभयारण्य सुद्धा तुम्ही या टूर मध्ये पाहू शकणार आहात. 
 Mayureshwar wildlife sanctuary ( ऑगस्ट १९९७)


चिंकारा जातीच्या हरणांसाठी विशेष असणारं हे काटवन ही याची खासियत आहे. 
तरस, कोल्हे, लांडगे इतर आसपासच्या परिसरातून आलेले मोर सुद्धा अनेकवेळा दिसतात. 
अतिशय लाजाळू असलेली ही चिंकारा हरणं पाहायला पर्यटकांना नक्कीच मजा येईल.

लिटील ब्राऊन डव्ह, स्पॉटेड डव्ह, रेड कॉलर्स ही कबुतर दिसतात. तसचं वेडा राघू, कोतवाल, शिंजीर, राखी खाटिक, नकल्या खाटिक, सातभाई ब्राम्हणी मैना, निखार असे अनेक पक्षी पाहायला मिळतात. आणि ही मस्त सफर घडवून आणण्यासाठी kalpaviharr Traaventure सज्ज आहे.





Tour Cost : Rs.3,650/- per person
Contact details : वैशाली देसाई-मोघे. Contact no: 9820684723



   

Friday, November 25, 2016

Kalpavihar Adventures presents kuch Runn utsav

क्रोकोडाइल आणि जंगल सफारी (5250/-)

क्रोकोडाइल आणि जंगल सफारी (5250/-)



रोजच्या त्याच त्याच रुटीनमधून शनिवार-रविवार मस्त ब्रेक हवा असेल तर Kalpavihar Adventures तर्फे १०-११ डिसेंबरला आयोजित केलेल्या क्रोकोडाइल आणि जंगल सफारीचा पर्याय उत्तम आहे. 

बोरीवली पासून प्रवास सुरु होऊन सायन, वाशी आणि पनवेल हे Enroute Pick Up Points ठेवण्यात आले आहेत. चिपळूण मधील चिवेली या गावी ही टूर असणार आहे.


Agro Tourism फार्म हाऊसमध्ये राहण्याची आणि कोकणातील चुलीवरच्या जेवणाचा( वेज-नॉनवेज) आनंद घेण्याची उत्तम संधी याठिकाणी पर्यटकांना मिळेल.

चिवेली गावात येणाऱ्या वसिष्ठ या मुख्य नदीवर क्रोकोडाइल सफर असणार आहे. लहान मोठ्या मगरी व त्यांचे बरेच प्रकार पाहायला मिळतील. 
(साधारण १३ ते १८ फुटी सर्वात मोठ्या आकारातली मगर). 



Agro Tourism फार्म हाऊसमध्ये कब्बडी, विटी दांडू, सूर पारंब्या यांसारखे खेळ, तर स्विमिंग, फिश फार्मिंग अशा अनेक Traditional Activities चा पर्याय सुद्धा पर्यटकांना उपलब्ध आहे. 

क्रोकोडाइल साफारीनंतर जंगल सफर मात्र रात्रीच्या वेळी असेल. आणि दुसऱ्या दिवशी गुहागर बीच, हेदवीचा गणपती असा दोन दिवसाचा भरगच्च तरी सोपा आणि सुटसुटीत टूर प्लान Kalpavihar Adventures तर्फे आयोजित केलेला आहे.

SO BE READY FOR THE BEST REFRESHMENT.............


अधिक माहितीसाठी संपर्क: Kalpavihar  Adventures 
वैशाली देसाई-मोघे. Contact no: 9820684723





Thursday, November 10, 2016

सहल गप्पा
          क्रोकोडाइल आणि जंगल सफारी
                                            (5450/-)

'क्रोकोडाइल आणि जंगल सफारी' ही भन्नाट सफारी जाणून घेण्यासाठी घेतलेली एक विशेष मुलाखत. ( सहल गप्पा )



या सहलीच्या सर्वेसर्वा - वैशाली देसाई-मोघे.

आरजे गायत्री: नमस्कार वैशाली ...

वैशाली:  नमस्कार...

गायत्री : क्रोकोडाइल जंगल सफारीबद्दल ऐकलं आणि खूप Interesting  सफर वाटली...म्हटलं आता प्रत्यक्ष भेटूनच तुझ्या या सहलीविषयी जाणून घेऊया...आणि माझ्या पण मित्र-मैत्रिणींना जायचं असेल तर त्यांना याविषयी सांगूया...

वैशाली: बरं केलसं...खरतरं आजकाल प्रत्येकाला एका छोट्या ब्रेकची गरज आहे. बहूतेक तूच यावर लिहीलं होतस नां...ब्रेक नावाचा ब्लॉग..yes मी वाचला होता.

गायत्री: ohh...thnku यार.  वैशाली, क्रोकोडाइल आणि जंगल सफारी किती दिवसांची आहे?

वैशाली: फक्त दोन दिवस....पण फुल धमाल करायची. १०-११ डिसेंबर. शुक्रवारी रात्री निघायचं. बोरीवली वरून रात्री ११.३० वाजता निघणार. आणि सायन, वाशी आणि पनवेल हे enroute pick up points आहेत. 

गायत्री: वाह...हे बरं आहे. शनिवार रविवार हवाच असतो एखादा जरा हटके....भन्नाट.
Exactly  काय काय आहे गं या सफरीमध्ये? नाव तर इतकं मस्त दिल्यसं ना कि आत्ता निघावं असच वाटतयं...हाहाहा

वैशाली: शनिवारी चिपळूणला पोहोचणार...चिवेली नावाचं छोटं गाव आहे. तिथे राहण्याची उत्तम सोय केली आहे.

गायत्री: अरे वाह...चिपळूण क्या बात !!! कोकणातली मजा काही औरच आहे....आणि कोकण म्हणजे जेवणाची एक वेगळीच खासियत.

वैशाली: अगदी तेच सांगणार होते...मस्त गरम गरम चुलीवरचं जेवण असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जेवणात veg- non veg दोन्ही प्रकार आहेत.. Agro tourism  फार्म हाऊसमध्ये राहण्याची सोय केली आहे. त्यामुळे तिथे राहताना गावात राहतोय असा फील येईल...सगळ्यांना मजा येईल.

गायत्री: ohh...शहरापासून दूर गेल्यावर हा वेगळेपणा अनुभवायला प्रत्येकाला आवडतो. आणि हवाहवासा वाटतो. आणि शेवटी हीच शांतात आपल्याला फ्रेश करते...

वैशाली: फ्रेश पेक्षा रिफ्रेश म्हणूया...


गायत्री: हाहाहा हो yes....hey, मला सांग क्रोकोडाइल सफारी नेमकी कशी असणार आहे ?

वैशाली: वसिष्ठ ही मुख्य नदी चिवेली गावात येते. या नदीवर ही सफारी आहे. 
तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या बोटी असतात...मग साधारण एक तास आपल्याला बोटीतून फिरताना मगरी दिसतात....safe jackets असतात. त्यामुळे भीती नसते.....

गायत्री: wow.....अगदी समोरून..अगदी जवळून मगर पाहण्याची मजा काही औरच आहे यार....

वैशाली: तीच तर खरी गंमत आहे. लहान मोठ्या मगरी आहेत..त्यांचे बरेच प्रकार पण पाहायला मिळतील. आणि सगळ्यात मोठ्या म्हणजे साधारण १३ ते १८ फुटी सुद्धा मगरी पाहायला मिळतील.
  
गायत्री: बापरे !!!! १३ ते १८ फुट !!
 
वैशाली: हो, आणि त्या नंतर आपण त्या फार्म वर असलेल्या सगळ्या traditional activities  करू शकतो....

गायत्री: अच्छा!! ते पण आहे का तिथे....? काय काय आहे त्यात?



वैशाली: कब्बडी, विटी दांडू, सूर पारंब्या खेळू शकतो...असे काही जूने खेळ. शिवाय गोट्या...नंतर स्विमिंग पूल आहे...फिश फार्मिंग आहे.

गायत्री: अरे सॉलिड....बरचं आहे गं.




वैशाली: एवढचं नाही...पावसाळ्यात कशाप्रकारे शेती करतात याविषयी सुद्धा तिथे जाणून घेता येईल.
 
गायत्री: अच्छा !! आणि मग जंगल सफर ?

वैशाली: जंगल सफर रात्री....

गायत्री: ohhh.......... पहिल्यांदी जंगल सफर करणाऱ्यांसाठी खूपच साहसी असेल ट्रीप.

वैशाली: वाघ, ससा, मोर, रानडुक्कर, जंगली गायी....असे प्राणी असतील...
त्यामुळे माझ्यासोबत येणाऱ्या पर्यटकांना जंगल सफर सुद्धा करता येईल.

गायत्री : जंगल सफर करण्यात एक वेगळीच मजा आहे हे नक्की....पण वैशाली, दुसऱ्या दिवशी अजून काय स्पेशल?

वैशाली : दुसरा दिवस तर अजूनच छान जाईल...कारण गुहागर बीच, आणि हेदवीचा गणपती पाहायला जाणार....आणि त्यात सुद्धा सकाळी निघताना जर कोणाला पुन्हा एकदा मगरींची सफर करायची असेल तरी आपण करू शकतो...

गायत्री: हाहाहा....अगदी मनातलं ओळखलंस...मी हेच विचारणार होते तुला. बरयं..म्हणजे दुसऱ्या दिवशी सुद्धा तू ही संधी दिली आहेस ते बेस्ट.

वैशाली: हो...आणि गुहागर बीच, आणि हेदवीचा गणपती झाल्यानंतर मग दुपार नंतर परतीचा मुंबईकडे प्रवास.....

गायत्री : वाह!! उत्तम. आणि हो, नेमकी कधी आहे म्हणालीस मघाशी? 

वैशाली : १० आणि ११ डिसेंबर. पण शुक्रवारी रात्री निघायचं.

गायत्री : वैशाली, खूप छान प्लान केल्यस तू...मस्त होईल टूर. दोन दिवसाच्या ब्रेक साठी..खरचं उत्तम. आणि हो, ही टूर कशी झाली याचं अनुभवकथन सुद्धा मला लिहायला आवडेल...

वैशाली: हो, अगदी नक्की. 


 
      



मित्रांनो, कशी वाटतेय क्रोकोडाइल आणि जंगल सफारी?? आहे ना Interesting ? आणि थोडी साहसी सुद्धा (प्रथम जंगल सफर करणाऱ्यांनासाठी). तुम्हाला पण हवा असेल मस्त ब्रेक तर या टूरचा विचार करायला काहीच हरकत नाही....

      वैशाली देसाई-मोघे यांची खासियत म्हणजे त्या नेहमी नवीन नवीन टूर्स प्लान करतात आणि टूर्स मध्ये नेहमी काहीतरी unique देण्याचा प्रयत्न करतात.

     क्रोकोडाइल आणि जंगल सफारी... लेखणीतर्फे तुमच्यापर्यंत पोहोचवली. आता यापुढे त्यांच्या असणाऱ्या अशा अनेक टूर्स या “सहल गप्पांमधून” तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवत राहीन.

सोबत त्यांचे contact details  देत आहे....तुम्ही या टूरचा भाग होऊ शकता.  आणि पुढचे अनुभवकथन लिहिताना तुमच्या अनुभवाचा सुद्धा उल्लेख करायला नक्की आवडेल.

Kalpvihar  Adventures
Contact no: 9820684723