Friday, November 25, 2016

Kalpavihar Adventures presents kuch Runn utsav

क्रोकोडाइल आणि जंगल सफारी (5250/-)

क्रोकोडाइल आणि जंगल सफारी (5250/-)



रोजच्या त्याच त्याच रुटीनमधून शनिवार-रविवार मस्त ब्रेक हवा असेल तर Kalpavihar Adventures तर्फे १०-११ डिसेंबरला आयोजित केलेल्या क्रोकोडाइल आणि जंगल सफारीचा पर्याय उत्तम आहे. 

बोरीवली पासून प्रवास सुरु होऊन सायन, वाशी आणि पनवेल हे Enroute Pick Up Points ठेवण्यात आले आहेत. चिपळूण मधील चिवेली या गावी ही टूर असणार आहे.


Agro Tourism फार्म हाऊसमध्ये राहण्याची आणि कोकणातील चुलीवरच्या जेवणाचा( वेज-नॉनवेज) आनंद घेण्याची उत्तम संधी याठिकाणी पर्यटकांना मिळेल.

चिवेली गावात येणाऱ्या वसिष्ठ या मुख्य नदीवर क्रोकोडाइल सफर असणार आहे. लहान मोठ्या मगरी व त्यांचे बरेच प्रकार पाहायला मिळतील. 
(साधारण १३ ते १८ फुटी सर्वात मोठ्या आकारातली मगर). 



Agro Tourism फार्म हाऊसमध्ये कब्बडी, विटी दांडू, सूर पारंब्या यांसारखे खेळ, तर स्विमिंग, फिश फार्मिंग अशा अनेक Traditional Activities चा पर्याय सुद्धा पर्यटकांना उपलब्ध आहे. 

क्रोकोडाइल साफारीनंतर जंगल सफर मात्र रात्रीच्या वेळी असेल. आणि दुसऱ्या दिवशी गुहागर बीच, हेदवीचा गणपती असा दोन दिवसाचा भरगच्च तरी सोपा आणि सुटसुटीत टूर प्लान Kalpavihar Adventures तर्फे आयोजित केलेला आहे.

SO BE READY FOR THE BEST REFRESHMENT.............


अधिक माहितीसाठी संपर्क: Kalpavihar  Adventures 
वैशाली देसाई-मोघे. Contact no: 9820684723





Saturday, November 19, 2016

जंगल बुक जंगल गप्पा भाग ४

पूर्वरंग : गायत्री: पण वाघ ??
मैत्रेयी: ऐकू येतंय काही? खूप लांबवरून लंगुरांचा आवाज येतोय. वाघ तिथे गेल्यामुळे ते एकमेकांना अलर्ट करत आहेत...हा त्यांचा अलार्म असतो...
गायत्री : ohh.......वाघ jus miss झाला म्हणजे. पण हो, वाघ आसपास आहे हे खाणाखुणांवरून पाहता आल यात जास्त थ्रील आहे. 
मैत्रेयी: खरयं..
 (गायत्री आणि मैत्रेयी एकमेकांना टाळ्या देतात...एक वेगळं थ्रील अनुभवल्याचा आनंद दोघींच्याही मनात असतो.)

 जंगल बुक जंगल गप्पा भाग ४


(गायत्री आणि मैत्रेयीची जीप्सीची सफर चालू आहे...जीप्सी म्हणजेच या open जीप मधून फिरण्याचा गायत्रीला खूपच आनंद झाला आहे. कारण ही सफर तिची पहिली सफर आहे. वाघाची पुसटशी चाहूल त्यांना मागच्या भागात लागल्याचं
आपण वाचलं...आता आज त्यांना काय काय नवीन गोष्टी ही जीप्सीची सफर घडवून आणतेय हे पाहूया...)

गायत्री: मैत्रेयी, इथे वाघ आहे असं मघाशी ऐकलं तेव्हाच्या थ्रिलिंग झटक्यातून बाहेरच आलेच  नाहीये गं....

मैत्रेयी: हाहाहा....होऊ शकत असं...आज आपण प्राणी पक्षी यापलीकडे जाऊन जंगलाची भौगोलिक रचना म्हणजेच टोपोग्राफी समजून घेऊया. मजा येईल. काहीतरी नवीन.

गायत्री: yes. हीच जिप्सीची गंमत मला अनुभवायची होती.

मैत्रेयी: चलो, आता त्यासाठी तलावाच्या दिशेने जाऊया..

गायत्री: तिथे पण वाघ आहे का?

मैत्रेयी: आता बास हां गायत्री....वाघच पाहायला आलीयेस का फक्त. एकदम चूप. तिथे संजय दादाच कॅन्टीन होतं. आता बंद झालं आहे. पण हा एक मोठा Landmark आहे.

गायत्री: पण संजय दादा कोण????

मैत्रेयी: जंगलातल एक कॅन्टीन होत. त्याच कॅन्टीन होतं ते.

गायत्री: अरे वाह.....इथे पण कॅन्टीन...बरोबर भूक तर लागणारच ना...शेवटी आपण माणूस आहोत...( गायत्री एकटीच बडबडत असते.)

मैत्रेयी: पूर्वी ना, आसपास राहायची सोय होती. आता बफर झोन मध्ये राहण्याची सोय आहे. इकडून मागे गेलो आणि जरा चाललो कि, तलावाच्या काठावर पायऱ्या आहेत आणि तिथेच मंदिर आहे.
  
गायत्री: मंदिर? कॅन्टीन? हे सगळचं असतं जंगलामध्ये....मला आज पहिल्यांदी कळतंय...कोणतं मंदिर? म्हणजे देव कोणता? गणपती ?

मैत्रेयी: नाही, तारू देव. असं म्हणतात की, प्रत्येक जंगलाचा एक देव असतो....तो जंगलाच रक्षण करतो असं म्हणतात. रात्रीच्या वेळी हा तारू देव घोड्यावरून येतो आणि जंगलाच रक्षण करतो असं या लोकांच म्हणण आहे...

गायत्री: ohhh...अच्छा!! मैत्रेयी, ते बघ पटकन..अगं डावीकडे....बघ. पांढर झाड आहे का ??????

मैत्रेयी: हो, करू नाव आहे त्याचं. याला घोस्ट ट्री सुद्धा म्हणतात.....( गायत्रीचे घाबरलेले हावभाव पाहून) घाबरू नकोस...गायत्री.

गायत्री: हो हो..नाही घाबरणार...प्रकाशात किती भारी दिसेल ना? बघ ना, सगळीकडे हिरवा, तपकिरी रंग आहे.......आणि मधेच हे पांढर झाड. भारीच !! निसर्गाची अनोखी किमया....  

( हे कॅन्टीन, मंदिर आणि झाड अशा काही वेगळ्या गोष्टी पाहून पुढे गेल्यानंतर पुढे दिसलेल्या काही गोष्टी....)

मैत्रेयी: गायत्री, आपण आता ज्या पुलावरून जातोय ना, त्याला साकव सुद्धा म्हणता येईल....

गायत्री: हो मी अगदी तेच म्हणणार होते तुला...कोणता area आहे गं हा...किती ग्रीनरी आहे सगळीकडे....मस्त वाटतयं.

मैत्रेयी: हो, हा पंचधारा नाला आहे. तुला थंडावा सुद्धा जाणवत असेल ना....कारण ताडोबामधला सगळ्यात थंड आणि ग्रीन असा भाग हा आहे. छोटसं amazon सुद्धा म्हणू शकतो.

गायत्री: एवढी ग्रीनरी आहे म्हणजे वेगवेगळे पक्षी, साप, सरडे बरेच असतील ना....

मैत्रेयी: हो आहेत की....पण ते आपण पायी जाणार आहोत नां तेव्हा नीट पाहायला आणि अभ्यासायला मिळतील.

( पुढे डावीकडे )

गायत्री: ते काय दिसतंय? पिंजरे आहेत का?

मैत्रेयी: हो अगं. सिमेंटच्या स्टेजवर मोठे जीर्ण झालेले पिंजरे आहेत. पूर्वीचं हे मगर प्रजनन केंद्र होतं. जेव्हा एखाद्या भागातील वैशिष्ट्य पूर्ण प्राण्यांची संख्या काही कारणांमुळे कमी होते तेव्हा त्या प्राण्याला त्या आदिवासातून बाहेर काढून स्वतंत्र देखरेखीखाली प्रजनन केलं जात. आणि त्यांची संख्या वाढवून परत नैसर्गिक आदिवसात सोडलं जात.

गायत्री: हो का? अच्छा.........

( केंद्रावरून.....पुढे डावीकडे गेल्यावर... )

गायत्री: wow....मस्त. तलाव लागलाय..तो बघ. हाच का तो तलाव ?

मैत्रेयी: गायत्री, हा ताडोबा तलाव आहे. फ्रेश water लेक. आणि हा जंगलाच्या साधारण मध्यभागी आहे.

हा मस्त तर आहेच...पण मगरी सुद्धा आहेत बरं का...हाहाहा.

गायत्री: मी आता कशालाही घाबरत नाहीये...कळलं का...हाह्हा.

मैत्रेयी: इथे सापडणाऱ्या मगरींना मार्श क्रोकोडाईल म्हणतात. पवई लेक मध्ये पण ह्याच आहेत.

( तलावाच्या आजूबाजूला दलदल होती..त्यात अनेक पक्षी, वनस्पती होत्या.)

मैत्रेयी: इथे दलदल आहे त्यामुळे waders पक्षी सुद्धा येतात. त्यात Common Sand Piper, Red Shank ,  Green Shank  हे पक्षी दिसत्यात बघ.

गायत्री तो बघ... तो करकोचा दिसतोय? त्याची चोच मोठी आहे आणि दोन चोचींमध्ये फट आहे... बघ. म्हणून त्याचं नावं Open Billed Stork आहे....

गायत्री: ohh. सही यार. eeee.......मगर आलीये बाहेर .....

मैत्रेयी: या मगरी आत्ता काठावर Sun Basking करत्यात. उबेसाठी त्या पाण्याच्या बाहेर येतात.


गायत्री: ओह्ह...बरोबर.

(त्यांना जिप्सीच्या फेरीतून यापुढे पांढरपावनी नावाचा भाग लागतो...जे माळरान म्हणून ओळखलं जातं.)

गायत्री: तसं हे ओसाड वाटतयं ना गं...

मैत्रेयी: हो, माळरान भाग आहे. चल, मचाणावर जाऊया. आणि मस्त पाणवठा पाहूया वरूनच...

 (आम्ही सगळे २ मिनिटांसाठी मचाणावर जातो. उंच मोठं लोखंडी मचाण असतं. तिथून गवा, चितळं, रानडुक्करं दिसू शकतात आणि नशीब चांगल असेल तर वाघ आणि रानकुत्रे सुद्धा दिसू शकतात. )

गायत्री: ते बघं...पटकन  तो कोणता प्राणी आहे?



मैत्रेयी: ग्रे आणि ब्राऊन रंगाची नील गाय आहे ती. तो प्राणी गायीसारखा वाटत असला तरी गाय नाही तो हरणाच्या जवळपास जाणारा प्राणी आहे. ग्रे आहे तो नर आहे. आणि ब्राऊन दिसतेय ती मादी आहे.

गायत्री: मस्त ....मचाणावरून खरचं जंगलाचा आवाका दिसतोय गं. डिस्कवरी चॅनल सारखा फील येतोय. आणि पाणवठ्यावर तर किती मोठे पक्षी आहेत ना? काळे आहेत पांढरे पण आहेत...आणि मान बघं गुलाबी ? ओह्ह...पाहिलंस का मैत्रेयी?

मैत्रेयी: yes....तो रंगीत करकोचा आहे. painted stork.

( पांढरपावनी वरून पुढे गेल्यावर दवणा waterhole लागले.)

गायत्री: लंगुर माती का खात आहेत गं ?

मैत्रेयी: हो. वनस्पतींमध्ये क्षारांचे प्रमाण खूप कमी असतं म्हणून शाकाहारी प्राण्यांची क्षारांची गरज भागत नाही. आणि त्यामुळे तीच गरज हे प्राणी ह्या मातीतले क्षार खाऊन भागवतात. आणि महत्त्वाचं म्हणजे सगळीकडे ही माती पुरेश्या प्रमाणात नसते. त्यामुळे जंगल विभाग कृत्रिम मिठाचे ब्लॉक्स जागोजागी ठेवतात.


(पुढे जाऊन डाव्या बाजूला गायत्री आणि मैत्रेयीला बांबूच छोटं मचाण दिसतं.)

गायत्री: हे मचाण इतकं लहान का?

मैत्रेयी: हो, हे फक्त तीन माणसांकरता आहे. वन्यजीवगणनेसाठी अगदी योग्य असतात. या मचाणाचं नाव काळा आंबा आहे.

गायत्री: का पण ? काळा आंबाच का?

मैत्रेयी: या जंगलातल्या ठिकाणांची नावं काही आसपासच्या Specialities  वरून बरेच वेळा ठरतातं...आता ते बाजूला बघ. या आंब्याच्या झाडाचं खोड हे इतर आंब्याच्या खोडापेक्षा जास्त काळं आहे.

(त्याठिकाणी गायत्री, मैत्रेयी ला दिसतो तिपकिरी रंगाचा कोंबडा त्याच नाव Red Spurfowl . जंगलातल्या कोंबड्यांचा एक प्रकार.)

गायत्री: पटकनं पटकनं बघ......मैत्रेयी........तिकडे मांजर आहे का?

मैत्रेयी: हो, जंगल कॅट आहे ती. ती दिसणं म्हणजे आपण solid लकी आहोत.  
ते बघं, तिचे पगमार्क आहेतच इथे. वाघासारखेच आहेत पण आकार जरा लहान.



(पुढे काटेझरी या ठिकाणावरून जिप्सी जाते. आणि आंबट हिरा नावाचं ठिकाण लागतं जिथे परत एक मचाण आहे. )

गायत्री: ते झाड जरा वेगळ दिसतंय गं..गुरु...बोलिये...वो क्या है?

मैत्रेयी: ते? गुळगुळीत, गुलाबीसर ते ना ?

गायत्री : हिरवट खोडं आहे ना ते विचारतेय...

मैत्रेयी: होहो...तेचं मी पण तेचं म्हणतेय अगं. त्या झाडाचं नाव अर्जुन आहे.
अर्जुन आणि कदंब या झाडांखाली पाणी जास्त प्रमाणात असतं.

त्याचं झाडावर गायत्री आणि मैत्रेयीला चार चार नखांचे निशाण दिसले..ते निशाण अगदी वर पर्यंत होते..

विचारल्यावर गाईड ने सांगितलं की, यावर अस्वल चढला होता. त्यावर त्याच्या नखांचे निशाण त्यांनी पहिले...आणि जीप्सीची वेळ संपल्यामुळे त्यांचा परतीचा प्रवास परत सुरु झाला.



पुढची सफर ----- पायी ट्रेल.

Experienced  Shared By Maitryee Bhave 
Content Writer and Developer RJ Gayatri Kashelkar    
Photo Courtesy- Maitryee Bhave, Snehal Vagal, Sonal Naik. 

SOFT SKILLS च्या दुनियेची ओळख......

SOFT SKILLS  च्या दुनियेची ओळख......



आज स्पर्धेच्या काळात “soft skills” या संकल्पनेचं महत्त्व मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पण soft skills म्हणजे नेमकं काय? आणि soft skills शिकल्यामुळे आपल्याला नक्की कसा आणि काय फायदा होऊ शकतो याविषयी जाणून घेणे ही काळाची गरज आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्त्ती ठरणार नाही. त्यामुळे “soft skills” या संकल्पनेची ओळख करून घेण्यासाठी एक करियर चर्चा- soft skills च्या दुनियेची ही पुढील सहा महिन्याची मालिका सुरु करत आहोत. आणि यासाठी मार्गदर्शन करणार आहेत HOSPITALITY QUORUM   ह्या COMPANY च्या DIRECTOR  GAURI KHER.




‘लोकसत्ता’ या वृत्तपत्रात त्यांनी याविषयावर अनेक लेखसुद्धा लिहिले आहेत. अनेक वाचकांनी ते लेख वाचले असतीलही. व्यावहारिक जीवनातील soft skills पासून ते अगदी करियरच्या दृष्टीने असणारं soft skills च महत्त्व गौरी madam यांच्याकडून आपण या करियर मालिकेत जाणून घेणार आहोत. यासोबतच HOSPITALITY QUORUM तर्फे soft skills या विषयावर वेगवेगळे Training Programs  असतात. करियर चर्चेमधून सुद्धा तुम्हाला या Training Programs  विषयी नक्की माहिती देण्यात येईल जेणेकरून तुम्ही स्वतः जाऊन ही स्किल्स शिकू शकता.

सुरुवात करूया....या पहिल्या ‘करियर चर्चा- soft skills च्या दुनियेची’ या मालिकेला.




आर.जे गायत्री: गौरी मॅडम, नमस्कार. ‘करियर चर्चा- soft skills च्या दुनियेची’ या मालिकेत तुमचं मनापासून स्वागत...
गौरी मॅडम: धन्यवाद !! सगळ्या वाचकांना माझा नमस्कार...
आर.जे गायत्री: मॅडम, ही करियर चर्चा सुरु करताना मला हे जाणून घ्यायला आवडेल की, soft skills म्हणजे नेमकं काय? कारण याविषयीची माहिती सगळ्यांनाच असेल असं नाही...त्यामुळे आपण ही संकल्पना विस्तृत समजून घेऊया.
गौरी मॅडम: बरोबर....गायत्री, soft skills म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर Personality Enhancement. प्रत्येकाकडे Functional Skills असतात. म्हणजे एखाद्या विषयात आपण जे शिक्षण घेतो, करियर करतो अशा काही बेसिक गोष्टी. त्या विषयातलं बेसिक knowledge आपल्याला असत. पण ते फक्त असून चालत नाही तर त्यात अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचं करियर घडवण्यासाठी Personality Enhancement किंवा soft skills शिकणं गरजेच आहे.

आर.जे गायत्री: ओके...म्हणजे हा विषय Personality Development पेक्षा वेगळा आहे असं म्हणू शकतो का आपण ?
गौरी मॅडम: हो काही प्रमाणात..नक्कीच. कारण HOSPITALITY QUORUM तर्फे आम्ही जे काही ट्रेनिंग सेशन्स घेतो त्यात आम्ही काही तासांत व्यक्तिमत्त्व विकास घडवून आणू शकत नाही. पण हो, आहे त्या व्यक्तिमत्वामध्ये योग्य ती आणि त्यांच्या प्रोफेशननुसार त्यांची Personality Enhancement कशी होईल याचा विचार आमच्या प्रत्येक ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये केलेला असतो. ज्यामुळे प्रत्येकाला करियर मध्ये नक्कीच खूप फायदा होतो.
आर.जे गायत्री: या soft skills ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश होतो?
गौरी मॅडम: Communication Skills  हे अतिशय महत्त्वाचं soft skill आहे. ज्यामुळे आपलं म्हणणं इतरांपर्यंत पोहोचत. यामध्ये केव्हा? कधी? आणि कसं बोलावं? या काही गोष्टी असतात. तर दुसऱ्या व्यक्तीचं ऐकून घेण्याची क्षमता सुद्धा असायला हवी याविषयी आम्ही माहिती देतो...यामुळे Miscommunication आणि  Misunderstanding होत नाही.
यासोबत, Change Management सुद्धा एक प्रोग्राम आहे. यामध्ये आपल्या अवतीभवती जे बदल होत असतात त्याला आपण कसे सामोरे जातो हा मुद्दा यामध्ये येतो. कारण आता बघ, रोज नव्याने Technology बदलतेय...प्रगती होतेय. आपल्या आयुष्यात जर काही अचानक बदल होत असतील तर आपण त्याला कसं Face करतो हे आजच्या काळात खूप महत्त्वाचं आहे. उदा. नोकरीतील बदल, एखादी करियर शिफ्ट काहीही...यासाठी एक Attitude लागतो. तो सुद्धा या Skills चा एक प्रकार आहे.
गायत्री, असे म्हणशील तर भरपूर ट्रेनिंग प्रोग्राम्स आहेत जे करियर घडवण्यासाठी खूपच मदत करतात. एकदा करियरची सुरुवात झाल्यानंतर याचा उपयोग होणारच आहे पण करियर ठरवताना सुद्धा आपण याची मदत घेऊ शकतो. अगदी १० वी, १२ वी च्या विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा होईल. कारण आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ध्येय्य असली पाहिजेत आणि ते डोळ्यासमोर ठेऊनच आजची पिढी सुद्धा पुढे जातेय....ज्याला आपण goals म्हणतो. ही goals अनेकवेळा नोकरी मधली प्रगती, किंवा व्यवसायातली प्रगती असतेच पण जेव्हा आपण स्वतःमध्ये सुधारणा करतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्याला सगळीकडेच दिसतो. या ठिकाणी soft skills important role play करतात.

आर.जे गायत्री: हो तुम्ही म्हणताय त्यावरून त्याचं महत्त्व लक्षात येतंय...कारण कधी कधी छोट्या छोट्या गोष्टी आपलं एकूणच व्यक्तिमत्व फुलवतात...
करियर चर्चेत पुढे जाताना, आपण एक एक टप्पा घेऊन त्याप्रमाणे महत्त्वाचे  असणारे कोर्स जाणून घेऊया....सुरुवातीला, जी मुलं १० – १२ वी मध्ये असतील  त्यांना जर soft skill ट्रेनिंग घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी काय सांगाल?
गौरी मॅडम: yes....त्यांच्यासाठी सुद्धा Personality Enhancement under बऱ्याच गोष्टी येतील. Personality, Assessment, Communication, Goal Setting , Etiquette,  Attitude, Emotional Intelligence, Financial Awareness असे soft skills चे प्रकार आम्ही मुलांना शिकवतो...यासाठी मुलांना फक्त पाच दिवस invest करावे लागतात...चार तास रोज अशा पद्धतीत आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स असतात....
आर.जे गायत्री: अरे वा!! आता तुमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स कुठे आहेत आणि कधी आहेत ? त्या विषयी सुद्धा आपण वाचकांना सांगूया...


आपल्या व्यक्तिमत्त्वाला झळाळी प्राप्त होऊ दे!
आपली अंगभूत कौशल्ये घासूनपुसून लख्ख करण्यास... समाजात योग्यरित्या
वावर कसा असावा यावर आधारित....

 युवावर्गासाठी खास :
“सामाजिक वर्तणुकीचे संकेत” (सोशल एटिकेट)
या कार्यशाळेत आपल्याला खालील गोष्टी शिकण्यास मिळतील:
• सोशल एटिकेट म्हणजे काय ?
• एटिकेटचे महत्त्व
• चांगला श्रोता कसा बनावा ?
• आपल्या रोजच्या जीवनात सोशल एटिकेटचा उपयोग
• कोणाशी कधी, कसे, काय आणि केव्हा बोलावे ह्याचे ज्ञान

दिनांक : ४ डिसेंबर,२०१६
कालावधी : ४ तास
प्रती शुल्क : रु. ७५०/- प्रती (स्नॅक्स व स्टडी मटेरीअलसहित)


           
 विचारून तर पहा !
या कार्यशाळेत : आपल्याला समाजातील असे ५ प्रमुख अडथळे ज्यांच्यामुळे आपण मागत नाही. त्यांना काय वाटेल? असं कसं विचारायचं?
उगीच त्यांनी माझा अपमान केला किंवा मला वेड्यात काढलं तर ? असे विचार अनेकवेळा आपल्या मनात येतात....यावर आधारित ही कार्यशाळा आहे.
यामध्ये आपण शिकू शकतो:
विचारण्याचे फायदे काय आहेत ?
विशेषज्ञांचे ७ वैशिष्ट्ये
भीतीच्या चक्राचा पराभव कसा करावा?
कसं विचारायचं ?
कोणाला विचारयचं ?
काय विचारायचं ?
तारीख : ११ डिसेंबर २०१६
कालावधी: ४ तास
स्थान: ठाणे / दादर
शुल्क: रु. ७५० /- टॅक्स सहित (स्नॅक्स व स्टडी मटेरीअलसहित)नियम आणि अटी लागू
रेजीस्ट्रेशनची अंतिम तारीख: ८ डिसेंबर २०१६
संपर्क:
तेजस्वी: ८४३३८२०८१३
किंवा ई-मेल करा:
workshops.hosquo@gmail.com


आर.जे. गायत्री : अतिशय फायदेशीर ठरतील असेच हे विषय आहेत... गौरी मॅडम, मनापासून आभार...soft skills बद्दल इतकी छान माहिती दिलीत त्याबद्दल.
गौरी मॅडम: धन्यवाद !!