Saturday, April 29, 2017

सिझल कट्टा-

नमस्कार  वाचक मंडळी,

मी आजपर्यंत बरेचवेळा  सिझल देसी या ठाण्यातल्या रेस्टाँरंट बद्दल लिहिलं आहे. त्यांचे वेगवेगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. खरतरं,  सिझल देसी मध्ये दरवेळी काहीना काही नवीन हे असतचं. कधी ऑफर्स, कधी उपवासाच्या सिझलर्सची मेजवानी, तर कधी M's Kitchen ची झालेली सुरुवात. पण  रेस्टाँरंट म्हंटलं की पार्टी, कधी नवीन खाद्यपदार्थांची मेजवानी या गोष्टी ओघाने होतचं असतात. परंतू मला असं वाटत की, सिझल देसी यामध्ये जरा अपवाद आहे. 

 रेस्टाँरंट व्यवसाय सांभाळत सगळ्यांना फायदेशीर ठरेल असे काही सामाजिक- शैक्षणिक विषयाला अनुसरून वेगवेगळे सेमिनार्स सिझल देसी मध्ये होतात. याच संकल्पनेच नाव- सिझल कट्टा. हा कट्टा महिन्यातल्या दर शनिवार रविवारी एका ठराविक वेळेत भरतो. सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत या सिझल कट्ट्यावर सगळे जण एकत्र येतात. याचा मुख्य हेतू इतकाच की, आपल्या सर्वांना उपयोगी पडेल अशा विषयांवरचे सेमिनार्स आयोजित करून त्या विषयाबद्दल माहिती पोहोचवणे. विशिष्ट क्षेत्रात अनेक वर्ष काम केलेली व्यक्ती याठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केली जाते. मार्गदर्शन करणे, माहिती पोहोचवणे हा हेतू असल्यामुळे  या सिझल कट्ट्यावर होणारे सर्व सेमिनार्स हे फ्री असतात. शिवाय  हा कट्टा सर्वांसाठी खुला असतो.

या सिझल कट्ट्यावर आजपर्यंत अनेक विषयावर सेमिनार्स झाले.

माइंड प्रोग्रामिंग ( सतीश रानडे), 
इनव्हेसमेंट (गणेश भिडे) अँड व्हील (पूर्वा नायगावंकर)
धेय्य निश्चिती आणि पूर्ती( सतीश रानडे), 
हैप्पी पॅरेंटिंग ( अपर्णा निमकर), 
व्हाय मेडीक्लेम ( गणेश भिडे), 
माझी गुंतवणूक आणि गुंतवणूकदाची मानसिकता तसेच शेअर बाजारात काय करावे काय करू नये?( निखिलेश सोमण)
व्यक्तिमत्व विकास( कविता जोशी), 
स्ट्रेस मॅनेजमेंट( मनशक्ती), 
महिला दिनाच्या दिवशी महिलांकरता विशेष कुकिंग वर्कशॉप( शेफ पराग जोगळेकर) , 
यूज ऑफ इंटरनेट अँड मोबाईल अॅप ( हिमांशू  वैद्य), 
सर्व्हिकल कॅन्सर (डॉ. नयना जाधव)
फूल मून मेडिटेशन सुद्धा एक अनोखा मेडीटेशनचा प्रकार सिझल कट्ट्यावर होत असतो.

शिवाय या रविवारी म्हणजेच ३० एप्रिलला  'मनावरील ताणाचे नियंत्रण आणि कौटुंबिक सुख-शांती' या विषयावर 'मनःशांती' संस्थेतर्फे व्याख्यान असणार आहे. 

सिझल कट्टा सुरु होऊन ३ महिने झाले.  या तीन महिन्यात झालेल्या सेमिनार्सची काही क्षण चित्र .











Sizzle  Desi- एक वेगळी  आणि हटके खवय्येगिरी.  
( पदार्थ ) मूळ  संकल्पना : शेफ पराग जोगळेकर. 

1,Trishul Apt, Besides Celebration Hall, Eastern express Highway, service road,Panchpakhadi , Thane 4000602
Hotel no: 022-25339741/51



Wednesday, April 5, 2017

Goal Setting Workshop

हाय फ्रेंड्स , 

आजचा ब्लॉग हा विशेषकरून आपल्या खास तरुण मित्र - मंडळींसाठी जरी असला तरी ज्या वर्कशॉप बद्दल आज आपण बोलणार आहोत  त्यात सहभागी होण्यासाठी वयाचं अजिबात बंधन नाही. 

असो...तर मूळ  मुद्द्याकडे वळते.

आजच्या तरुण पिढीचं आणि करियरचं  समीकरण जोडायला गेलो तर त्या समीकरणात वेगवेगळे  कंगोरे समोर येताना दिसतात. उदा. आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धेचं प्रमाण खूप आहे. पण तरी तितक्याच प्रमाणात संधी , योग्य मार्गदर्शन या गोष्टी सुद्धा विद्यार्थ्यांना वेलकम  करतच असतात. 




करियर निश्चित करताना आजकाल  आपल्या आवडीला अधिक महत्त्व दिले जाते.  'तुझी Passion ( पॅशन ) काय आहे त्यात करियर कर.... '  असं बरेच वेळा आपण म्हणतॊ, ऐकतो आणि स्वतः सुद्धा तेच करण्यावर भर देतो. 

पण याच Passion ( पॅशन )  शब्दाची जरा गंमत  होत असते. कारण काहींना हीच passion  कधी लवकर कळते, काहींना उशिरा, किंवा कधी अर्ध आयुष्य दुसऱ्या क्षेत्रात काम करून झाल्यावर नेमकी passion  समोर येते. त्यामुळे हा passion  चा लपंडाव जरा गमतीशीर आहे. हा लपंडाव असं   लिहिताना तसं सोपं  वाटतं किंवा सहज आपण बोलून जातो पण आपल्या करियर मध्ये जेव्हा आपल्याला नेमकं काय  करायचं आहे, आपली आवड नेमकी कशात  आहे?  याचं  उत्तर जेव्हा सापडत नाही तेव्हा मात्र मनाची खूप चिडचिड होते.

 माझ्या ओळखीत काही व्यक्ती  अशा आल्या की, ज्यांना वयाच्या पाचव्या वर्षीच माहित झालं  होत की  आपल्याला हि अमुक एक गोष्ट आवडते आणि आपण यातच करियर करायचं. काही जण  'गो विथ द फ्लो' असं  म्हणत  गेले आणि जिथे आपले मित्र-मैत्रिणी तिथे आपण असं  समीकरण वापरत  पुढे गेले. मग अगदी  सेम  कॉलेज आणि जरा बऱ्यापैकी जमेल असे विषय निवडत गेले. पास आउट  झाल्यावर मात्र नेमकी आवड आणि हातातली डिग्री यात बरीच तफावत. 



मग मनाचा गोंधळ,वेळ फुकट जाण्याचा त्रास, विचार करत बसण्याचा किंवा आहे ते स्वीकारून  बऱ्यापैकी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न अशा तडजोडी करत करियर करणारी काही मंडळी आहेत.





तर काही विद्यार्थी स्वतःचा विचार न करता आणि आपल्याला काय येतं  किंवा काय येत नाही असा दोन्हीचा विचार न करता  जिथे पैसे जास्त, स्कोप जास्त अशा क्षेत्रात करियर करायचा निर्णय घेतात. तर कधी आई-वडील,  भाऊ बहीण यांच्या हट्टावरून  आवड ठरवणारी मंडळी सुद्धा आहेत.





त्यामुळे एकूणच काय तर करियर ठरवत असताना झालेला गोंधळ आणि आवड/passion  लक्षात न घेता निवडलेलं  क्षेत्र यावरून आपल्या लक्षात येतं  की, आपण आपल्या आयुष्यात  'GOAL SETTING' करायला आपण कुठेतरी कमी पडलो.


जर आपण आपल्या आयुष्यात धेयय   निश्चित करू शकलो तर कितीतरी गोष्टी सोप्या होतील. मेहनत जास्त करावी लागेल पण मनाचा गोंधळ होणार नाही. आणि जर आपलं  मन आनंदी असेल तर आहे त्या कामात, करियर मध्ये अगदी करियरमधली आव्हानं  पेलताना सुद्धा आपल्याला त्रास होणार नाही उलट आपली स्वतःची प्रगतीच होत राहील. त्यामुळे दणकेबाज करियर करायचं असेल, त्यात जीव ओतून  काम करायचं असेल फक्त पैशाने नाही तर ज्ञानाने सुद्धा श्रीमंत व्हायचं असेल तर 'गोल सेट' करणं  गरजेचं आहे असं  म्हणायला काहीच हरकत नाही. 

येत्या २२ एप्रिलला  ठाण्यात याच 
'GOAL SETTING' या विषयवार एक वर्कशॉप आहे. 

  • यात गोल सेटिंग का करायचे? 
  • ते कसे सेट करायचे? 
  • ते साध्य कसे करायचे? 
  • आणि गोल्स मनात ठेवून आत्मपरीक्षण (self  analysis)  कसे करायचे? 
  •  या सगळ्या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत सॉफ्ट  स्किल ट्रेनर गौरी खेर मॅडम . 
  • आपण लोकसत्ता मध्ये  'वेगळ्या वाटा' या सदराखाली आलेले लेख वाचले असतलीही. त्यांच्याकडून प्रत्यक्ष मार्गदर्शन तुम्ही नक्की घेऊ शकता. 

  • रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख १९ एप्रिल २०१७ आहे.
  • वेळ : ७. ३० ते ११. ३०
  • प्रति शुल्क: ७५०/-प्रति ( नाश्ता व स्टडी मटेरिअलसहित)
  • तेजस्वी : 8433820813
  • workshops.hosquo@gmail.com