Sunday, February 26, 2017

परदेशी शिक्षण भाग ३


आज परदेशी शिक्षण भाग ३ सर्व वाचकांसाठी घेऊन येत आहे.


आजकाल आपण अनेक ठिकाणी सतत ऐकत असतो की,'माझा मुलगा बाहेर जाणार आहे शिकायला...किंवा माझी मुलगी १२वी नंतरच US ला गेली आहे, आता तिथेच चांगली नोकरी सुद्धा मिळाली आहे.' वगेरे वगेरे....म्हणजे थोडक्यात कायं तर बाहेर शिकायला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा कल सध्याच्या काळात आपल्याला वाढताना दिसतोय आणि पालकांनी सुद्धा मानसिक आणि पर्यायाने आर्थिक तयारी करून ठेवलेली असते.
पण ते सगळं असलं तरीसुद्धा सातासमुद्रापार अर्धवट माहिती  ने जाणं  जरा धोकादायक  नाही का?
कारण त्यात आपण आपला वेळ, पैसा, करियर याची एक प्रकारे गुंतवणूक करत असतो. ही गुंतवणूक योग्य पद्धतीने होणं मला तरी खूप गरजेचं वाटतं. अर्थात, तुम्ही  सुद्धा माझ्या मताशी सहमत असालचं.


( तुमच्या प्रतिक्रिया/ अनुभव  ब्लॉगच्या शेवटी Comment Box मध्ये टाकू शकता)

परदेशी शिक्षणाकरता जाण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थी -पालक यांच्यासाठी 'एन्ड टू एन्ड' सोल्युशन्स देणाऱ्या गेली बारा-तेरा वर्ष या क्षेत्रात अतिशय प्रामाणिकपणे काम  करणाऱ्या दोन बहिणींशी माझी ओळख झाली. उत्तम उद्योजिका म्हणून या क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. रुपाली ठाकूर आणि वृष बर्वे. IE मार्फत (Interedwise Education)  त्या मुलांना परदेशी शिक्षणासंदर्भात मार्गदर्शन करतात.

मागच्या भागात  व्हिसा, विद्यार्थ्यांसोबत पालकांना मिळणारे मार्गदर्शन, एकूणच  IE (Interedwise Education)ची झालेली  सुरुवात, आणि देश व कोर्स  ठरवताना विद्यार्थी मित्रांनी घ्यायची काळजी याविषयी माहिती देणारा ब्लॉग होता. परदेशी शिक्षण भाग २ मध्ये रुपाली ठाकूर यांनी मार्गदर्शन केलं होतं.त्याची लिंक सुद्धा सोबत जोडत आहे.
   
http://gayatrikashelkar.blogspot.in/2016/12/blog-post_27.html?view=classic

या भागात विद्यार्थी -पालक यांना  मार्गदर्शन करणार आहेत रुपाली ठाकूर मॅडम आणि वृष बर्वे मॅडम. या आधी वृष बर्वे यांनी  फोन मुलाखतीतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं होत.

विशेष टीप : (तुमच्यापर्यंत ती मुलाखत पोहोचली नसेल तर तुमचा इमेल आयडी comment box मध्ये तुम्ही टाकू शकता. अगदी काहीश्या मिनिटांत उपयुक्त माहिती तुम्हाला मिळेल असा तो फोन इंटरव्हू आहे. आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचवू. )

परदेशी शिक्षण भाग ३ 

आर.जे गायत्री: परदेशी शिक्षणाकरता जाण्याचा निर्णय जेव्हा निश्चित होतो त्यानंतर सगळ्या प्रोसिजर्सना (Procedures) किती वेळ लागतो?

वृष बर्वे:   साधारण सहा -आठ महिने लागतात.कारण हा प्रवास पूर्णपणे 'डेस्टीनेशन टू डेस्टीनेशन' असतो. त्यासाठी सगळ्यात पहिले मी विद्यार्थ्यांना सांगीन  कि, त्यांनी त्यांची प्रोफाईल तयार ठेवावी. अगदी सुरुवातीपासूनच आम्ही मुलाचं काउन्सिलिंग करतो. त्याचं करियर मधलं मुख्य ध्येय, त्यांना नेमकं काय करायचं आहे?, त्यांना बाहेर जायचं आहे पण नेमकं कुठे शिकायला जायचं आहे?
उदा. द्यायचं झालं तर समजा एखाद्या विद्यार्थ्याला जर्मनीला ऑटोमोबाईल क्षेत्रातल्या  शिक्षणासाठी जायचं आहे. तर त्यासाठी लागणारी तयारी याविषयी आम्ही मार्गदर्शन करतो. शिवाय व्हिजन काय आहे? डेस्टीनेशन कोणतं निश्चित केलं आहे? शिक्षण सुद्धा ठरवलेल्या अनुषंगाने असायला हवं, अगदी दहावी पासूनच्या सगळ्या मार्कशीट्सची आवश्यकता असते.अशा सगळ्या गोष्टींविषयी आम्ही मार्गदर्शन करतो. जीआरई, टोफेल, जीमॅट या परीक्षांचे आम्ही क्लासेस सुद्धा घेतो. तीन महिन्यात मुलांची संपूर्ण तयारी होईल हे आम्ही बघतो.
 
आर.जे गायत्री: तुम्ही Mock Interview ची तयारी कशी करून घेता?



रुपाली ठाकूर : विद्यार्थ्यांच्या व्हिसा प्रोसेसिंगच्या वेळी याची तयारी करणं गरजेचं असतं. कारण तेव्हा मुलांच्या हातात कॉलेज/ युनिव्हर्सिटीचं ऑफर लेटर सुद्धा आलेलं असतं. आता परीक्षा असते त्यांच्या व्हिसाची. पण त्याची सुद्धा आम्ही तयारी करून घेतो. Interview मध्ये काय प्रश्न विचारतील याची सर्व कल्पना आम्ही मुलांना देतो, त्यानुसार त्यांच्या  उत्तरांची  तयारी होते. एवढचं नाही तर ते कसं बोलतात आणि स्वतःला  कशापद्धतीने सादर करतात हे पाहून आम्ही त्यांना अजून सुधारणा करण्यासाठी मदत करतो.  त्यांचा आत्मविश्वास, शब्दोच्चार, मॅनरीजम, अॅक्सेंट एकूणच त्याचं इमेज बिल्डींग याविषयी संपूर्ण माहिती, मार्गदर्शन देऊन त्याची  तयारी सुद्धा आम्ही करून घेतो.

आर.जे गायत्री: शैक्षणिक कर्जाच्या दृष्टीने IE ची काय मदत होते?



रुपाली ठाकूर : आम्ही अनेक बँक आणि वित्तीय संस्था (financial institutions) यांच्यासोबत  अफीलिएटेड आहोत. फिनान्स कसा अरेंज करायचा आहे? काही मोर्गेज ( mortgage) करावे लागेल का ? काय आणि कशी आर्थिक तयारी आणि क्षमता आहे? किंवा दुसरे कोणते मार्ग आहेत? याविषयी आमच्याकडून त्यांना शैक्षणिक कर्जाच्या दृष्टीने मार्गदर्शन होत असतं. आणि कोणत्याही प्रकारे पालकांवर पैशाचं प्रेशर येणार नाही याची अधिक काळजी घेतली जाते. आजपर्यंत ६०० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना आम्ही परदेशी शिक्षणासाठी पाठवलं आहे.


आर.जे गायत्री: Pre- Departure Service, Travel and Forex, Post Landing Services या तुमच्या सर्व्हिसेस  बद्दल आम्हाला सांगा.

 वृष बर्वे: Forex च्या बाबतीत सांगायचं झालं तर, फाॅरेन एक्ससेंज साठी आमची मदत होते. काही  एजन्स्सीज  सोबत अफिलीएटेड आहोत. त्यामुळे किती पैसे प्रवासात लागणार आहेत? ते ट्रान्स्फर कसे करायचे? फाॅरेन बँकेत अकाउंट कसं ओपन करायचं? या सगळ्याचा write up आमच्याकडून विद्यार्थ्यांना मिळत असतो.


 शिवाय  Pre- Departure Service अंतर्गत आम्ही त्यांना अगदी छोट्या गोष्टींपासून मार्गदर्शन करतो. एअरलाईन कोणती? flight कोणती आहे? Connecting Flight कोणती आहे? किती बॅगेज नेऊ शकतो आहोत वगेरे सगळचं मार्गदर्शन होत असतं. कधी कधी Discounted Rate मध्ये Flight तिकिट्स उपलब्ध असतात तर त्याचाही फायदा विद्यार्थ्यांच्या प्रवासात  होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.





हा झाला प्रवासाचा विषय आणि त्यालागून सर्व प्री- डीपार्चर सर्व्हिसेस सुद्धा म्हणजे  विद्यार्थी जेव्हा परदेशी पोहोचतात म्हणजेच तिकडे Land होतात तेव्हा खर सांगायचं तर एका नव्या देशात ते अगदीच एकटे असतात तेव्हा आम्ही त्यांच्या मानसिकतेचा विचार करून काही सोयी पुरवतो...
जसं की, Pick Up आणि Drop.
म्हणजे अगदी इथून निघतानाचं तिकडची Pick Up आणि Drop ची सोय आम्ही करून ठेवू शकतो. म्हणजे ते त्यांच्या ठरवलेल्या निश्चित स्थळी शांतपणे आणि सुखरूप पोहोचतात. कारण काही विद्यार्थी कॉलेज किंवा विद्यापीठाच्या हॉस्टेलवर राहण्याचा निर्णय घेतात तर काही जण अपार्टमेंट मध्ये राहण्याचं निश्चित करतात. आमची मदत दोन्हीसाठी असते.

जर त्यांना कॉलेज/विद्यापीठाच्या हॉस्टेलवर राहायचं असेल तर ते शक्य असतं कारण आम्ही काही  एजन्स्सीज सोबत अफिलीएटेड  आहेत. ज्यामुळे त्यांची सोय अतिशय उत्तमरीत्या होते.  तर काही विद्यार्थी अपार्टमेंट मध्ये राहाणं पसंत करतात तर यात आम्ही त्यांना मार्गदर्शन आणि माहिती देतो...जसं की, कॉलेज पासून अंतर किती आहे? नेमकी लोकेशन काय आहे वगेरे. पण आमचा प्रयत्न हाच असतो कि, विद्यार्थी 'लोकेशन हब' भागात राहतील जिथून त्यांना सगळचं जवळ पडेल. आणि कमीत कमी खर्चात त्यांना जास्तीत जास्त चांगली सर्व्हिस कशी मिळेल हाच मुद्दा ठेवून आम्ही मदत करतो.

आर.जे गायत्री: धन्यवाद !!


Contact no:  022-65150555 –   MOB: 98 20 38 31 18/ 93 22 15 05 47 
ADD: C-105, 1st Floor, Sai Classic Bldg; 90 Feet Road,
Mulund – 400 081  
Email : mulund@ieplcareer.com 
URL: www.ieplcareer






तुम्हाला काही अधिक प्रश्न असतील तर तुम्ही आमच्यापर्यंत जरूर पोहचू शकता त्यासाठी आमचा इमेल आयडी आहे...digitalmindspace@gmail.com .










Wednesday, February 22, 2017

Sizzle Desi मध्ये उपवासाचे सिझलर्स

हाय फ्रेंड्स....नाही नाही, हाय खवय्ये दोस्त मंडळी....कसे आहात? कसं आहे...फ्रेंड्स...आणि वाचक मंडळी अशी हाक  न मारता जेव्हा मी तुम्हाला खवय्ये दोस्त मंडळी म्हणते तेव्हा आता तुम्हालाच लक्षात येत असेल कदाचित कि मी खाण्याविषयी काहीतरी लिहिणार आहे...अगदी बरोबर.

खवय्ये शब्द आला म्हणजे आपल्या सगळ्यांच आवडतं झालेलं SIZZLE DESI तर आलचं पाहिजे नाही का ? आणि सिझल देसी म्हणजे जगभरातल्या वेगवेगळ्या पदार्थांना आपण एका देसी टचने खाऊ शकतो. आणि फक्त जगभरातले पदार्थच  नाहीत बरं का....अहो आपले उपवासाचे पदार्थ सुद्धा एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने म्हणजेच सिझलिंग प्लेट वर आपण खाऊ शकतो....


तोंडाला पाणी सुटलं ना? ...अहो सुटणारचं....कारण एकतर उपवासाचे पदार्थ आवडीचे असतात त्यात सगळे उपवासाचे पदार्थ सिझलिंग प्लेट वर चुर्रर र्रर्र असा आवाज करत समोर येतात तेव्हा ते खाण्याची मजा काही वेगळीच आहे....

अगदी आपले सगळे नेहमीचे उपवासाचे पदार्थ म्हणजे साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, बटाट्याची भाजी, बटाट्याचा किस, वरी तांदूळ, दाण्याची आमटी, कोशिंबीर आपल्याला अनोख्या अशा सिझलिंग प्लेटवर खायला मिळतील.


आणि येत्या २४ तारखेला  'महाशिवरात्री' निमित्त  आपल्यापैकी अनेकांचा उपवास असेलच. त्यामुळे घरी तर आपण नेहमीच आपले आवडते उपवासाचे पदार्थ करत असतोच यावेळी हेच उपवासाचे पदार्थ जरा अनोख्या पद्धतीने खाउन पाहूया...काय ? कशी वाटतेय आयडिया?



आणि हे वाचता वाचता तिथे जाण्याचा तुमचा प्लान ठरत असेल तर अजून एक माहिती म्हणजे हे उपवासाचे सिझलर्स त्यादिवशी सिझल देसी मध्ये सकाळपासून ते रात्रीच्या डिनरपर्यंत आहेत. त्यामुळे कोणतीतरी एक वेळ नक्कीच ठरवू शकता. आणि जर कोणाचा उपवास नसेल तरी बाकी सगळे पदार्थ सुद्धा असणार आहेतच.
त्यामुळे ऑप्शन बरेच आहेत.... पण हो, पारंपारिक चवीसोबत काहीतरी वेगळं आणि वेगळ्या पद्धतीने खवय्येगिरी करायची असेल तर जरूर जा...आणि उपवासाचे सिझलर्स enjoy करा. अजून एक महत्वाच म्हणजे सर्विस रोड असल्यामुळे पार्किंगच टेन्शन अजिबात नाही.  

sizzle  Desi- एक वेगळी  आणि हटके खवय्येगिरी.  
( पदार्थ ) मूळ  संकल्पना : शेफ पराग जोगळेकर. 

1,Trishul Apt, Besides Celebration Hall, Eastern express Highway, service road,Panchpakhadi , Thane 4000602
Hotel no: 022-25339741/51


Sunday, February 19, 2017

WordsWorth-समर स्पेशल



   हाय फ्रेंड्स ...कसे आहात? आता तुम्ही म्हणाल की, परीक्षांच्या काळात कसे असणार? हो हो...मला पूर्ण कल्पना आहे की सध्या दहावी-बारावी, आणि इतर सगळ्याच विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा काळ आहे...त्यामुळे माझी विद्यार्थी वाचक मंडळी अभ्यास,परीक्षा,पुढचं करियर या सगळ्या विचारात असेल. पण एक मात्र खरं आहे...कितीही अभ्यास,करियर अशा सगळ्या गोष्टी असल्या तरीसुद्धा मे महिन्याचे काहीना काही प्लान्स ठरलेले असतात. याला कोणीच अपवाद नाही. 
म्हणूनच मे महिन्यात सुरु होणाऱ्या WordsWorth बद्दल आज मी या ब्लॉग मध्ये सांगणार आहे.

मला सांगा, या उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमचे फिरायला जाण्याचे काही प्लान्स ठरले असतील?किंवा ठरत असतील? किंवा सुट्टी सत्कारणी लागावी म्हणून तुम्ही काही कोर्सेस पण करणार असाल. हे साधारण चित्र घरोघरी असतच. त्यामुळे आपल्या भविष्यासाठी आवश्यक असा इंग्लिश स्पिकिंगचा कोर्स-WordsWorth याबद्दल तुम्हाला सांगणार आहे.


WordsWorth नावाचा इंग्लिश स्पिकिंगचा क्लास उन्हाळ्याच्या सुट्टीत असणार आहे. हा क्लास फक्त दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांपुरता अजिबात मर्यादित नाही- गृहिणी, व्यावसायिक आणि ज्यांना कोणाला त्यांच्या या भाषेवर प्रभुत्व आणण्याची इच्छा आहे त्या सर्वांसाठी आहे.

कारण इंग्रजी भाषा प्रभावीपणे बोलता येणं ही काळाची गरज आहे. स्पर्धा वाढतेय त्या स्पर्धेत टिकून सुद्धा राहायचं आहे. त्यामुळे जेव्हा व्यावसायिक/उद्योजक मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये किंवा इतर ठिकाणी उत्तम इंग्रजी बोलू शकतात तेव्हा ते नक्कीच पुढे प्रगती करू शकतात. त्यांच्या व्यवसायाला या भाषेमुळे कोणत्याही मर्यादा येत नाहीत. शिवाय गृहिणींना इंग्रजी बोलण्याची किंवा येण्याची ‘काय गरज’? असा प्रश्न पडू शकतो पण कोणतीही गोष्ट शिकल्याने मुळात ती फुकट जात नाही. आणि आपला आत्मविश्वास वाढायला मदत होते.

WordsWorth या इंग्रजी स्पिकिंगच्या क्लासमध्ये व्याकरणापासून ते अगदी ग्रूप डिस्कशनपर्यंत सगळ्याच गोष्टींचा समावेश होणार आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर डायरेक्ट लर्निंग ही अभ्यासपद्धती वापरून तुम्ही इंग्रजी आत्मविश्वासाने बोलू शकणार आहात.


याचा फायदा लक्षात घेता तुम्हाला in advance कळवत आहे....आणि अधिक माहितीसाठी संपर्क देत आहे.

तेजस्वी: 8433820813

Sunday, February 12, 2017

जंगल बुक जंगल गप्पा भाग ६

जंगल बुक जंगल गप्पा भाग ६

पूर्वरंग :
गायत्री: खरंय...ऐकां ना, आपण ५ मिनिटं जरा थांबूया का? तहान लागलीये. पाणी पिते.

मैत्रेयी: गायत्री, जंगलात कधी हरववलीस आणि तुला तहान लागली असेल आणि पाणी नसेल तर एक झाड सांगून ठेवते...

गायत्री: oyee...दुष्ट. असं काय बोलतेस. मी हरवले तर ? ओह्ह्ह..बापरे.

मैत्रेयी: अगं उदाहरण म्हणून सांगतेय गं...पुढे लागेल एक झाड माहूरवेल म्हणून. त्या खोडाला स्लॉट केला की त्यात अगदी स्वच्छ पाणी मिळेल.

गायत्री: ओह्ह...असं पण आहे इथे ...सही यार. निसर्गाची किमया अफाट आहे.

(पायी ट्रेल करताना आम्ही ५ मिनिटांची विश्रांती घेतली आणि मग पुढे प्रवास सुरु केला. पुढचा पायी ट्रेल पुढच्या भागात.)

यापुढे....५ मिनिटांच्या विश्रांतीनंतर गायत्री आणि मैत्रेयी यांचा पायी ट्रेल परत सुरु होतो.

गायत्री : चला, निघूया. मैत्रेयी, आता काय काय पाहायचं आहे?

मैत्रेयी: आपल्या आजूबाजूच्या सगळ्याच गोष्टींच निरीक्षण करत पुढे जायचं...कारण...पायी ट्रेल म्हणजे micro habitat पाहत पाहत आपण पुढे जाऊ शकतो...सगळ्याच गोष्टींच निरीक्षण करत पुढे जाऊया म्हणजे पायी ट्रेल यशस्वी होऊ शकतो.

गायत्री: ok madam....जशी आपली आज्ञा....

मैत्रेयी: बास हं आता...ते बघ, तो ऐन वृक्ष आहे. त्याला पानं नाहीत त्यामुळे आपण तो खोडावरून ओळखू शकतो.

(गायत्री जवळ जाऊन खोडाचं निरीक्षण करते)

गायत्री : हे खोडं जरा वेगळ वाटतयं गं...

मैत्रेयी: निरीक्षणशक्ती चांगलीच सुधारली आहे madam तुमची...मी आता त्याबद्दलचं सांगणार होते. त्याला ‘क्रोकोडाइल बार्क ट्री’ म्हणतात. कारण मगरीच्या पाठीसारखा भास याठिकाणी होतो.


गायत्री: ohhh...भारी. इथे केवढी ऐनची झाडं आहेत गं...ते बघ तिथे पण आहेत.

मैत्रेयी: आपल्याला जंगलात ऐन हे सगळ्यात जास्त प्रमाणात नेहमीच पाहायला मिळतील. आणि अर्जुन सुद्धा. तिथे दिसतंय का? ते बघ...तिथे चारोळी, तेंदू आणि काय आहेत ते ? चल...तिथे जवळ जाऊन पाहूया...

हं....गायत्री, हे चारोळी, तेंदू आणि मोह आहेत....यांची फळं प्राण्याचं खाद्य असतं.

गायत्री: मैत्रेयी, ते काय आहे गं ....पिवळी फुलं ?

मैत्रेयी: तो बहावा ....पिवळा गुच्छ लांब लोंबकळणार तेच ना? त्याला ‘गोल्डन शॉवर ट्री’ सुद्धा म्हणतात...आणि अजून एक interesting खोडं दाखवते तुला....


गायत्री: मी ओळखते थांब....

दोघी पुढे जातात ....
मैत्रेयी: हा धावडा आहे....ग्रे रंगाच खोडं आहे याचं...आणि यावर पांढरे धब्बे असतात... आणि एक सिन्हा नावाच सुद्धा झाड आहे. पुढे दिसेल आपल्याला. त्या खोडाची सालं खरवडलेली असतात. पापुद्रे निघालेले असतात.

गायत्री: पण ते पांढर शुभ्र खोड कोणतं आहे ? तो धावडा नाही ना?

मैत्रेयी: हे करू आहे. करकरीत स्वच्छ पांढर खोड. आणि ते बघ गायत्री...ते ऑरकिड्स आहेत..

गायत्री: ते असं दुसऱ्या झाडावर का आलेत गं?

मैत्रेयी: हो आलेत खरे पण फक्त ते support घेतात. पण अन्न मात्र स्वतःच स्वतः तयार करतात म्हणजेच त्यांच्या मुळांमधून पाणी शोषून घेतात त्याला EPITHYTIC ROOT असं म्हणतात.

गायत्री: मैत्रेयी, कसलं भारी आहे यार हे सगळं...तू म्हणाली होतीस ते बरोबर आहे...पायी ट्रेल करायला मजा येतेय. किती किती नवीन शिकायला आणि ऐकायला मिळतंय ग. म्हणजे बघ ना...प्रत्येक झाडाची त्याच्या पानाची खासियत आहे...त्यावरून जंगलाचे प्रकार सुद्धा ठरतात....तू मध्ये म्हणाली होतीस बघं कि पानगळीच जंगल...एव्हरग्रीन जंगल याबद्दल ...मला ते मनोमनी पटतंय आता.

मैत्रेयी: hmmm....झाडांची त्याच्या पानांची खासियत तर आहेच शिवाय ऋतूनुसार सगळ बदलत असतं...त्यानुसार जंगलाचा प्रकार सुद्धा ठरतो. म्हणजे थोडक्यात काय तर सगळी ecosystem एकमेकांवर अवलंबून असते. पानगळीचं जंगल म्हणजे थंडीमध्ये पान गळतात आणि उन्हाळ्यात येतात. आणि वर्षभर पालवी असते त्याला आपण म्हणू शकतो एव्हरग्रीन जंगल...

गायत्री: मैत्रेयी, पण मला एक प्रश्न असा पडलाय कि, ही झाडं त्याचे नवे प्रकार कसे ओळखायचे? किती बारीक सारीक बदल दिसत आहेत....

मैत्रेयी: हो...ते पण ओळखायच्या पद्धती आहेत..अगदी scientific . ohhh...ops. त्याबद्दल सांगते नंतर...

गायत्री: अग काय झालं?

मैत्रेयीचा चालता चालता विष्ठेमध्ये पाय पडतो.....

हा पण पायी ट्रेलचा एक भाग आहे हा गायत्री....हाहाहा....( दोघी हसतात)

मैत्रेयी: ही विष्ठा अस्वलाची असणार.

गायत्री: तुला कसं कळल ग? आणि इथे अस्वल आहे का म्हणजे? बापरे....चल जाऊया मैत्रेयी.

मैत्रेयी: डरनेका नही madam....आणि हो, अस्वलाची विष्ठा ही चिकट गम सारखी असते. कारण त्याच्या आहारातला बराचसा भाग बेलफळाचा असतो.  त्याच्या आहारात तेंदू, बहावा आणि वाळवी असते ते यावरून लगेच लक्षात सुद्धा येऊ शकत. शिवाय सिल्व्हरिक रंगाची डोकी जेव्हा त्याच्या विष्ठे मध्ये दिसतात ती असतात वाळवीची. पोट साफ होण्यासाठी अस्वल बहाव्याच्या शेंगा खातो. आणि ऋतूनुसार त्याचं खाद्य बदलत राहतं हे सुद्धा आपल्याला यातूनच लक्षात येत राहतं.

गायत्री: ohh....असं तर सगळ्याच प्राण्यांच्या विष्ठेमध्ये काही ना काही वेगळेपण असेल त्यामुळे अभ्यासकांना नक्कीच फायदा होत असणार.

मैत्रेयी: हो अर्थात, आता बघ, चित्तळाची विष्ठा ही लहान पॅलेट प्रमाणे असते. त्याची संख्या मोजून प्राणीगणनेसाठी याचा उपयोग होतो.
 लंगुरांची माणसासारखीचं असते.

 तर नील गायीची वेगळी असते. मोठे ढीग असतात . त्याला मखर सुद्धा म्हणतात. त्यांची एक सवय असते त्या सगळ्या नील गायी एकाच ठिकाणी येऊन विष्ठा करतात.

गायत्री: ओह्ह...बापरे...बरीच नवीन माहिती मिळतेय. आपल्याला जिप्सीच्या सफरीमध्ये या गोष्टी काहीच पाहता येत नाहीत ना....

गायत्री आणि मैत्रेयी पुढे जात असतात...पायी चालता चालता निरीक्षण करत करत हे बोलणं चालू असतं.

मैत्रेयी: मांजर प्राणी वर्गातली विष्ठा ही मनुष्यप्राण्यासार्खीच (scat) असते पण त्यातला फरक एवढाच कि त्याच्या आकाराप्रमाणे ती रानमांजर, बिबळ्या,वाघ यांच्यापैकी कोणाची हे ओळखता येऊ शकत. त्यात जर राठ काळे केस दिसले तर बिबळ्याने दोन दिवसांपूर्वी रानडुक्कर खाल्लं आहे हे लक्षात येतं.

गायत्री: अगं...तू मगाशी मला काहीतरी सांगत होतीस...पद्धतीबद्दल..मी विचारलं ना तुला...झाडं कशी ओळखायची वगैरेर...मग तुझा पाय पडला. मग तू म्हणालीस नंतर सांगते...

मैत्रेयी: अग हो..हो. आठवतयं मला....हर्बेरीयम आणि बार्क ऑटोग्राफ अशा दोन पद्धती आहेत.

गायत्री: म्हणजे काय करायचं त्यात?

मैत्रेयी: झाडावर कागद ठेवायचा, पेन्सिल घेऊन खरवडायचं. ती इन प्रिंट नंतर match होतेय का ते पहायचं. हर्बेरीयम मध्ये झाडाची फुलं,पानं त्यातून पाणी काढून टाकायचं आणि ते preserve करायचं. या इन्फो कलेक्शन टेकनिक्स आहेत. गायत्री , ते बघ ....

गायत्री: बापरे ...कोणी आलं का? गायत्री पटकन मागे वळून पाहते.
मैत्रेयी: अगं कोणी आलं नाहीये....मी तुला ती वेल दाखवतेय. आता पटकन दिसली. माहूरवेल म्हणतात तिला. नाजूक असतात पण खोडाइतक्या मोठ्या असतात.

गायत्री आणि मैत्रेयी जवळ जाऊन त्याचं निरीक्षण करतात.

मैत्रेयी: गायत्री, मला सांग....general knowledge question विचारतेय....

गायत्री: अरे बापरे....अग माझ्या नावात फक्त GK आहे गं...गायत्री कशेळकर. पण बाकी सगळी गंमतच आहे.

मैत्रेयी: ते जाऊदे गं...गंमत म्हणूनच विचारतेय....
बांबूच वन हे काय आहे? झाड? गवत? की झुडूप?

गायत्री: गवत नक्कीच नाही....झुडूप पण नाही...झाडचं आहे...
Answer lock किया जाय.

मैत्रेयी: hahahha....सोलिड उत्त्तर चुकलेलं आहे गं...hahhaha.

गायत्री: एकतर मी पहिल्यांदी जंगलात आले आहे....त्यात माझं gk धन्य...त्यात तू हसं मला...

मैत्रेयी: रागवू...नको ग. hahhaha...नाही हसतं...hahahha.

गायत्री: हेच किती हसत सांगतेयस...जाऊदे..काय आहे खरं उत्तर?

मैत्रेयी: बांबुच वन हे गवत आहे. tallest गवत. ते एकाच दिशेला वाढत जातं त्यामुळे बांबुच वन सलग दिसतं. आणि सगळ्यत interesting म्हणजे ४० वर्षातून एकदा फुलं येतं आणि मग बांबू मारतो.
गायत्री: ohhh....४० वर्षातून एकदा फुलं? सही यार.

गायत्री आणि मैत्रेयी चा परतीचा प्रवास सुरु झालेला असतो.
वेळ ५.३० संध्याकाळी.

गायत्री: हा किर्र आवाज रातकिडे ना ग...

मैत्रेयी: नाही...आपल्याला रातकिडे वाटतात पण ते रातकिडे नसतात. तर शोधायला अवघड असतील असे cicada नावाचा कीटक असतो तो.

गायत्री आणि मैत्रेयी यांची जीप्सीची सफर आणि पायी ट्रेल पूर्ण होतो. आता यापुढे जंगल सफर अजून एका अनोख्या पद्धतीने करणार आहेत. यासाठी पुढचा भाग जरूर वाचा.