जंगल बुक – जंगल गप्पा भाग २
जंगल बुक – जंगल गप्पा भाग १ (आता गायत्री आणि मैत्रेयी कोणत्या ठिकाणी जायचं...कधी जायचं या सगळ्या गोष्टी ठरवत ठरवत गाडीवरून जातात....) यापुढे ....
दीड महिन्यानंतर ....
(जंगल पाहायचं कसं या विषयावर मैत्रेयीने गायत्रीला काही खूप छान गोष्टी सांगितलेल्या असतात. त्यामुळे जंगल पाहायचं कसं, वाचायचं कसं आणि हे सगळ करत असताना जंगलातलं सौंदर्य कसं शोधता येऊ शकत याविषयी गायत्रीला उत्सुकता निर्माण होते. आणि लिहिण्यासाठी वेगवेगळे विषय सुद्धा मिळू शकतात, नवीन माहिती मिळू शकते, दृष्टीकोन बदलू शकतात शिवाय तिची जंगला बद्दलची भीती सुद्धा जाऊ शकते या विचाराने गायत्री जंगलात सफर करण्यासाठी तयार होते. त्यामुळे पानगळ सुरु झालेला उत्तम महिना अर्थातच डिसेंबर महिना पाहून गायत्री आणि मैत्रेयी ताडोबाची सफर करायचा मस्त प्लान करतात.)
मैत्रेयी : (फोन वर) hello....काय madam...झाली का तयारी? उद्या जायचंय ...घाबरली नाहीस ना.....हाहाहा ( हक्काने चिडवून)
गायत्री : नाही गं....किती वेळा ते घाबरली घाबरली चालू आहे तुझं. गप्प बस आता. (हक्काने चिडून)
मैत्रेयी: ok....sorry. चिडू नकोस...
गायत्री : hmmmm.....बरं ऐकं...मी आत्ताच बॅग भरायला घेतेये.
मैत्रेयी: म्हणजे मी योग्य वेळी फोन केला आहे. तुला तेच सांगायचं होत. साधारण मळकट रंगाचे वगैरे कपडे घे...किंवा थोडे जुने. नाहीतर एकदम चांगले कपडे घेशील...आपण निवेदन करायला नाही जाणार आहोत...हाहाहा.
गायत्री: होय गं... आज मला त्रास देण्यासाठीच फोन केल्यास ना ..कुचकट. सोड. बोल पुढे...
मैत्रेयी: हाहाहा...hmmmm...दुर्बीण घे. वही पेन.
गायत्री : ओके....मी मस्त नवीन शूज घेतले आहेत...आणि hat सुद्धा.
मैत्रेयी: आणि madam....आपण तिथे एक अभ्यासक म्हणून जाणार आहोत बर कां....ट्रीप नाहीये.
गायत्री: आता हे तू मला आपला प्लान ठरल्यापासून साधारण १० वेळा तरी सांगितलं आहेस....मी पण अभ्यासक म्हणूनच येतेय. आणि तशीच तयारी केलीये मी....dont worry.
मैत्रेयी: हो गं...मी गंमत केली. तशी तू आहेस प्रामाणिक.
गायत्री : haan....बोलं आता ... मला माहितीये तु आता काय म्हणणार आहेस.. माझा विद्यार्थी प्रामाणिक आहे हेच ना....असो. चल. भेटूया उद्या...
मैत्रेयी: yes....bye.
(दोन दिवसाचा चंद्रपूरपर्यंतचा प्रवास ट्रेनने केल्यानंतर पुढे दोन तासावर असलेल्या ताडोबा जंगलापर्यंतचा प्रवास बसने पूर्ण होतो.
गायत्रीच्या मनात खूपच उत्सुकता...आणि मैत्रेयी Teacher Zone मध्ये गेलेली असते. कारण मैत्रेयी अनेक वर्ष जंगलात फिरलेली असते आणि गायत्रीचा जंगलात जाण्याचा पहिलाच अनुभव....त्यामुळे भीती, आणि उत्सुकता अशा दोन्ही भावना मनात असतात.)
आता खऱ्या अर्थाने सफर सुरु....
गायत्री : wow.....आलो आपण....अगं पण आपण आलोय ना ताडोबा मध्ये...मग एवढी रहदारी कशी...बघ नां...किती गाड्या येत्यात जात्यात...असं कसं?
मैत्रेयी: hmmmm....अगं याला Buffer Zone म्हणतात. म्हणजे मुख्य जंगल प्राण्यांसाठी तर असतच...पण याठिकाणी थोडी रहदारी असते.
गायत्री : पण असं का? मला कळलं नाही....
मैत्रेयी: हे बघं....हे मुळात माणूस- आणि प्राणी यांच्यातली दरी दूर करण्यासाठी आहे. basically, man- animal conflict दूर करण्यासाठी....आता जेव्हा प्राण्यांची संख्या वाढते तेव्हा ते त्यांच्या हद्दीपासून बाहेर येतात..मग ते एकदम जंगलाबाहेर येऊ नयेत म्हणून हा Buffer Zone आहे....
गायत्री : ohhh....अच्छा....eee.....ते बघं....सांबर.....(लगेच फोटो आणि दुर्बीण घेऊन उत्सुकतेने निरीक्षण )
मैत्रेयी: तो बघं...मोर....
गायत्री: आईशप्पथ.....superb.....इथे पण सांबर आहे ना तो मैत्रेयी....
मैत्रेयी: हो....रानकोंबडे सुद्धा असतात या Buffer Zone मध्ये.
( हे सगळं disscussion बफर झोन मधून जाताना बस मध्ये....)
गायत्री : हो..का...? सहीये...मजा येणारे. माझा निर्णय correct होता.
मैत्रेयी: आणि कसं असतं माहितेय एक जंगल कॉरिडॉर नावाचा concept आहे.
गायत्री : म्हणजे ?????
मैत्रेयी: अगं सांगतेय....सांगतेय..किती घाई? हाहाहा
गायत्री : हं...sorry..बोल बोल...
मैत्रेयी: सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे जंगलांना जोडणारा पट्टा. कधी कधी काय होत की, वाघ किंवा इतर प्राणी त्यांची terriority सोडून लांब लांब जातात. त्यांनी एकदम वस्तीत यायला नको म्हणून हे जंगल कॉरिडॉर आहेत. आता north south कॉरिडॉर बनतोय.
गायत्री: म्हणजे काही पट्टे कृत्रिम पण आहेत का?
मैत्रेयी: हो....काही natural...काही artificial कॉरिडॉर्स...
(बस मधून उतरून पायी चालत चालत.....)
गायत्री : eee...मैत्रेयी...मला सांग तू मला म्हणाली होतीस ना...जंगल पाहताना vertical and horizontal concept...ते सांग ना आता....तेव्हा आपण जिमखान्यावर होतो...त्यामुळे नीट कळलं नव्हत.
मैत्रेयी: जंगल vertically पाहशील तर micro habitats नीट दिसतील...म्हणजे झाडांना पालवी फुटलेली दिसेल...एकतर आपण मस्त डिसेंबर मध्ये आलोय. फुलं, फळ, गवत वाढलेलं दिसेल...
गायत्री : आणि horizontal मध्ये काय काय दिसेल?
मैत्रेयी: एक मस्त ग्रीनरी....पाण्यांचे साठे दिसतील.
गायत्री : hmmm....पावसामुळे पाणी भरलेलं असेल. बरोबर....
मैत्रेयी: आणि आता forest department ने काही protection measures सुद्धा केले आहेत. ते सिझन प्रमाणे बदलतात.
गायत्री : ohhh....सहीये यार....पण नेमकी कोणती काळजी घ्यावी लागते गं त्यांना?
मैत्रेयी: जर कधी वाघिणीला पिल्लं झाली तर ती मोठी होईपर्यंत त्या भागात कोणाला जाऊ देत नाहीत. अशाप्रकारे....
गायत्री: ओह्ह....hmmm, गरजेच आहे ना....
eee...मला सांग आता आपण कसं फिरायचं आहे जंगल? wow....m very excited....
मैत्रेयी: बरेच पर्याय आहे...आपण पायी जाऊ शकतो....
गायत्री : बापरे !!..पायी...भीती वाटते गं.
मैत्रेयी: आपण तीच भीती काढायला आलो आहोत ...आणि आपल्यासमोर जंगलाच एक चित्र उभ राहलय...जंगल म्हणजे भूत...डरावणं काहीतरी...तसं नाहीये. त्याचं जंगलाच सौंदर्य उलगडायला आलोय आपण....
गायत्री : hmmmm नाही घाबरणार...तू म्हणशील ते मान्य...
मैत्रेयी: आपण जंगल सफारी करू शकतो...open जीप...त्यात आपल्याला सगळे प्राणी दिसतील...कमीत कमी वेळात सगळ जंगल पाहता येईल...
गायत्री : मग तेच बेस्ट...
मैत्रेयी: हो..पण त्यात निरीक्षण नाही करता येणार. खाणाखुणा, कीटक, सगळी observations miss out होतील...म्हणतात ना....जंगलांचे राज असतात. ते नाही कळणार मग...
गायत्री : ohhh....मग पायीच जाऊया...येते मी.
मैत्रेयी: पण आता पायी trails बंद केले आहेत. आता नियम कडक झालेत. त्यांनी आखून दिलेलेच मार्ग फक्त पायी चालण्यासाठी असतात.
गायत्री : मग कसं जायचं ? ee...ती आपली पारंपारिक पद्धत मचाण असेल ना...एका ठिकाणी हालचाल न करता बसायचं ...खूप काही तास...ते करूया का? मला ते करायचं आहे....
मैत्रेयी: पण त्यासाठी आपल्याला forest department permission लागेल..पण आत्ता नाहीये आपल्याकडे...
गायत्री : अरे यार...शीट....
मैत्रेयी: खरं सांगायचं तर मचाणावरून निरीक्षण करता येतं आणि पायी चाललो तर जंगल वाचता येतं....पण एक गंमत आहे...तुला मचाणासारखाच थोडा अनुभव येईल.
फायर टॉवर आहेत...कुठे आग लागली नाही ना ते पाहायला...तिथे चढून आपल्याला उंचावरून पाणवठे दिसतील...झाडं, आणि मस्त ग्रीनरी...
गायत्री : बेस्ट...
मैत्रेयी: किंवा अजून एक...watch केबिन....सिमेंटचीच आहे...पण पाणवठ्याजवळ आहे....तिथेपण भरपूर गोष्टी पाहता येतील..........
( जंगल पाहायचं कसं याचे सगळे पर्याय disscuss केल्यानंतर गायत्री आणि मैत्रेयी एक पर्याय निश्चित करतात....आणि एका अनोख्या जंगल दुनियेचं निरीक्षण करायला सुरुवात होते)
Experienced shared by Maitreyee Bhave
Content Writer and Developer RJ Gayatri Kashelkar
Photo Credits : Maitreyee Bhave, Sonal Naik, Sneha Vagal.















