Sunday, March 19, 2017

घर असावे.... ‘स्मार्ट’

प्रत्येकजण या जगात आल्यापासून दोन अक्षरी शब्दाशी कायमचा जोडला जातो ते म्हणजे ‘घर’.
या घराशी प्रत्येकाचं एक वेगळं नातं तयार होत असतं. मग ती जागा लहान असेल वा मोठी, प्रत्येकासाठी आपलं घर हे खास असतंच. मग त्यात स्वयंपाकघर, हॉल, ती जागा, आजूबाजूचा परिसर, आपल्या घरातली गॅलरी अशा एक ना अनेक जागा स्वतःपुरत्या तरी नक्कीच विशेष असतात. आणि ज्यात प्रत्येकाच्या काहीना काही आठवणी सुद्धा असतातच. याला अपवाद कोणीच नाही. 
त्यामुळे थोडक्यात काय तर, घर हे ‘खास’च असतं.

आता घर खास आहे म्हंटल्यावर काळानुसार आपण त्यात बदल करतो. काही बदल हे फक्त गरज लक्षात घेऊन केलेले असतात किंवा कधी गरज आणि घराचा एक डौलदार लुक या दोन्ही गोष्टींसाठी आपण आपल्या घरामध्ये बदल करत असतो. घराचा एक वेगळा बाज येण्यासाठी आपण घराचं इंटिरियर डिझाईन करण्यावर भर देतो. 

मग कधी मॉडयुलर किचन असेल किंवा वेगळ्या पद्धतीची सिटींग अरेंजमेंट असेल, कधी भारतीय बैठकच असेल पण ती सुद्धा जरा वेगळा लुक डिझाईन करून असेल शिवाय यासोबत संपूर्ण घराची रंगसंगती हा विषय सुद्धा महत्त्वाचा त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही सुद्धा इंटिरियर डिझाईन करून घेतल्या असतीलच.





पण जरा कल्पना करा की, 


  • तुम्ही ऑफिस वरून घरी परत आल्यावर तुमचं आवडीचं गाणं अपोआप लागलेलं असेल. 
  • तुम्हाला हव्या त्या वेळी एसी/ पंखे चालू होतील.
  • तुमची मुलं घरी एकटी असतात त्यामुळे अर्थातच घराबाहेर पडताना तुम्हाला त्यांची काळजी असते अशावेळी जर नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही मोबाईलवर तुमच्या मुलांना पाहू शकलात तर तुमची चिंता मिटेल.
  • तुम्ही ऑफिसमध्ये आहात पण घराची सुरक्षा तर महत्त्वाची आहेच अशावेळी आपली व्यक्ती घरी असताना त्यांच्या सुरक्षेची तुम्ही काळजी घेऊ शकता म्हणजेच दारावरची बेल वाजली तर ऑफिस मध्ये बसून तुम्ही दार उघडायचं किंवा उघडायचं नाही यावर नियंत्रण ठेवू शकता.
  • तुमच्या मूडप्रमाणे घरातल्या दिव्यांचा प्रभाव कमी जास्त करू शकता. 


अशा अनेक गोष्टी आपण आता करू शकतो. म्हणजे ही फक्त कल्पना नाही तर हे ऑटोमॅटिक घर तुम्ही नक्की करू शकता. ज्याला ‘होम ऑटोमेशन’ म्हणतात.





सध्या अन्न, वस्त्र, निवारा यासोबत इंटरनेट म्हणजेच वायफाय ही चौथी गरज निर्माण झाली आहे. डिजिटल इंडियाला आपलाही पाठींबा आहेच. पण जर इंटरनेट गरजेच असेल तर विजेची बचत आणि विजेची निर्मिती या दोन्ही गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत. 

यासाठी घरच्या घरी आपण सोलारची (सौरऊर्जा) सोय करू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर उर्जेची बचत आणि त्यायोगे उर्जेची निर्मिती होत राहील. या सगळ्या ‘घर’ या व्याखेशी जोडणाऱ्या काही नव्या कल्पना आहेत ज्यामुळे आपण आपलं घर इंटेरियर सोबत आपण स्मार्ट करू शकतो.

याचा फायदा असा कि, हे स्मार्ट होम तुम्ही नवीनच घरात करायला हवं असं अजिबात नाही तर अगदी आहे त्या घरालाच या स्मार्ट होमने जरा वेगळा आणि हटके असा लूक तुम्ही आणू शकता. म्हणजे स्वतःच्या आवडीप्रमाणे तयार केलेलं तुमचं हक्काचं घर अजूनच खुलून दिसेल. याला आपण अगदी पर्सनलाईज किंवा कस्टमाइज होम म्हंटलं तरी अतिशोयोक्ती ठरणार नाही.

‘मी मला हवं त्याप्रमाणे माझं घर सजवलं आहे’ ही भावना तुमच्या मनात येणार हे नक्की. कारण यामध्ये सगळ्यात मोठा आणि आताच्या काळातला महत्वाचा प्रश्न म्हणजे सुरक्षेचा. जेव्हा तुमचं घर हे स्मार्ट पद्धतीने सजलेलं असेल तेव्हा घराच्या बाहेर असतानाही तुम्ही घरावर नीट लक्ष ठेवू शकाल.

जाता जाता थोडक्यात स्मार्ट होम्स विषयी माहिती देणाऱ्या आणि सुनियोजित घरं बांधणाऱ्या या कंपनीविषयीची माहिती- 
(वरील फोटो हे याच कंपनीने केलेल्या इंटेरियर डीझाइनचे आहेत.)

“एम.आर.कशेळकर अॅंड कंपनी” ही आर्किटेक्चरल फर्म डोंबिवलीमध्ये गेली ३५ वर्ष कार्यरत आहे. आर्किटेक्ट माधव कशेळकर यांनी या कंपनीची सुरुवात केली. 


डिझाइन हा हातखंडा असलेल्या या कंपनीने डोंबिवली, पनवेल, चेंबूर, पंढरपूर, अलिबाग ते अगदी राजस्थान पर्यंत स्थापत्य प्रकल्प त्यांच्या डिझाईनच्या वैशिष्ट्याने पूर्ण केले आहेत. हॉटेल्स, कारखाने, शाळा, कॉलेज, बंगले, फार्म हाउस, हॉस्पिटल आणि अनेकविध मंदिर त्यांनी बांधली. आणि विशेषतः त्यांचे सर्व प्रकल्प हे वास्तुशात्राचा विचार करून पूर्ण झालेले आहेत.


नवीन पिढीच्या येण्यामुळे आता या कंपनीला आणखीन एका संकल्पनेची मजबूत साथ मिळाली आहे. मास्टर्स इन आर्किटेक्ट असलेला कौस्तुभ कशेळकर याने या कंपनीला नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन संकल्पनांशी जोडले आहे. शिवाय “इनसाइड स्टोरी” म्हणजेच इंटिरियरचे अनेक प्रकल्प त्याने त्याच्या अनोख्या शैलीने पूर्ण केले. याविषयी बोलताना कौस्तुभ कशेळकर म्हणाले, “घराला मनासारखं सजवून प्रोजेक्ट पूर्ण करून निघताना आणि हातात चावी देताना कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून हे निश्चित लक्षात येते की पवई हिरानंदानी पासून मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात “इनसाइड स्टोरी” ने स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे."



त्यामुळे “एम.आर.कशेळकर अॅंड कंपनी” व “इनसाइड स्टोरी” दांडगा अनुभव आणि कौशल्य या जोरावर गेली अनेक वर्ष सुनियोजित व सुरेखीत वास्तूत राहण्याचा आनंद अनेकांना देत आहेत.      
तुम्हालाही सुनियोजित, सुरेखीत वास्तूत राहायची इच्छा आहे? 

आहे त्यात घराला स्मार्ट होम मध्ये बदलायचं आहे? 

नवीन घर घेतलं आहे पण तुम्ही तुमच्या विचाराने काही करण्याचं निश्चित केलं  असेल पण कोणाच्यातरी सल्ल्याची गरज आहे? 

तुम्हाला तुमचं घर वास्तूप्रमाणे निटसं करायचं आहे? 

अशा अनेक प्रश्नांसाठी “एम.आर.कशेळकर अॅंड कंपनी” व “इनसाइड स्टोरी” नक्की तुमच्यासोबत असेल.
 
Contact
Architect  Kaustubh Kashelkar 
(M.Arch)
9920951511


 




Saturday, March 18, 2017

मिट्टीकुल

हाय फ्रेंड्स, 
आज या ब्लॉगची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने करायची आहे. 
 मी तुम्हाला काही प्रश्न विचारतेय. तुम्ही वाचता वाचता मनातल्या मनात त्याची उत्तर द्या.
 तर, पहिला प्रश्न असा की, तुम्ही तुमच्या घरी काही ना काही  नवीन बदल करत असता का?
 यात खास करून तुम्हाला स्वयंपाकघराचा (किचनचा) लुक  बदलण्याची इच्छा आहे का?
तुम्ही तुमचं आरोग्य नीट रहावं यासाठी दररोज व्यायाम किंवा कोणती ना कोणती activity करता का? उदा. रोज सायकलिंग, व्यायाम, योगासने, डाएट, रोजचे चालणे वगेरे वगेरे....
आता तुम्ही म्हणाल की, हे सगळे प्रश्न तर किती वेगळे आहेत...याचा एकमेकांशी काहीच संबंध नाहीये. पण हे प्रश्न जरी मिळतेजुळते नसले तरी सुद्धा याचं उत्तर मात्र या सगळ्या प्रश्नांना सामावून घेणारं आहे...ते म्हणजे मातीची भांडी वापरून पहा.
तुम्ही म्हणाल की, मातीची भांडी वापरणं आणि आरोग्याची काळजी, किचनचा नवा लुक या सगळ्याचा काय संबंध? अहो, अगदी जवळचा संबंध आहे....तो कसा हेच सांगणारा आजचा ब्लॉग.

मला सांगा तुमच्या घरी पाणी पिण्याचा माठ सोडून इतर मातीची भांडी आहेत का??

वाचता वाचता अनेकांनी नकारार्थी माना डोलावल्या असतील. बरोबर ना? ह्म्म्म....हे चित्र जरी अनेक घरोघरी असलं तरीसुद्धा तुम्ही एकदा क्षणभर डोळे बंद करून कल्पना करा की, तुमच्या किचन मध्ये नेहमीच्या फ्रीजपेक्षा जर मातीचा फ्रीज असेल तर कसं वाटेल?
काय लूक बदलेलं तुमच्या घराचा...अहो, एवढचं कशाला मातीचा तवा, पाण्याची बाटली, डीनर सेट, मातीचा कुकर अशा सगळ्या गोष्टी जर तुमच्या स्वयंपाकघरात असतील तर फक्त तुमच्या किचनचा लुकच बदलणार नाही तर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी अशी ही मातीची भांडी वरदान ठरतील.

कारण आपल्या सगळ्यांच्या घरी आजकाल अल्युमिनियम आणि स्टीलची भांडी असतात पण मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यामुळे मातीमध्ये असणारे आणि शरीराला उपयोगी ठरणारे सगळे गुणधर्म आपल्या शरीराला उपयुक्त ठरु शकतात.
जसे की, आयन, कॅल्शियम, फोस्फरस, मॅग्नेशियम, सल्फर. तसचं अनेक आजारांचं प्रमाणसुद्धा यामुळे कमी होऊ शकतं.


एवढचं नाही तर आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याला आपण मातीच्या भांड्यांमध्ये जेवू खाऊ घातलं तर एका वेगळ्या पद्धतीने स्वागत केल्याची मजासुद्धा अनुभवता येऊ शकते. त्यामुळे आता Modern kitchen मध्ये हा मातीच्या भांड्यांचा नवा लुक एकदा पाहायला काहीच हरकत नाही.

 मला असं वाटतय की, तुम्हाला सुद्धा माझं म्हणणं आता पटतयं. आणि आता प्रश्न आहे की, फ्रीज पासून ते अगदी ताटं-वाट्यांपर्यंत सगळं घ्यायचं कुठून??

यासाठी बेस्ट पर्याय आणि नावाजलेला Brand म्हणजे मिट्टीकुल.


मिट्टीकुल विषयी बोलायचं झालं तर आपल्याला थोडी गुजरातची सफर करावी लागेल. कारण गुजरात मधील मनसुखभाई प्रजापती यांनी १९८८ मध्ये मातीचा तवा तयार करणारी factory उभी केली. पण २६ जानेवारी २००० साली गुजरात मध्ये झालेल्या मोठ्ठ्या भूकंपामुळे त्या सगळ्या साठ्याचं नुकसान झालं. तरी न डगमगता पुन्हा एकदा नवी सुरुवात झाली आणि २००४ साली त्याचं तुटलेल्या मातीच्या साठ्यातून मातीचा फ्रीज जन्माला आला. ज्याची आज जगभरात पसंती आहे. आता त्यांच्याकडे ५० पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या मातीच्या वस्तू आहेत. आता रवी प्रजापती आणि राज प्रजापती याचा सर्व कारभार पहातात. त्यांच्या एकूण पद्धतींविषयी बोलताना राज प्रजापती म्हणाले की,''आम्ही जी माती वापरतो ती नैसर्गिक माती असते, ती refine केली जाते, कोणत्याही प्रकारे केमिकल राहणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. त्याचं व्यवस्थित टेस्टिंग आम्ही नेहमी करतो आणि मातीची सगळी भांडी कशी सुंदर दिसतील तसचं त्याचा वापर कसा सोपा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.”

Contact :
info@mitticool.com
Mobile Android App- Mitticool
http:mitticool.com


Content writer and developer- RJ Gayatri Kashelkar



MITTICOOL

Hi Friends!! 
Today we are going to proceed with our blog in a new fashion. I will be putting forward some simple questions at you. You can frame the answers in your mind.

So, the first question goes: Do you always end up making some changes at your household?
Particularly, do you desire to revamp your kitchen? Do you exercise or follow any healthy activity for a proper health and well-being? For example, day-to-day activities like cycling, yoga, meditation, dieting, etc. etc.Now you may ask - the questions I put forward do not have any relation with one another and they vary. But, however different the questions are, finally they are summed up to one single solution – use of clay utensils in our daily routine.

You may think – how is the use of clay pots and health, as well as the kitchen refurbishment related?

Yes! Yes! They are closely-related… that is what today’s blog is all about.

Excluding the earthen water pot, does anyone of you use any other clay utensils at home?
Reading further, many of you would have nodded with a no. Isn’t it? Hmmm… even if this is the case at many houses today, imagine if all the articles at your home are replaced with clay utensils? Visualize your regular refrigerator replaced by an earthen one. 


It will be so amusing to see your house go through a make-over. Not only refrigerator, but earthen pans, water bottles, dinner sets, pressure cooker in your home will accentuate the look. It will also be a boon with its various benefits to the health. 
Nowadays, everyone uses aluminium and steel utensils. But, clay utensils possess valuable characteristics like iron, calcium, phosphorus, magnesium and sulphur that are useful for the wear and tear of the body.   


Various diseases stay away from our body because of these vital minerals in clay. If the guests coming over are welcomed using earthenware, it gives a different feeling of hospitality altogether. 
Hence, the introduction of clay utensils in our ‘Modern Kitchen’ should not be a problem now.
What I feel now is that you readers agree to whatever I have to say. So the question arises regarding the purchase of this earthenware. The best option and selected brand for this is – MITTICOOL.


The brand ‘MITTICOOL’ is enrooted in Gujarat.  Gujarat-based Mansukhbhai Prajapati started a factory manufacturing clay pans in 1988. 
Due to the earthquake in Gujarat on 26th January 2000, the entire stock of goods was damaged. But Mansukhbhai did not lose hope. He built his entire empire once again making use of the same waste clay for making the very first earthen refrigerator in 2004. He owns more than fifty different articles of clay.
 Mansukhbhai’s sons, Ravi Prajapati and Raj Prajapati take care of the entire business now. In an interview with Raj Prajapati, he talked about the clay having organic properties and how it is refined. There is no chemical added in the soil. Every utensil is checked prior to avoid any deformities.    
   
Contact :
info@mitticool.com
Mobile Android App- Mitticool
http:mitticool.com


Content writer and developer- RJ Gayatri Kashelkar

Translated by- Kalyani Baal






Wednesday, March 15, 2017

Information about Artificial Eye


हाय फ्रेंड्स, आज मी थोड्या वेगळ्या विषयवार या ब्लॉग मार्फत तुमच्याशी बोलणार आहे.
नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आपली वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी ओळख किंवा भेटीगाठी होत असतात. मलाही माझ्या व्यवसायामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना भेटता येतं. 
त्याचं एका वेगळ्या भेटीविषयी आणि पर्यायाने लक्षात राहिलेल्या त्या अनोख्या क्षेत्राविषयी आज मी ब्लॉग लिहिणार आहे.

कदाचित हे क्षेत्र तुम्हाला नवीन नसेल.पण म्हणतात ना, काही वाक्य आपल्या डोक्यात इतकी बसतात कि त्याविषयी विचार करावा, किंवा माझ्याबाबतीत सांगायचं झालं तर लेखणी घेऊन ते सरळ लिहून काढावं अशी भावना येते. तर असो, मूळ मुद्याकडे वळते....आणि त्यासाठीच हा ब्लॉग.

आपल्या शरीरातल्या महत्त्वाच्या ज्ञानेंद्रीयांपैकी एक म्हणजे अर्थातच ‘डोळा’. अतिशय नाजूक, सतेज, बोलका आणि जन्मानंतर जगाशी ओळख करून देणारा अवयव. अशा तर अनेक आणि हव्यातेवढ्या त्याच्या व्याख्या करता येतील. पण दुर्दैवाने काही जणांच्या बाबतीत हाच डोळा जेव्हा आयुष्यात अर्धवट साथ देऊन अचानक निघून जातो तेव्हा त्याचं काय होत असेल?? अंगावर काटा उभा राहतो. कधी अपघाताने तर कधी आजारामुळे आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर जेव्हा डोळे काही कारणामुळे निकामी होतात तेव्हा त्या व्यक्तीचं खरचं काय होत असेल?? कालपर्यंत दिसणाऱ्या गोष्टी आज आपण पाहू शकत नाहीयोत.

बापरे !! विचारही करता येत नाहीये. असं म्हणताना जन्मतः अंध असणाऱ्या व्यक्तींबद्दल सहानुभूती नाही असं अजिबात नाही. पण त्यांनी स्वतःहून त्यांच्या आयुष्यातलं सत्य – FACT स्वीकारलेली असते. आणि दिसत नसतानाही दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्यांच्या आयुष्यातली प्रगतीची वाट धरलेली असते.

कधी ऐन तारुण्यात तर कधी बालपणीच, कधी अपघाताने तर कधी गंभीर अशा आजाराने जेव्हा एक डोळा किंवा दोन्ही डोळे गमावलेल्यांची स्थिती वाईट म्हणण्यापेक्षा विचित्र होऊन जाते. ना धड त्यांना पुढे जाणं शक्य होत ना धड मागे.पण तुमच्या मनात विचार येईल कि आता मेडीकल सायन्स/ वैद्यकीय शास्त्र इतकं पुढे गेलं आहे की या सगळ्या गोष्टी बऱ्या होऊ शकतात. पण तरी काही वेळा केसेस पूर्णपणे बऱ्या होण्याची शक्यता कधी कधी कमी असते. मग पुन्हा चिंता, काळजी आणि मनातल्या दु:खाची तर कशाशीच तुलना होऊ शकत नाही. शिवाय आत्मविश्वास जातो, भीती निर्माण होते, एकाच डोळ्याने दिसत असल्यामुळे चेहरा वेगळा दिसायला लागतो, एवढच नाही तर करीयर, लग्न यात अडचणी यायला सुरुवात होते. अडचणींची रांग लागते असं म्हटलं तरी अतिशोयोक्ती ठरणार नाही. कारण असं म्हटलं जात की, शारीरिक दुखापतीपेक्षा मानसिक दुखापत जास्त वेदना देते. आणि यामध्ये तर दोन्ही गोष्टींच्या वेदना एकाच वेळी जाणवत असतात. 

खरतरं हे सगळ लिहिण्याचा हेतू म्हणजे एका कार्यशाळेच्या निमित्ताने नव्या मैत्रिणीशी ओळख झाली. Ocularist ऐश्वर्या जुवेकर. आपापल्या क्षेत्रांविषयी बोलताना गप्पा रंगत होत्या. आणि “डोळा” हा विषय शिवाय वर लिहिलेल्या बऱ्याच गोष्टींचा सारांश आमच्याही बोलण्यात आला तेव्हा आमच्याच गप्पा हळू हळू गंभीर होत गेल्या. कारण, विषय अर्थातच तेवढा गंभीर होता. पण बोलता बोलता ती म्हणाली की, 'जेव्हा पेशंटचे सगळे प्रयत्न करून सुद्धा हवा तसा मार्ग मिळत नाही तेव्हा शेवटचा पर्याय राहतो तो Cosmetic Appearance चा. याचाच अर्थ असा की, जर काही कारणांमुळे Eye Translpant होणं कठीण असणार आहे. सगळे प्रयत्न करून आता मात्र काहीच उपाय दिसत नाहीये. मग आता करणार तरी काय? जे आहे ते स्वीकारावं लागणार...असा विचार त्यांच्या मनात येतो. चेहऱ्यामध्ये झालेला बदल आणि कुठेही वावरताना वाटणारी भीती किंवा लाज या सगळ्या गोष्टी आता आयुष्याचा भाग बनणार...पण यावेळी Cosmetic Appearance हा एक उत्तम पर्याय असू शकतो याची कल्पना सर्वांना नसते. 


Cosmetic Appearance या पर्यायानुसार नवीन लावलेला कृत्रिम डोळा हा नेहमीच्या डोळ्यासारखाचं तयार केला जातो. आपण हसलो कि डोळाही हसतो, रडतो आणि थोडक्यात म्हणजे बोलका होतो. ह्या कृत्रिम डोळ्याची लेन्स प्रमाणे कालघाड होते. १५ दिवसातून एकदा हा लेन्स प्रमाणे दिसणारा कृत्रिम डोळा काढता घातला येतो. या कृत्रिम डोळ्याची सुद्धा हालचाल व्यवस्थित होऊ शकते. कधी कधी रेडीमेड डोळा घेण्याकडे सुद्धा अनेकांची पसंती असते. तज्ञांच्या मते, 'स्वच्छतेच्या दृष्टीने आणि इतर फायदे लक्षात घेता Custom Eye बनवून घ्यायला जास्त पसंती असते'.


आज याच क्षेत्रात काम करणाऱ्या मैत्रिणीशी ओळख झाल्यामुळे माझ्या सर्व वाचकांपर्यंत ही माहिती मी पोहचवत आहे.

Ocularist ऐश्वर्या जुवेकर हिच्याविषयी सांगायचं झालं तर ती स्वतः या क्षेत्रात गेली चार ते पाच वर्ष अतिशय प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करतेय. Optometry चं शिक्षण घेण्यापूर्वी कॉलेजमध्ये तिच्या सिनियरकडून कृत्रिम डोळे(Artificial eye) बसवण्याची प्रक्रिया आणि पद्धत तिने पहिली. 
आणि त्यानंतर त्या पेशंटचा नीटस झालेला चेहरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर झालेला आनंद पाहून  तिने याच क्षेत्रात करियर करायचा निर्णय घेतला. आजपर्यंत तिने अनेक केसेस यशस्वी केलेल्या आहेत. तिच्याकडे अगदी दूर दूर वरून पेशंट येत असतात. पेशंटची मानसिकता समजून घेऊन त्यांना सांभाळून ती हे अतिशय मोठं काम या क्षेत्रात करते आहे. आज तिचे सगळे पेशंट आपापल्या क्षेत्रात आत्मविश्वासाने काम करत आहेत.  


(ब्लॉगवर फोटो टाकण्यासाठी पेशंटने परवानगी दिलेली आहे.)


 गला पूर्णविराम देण्याआधी मी माझ्या सर्व वाचकांना सांगीन की, तुमच्या ओळखीत अशी कोणती व्यक्ती असेल कि तिला अशा प्रकारच्या मदतीची गरज आहे तर तुम्ही Ocularist ऐश्वर्या जुवेकरला नक्की संपर्क करू शकता.


तिचा संपर्क जोडत आहे. 

Ocularist Aishwarya Juvekar
Svadha Prosthetics Centre
9004024124
ash.potnis33@gmail.com