Tuesday, January 31, 2017

SIZZLE DESI- ENJOY THE OFFERS

SIZZLE DESI- ENJOY THE OFFERS
       

दरवेळी काहीना काही नवीन ऑफर्स खवय्यांसाठी घेऊन येणारं आणि एवढच नाही तर आपल्या सगळ्यांच्याच परीचयाचं झालेलं हॉटेल अर्थात ठाण्याचं Sizzle Desi. मी जेव्हापासून Sizzle Desi विषयी लिहिते आहे तेव्हापासून मला हा अनुभव येतोय. मग विचार केला आपल्या 
मित्र-मैत्रिणींपर्यंत या ब्लॉगमार्फत त्यांच्या ऑफर्स पोहोचवूयात. 

आणि तुम्हाला खर सांगू का आपण हॉटेल निवडतो....आपण म्हणजे ? हो...म्हणजे आपल्या सारखे सगळेच खवय्ये. आपण फक्त ऑफर्स बघून दरवेळी हॉटेलला जातो असं नाही. पण हो, तिकडची टेस्ट नेहमीच पाहतो. टेस्टच्या बाबतीत तर Sizzle Desi चा काहीच प्रश्न नाही. एवढच कशाला अहो....आपण पार्किंग सुद्धा बघतोच कि या टेस्ट सोबत. कदाचित वाचताना तुम्हाला हसू येईल. पण मनात खरंच आठवून पहा. करताना तुम्ही विचार?? करताच. इथे तर तो पण प्रश्न नाही. सर्विस रोड आहे. भरपूर पार्किंगच पार्किंग. असो...पण नेहमी त्याच त्याच हॉटेल मध्ये जाऊन तेच तेच पदार्थ ऑर्डर करायचा कधीतरी कंटाळा येऊ शकतो. आणि हो, तुमच्यापैकी अनेकांना दरवेळी काहीतरी नवीन टेस्ट करायची सुद्धा आवड आणि सवय असेल तर मग हा ऑप्शन डोक्यात ठेवायला काहीच हरकत नाही. या दोन्ही ऑफर्स ३१ मार्च पर्यंत आहेत.



sizzle  Desi- एक वेगळी  आणि हटके खवय्येगिरी.  
1,Trishul Apt, Besides Celebration Hall, Eastern express Highway, service road,Panchpakhadi , Thane 4000602
Hotel no: 022-25339741/51


Friday, January 27, 2017

NAINITAL- YOUTH CAMP

                                                               युथफुल सफर नैनितालची. 


 
नवीन वर्ष सुरु होऊन आता जानेवारी महिना सुद्धा संपत आला. दिवस,वेळ सगळच पटापट पुढे जातंय. हो आणि  हे तुम्हाला पण मान्य असेलच.त्यामुळे आता जानेवारी संपून आपल्या सगळ्यांचा लाडका आणि सुट्ट्यांचा राजा असलेला मे महिना कधी येईल लक्षात सुद्धा येणार नाही. पण हरकत नाही. मे महिन्यात कुठे जायचं याचा प्लान तुम्ही आत्ताच आखू शकता.



Kalpaviharr Traaventure या मे महिन्यात अर्थात आपल्या हक्काच्या सुट्टीच्या काळात एक धमाल युथ कॅम्प नैनिताल याठिकाणी घेऊन जाणार आहेत. १८ ते २८ मे  ही या युथफुल सफरीची तारीख आत्ताच बुक करा. यात असणार आहेत बरेच साहसी उपक्रम जे आपल्याला आत्मविश्वास वाढवण्यासाठी आवश्यक असतात. शिवाय self development साठी महत्वाच्या असणाऱ्या गोष्टी अगदी योगा, मेडीटेशन, आरोग्य यावर काही लेक्चर्स सुद्धा या तरुण मंडळींसाठी असणार आहेत.  
 

या कॅम्प मध्ये असणाऱ्या ACTIVITIES वर एक नजर... 

•  Basic Rock Climbing:  Covers training in rock-scrambling, bouldering, tying of knots & hitches, rock-climbing with safety provided by belay, rappelling, and river crossing. Certificates are awarded to participants on successful completion of the camp.


•  Treks:  A gradual build-up of stamina is one of the objectives of treks. Treks start with a mere 4 km, and by the end of the camp almost all campers are able to complete the enchanting 16 km trek to Kainchi. Treks to other magnificent scenic points include Land’s End, Hanuman Mandir scenic spot on Ayarpatta Hill, Dorothy Seat / Tiffin Top, Jungle Trek, Snow View and the lofty NainaPeak.



•  Games, community singing and cultural programs.

• Yoga-based keep-fit exercises. Shramdan (selfless work offering) to inculcate dignity of labour.



•  Meditation, and talks on healthy living, character building, national problems & role of youth.
                            

या युथफुल सफरीमध्ये सहभागी व्हायचं असेल तर लगेच बुकिंग करा.. कॅम्पमध्ये १२ वर्षावरील मुलं सहभागी होऊ शकतात.  

Tour Cost : Rs.18,500/- per person
Contact details : वैशाली देसाई-मोघे. 
Contact no: 9820684723

Tuesday, January 10, 2017

Learning over Breakfast !!!! प्रभात पाठशाला

Learning over Breakfast !!!!

परवा एका मीटिंगला गेले होते. त्याठिकाणी आम्ही तसे बरेचजणं होतो. ज्या प्रोजेकटसाठी भेटलो होतो त्याविषयीची चर्चा झाली. मग चहाच्या ब्रेकमध्ये वेगवेगळे विषय निघत होते. तेव्हा माझ्या एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली की, प्रत्येकाचं रुटीन खूपचं बिझी झालंय शिवाय नोकरी, व्यवसायातली स्पर्धासुद्धा तितक्याच प्रखरतेने जाणवू लागली आहे. स्पर्धा तर आहे, जग झपाट्याने प्रगतीचा हात धरून पुढे धावतंय याचा अर्थ आपल्याला मागे राहूनसुद्धा चालणार नाही. यासाठी आपल्याला काळाप्रमाणे आणि जमल्यास जरा काळापुढे जगता आलं पाहिजे...अशा अनेक गोष्टींवर आम्ही बोलत होतो. तेवढ्यात आमच्यात असाही विचार झाला की स्वतःसाठी आजकाल वेळ मिळतच नाहीये. सतत टार्गेट समोर, त्यामुळे स्वतःच आत्मपरीक्षण करायलासुद्धा वेळ कमी पडतोय. त्या गोष्टीवर तर सगळ्यांचच बऱ्यापैकी एकमत झालं. तेव्हा माझ्या मनात विचार आला की जर आपण आत्मपरीक्षण केलं नाही तर आपल्याला आपल्या चूकाचं कळणार नाहीत...मग आपण त्या चूका काढून टाकण्यासाठी काहीच मेहनत घेणार नाही आणि मेहनत नाही घेतली तर काळाप्रमाणे धावणारी targets आपल्याला achieve करताना तितकचं जड जाणार..कारण आपण २ मिनिट थांबून Self Improvement करायला वेळच नाही देऊ शकलो ! 

हा विचार माझ्या मनात घोळत होताच आणि मी बोलूनसुद्धा दाखवला....शिवाय असे बरेच कोर्सेस असतात जे केल्याने फायदा होतो ...उदा. व्यक्तिमत्व विकास किंवा soft skills बद्दल मध्यंतरी मी लिहिलं होतं, त्याविषयी सुद्धा सांगितलं...पण आमच्या ग्रुपमध्ये नोकरी करणाऱ्या लोकांनी मात्र वेळचं नाहींये असाच सूर धरला. करायची इच्छा आहे पण वेळेच गणित जमत नाही. तेव्हा मला आणखीनच चिंता वाटायला लागली...कोणाची अशी नाही. या परिस्थितीची. कारण  Self Improvement  तर गरजेची आहे. पण अशा कोर्सेसना जायला वेळ मिळत नाहीये आणि ते सुद्धा नोकरी मुळे. मनात म्हंटल आपला बिझनेस बरा आहे...आपण आपल्याला हवा तसा वेळ काढू शकतो. पण त्यांना वेळ काढता येत नाहीये हे मनाला आवडलं सुद्धा नाही...थोडी कीवच आली त्यांची. 
पण काय गंमत असते....तेवढ्यात HOSPITALITY QUORUM   ह्या COMPANY च्या DIRECTOR  GAURI KHER यांचा मला फोन आला. आणि त्यांनी मला ‘प्रभात पाठशाला’ बद्दल सांगितलं. आणि माझ्या मनात असलेली चिंता, कीव...सगळं एकदमचं पळून गेलं. कारण या बेस्ट concept मुळे self improvement करण सहज शक्य होणार होतं. आणि आहे सुद्धा..ज्यात कोणाचाच अख्खा दिवस वाया जाणार नाहीये आणि महिन्यातून फक्त एकदा तेही सकाळी सकाळी !! त्यामुळे आपला संपूर्ण विकेंड मोकळा. थोडक्यात काय तर Learning Over Breakfast !!

म्हणून आजचा ब्लॉग खास प्रभात पाठशालासाठी..

प्रभात पाठशाला म्हणजे आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करून घेण्याची उत्तम संधी. आपल्या धावपळीच्या रुटीनमध्ये या सगळ्यासाठी संपूर्ण दिवस वेळ काढणं शक्य नसतं. त्यामुळे ‘प्रभात पाठशाळा’ हे  व्यक्तिमत्व विकासासाठी छोटे
‘मिनी मॉड्यूल्स’ घेऊन येणार आहे. खास मराठी भाषिकांसाठी ही पाठशाळा ठाणे (प) याठिकाणी महिन्याच्या दर चौथ्या शनिवारी आयोजित केली जाणार आहे. वेळ सकाळी ७.३० ते ११.३०. मग तुमचा दिवस मोकळा.

Mini  Modules

                     vसंवाद कौशल्य या कार्यशाळेत :-

Ø संवाद म्हणजे काय?

Ø आपल्या कम्युनिकेशनची स्टाईल कोणती? – एक चाचणी

Ø संवादातील अडथळ्यांची ओळख

Ø गैरसमज टाळण्यास काय करावे?

Ø कम्युनिकेशनमधील अनेक समज (पर्स्पेक्टीव्ह)

•      दिनांक: २८ जानेवारी,२०१७  वेळ: सकाळी ७.३० ते ११.३०

•      प्रती शुल्क: रु. ७५०/- प्रती (नाश्ता व स्टडी मटेरीअलसहित)

•      रेजीस्ट्रेशनची अंतिम तारीख: २५ जानेवारी,२०१७

•      अधिक माहितीसाठी संपर्क करा:

•      तेजस्वी : 8433820813



vEnhanching Business Communication या कार्यशाळेत :-


Ø व्यावसायिक संवाद (बिझनेस कम्युनिकेशन) म्हणजे काय ?

Ø उत्कृष्ट व्यावसायिक संवाद कसा साधावा ?

Ø ईमेल एटीकेट : वोक्याब्युलरी आणि व्याकरणातील सुधारणा

Ø एडिटिंग आणि फॉरमॅटिंगचे महत्त्वं

Ø सॅल्युटेशन्स, क्लोझर्स, सिग्नेचर्स ई.चा योग्य वापर

Ø  मिटिंगचे मिनीट्स कसे बनवायचे?

·                        दिनांक :२५ फेब्रुवारी , २०१७

·                        रेजीस्ट्रेशनची अंतिम तारीख: २२ फेब्रुवारी,२०१७


                   vभावनिक बुद्धिमत्ता या कार्यशाळेत :-
Ø भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय?

Ø भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व

Ø स्वतःच्या, तसंच इतरांच्या, भावनांची ओळख ; त्याचे नियमन कसे करावे?

Ø भावनिक बुद्धिमत्तेचे घटक कोणते?

Ø भावनिकदृष्ट्या बुद्धिमान व्यक्तींची लक्षणे

Ø भावनिक बुद्धिमत्तेचा विकास कसा करावा?

Ø मानसिक वैशिष्ट्यांचे मोजमापन – एक चाचणी

·        दिनांक : २५ मार्च २०१७

·        रेजीस्ट्रेशनची अंतिम तारीख: २२ मार्च २०१७


v गोल सेटिंग या कार्यशाळेत :-
Ø गोल-सेट्टींग म्हणजे काय ?

Ø गोल-सेट्टींगचे महत्त्व
Ø गोल्स म्हणजे तरी काय आणि ते सेट का करायचे?

Ø आपले ध्येय (गोल्स) कसे साधायचे?

Ø गोल्स मनात ठेऊन सेल्फ-अॅनालिसिस कसे करायचे?

·        दिनांक : २२ एप्रिल, २०१७

·        रेजीस्ट्रेशनची अंतिम तारीख: १९ एप्रिल, २०१७


 v Presentation skills या कार्यशाळेत :-


Ø प्रेझेन्टेशन स्किल्स म्हणजे काय?

Ø प्रेझेन्टेशन स्किल्सचे महत्त्व

Ø प्रेझेन्टेशन स्किल्सचे ट्रेनिंग का घ्यावे?

Ø प्रेझेन्टेशन कसे प्लॅन करायचे (नियोजन)?

Ø प्रेझेन्टेशन कसे रचायचे (स्ट्रक्चर)?

Ø मॅटरचं फॉरमॅटींग कसं करायचं? आणि उत्तम डिलिवरीचे गुपित
   
·        दिनांक : २७ मे २०१७

·        रेजीस्ट्रेशनची अंतिम तारीख: २४ मे २०१७


       vInterpersonal skills या कार्यशाळेत :-


Ø इंटर-पर्सनल स्किल्स म्हणजे काय?

Ø इंटर-पर्सनल स्किल्सचे रोजच्या जीवनात, नोकरीच्या ठिकाणी आणि व्यावसायात काय फायदे?

Ø सेल्फ-नॉलेजचा काय फायदा?

Ø वेगवेगळ्या प्रकारचे व्यक्तिमत्त्व असणाऱ्या लोकांना कसे जाणून घ्यायचे?

Ø कठोर लोकांशी कसा संवाद साधायचा?

Ø चांगल्या वृत्तीचे काय महत्त्व आहे?

Ø सकारात्मक कसे राहायचे?

·        दिनांक  २४ जून २०१७

·        रेजीस्ट्रेशनची अंतिम तारीख: २१ जून २०१७

v अधिक माहितीसाठी संपर्क करा:
v तेजस्वी : 8433820813

मला माझ्या प्रश्नाचं उत्तर या प्रभाती पाठशालेने लगेचं दिलं...त्यामुळे मी

तुम्हाला या ब्लॉग मार्फत त्यात असणाऱ्या सर्व घटकांची माहिती 

पोहोचवत आहे. आणि हो, या अनोख्या कार्यशाळेत आपल्याला मार्गदर्शन

करणार आहेत विख्यात सॉफ्ट स्किल्स प्रशिक्षिका सौ. गौरी खेर. 



Hospitality sector मध्ये अनेक वर्षांचा कामाचा अनुभव गाठीशी ठेऊन आता 

‘सॉफ्ट स्किल्स’ प्रशिक्षण, ह्या वेगळ्या क्षेत्राकडे त्या वळल्या आहेत.आजही त्या

विविध कंपन्यांमध्ये प्रशिक्षण कार्यशाळा घेतात आणि लोकसत्ता, सकाळ ई... 

मध्ये ह्या विषयावर त्यांचे लेखही प्रसिद्ध झाले आहेत.

त्यामुळे अशा अनुभवी आणि या विषयातल्या तज्ञ व्यक्तीकडून self Improvement च्या ‘प्रभात पाठशाला’ मध्ये नक्की जायला हवं.












Learning over Breakfast !!!! very simple...