सामान्यातील असामान्यत्व
या संपूर्ण विश्वात सामान्य माणसांची लोकसंख्याच जास्त आहे.
म्हणजे कधी कधी वाटत की देवाला सुद्धा सामान्य माणस अधिक प्रिय असू शकतील. म्हणूनच
त्याने त्याच्या सर्वलोकी संसारात सामन्य माणस अधिक बनवली आहेत.
मला तर या सामान्य माणसाच्या प्रवृतीचाच अभिमान वाटतो. आणि कधी कधी आश्चर्य
सुद्धा वाटत ते त्यांच्या सहनशक्तीच. या सामान्य माणसाच वैशिष्ट्य पाहायला गेलो तर
लगेच अगदी डोळ्यासमोर ठळक अश्या गोष्टी येत नाहीत पण एक दिवस असा अनुभवला की
क्षणोक्षणी या सामन्यात्वाच कौतुक वाटत गेल. सामान्यामधले असामान्यत्व
खऱ्याअर्थाने जाणवले. सामान्य माणूस हा खरतर नटाला हिरो मानत असतो पण नकळतपणे
स्वतःच स्वत:च्या आयुष्यात स्वतःला सुद्धा एक कर्तबगार हिरो मानायला विसरून जातो. आणि यात
वेगळेपण हेच वाटते की त्याच्या हे लक्षात येत नाही किंवा लक्षात आलेलं असूनही तो
बोलत नाही.
सकाळी धावत्या घडाळ्याच्या काट्यासोबत तोही घराचा धावता निरोप घेतो. धावत्या
ट्रेन मध्ये चढल्याचे , कसाबसा स्वतःचा जीव
ट्रेनच्या दरवाज्यातून आतमध्ये आणल्याचे समाधान मानून दिवसाला सुरुवात करणारा
" सामान्य माणूस " विचारांनी मात्र ग्रस्त . मग त्यात चिंता असतो वा
आशा. ट्रेनमधला प्रवास हा काहींसाठी नकोसा तर काहींसाठी स्वतःच्या ज्ञानात
भर टाकणारा ,काहीना कधीच कोणी
बोलू दिले नाहीये आणि हेच काय ते एकमेव गप्पा मारण्याचे ठिकाण असे समजून अगदी आल्या क्षणापासून जाईपर्यंत भरपूर गप्पा
मारण्याची हीच ती जागा असा समजणारा खास प्रवासी वर्ग असतो तर काहींसाठी शांतपणे
गाणी ऐकण्याचा नवीन ट्रेंड सुद्धा हा सामान्य
माणूस लगेच स्वीकारतो. गर्दीतही पुस्तक वाचाणारे त्यात मग्न होऊन जाणारे तर कधी
कधी सकाळच्या ताज्या बातम्यांचा पेपर तासाच्यातसा धरून घेऊन आलेले आपण पाहतो. यात
वेगळी गोष्ट एवढीच जाणवते कि असाच त्यांचा दैनंदिन कार्यक्रम असतो पण ह्या
सगळ्याचा कंटाळा असो वा नसो ते आनंदाने हसऱ्या चेहऱ्याने दिवसाची सुरुवात करतात.
अगदी बातम्या कितीही कडू-गोड असल्या तरी
जीवनात संघर्ष हा आलाच हे अगदी सहजतेने पण जाणीवपूर्वक स्वीकारणारा हा सामान्य
माणूस......
ऑफीस मध्ये काम , मनापासून
स्वीकारणाऱ्या जबाबदाऱ्या शिवाय त्यात
आपसूकच ओढवून घेतलेली कामे . कारण अगदी
दूरच्या मित्रालासुधा अनेकवेळा
“ नाही ” हा
शब्द उच्चारलेला नाही. पण तरी जबाबदाऱ्या स्वीकारताना कामाचा व्याप ,
काळजी हे
सगळच मानवी स्वभावानुसार या गोष्टी आल्याच पण याच्या चेहऱ्यावर या
काळजीच्या आठ्या
आल्या तरी घरी परतल्यावर मुलांची निरागस हाक आणि चेहरे पाहून
सगळ्या नकारात्मक
गोष्टी पळून जातात. घरी येताना बायकोने सांगितलेल्या वस्तू
आणण्याची आणि कितीही
महाग असली तरी भाजीचा भाव न करता आणि
अप्रत्यक्षरित्या भाजीवालीला नफ्याचा डोंगरच चढवून देणारा हा सामान्य माणूस
भाजीविक्रेत्यांकडून खूप दुवा मिळवून घरी येतो. पण अपवाद हे असतातच.
असो........पण एवढेच नाही तर
अगदी छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मानणारा हा
सामान्य माणूस काळाप्रमाणे स्वतःला
बदलतो आहे. तंत्रज्ञानाशी मैत्री सुद्धा करतो आहे.
पण हे करताना त्याला त्याची
माणुसकी जपायची आहे...टिकवायची आहे आणि या साठी
आणि एकूणच एकात्मतेसाठी त्याचे
अविरत प्रयत्न चालू असतात ....
No comments:
Post a Comment