Sunday, September 25, 2016

रायगडावरची कोजागिरी – भाग एक


                

या पावसाळ्यात आपल्यापैकी अनेकजणांनी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ट्रेकिंग केलं असेल. कदाचित तुमच्यापैकी अनेकजण रायगडावर सुद्धा जाऊन आले असतील. पण परत एकदा प्लान करायला काहीच हरकत नाही...काय ?? बरोबर ना?



कारण यावेळेची तुमची रायगडावरची सफर अतिशय हटके आणि भन्नाट असेल यात वाद नाही. कसं काय विचारताय ?? सांगते...

कारणं अगदी point wise सांगायची झाली तर ...

1.सुप्रसिध्द संशोधक श्री. गिरीश जाधव यांच्याकडून आपल्याला शिवकालीन ‘शस्त्र आणि शास्त्र’ याविषयीची माहिती मिळेल.

    2.slide shows आणि शस्त्रांच प्रात्यक्षिक आपण  पाहू शकणार आहोत.

3.सुप्रसिध्द इतिहास संशोधक आणि शिवसाहित्याचे गाढे अभ्यासक श्री.पांडुरंग बलकवडे यांच्याकडून आपल्याला ‘छत्रपती श्री. शिवरायांचा’ दैदीप्यमान आणि रोमांचकारी इतिहास ऐकता येईल.

    4.आणि मित्रांनो, यासोबतच रायगडावरील ऐतिहासिक स्थळांवर तर आपण जाणार आहोतच...म्हणजे बघा, कितीतरी नवीन माहिती, आणि एक वेगळा प्रवास म्हणून तुमच्या कायम लक्षात राहील.

   5.अविस्मरणीय शौर्य गाथा ऐकता ऐकता कोजागिरी पौर्णिमेचा आनंद आणि सोबत मसाला दूध !!

इतकचं नाही तर रायगडावरच मुक्कामाची सोय !
आहे कि नाही भन्नाट आणि हटके सफर ??









आता पटकन एकूण दोन दिवसाचा प्लान कसा असेल यावर नजर घालूया...

शनिवार – १५ /१०/२०१६

पहाटे ७ वाजता- ठाणे/ शिवाजीनगर, पुणे याठिकाणी उपस्थित रहावे.
ठीक ७.३० वाजता रायगडाच्या दिशेने आपला बस प्रवास सुरु होईल..
अंदाजे ९ वाजता- चहा, नाष्टा
अंदाजे १ – जेवण
रायगडाच्या पायथ्यापर्यंत – बस प्रवास
पायथ्यापासून गडापर्यंत – गंडोला प्रवास ( रोप वे )
३.३० वाजता आपण रायगडावर असाल.
४.३० वाजता - सुप्रसिध्द संशोधक श्री. गिरीश जाधव आपल्याला शिवकालीन ‘शस्त्र आणि शास्त्र’, slide shows आणि शस्त्रांच प्रात्यक्षिक आपण पाहू शकणार आहोत.
६.३० वाजता- चहा, snacks
७ वाजता - सुप्रसिध्द इतिहास संशोधक आणि शिवसाहित्याचे गाढे अभ्यासक श्री.पांडुरंग बलकवडे यांच्याकडून आपल्याला ‘छत्रपती श्री. शिवरायांचा’ दैदीप्यमान आणि रोमांचकारी इतिहास ऐकता येईल.
रात्री ९ वाजता – जेवण
ऐतिहासिक स्थळांना भेटी आणि शौर्य गाथा.
रात्री १२.३०- मसाला दूध
मुक्काम – रायगडावरच !

रविवार - १६/१०/२०१६

९ वाजता- चहा, नाश्ता
परतीचा प्रवास सुरु ......................
ठाणे येथे सहलीची सांगता .

Sooo Friends ........................BE READY ......................................

अधिक माहितीसाठी संपर्क – 9819926344/ 7506260303

organised by.....

RJ GAYATRI KASHELKAR
CONTENT WRITER AND DEVELOPER
DigitalMindS'pace 

No comments:

Post a Comment