Tuesday, October 4, 2016

                                                    
 ब्रेक........

दुपारी ३.३० ची वेळ. दादर स्टेशन नेहमीप्रमाणेच गजबजलेलं. मी एका meeting वरून निघाले होते. डोंबिवली ट्रेनची वाट पाहत होते. माझ्यासोबत उभ्या असलेल्या सगळ्याचं बायका हातात मोबाईल आणि कानात earphones अशा uniform मधेच होत्या असं काही वेळाने वाटायला लागलं. मी मात्र आपण अपवाद असावं असा उगाचच विचार करून फोन हातात घेऊन त्यात काहीही मेसेज वगैरे पाहण्याचे कष्ट घेतले नाहीत. त्यादिवशी 1st class मध्ये चढण्याची एक वेगळीच पद्धत पहिली. आम्ही सगळ्याजणी line मध्ये उभे राहून शांतपणे चढलो होतो. माझ्यासमोर साधारण माझ्याच वयाच्या दोन मैत्रिणी बसल्या होत्या. एकीचं नुकतच लग्न झालेलं. आणि एक ऑफिस मधून half day घेऊन परत आलेली.

खूप दिवसांनी भेटल्याचा त्यांना झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. बहुतेक शाळेतल्या मैत्रिणी असाव्यात असा मी अंदाज केला आणि मी माझ्या ट्रेन मधल्या रुटीनला नकळत सुरवात केली. थोडावेळ झोपले, मग डबा खाल्ला, पुढच्या कामांची लिस्ट केली. मैत्रिणीच्या वाढदिवसाचा फोन केला. तोपर्यंत कांजूर स्टेशन आलं होतं. त्या समोर बसलेल्या दोघी मैत्रिणींच्या गप्पा रंगत आल्या होत्या. मग काही न बोलता मी सुद्धा नकळत त्यांच्या गप्पांमध्ये सामील झाल्याचा मला भास झाला. कारण त्या इतक्या मोठ्या आवाजात गप्पा मारत होत्या की, सामील होण्यापलीकडे त्यांनीच तसा काही पर्याय ठेवला नव्हता.

काय ग, आजकाल खरचं त्याचं त्याचं रुटीनचा खूप कंटाळा यायला लागलाय...असं ऑफिसला halfday घेऊन आलेली मुलगी तिच्या मैत्रिणीला अगदी कंटाळलेल्या स्वरात सांगत होती.
सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, रात्री घरी ... मग काय जेवायचं आणि झोपायचं...
अशा काहीशा त्यांच्या गप्पा चालू होत्या...त्यावर मी मनातल्या मनात माझा विचार करत होते.
क्षणभर मनात विचार आला की, त्यांच्या गप्पा इतक्या लहान वयात एवढ्या निराशावादी होत्या हे पाहून मी जरा अस्वस्थ झाले. किती negative विचार करत्यात या मुली असं राहून राहून वाटायला लागल.

त्यांच्या गप्पांवरून हे लक्षात आल की, सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत त्या busy असतात पण ऑफिस मधला कामाचा वेळ सोडता फक्त येता-जाता प्रवासात गाणी ऐकणे, नाहीतर movie पाहणे यापलीकडे काहीच नाही....मग कंटाळा येणार नाही तर काय ?
हा विचार करता करता एकदम त्या trekking विषयी बोलयला लागल्या होत्या. आपण कॉलेजमध्ये असताना किती मजा करायचो...पावसात तर फुल धमाल करायचो. त्यावरून हे कळल की त्या ट्रेकिंग ग्रुप मध्ये झालेल्या मैत्रिणी होत्या. तेव्हा मलाच कुठे हायसं वाटलं कारण आता त्यांच्या गप्पा negative, निराशावादी, आयुष्य संपल्यासारख्या नव्हत्या. त्यामुळे नकळत झालेल्या आम्हा इतर जणींना जरा बरं वाटलं. इतरांचं माहित नाही पण मला नक्कीच बरं वाटलं होतं. कारण त्या अगदीचं समोर बसल्या होत्या आणि त्यांचा आवाज सुद्धा बाजूच्या डब्यात जाईल इतका तर सहज होता. त्यामुळे मला त्यांच्या गप्पांमध्ये नकळत सामील व्हावचं लागलं होतं. मग त्या दोघी ट्रेकिंग केलेल्या आठवणींबद्दल बोलत होत्या. कोणाची फजिती, तेव्हाचे प्रसंग....वगैरे सगळचं. मलाही मजा येत होती ते ऐकून.

पुन्हा एकदा जायला पाहिजे यारं......खरच. किती मस्त ब्रेक मिळेल. 
करूया का प्लान ??

सुट्टी मिळेल का पण ? 
  
मिळेल ग .....करूया काहीतरी. आज सगळ्यांना करायचा का मेसेज...बघूया सगळ्यांना कसं जमतंय...

चालेल...मी अगदीच ओस पडलेला आपला तो ट्रेकिंग ग्रुप आज जरा पुन्हा जिवंत करते...

हाहाह....दोघी हसत होत्या...

यावरून माझ्या मनात आलं की प्रवास, ट्रेकिंग आणि अर्थात निसर्ग यामध्ये आपल्याला फ्रेश करण्याची किती ताकद आहे? किती ग्रेट आहे हा निसर्ग...फक्त या एका विषयाच्या आठवणींमुळे त्यांच्या negative  गप्पा  positive झाल्या. मग प्रत्यक्षात गेलो तर किती energy मिळेल? पण सगळ्यांचा हाच प्रश्न वेळ मिळत नाही. पण तेव्हा मनात विचार आला की, अजून जास्त चांगल काम करण्यासाठी आणि quality life जगण्यासाठी या ब्रेक ची गरज आहे. आज आपण त्या मोबाईलच्या कृत्रिम दुनियेत स्वतःला इतकं झोकून दिलं आहे की, बाहेरचा निसर्ग पाहायलाच आपण विसरून गेलो आहोत. मी मनातल्या मनात गंभीर होतं होते.

तेवढ्यात माझ्या मनात आलं की, या दोघी कुठे जायचं याचा विचार माघासपासून करत आहेत. शेवटी त्या कोणत्याच conclusion ला पोहोचल्या नव्हत्या. आणि ग्रुपवर सगळ्यांना विचारून ठरवणार होत्या म्हणजे बहुदा प्लान cancel च होऊ शकतो असं माझं मलाच वाटलं. कारण इतक्या  दिवसांनी सगळे बोलणार म्हणजे whatsapp group वर मुद्दा बाजूला राह्यला वेळ नाही लागणार.
असं झालं असतं तर मला वाईट वाटलं असतं कारण एका ब्रेकची गरज असते हे माझं मलाही मान्य होतं. आणि नुकतचं मागच्या महिन्यात मी रायगडावरवरची कोजागिरी हा लेख लिहिला होता. शिवाय video पण केला होता. माझ्याकडे एक चांगला पर्याय असताना जर मी त्यांना एका मैत्रीच्या नात्याने सांगितला नसता तर मला वाईट वाटलं असतं.

क्षणभर विचार करून शेवटी मी त्यांना सांगितलं, मी नुकताच एक लेख लिहिला आहे. तुम्हाला एक चांगला पर्याय होईल...सांगू का ?  
हो सांगा की....
त्या दोघींनी उत्साहाने विचारलं. TRAVEL PAX HOLIDAYS  नावाची कंपनी आहे. त्यांनी हे organise केलं आहे. कोजागिरीच्या दिवशी रायगडावर जाऊन कोजागिरी पोर्णिमा साजरी करणार आहेत. आणि संशोधक श्री. गिरीश जाधव येणार आहेत. ते शिवकालीन ‘शस्त्र आणि शास्त्र’ याविषयीची माहिती देणार आहेत.

ओह....किती मस्त !!

हो....खरच छान आहे. तुम्ही दोघी मघापासून बोलत होतात...म्हंटलं सांगूया तुम्हाला....

बरं केलत....

आणि हं....slide shows,शस्त्रांच प्रात्यक्षिक सुद्धा दाखवतील. आणि शिवाजी महाराजांचा इतिहास वगैरे सगळं सांगणार आहेत. आणि हे सांगण्यासाठी सुप्रसिध्द इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे येणार आहेत.

जाऊया का गं ?? खूपचं भारी आहे. कधी आहे..कोणाला contact करायचा ? काही माहिती आहे का ?

हो देते ना....मी म्हटलं. मला वाटलं कि यांनी इतकं ऐकून पक्कच केलं बहुतेक.
१५-१६ ऑक्टोबरला आहे.

अरे वाह....सारिका जाऊया का गं...मग ग्रुप वर ह्याच प्लानचं विचारूया ना गं.
हो हेच बेस्ट आहे.
आम्हाला याविषयी सगळी माहिती कुठे मिळेल?

मी यावर ब्लॉग लिहिले आहेत. त्यात मी सगळी माहिती लिहिली आहे.
gayatrikashelkar.blogspot.in हा माझा ब्लॉग आहे...
त्या दोघींनी मोबाईल मध्ये लिहून घेतला.
मी त्यात video सुद्धा टाकले आहेत. त्यात contact no आहेत.
In case  काही अडचण आली...किंवा काही प्रश्न असतील तर हे माझं कार्ड.

okkk....thank you so much....

aree....thank you काय ? मी म्हणाले...

आम्ही दिव्यापर्यंत पोचलो होतो.

एक माझा ब्लॉग वाचत होती....आणि एक मलाच प्रश्न विचारत होती.
हाचं ना.....रायगडावरची कोजागिरी भाग १....आणि भाग २. ?
हो हाच.....

किती दिवस आहे ?

२ दिवस....१५ ला निघायचं....१६ ला परतं....सगळी त्यांची सोय आहे..खाण्यापिण्याची राहण्याची वगैरे...
त्या ब्लॉग मध्ये मी सगळा दोन दिवसाचा प्लान कसा असेल हे लिहिलं आहे.

हो...आहे ग. हे बघ....

मग तीने तिचे प्रश्न विचारायचे थांबवले..आणि दोघी कोपर ते डोंबिवली माझा ब्लॉग आणि video पाहत होत्या. आणि त्यांनी तीच लिंक लगेच त्यांच्या ग्रुप वर पाठवली.
हे सगळं त्या माझ्याच समोर करत होत्या. एक क्षण मला खूप बरं वाटलं की, माझ्या लेखणीचा कोणालातरी फायदा झाला. हा फायदा त्यांनी माझा ब्लॉग वाचला....video पहिला यासाठी तर होताच पण यापलीकडे जाऊन....असं वाटलं की, आज त्या ग्रुपला त्यांच्या रुटीन मधून एक थोडा ब्रेक मिळेल...जो कदाचित दिवसरात्र काम करणाऱ्या प्रत्येकाला आवश्यक आहे. ब्रेक तर मिळेलच शिवाय  माहिती मिळेल...एक वेगळं ट्रेकिंग होईल..एक छान अनुभव मिळेल...एक छान आठवण मनात राहील. अशा quality of life कडे झुकणाऱ्या अनेक गोष्टींसाठी मला बर वाटलं.

दोघींनी मला पुन्हा एकदा thank you म्हटलं...एका ओळखीच्या स्वरात आम्ही एकमेकींचा निरोप घेतला....कदाचित आता ट्रेन मधल्या मैत्रिणी म्हणून भेट होण्यासाठी.
आम्ही नक्की जाऊ...आणि परत भेट झाली तर नक्कीच सांगू कसा experience होता ते....
yes...thank you. bye.
एक ब्रेक मिळेल या विचारानेच त्या दोघींच्या चेहऱ्यावर उत्साह दिसतं होता... त्यांच्या thank you मधेच खूप आनंद होता...

हा इतक्या कमी क्षणातला बदल पाहून ज्या लेखणीने हा बदल घडवून आणला त्याच लेखणीने हा अनुभव लिहावासा वाटला...माझ्या लेखणीला thanku म्हणण्यासाठी.
आणि हा ब्लॉग जे वाचक वाचत असतील....त्यांना सुद्धा मला सांगावसं वाटतं की, हा एक ब्रेक जर आपल्याला आपलं काम अजून चांगल्या पद्धतीने करण्यासाठी ताजतवानं करण्यासाठी मदत करणार असेल तर तो जरूर घ्यावा. तंत्रज्ञानाच्या जगापासून थोडं लांब जाऊया....आणि quality life जगूया..

आरजे गायत्री कशेळकर.  




No comments:

Post a Comment