Saturday, October 22, 2016

                                 



काळजीपूर्वक नियोजनाची गरज – परदेशी शिक्षण भाग १

Hiii Friends, परदेशात शिक्षणासाठी जाण्याचा 
विचार असेल, कदाचित तयारी सुद्धा चालू असेल... अशा विद्यार्थी आणि पालकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती देणारी ही मुलाखत आहे. कारण, परदेशात शिक्षणासाठी जायचं म्हणजे बऱ्याच गोष्टींच्या नियोजनाची गरज असते. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या? आणि अर्थात त्याचं नियोजन कसं करावं याविषयी Interedwise Education Pvt Ltd च्या Overseas Counsellor – Center Head  रुपाली ठाकूर यांनी उत्तमप्रकारे विद्यार्थी आणि पालकांना या मुलाखतीतून मार्गदर्शन केलेलं आहे. 
Overseas Counsellor रुपाली ठाकूर 








आरजे गायत्री 

आरजे गायत्री: नमस्कार madam....





Overseas Counsellor - रुपाली ठाकूर: नमस्कार....

आरजे गायत्री:  कोणत्याही गोष्टीत नियोजन अर्थातच planning महत्त्वाचं असतच. आणि परदेशी शिक्षण म्हंटलं तर अगदीच महत्त्वाचं आहे...तर madam, ते नियोजन कशापद्धतीने करावं आणि विद्यार्थी आणि पालकांना तुमच्या IE (Interedwise  Education Pvt Ltd) तर्फे काय मदत होऊ शकते? 

रुपाली ठाकूर: अगदी बरोबर आहे गायत्री....नियोजन खूपच गरजेचं आहे. मला विद्यार्थी आणि पालकांना असं सांगावसं वाटतं की, जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी परदेशी शिक्षणासाठी जायचा विचार करतात तेव्हापासूनच म्हणजे साधारण एक वर्ष आधीच planning करावं. काही विद्यार्थी  दहावी, काही बारावी तर काही पदवी  (graduation), पीजी शिक्षणानंतर परदेशी शिक्षणासाठी जातात. IELTS,TOEFL, GRE, GMAT या परीक्षांची तयारी असते त्याप्रमाणे अभ्यासाचं नियोजन विद्यार्थी करू शकतात. या परीक्षांचे मार्क्स दोन वर्षांसाठी valid असतात. याठिकाणी महत्त्वाचं म्हणजे त्यातही मुलांनी जर एखादा विशिष्ट कोर्स पक्का केला असेल तर त्याप्रमाणे University  मध्ये अॅडमिशन घ्यायला बरं पडतं. आर्थिक गणितांच नियोजन यामुळे नक्कीच सोपं होऊ शकतं. Educational  loan साठी Income Tax Returns,  bank balance, FD’s  या गोष्टी महत्त्वाच्या आहेत हे लक्षात ठेवावं. त्यामुळे तू म्हणालीस तसं नियोजन आवश्यक आहेच ज्यामुळे गोष्टी खूप सोप्या होतात. शिवाय आम्ही विद्यार्थ्यांना कोर्सेस पासून ते University selection, बजेट आणि त्यांच्या passion प्रमाणे कोर्स निवडायला आणि स्कॉलरशिपसाठी सुद्धा मदत करतो. काही वेळा विद्यार्थी फक्त academics पर्यंत मर्यादित राहतात. मला असं सांगायला आवडेल की, ज्या काही विद्यार्थ्यांच्या इतर activities म्हणजे अगदी क्रीडा,कला ( national, international level ) असतात त्याची मदत स्कॉलरशिपसाठी होते. त्याचा याठिकाणी कसा उपयोग होईल याविषयी सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो. अनेकवेळा मी पाहिलं आहे की विद्यार्थी ती सगळी Certificates नीट ठेवत नाहीत आणि मग आयत्यावेळी जमवाजमवं करतात, धावपळ होते. त्यात वेळ जातो...मग त्यांचा पक्का निश्चय किंवा निर्णय जरा  डगमगतो....त्यामुळे सगळी certificates नीट ठेवा, File maintain करा , नोकरी करणाऱ्यांनी त्यांचा सीव्ही (cv) कायम अपडेट ठेवावा. आणि विचार पक्का ठेवा म्हणजे तुमच्या पालकांना सुद्धा आर्थिक गोष्टी ठरवणं सहज शक्य होईल.


आरजे गायत्री:   नक्कीच...म्हणजे विचार तर पक्का हवाचं शिवाय documents सुद्धा सगळीच नीट ठेवली तर त्या दृष्टीने तयारी करताना वेळ जाणार नाही...

रुपाली ठाकूर: yes....अगदी बरोबर. 

आरजे गायत्री: यासोबतच...कधीकधी University ठरवत असताना किंवा  देश ठरवतं असताना जर मनाचा गोंधळ होत असेल तर प्राधान्य कशाला द्याव असं तुम्हाला वाटतं?

रुपाली ठाकूर: मला असं वाटत की, प्राधान्य हे तुम्ही ठरवलेल्या vision ला द्यावं. आधी हे निश्चित्त करा की नोकरी करणार आहात कि फक्त शिकायला जाणार आहात कि कायम वास्तव्य असणार आहे. या गोष्टी समजून आम्ही मुलांना मार्गदर्शन करतो. कारण जर कायम वास्तव्य असेल किंवा परत येणार असतील तर त्याप्रमाणे त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकते याविषयी सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो. एवढच नाही तर प्रत्येक देशाचे फायदे तोटे याविषयी सुद्धा नीट माहिती आम्ही देतो. विद्यार्थ्यांनी  आपल्या क्षमतेप्रमाणे कोर्स निवडण्यावर प्राधान्य द्यायला पाहिजे. क्षमतेप्रमाणे कोर्स कसा ठरवायचा यासाठी मुलांना मदत लागते त्यामुळे त्यासाठी आम्ही असतोच. काही वेळा एखादा कोर्स करण्याची क्षमता नसल्यामुळे विद्यार्थी परत सुद्धा आले आहेत..त्यामुळे असं होऊ नये यासाठी मुलांनी त्यांच vision निश्चित करावं असं मी सांगेन आणि त्यासाठी आमची कंपनी मदत करते.


आरजे गायत्री : हो खरंय. जर आपल्याला काय करायचं आहे हे पक्क ठरलं असेल तर इतर गोष्टी सोप्या होतात...madam, पुढचा प्रश्न पालकांसाठी मला विचारायचा आहे ....
आजकाल मुलांचा परदेशी शिक्षणासाठी जायचा निर्णय अगदी लहान वयातचं पक्का असतो...तर त्या अनुषंगाने आर्थिक बाजूची तयारी किंवा नियोजन पालकांनी कसं कराव ?

रुपाली ठाकूर: कुठेही असलो तरी आजकाल financial planning च्या दृष्टीने पाहता 25 – 30 लाख इतकी सोय तर करूनच ठेवावी. आणि आता तर शिक्षणाचं  financial planning हे मुलांच्या लहानपणापासूनच करावं. याविषयी मार्गदर्शन करणारी सुद्धा तज्ञ मंडळी आहेतच...
शिवाय पालकांना मला हे सांगायला आवडेल की, आपल्या स्वतःच्या savings सोबत Educational loan चा विशेष फायदा याठिकाणी होतोच. त्यामुळे दडपण घेण्याची काहीच गरज नसते. पालकांचा हा गैरसमज असतो की सगळे पैसे एकदम भरावे लागतील वगैरे...पण तसं होत नाही. याठिकाणी सुरुवातीला पालक support म्हणून असतात आणि नंतर म्हणजे साधारण दोन वर्षांनी ते educational loan  विद्यार्थ्यांनी भरायचं असतं. यात विद्यार्थी स्वतः ती जबाबदारी घेतात त्यामुळे त्याचं चांगल्या प्रकारे ग्रुमिंग सुद्धा होत असतं.


आरजे गायत्री: बरोबर..
परदेशात शिक्षणासाठी जायचा निर्णय पक्का झाल्यानंतर कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवून त्यानुसार पाउलं उचलावीत?  

रुपाली ठाकूर: Exam, University , देश, विषय, वर्ष, नक्की काय करणार?, Visa किती वर्ष वापरणार? मानसिक तयारी.
आपण काय करू शकतो, काय करू शकत नाही याविषयी अगदी प्रामाणिक राहून प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांनी विचार करावा. 

आरजे गायत्री: हो..तुम्ही मांडलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. madam, (Interedwise  Education Pvt Ltd) तर्फे pre – departure services दिल्या जातात...त्याविषयी सांगा.

रुपाली ठाकूर: जाण्यापूर्वीची तयारी करून देण्यात सुद्धा आमची कंपनी मदत करते. प्रत्येक देशाचे नियम असतात. त्याप्रमाणे आम्ही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. उदा. काही देशांमध्ये आधीच funds transfer होतात. त्यामुळे पालकांना सुद्धा भीती राहात नाही. मुलांच्या राहण्याची सोय नीट असेल तर पालकांना चिंता नसते आणि मुलींच्या बाबतीत तर अधिकच काळजी असते. त्यामुळे आम्ही University कँपस मध्ये त्यांची राहण्याची सोय आम्ही पाहतो. थोडक्यात सांगायचं तर अगदी भारतात त्यांना कोर्स निवडण्यापासून ते University आणि परदेशात गेल्यावर तिकडची सुद्धा सोय पाहण्याची जबाबदारी आमची कंपनी घेते. 


आरजे गायत्री: वा...खूपच छान !! म्हणजे पालकांना सुद्धा काळजी राहत नाही. आणि तुम्ही आधी म्हणालात त्याप्रमाणे योग्य नियोजन केलं तर सगळ्या गोष्टी नीट होऊ शकतात. 

 रुपाली ठाकूर: हो..अगदी खरं.

आरजे गायत्री: धन्यवाद madam....तुम्ही खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलत...पुढच्या मुलाखतीतून आम्हाला IE (Interedwise  Education Pvt Ltd) विषयी जाणून घ्यायला नक्कीच आवडेल...

पण वाचकांना सांगायला आवडेल की तुम्हाला काही प्रश्न असतील तर आमच्या पुढच्या मुलखतीपर्यंत थांबायची काहीच गरज नाही...madam आणि त्यांची कंपनी अर्थात संपूर्ण टीम मार्गदर्शन करायला अगदी कायम आहेतच...

Contact no:  022-65150555 –   MOB: 9820383118
ADD: C-105, 1st Floor, Sai Classic Bldg; 90 Feet Road,
 Mulund – 400 081  
Email : mulund@ieplcareer.com 
URL: www.ieplcareer



GOOD LUCK !!!!!!

No comments:

Post a Comment