Sunday, November 6, 2016

पूर्वरंग :

( जंगल पाहायचं कसं याचे सगळे पर्याय discuss केल्यानंतर गायत्री आणि मैत्रेयी एक पर्याय निश्चित करतात....आणि एका अनोख्या जंगल दुनियेचं  निरीक्षण करायला सुरुवात होते )

यापुढे ...
.
जंगल बुक जंगल गप्पा भाग ३

गायत्री : ऐकं ना...आपण आत्ताच जाऊया का watch केबिनमध्ये....?

मैत्रेयी : हो जाऊया... का नाही ? चलो.

गायत्री आणि मैत्रेयी watch केबिन जवळ पोहोचतात....
.
( watch केबिन – सिमेंटची एक छोटी खोली...जिथून प्राणी आणि पक्षी याचं अभ्यासकांना निरीक्षण करता येतं)

गायत्री : wow मैत्रेयी, सहीचं यार...किती मस्त मज्जा येणारे आता. (प्राण्यांना जवळून पाहण्याचा गायत्रीचा पहिलाच अनुभव त्यामुळे मनात प्रचंड उत्सुकता आणि थोडीशी भीती)

मैत्रेयी: हो हो.....पण आपण अभ्यासक म्हणून आलोय हं....कोणताही प्राणी किंवा पक्षी दिसला तर खूप excite नको होऊस...ओके क्या?

गायत्री : yes बॉस....खरचं गं खूप छान जागा आहे. पाणवठा किती मस्त बांधलाय. एक वेगळीच शांतता जाणवतेय नाही का?

मैत्रेयी: hmmm....ते बघ गायत्री, तिथे तीन चार फुटांवर झाडं अजिबात दिसत नाहीयेत...आणि या संपूर्ण मोकळ्या भागात अतिशय मऊ माती आणतात...या मातीत छोटे दगड वगैरे नसतात...एकदम मऊ. आणि त्यात हे पगमार्क इम्प्रेशन pad (pugmark impression pad) तयार केले जातात....

गायत्री : ohhh....nice idea...very interesting. पण का करतात गं असं? प्राण्यांना दगड वगैरे लागू नये म्हणून? पण असं नसेलचं...एरव्ही तर त्यांना जंगलात पायांना लागतच असणार काही ना काही...मग फक्त पाणवठ्याजवळ का?

 (watch केबिन मधून निरीक्षण करता करता चालू असलेलं संभाषण)

मैत्रेयी: अगं येडू...ते त्यांच्यासाठी केलेले नसतात....आपल्यासाठी केलेले असतात?

गायत्री : aing....आपल्यासाठी का करतील ? मला काहीच कळत नाहीये.
..
मैत्रेयी: अगं आपल्यासाठी म्हणजे हे अभ्यासकांसाठी केलेलं असतं. दगड नसलेली माती असते त्यामुळे मातीवर प्राण्यांचे ठसे ठळकपणे उमटतात.
...
गायत्री : अच्छा !! म्हणजे पाणवठ्यावर कोणते प्राणी आले...हे यावरून लगेच समजेल...Right? पण दोन वाघ येऊन गेले तर ?

मैत्रेयी: हो...good question ...तरीसुद्धा फरक ओळखता येतो..
   
गायत्री: जंगल चांगल्या प्रकारे वाचता येण्यासाठी अभ्यासकांना याचा फायदा होत असणारं...आजच्या दिवसातली एक भारी गोष्ट समजली मला...म्हणजे आता खऱ्या अर्थाने जंगल वाचायला आपण सुरुवात केली असं म्हणायला काहीच हरकत नाही. 
  
मैत्रेयी: yes....very true  माय आरजे फ्रेंड.
....
गायत्री : eee, मैत्रेयी तो कोणता पक्षी आलाय पाणवठ्याजवळ ?

मैत्रेयी : तो ना....हां...तो कोतवाल आहे.
.
गायत्री : गेला पण...एका क्षणात ?? (खूप आश्चर्याने) असं काय पाणी प्यायलं त्याने ?

मैत्रेयी: कोतवाल, फ्लायकॅचर्स, बी ईटर्स हे पक्षी असंच उडता उडता पाणी पितात....आणि गरुड वगैरे शांतपणे पाणवठ्यावर बसतात...पाणी पिऊन मग शांतपणे उडतात
.  
गायत्री : ohhh......पण हे कोतवाल वगैरे असं का उडता उडता पाणी पितात?

मैत्रेयी: कारण त्यांना जास्त पाणी लागत नाही त्यामुळे ते action मधेच पाणी पितात. तो बघ...पटकन...लंगुर्स. म्हणजे काळ्या तोंडाची वानरं....पाणी प्यायला आली आहेत....

गायत्री : ह्म्म्म....solid धमाल येतेय इथून पाहायला...किती जवळून पाहतोय ना आपण त्यांना....

मैत्रेयी: ये तो कुछ नही dear...अगं watch केबिन हा तर पर्याय आहेच पण मचाणाचा सगळ्यात जास्त फायदा असतो...कारण आपण तिथे बसून अगदी २४..४८ तास निरीक्षण करू शकलो तर मस्त धमाल..आणि असं निरीक्षण करणं प्राणी जनगणनेचा एक भाग आहे.

गायत्री : अरे haan रे...बरोबर. मैत्रेयी, मला सांग....अजून कोणते कोणते प्राणी येतील पाणवठ्यावर ?

मैत्रेयी: बरेच.....चितळं म्हणजे spotted deers , गवे, सांबर, भेकर असे बरेच....आणि 
गायत्री....वेगवेगळ्या प्राण्यांच्या सवयी, behavioural pattern त्यांचे हावभाव या सगळ्याचा अभ्यास आपल्याला मचाणावर बसून करता येतो.

गायत्री : अच्छा....bdw कल का क्या प्लान है?

मैत्रेयी: उद्या आपण जिप्सीची सफारी करूया..
..
गायत्री : ohhh...done. म्हणजे open जीप ना...?

मैत्रेयी: yes...सकाळी पाच वाजता सुरु होते 
.
गायत्री : काय ???????????? पाच ????????????? म्हणजे चार वाजता उठावं 
लागेल...बापरे !!

मैत्रेयी : होहो....अगं घाबरले मी...हळू जरा.

गायत्री : येईल का मला जाग?? बापरे चार ?

मैत्रेयी: येईल येईल...माझा alarm वाघाच्या डरकाळीचा आहे...hahha. आणि त्यात आपण ताडोबा मध्ये आहोत. सो तुला वाटेल वाघच आलाय की काय बाजूला.. सो धाडकन उठशील...dont worry...हाहाह
.
गायत्री: काही टेपा नको मारूस....चलं...उठीन मी sharp 4 am.

( अशाप्रकारे ताडोबा मधला पहिला दिवस या watch केबिनच निरीक्षण करून पूर्ण होतो...आता जंगलाच नेमकं सौंदर्य काय हे हळू हळू गायत्री उलगडायला लागली आहे....
आता ताडोबा जंगलातला दुसरा दिवस सुरु होईल जिप्सीच्या सफारीमधून....)

दिवस दुसरा: ( जिप्सीची सफर. जंगल उघडण्याची वेळ सकाळी ठीक ५ वाजता....या ओपन जीप मध्ये driver व guide ची सोय असते.)

गायत्री : बापरे !! किती अंधार आहे ना.
...
मैत्रेयी: हो. आत्ता अगदीच पहाटेची वेळ आहे. पण हळू हळू उजाडायला लागेल तेव्हा खूप मस्त वाटेल..
..
गायत्री : हो..मस्त तर आत्ताच वाटतयं.....वेगळा फ्रेशनेस जाणवतोय...तुला जाणवतोय?

मैत्रेयी: येस....कितीही वेळा आलो..तरी तितकचं फ्रेश वाटतं. जंगलात एक वेगळ्या प्रकारचा गंध जाणवतोय बघ...हा निसर्गाचा फील आहे..
  
गायत्री: हो...छान तर वाटतयं गं. पण जरा भीती पण
 ....
मैत्रेयी: अब क्या हुआ? मस्त निसर्ग आहे...त्याचा आनंद घे. घाबरू नकोस
.
गायत्री : हो पण मला खरं सांग...ओपन जीप मध्ये प्राणी अंगावर वगैरे येणार नाहीत ना ?

मैत्रेयी: अगं अजिबात घाबरू नकोस...हे safe आहे. प्राण्यांना सुद्धा ओपन जीप जाते याची सवय असते. ते घाबरत नाहीत...पळत नाहीत. काही नाही. ते त्यांच्या त्यांच्या नादात असतात...महत्त्वाचं म्हणजे जोपर्यंत आपण त्यांना काही करत नाही तोपर्यंत ते काहीही करत नाही
.
गायत्री : मग ठीके. मी त्यांना काहीच करणार नाहीये...उलट भरपूर जंगल पाहणार आहे आज..
..
मैत्रेयी: हो पाहूया. अगदी मनसोक्त. ओपन जीपचा हाच तर फायदा आहे. आपल्याला सगळ जंगल पाहता येतं ...भरपूर प्राणी दिसतील.
..
गायत्री : eee.....ऐकं ना. तुला माघासपासून एक आवाज येतोय का?

( जिप्सीची सफर सुरु झालेली असते...)

मैत्रेयी: कोणता आवाज?

गायत्री : लोहार लोखंडावर काही मारत असेल त्यावर काही काम करत असेल तर आवाज कसा येतो? तसा...काहीसा.
..
मैत्रेयी: हां....थांब हा...( आवाज नीट ऐकते ) yes. बरोबर. हा तांबट पक्षी. सकाळी पहाटे पहाटे जंगलात त्याची सफर असते.

(ओपन जीप मधून पुढे पुढे आल्यावर.)

मैत्रेयी: हे बघ....कुरणं. आता पुढे माळरान सुद्धा लागेल.

(माळरान लागल्यावर.)

गायत्री: मैत्रेयी, ते बघं...चितळ्यांचा कळप.

मैत्रेयी: त्यात...ज्यांना शिंग आहेत ते नर चितळं आहेत. पाहिलसं का? ते बघ..
गायत्री : होहो....दिसत्यात
...
मैत्रेयी: आणि ज्या चितळ्यांना शिंग नाहीत. त्या मादी असतात.
   
(माळरान संपल्यावर दाट जंगल दिसायला सुरुवार होते.)

गायत्री: मैत्रेयी, मला वाघ पहायचे आहेत. ते काही दिसत नाहीयेत यार..shit.

मैत्रेयी: दिसतील दिसतील.... इथे येऊन वाघ सगळेच बघतील. पण आपण वाघ शोधू...गायत्री,वाघ पाहण्यासाठी तर सगळेच येतात गं.. पण आपण वाघ शोधूया, काय ?
गायत्री : yes....नक्की.

मैत्रेयी: आपण वाघ शोधू, त्याचा पाठलाग करू...तर खऱ्या अर्थाने वाघ पाहण्यात मजा आहे. आणि वाघ पाहण्यासाठी सगळ्यात योग्य ठिकाण म्हणजे हे दाट जंगल आणि थंड बांबू... बांबूच्या वनात वाघ दिसतील
.
गायत्री : ee....ते बघं, किती मोठे पक्षी आहेत...बापरे!!

driver: तीन चार दिवसांपूर्वी शिकार झाली होती...गिधाडं आहेत तिथे..
.
मैत्रेयी: अच्छा !! गायत्री...गिधाडं आणि कावळे जंगलाचे सफाई कामगार 
असतात...शिकार झाल्यानंतर तो भाग ते साफ करून टाकतात.
  
(जिप्सीच्या सफरीमध्ये गायत्री आणि मैत्रेयीला बरेच पक्षी, प्राणी दिसतात जसे की, गवे, सांबर, हरणं, भेकर.)

(जिप्सीची सफर चालू असताना काही गाड्या परत येत होत्या. दुसऱ्या कार चे driver आमच्या driver ला काहीतरी सांगून गेले. आणि आमच्या driver ने गाडी पटकन पुढे नेली.)
  
गायत्री : क्या हुआ?

driver: आगे sighting हुआ है..

गायत्री : म्हणजे?

मैत्रेयी: तुझी इच्छा आज पूर्ण होणार गायत्री... sighting हा शब्द वाघासाठी वापरला जातो
.
गायत्री: ohh..wow. I am very excited.

त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर..
..
मैत्रेयी: ते बघ...पग मार्क्स (पाऊलखुणा).

गायत्री: ohh...इथून वाघ गेलाय म्हणजे आत्ताच....

सगळ्यांची उत्सुकता चेहऱ्यावर....

मैत्रेयी: हो..
.
गायत्री: पण वाघ ??

मैत्रेयी: ऐकू येतंय काही? खूप लांबवरून लंगुरांचा आवाज येतोय. वाघ तिथे गेल्यामुळे ते एकमेकांना अलर्ट करत आहेत...हा त्यांचा अलार्म असतो...

गायत्री : ohh.......वाघ jus miss झाला म्हणजे. पण हो, वाघ आसपास आहे हे खाणाखुणांवरून पाहता आला यात जास्त थ्रील आहे.
मैत्रेयी: खरयं..

( गायत्री आणि मैत्रेयी एकमेकांना टाळ्या देतात...एक वेगळं थ्रील अनुभवल्याचा आनंद दोघींच्याही मनात असतं...)

Experienced  Shared By Maitryee Bhave
Content Writer and Developer RJ Gayatri Kashelkar    


No comments:

Post a Comment