Saturday, April 29, 2017

सिझल कट्टा-

नमस्कार  वाचक मंडळी,

मी आजपर्यंत बरेचवेळा  सिझल देसी या ठाण्यातल्या रेस्टाँरंट बद्दल लिहिलं आहे. त्यांचे वेगवेगळे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवले आहेत. खरतरं,  सिझल देसी मध्ये दरवेळी काहीना काही नवीन हे असतचं. कधी ऑफर्स, कधी उपवासाच्या सिझलर्सची मेजवानी, तर कधी M's Kitchen ची झालेली सुरुवात. पण  रेस्टाँरंट म्हंटलं की पार्टी, कधी नवीन खाद्यपदार्थांची मेजवानी या गोष्टी ओघाने होतचं असतात. परंतू मला असं वाटत की, सिझल देसी यामध्ये जरा अपवाद आहे. 

 रेस्टाँरंट व्यवसाय सांभाळत सगळ्यांना फायदेशीर ठरेल असे काही सामाजिक- शैक्षणिक विषयाला अनुसरून वेगवेगळे सेमिनार्स सिझल देसी मध्ये होतात. याच संकल्पनेच नाव- सिझल कट्टा. हा कट्टा महिन्यातल्या दर शनिवार रविवारी एका ठराविक वेळेत भरतो. सकाळी ८.३० ते १०.३० या वेळेत या सिझल कट्ट्यावर सगळे जण एकत्र येतात. याचा मुख्य हेतू इतकाच की, आपल्या सर्वांना उपयोगी पडेल अशा विषयांवरचे सेमिनार्स आयोजित करून त्या विषयाबद्दल माहिती पोहोचवणे. विशिष्ट क्षेत्रात अनेक वर्ष काम केलेली व्यक्ती याठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रित केली जाते. मार्गदर्शन करणे, माहिती पोहोचवणे हा हेतू असल्यामुळे  या सिझल कट्ट्यावर होणारे सर्व सेमिनार्स हे फ्री असतात. शिवाय  हा कट्टा सर्वांसाठी खुला असतो.

या सिझल कट्ट्यावर आजपर्यंत अनेक विषयावर सेमिनार्स झाले.

माइंड प्रोग्रामिंग ( सतीश रानडे), 
इनव्हेसमेंट (गणेश भिडे) अँड व्हील (पूर्वा नायगावंकर)
धेय्य निश्चिती आणि पूर्ती( सतीश रानडे), 
हैप्पी पॅरेंटिंग ( अपर्णा निमकर), 
व्हाय मेडीक्लेम ( गणेश भिडे), 
माझी गुंतवणूक आणि गुंतवणूकदाची मानसिकता तसेच शेअर बाजारात काय करावे काय करू नये?( निखिलेश सोमण)
व्यक्तिमत्व विकास( कविता जोशी), 
स्ट्रेस मॅनेजमेंट( मनशक्ती), 
महिला दिनाच्या दिवशी महिलांकरता विशेष कुकिंग वर्कशॉप( शेफ पराग जोगळेकर) , 
यूज ऑफ इंटरनेट अँड मोबाईल अॅप ( हिमांशू  वैद्य), 
सर्व्हिकल कॅन्सर (डॉ. नयना जाधव)
फूल मून मेडिटेशन सुद्धा एक अनोखा मेडीटेशनचा प्रकार सिझल कट्ट्यावर होत असतो.

शिवाय या रविवारी म्हणजेच ३० एप्रिलला  'मनावरील ताणाचे नियंत्रण आणि कौटुंबिक सुख-शांती' या विषयावर 'मनःशांती' संस्थेतर्फे व्याख्यान असणार आहे. 

सिझल कट्टा सुरु होऊन ३ महिने झाले.  या तीन महिन्यात झालेल्या सेमिनार्सची काही क्षण चित्र .











Sizzle  Desi- एक वेगळी  आणि हटके खवय्येगिरी.  
( पदार्थ ) मूळ  संकल्पना : शेफ पराग जोगळेकर. 

1,Trishul Apt, Besides Celebration Hall, Eastern express Highway, service road,Panchpakhadi , Thane 4000602
Hotel no: 022-25339741/51



No comments:

Post a Comment