'मी पाहिलेली अमेरिका' या ब्लॉग सिरीजला तुम्ही दिलेल्या अप्रतिम प्रतिसदाबद्दल मी सर्वांची मनापासून आभारी आहे.
मला सांगायला आनंद होतोय की,एकूण ९२२ वाचकांनी हा ब्लॉग वाचला आणि ३०० पेक्षा अधिक श्रोत्यांनी किंवा प्रेक्षकांनी ब्लॉग अभिवाचन ऐकले आहे.
आणि मी पहिल्या भागात एक प्रश्न विचारला होता.'अनोळखी, अपरिचित आणि नवीन' अशा मिश्र भावनांचा प्रवास करताना तुम्हाला कधी अनुभव आला आहे का? अनुभव ऐकायला आवडेल.
तर काही वाचकांचे अभिप्राय माझ्यापर्यंत आले आहेत..त्याचा उल्लेख या भागाच्या शेवटी करणार आहे.
अपरिचित,अनोळखी,आणि नवीन अशा भावना मधे मधे मनात येत असल्या तरी सिऍटल एअरपोर्टपासून घरापर्यंतचा प्रवास करण्यासाठी माझं मन खूपच उत्सुक होतं. कारण शेवटी 'घरी' जाण्याचा आनंद हा वेगळाच असतो.
![]() |
| Seattle-Tacoma International Airport |
घरी जाण्याचा उत्साह आणि आनंद मनात होता हे नक्की पण माझ्या चेहऱ्याकडे पाहून कोणालाच वाटलं नसतं असा माझा चेहरा होता.. काहीसा थकल्यासारखा. अठ्ठावीस तासाचा एकूण प्रवास.. त्यात दोन तासाचा हॉल्ट वगळता संपूर्ण प्रवास एकाच ठिकाणी बसून.. त्यामुळे
आखडलेला जीव आणि वेळा बदलल्यामुळे बदलेलं शरीराचं घड्याळ.. अर्थात 'जेटलॅग'. इतका मोठा आणि सलग प्रवास बहुतेक आयुष्यातला पहिलाच प्रवास होता. पण तरी हा भला मोठा प्रवास finally आता संपला होता. आणि आम्ही सिऍटलला उतरल्यावर भली मोठी रांग होती ती इमिग्रेशनची. या संपूर्ण प्रवासात इतकी मोठी रांग इथेच शेवटच्या टप्प्यात लागली होती. रांगेत असताना ते ऑफिसर्स काय विचारतील यावर आम्ही बोलत होतो. रांग हळूहळू पुढे चालली होती. परदेशात येऊन गेले दोन दिवस फक्त एअरपोर्टच पाहत होते त्यामुळे सिएटलला आल्यावर कधी एकदा एअरपोर्ट मधून बाहेर जातेय असं एक क्षण मला वाटलं. पण फक्त एकच क्षण. तर ते ऑफिसर्स काय प्रश्न विचारतील याचा अंदाज आल्यावर त्या उत्तरांची उजळणी मी मनातल्या मनात करत होते. गोष्टी सोप्या होत्या पण तरी टेंशन आलं होतं. अर्ध्या पाऊण तासानंतर आमचा नंबर आला. त्या ऑफिसर्सनी प्रश्न विचारले. आम्ही उत्तर दिली. पासपोर्ट दिले. ठसे झाले. स्टॅम्प झाला... आणि त्यांनी मला सांगितलं...
'वेलकम टू अमेरिका'... मी त्यांना हसून थँक्यू म्हटलं.
आम्ही आमच्या बॅगा घेतल्या. कनेक्टिंग फ्लाईट्स असल्यामुळे इंडिया मध्ये दिलेल्या बॅगा आता थेट सिऍटलला आल्यावर आम्ही घेत होतो.
उबर बुक केली. त्या ड्रायव्हर ने हसून आमचं स्वागत केलं, विराजचं आणि त्याचं बोलणं झालं.. नॉर्मल ग्रीटिंग्ज.. त्याने आमच्या बॅगा नीट लावल्या. आणि एअरपोर्ट पासून घरापर्यंतचा प्रवास अखेर सुरु झाला.
आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.. खऱ्या अर्थाने सहजीवनाची आता सुरुवात झाली हे मनोमनी जाणवत होतं.
मी खिडकीतून बाहेर पाहिलं. एअरपोर्ट च्या रस्त्यावरून आम्ही जात होतो. सुरुवातीला काहीसा इंडस्ट्रिअल भाग होता.
आणि त्या नितांत सुंदर निसर्गाला मी मनोमनी नमस्कार केला. तो आकाशपाळणा माझं सिएटल मध्ये स्वागतच करतोय असं वाटून गेलं आणि अचानक माझ्या चेहऱ्यावर हसू आलं....... मी मनातल्या मनात थँक्यू म्हंटल.
त्या आकाशपाळण्याचा विचार मनात चालू असताना काही क्षणातचं आम्ही घरापाशी पोहोचलो. बिल्डिंग खाली गाडी उभी केली. त्या ड्रायव्हर ने सगळ्या बॅगा काढून दिल्या. गाडीतून उतरलो.
खरं सांगू तर, सिऍटल मध्ये पहिलं पाऊल ठेवल्यानंतरचा प्रसंग सुद्धा आजही जसाच्या तसा लक्षात आहे. या नव्या देशातलं पहिलं पाऊल. प्रचंड ऊन होतं. गाडीतून उतरल्या उतरल्या माझे डोळे अक्षरशः मिचकले.. समोर नीट पाहता सुद्धा येऊ नये इतका प्रखर प्रकाश डोळ्यावर आला. आणि देहाला नकळत जाणवत होती ती घरापासून जवळच असलेल्या समुद्रावरची थंडगार हवा. हा माझा सिऍटल मध्ये उतरल्यावर लक्षात राहिलेला प्रसंग.
त्यानंतर आम्ही आमच्या जड बॅगा घेतल्या आणि बिल्डिंग मध्ये प्रवेश केला. अगदी बिल्डिंग मध्ये प्रवेश करतानाच मला एक नवी पद्धत समजली इथे बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी 'गेटेड एंट्री' असते. ती चिप असलेली व्यक्तीच बिल्डिंगमध्ये प्रवेश करू शकते अर्थात रहिवासी ... आता भारतात सुद्धा अनेक ठिकाणी ही पद्धत असते.. फक्त त्याचे प्रकार वेगळे असतात.
तर... आम्ही बिल्डिंग मध्ये प्रवेश केला. एखाद्या आलिशान हॉटेल चा आवार जसा असतो तसचं सगळं दिसत होतं. आम्ही लिफ्टपाशी उभे होतो. लिफ्ट समोर उभं न राहता त्याच्या बाजूला उभं राहून ... मग प्रवेश करण्याची सवय मला इथे आल्यावर लागली. ही पद्धत नव्याने समजली आणि आवडली सुद्धा.
धन्यवाद !!
वाचकांचे अभिप्राय- भाग १
'अनोळखी, अपरिचित आणि नवीन' अशा मिश्र भावनांचा प्रवास करताना तुम्हाला कधी अनुभव आला आहे का?
(ठाणे)स्वाती भट- लंडनला तिला अनोळखी वाटलं होतं.
प्रसाद अग्निहोत्री- अमृतसर या ठिकाणी जेव्हा ते गेले तेव्हा ते हरवले होते तेव्हा त्यांना अनोळखी.. अपरिचित असा अनुभव आला..
(रत्नागिरी)अभिषेक काटदरे- सिक्कीम आणि दार्जिलिंग या ठिकाणी असा अनुभव आला.
उबर बुक केली. त्या ड्रायव्हर ने हसून आमचं स्वागत केलं, विराजचं आणि त्याचं बोलणं झालं.. नॉर्मल ग्रीटिंग्ज.. त्याने आमच्या बॅगा नीट लावल्या. आणि एअरपोर्ट पासून घरापर्यंतचा प्रवास अखेर सुरु झाला.
आम्ही दोघांनी एकमेकांकडे पाहिलं.. खऱ्या अर्थाने सहजीवनाची आता सुरुवात झाली हे मनोमनी जाणवत होतं.
मी खिडकीतून बाहेर पाहिलं. एअरपोर्ट च्या रस्त्यावरून आम्ही जात होतो. सुरुवातीला काहीसा इंडस्ट्रिअल भाग होता.
परदेश कसा आहे हे पाहताना मायदेशाची मला तेव्हा खूप आठवण येत होती. आपल्या देशात आपल्याला परकं कधीच वाटत नाही. याचा अनुभव त्याचक्षणी मला आला. आणि परदेश म्हणजे काय हे सुद्धा त्याचक्षणी मला जाणवलं. खूप लांब आले आहे सगळ्या माणसांच्या घोळक्यापासून असा विचार माझ्याही नकळत मी करत होते.पण मनातलं सगळं जाणणारा साथीदार सोबत होता त्यामुळे इथे रुळायला कमी वेळ लागला. हे त्याच्या शिवाय कधीच शक्य नव्हत.
आपल्या एखाद्या गोष्टीपासून लांब गेल्यावर त्या गोष्टीची अधिक आठवण येते अगदी त्याचप्रमाणे मला घरच्यांची ...देशाची सारखी आठवण येत होती.
एअरपोर्ट जवळचा इंडस्ट्रिअल भाग आता आम्ही सोडला होता आणि सिएटलच्या डाउनटाऊनच्या दिशेने आमची उबर जात होती.
तेव्हा बाहेरचा परिसर पाहताना भर दुपारच्या उन्हात एका भल्यामोठ्या आकाशपाळण्याकडे आणि समुद्राकडे लक्ष गेलं.
तो भलामोठा आकाशपाळणा म्हणजेच 'ग्रेट व्हील'. पर्यटकांच विशेष आकर्षण.
![]() |
| याची उंची १७५ फीट इतकी आहे. अमेरिकेच्या वेस्ट कोस्ट मधला हा सगळ्यात उंच आकाशपाळणा |
आणि त्या नितांत सुंदर निसर्गाला मी मनोमनी नमस्कार केला. तो आकाशपाळणा माझं सिएटल मध्ये स्वागतच करतोय असं वाटून गेलं आणि अचानक माझ्या चेहऱ्यावर हसू आलं....... मी मनातल्या मनात थँक्यू म्हंटल.
त्या आकाशपाळण्याचा विचार मनात चालू असताना काही क्षणातचं आम्ही घरापाशी पोहोचलो. बिल्डिंग खाली गाडी उभी केली. त्या ड्रायव्हर ने सगळ्या बॅगा काढून दिल्या. गाडीतून उतरलो.
खरं सांगू तर, सिऍटल मध्ये पहिलं पाऊल ठेवल्यानंतरचा प्रसंग सुद्धा आजही जसाच्या तसा लक्षात आहे. या नव्या देशातलं पहिलं पाऊल. प्रचंड ऊन होतं. गाडीतून उतरल्या उतरल्या माझे डोळे अक्षरशः मिचकले.. समोर नीट पाहता सुद्धा येऊ नये इतका प्रखर प्रकाश डोळ्यावर आला. आणि देहाला नकळत जाणवत होती ती घरापासून जवळच असलेल्या समुद्रावरची थंडगार हवा. हा माझा सिऍटल मध्ये उतरल्यावर लक्षात राहिलेला प्रसंग.
त्यानंतर आम्ही आमच्या जड बॅगा घेतल्या आणि बिल्डिंग मध्ये प्रवेश केला. अगदी बिल्डिंग मध्ये प्रवेश करतानाच मला एक नवी पद्धत समजली इथे बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या रहिवाशांसाठी 'गेटेड एंट्री' असते. ती चिप असलेली व्यक्तीच बिल्डिंगमध्ये प्रवेश करू शकते अर्थात रहिवासी ... आता भारतात सुद्धा अनेक ठिकाणी ही पद्धत असते.. फक्त त्याचे प्रकार वेगळे असतात.
तर... आम्ही बिल्डिंग मध्ये प्रवेश केला. एखाद्या आलिशान हॉटेल चा आवार जसा असतो तसचं सगळं दिसत होतं. आम्ही लिफ्टपाशी उभे होतो. लिफ्ट समोर उभं न राहता त्याच्या बाजूला उभं राहून ... मग प्रवेश करण्याची सवय मला इथे आल्यावर लागली. ही पद्धत नव्याने समजली आणि आवडली सुद्धा.
धन्यवाद !!
पुढचा भाग जरा खास असणार आहे.. कारण त्यात मी जेटलॅग या माझ्या अनुभवाविषयी तर लिहिणार आहेच. आणि सोबत आहे एक सरप्राईज .. त्याची थोडी हिंट देते. मार्च महिन्याच्या दुसऱ्या रविवारी डे लाईट टायमिंग बदललं होतं.. थोडक्यात घड्याळ बदललं होतं. आणि आता ते नोव्हेंबर च्या पहिल्या रविवारी पुन्हा स्टॅंडर्ड टायमिंग ला पूर्ववत होणार आहे. तर यात काय गम्मत असते.. हा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे.. वेळ बदलतानाचा व्हिडीओ सुद्धा शेअर करणार आहे.
त्यामुळे पुढचा भाग नक्की वाचा.
जाता जाता ... आजचा प्रश्न
मी आकाशपाळणा असतो/असते तर... ?
किंवा
लक्षात राहिलेला आकाशपाळण्यात बसण्याचा अनुभव फक्त १ शब्दांत
किंवा एका वाक्यांत
किंवा एका वाक्यांत
तुम्ही तुमचा अनुभव कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता किंवा मला मेल करू शकता.
gmkashelkar@gmail.com
वाचकांचे अभिप्राय- भाग १
'अनोळखी, अपरिचित आणि नवीन' अशा मिश्र भावनांचा प्रवास करताना तुम्हाला कधी अनुभव आला आहे का?
(ठाणे)स्वाती भट- लंडनला तिला अनोळखी वाटलं होतं.
(रत्नागिरी)अभिषेक काटदरे- सिक्कीम आणि दार्जिलिंग या ठिकाणी असा अनुभव आला.

Us madhe florida ani orlando galo hoto tikade chan anubhav ale mast majja ali mazaya mula maza ani abhijit yache pahila pardeshi parvas
ReplyDeleteExcited hoto tai airport ali hote ti jaam anandat hoti apalya mabasa na bheta ya annand vagala