Saturday, November 25, 2017

इन्स्टंट ढोकळा आणि मूगभजी - 'शरा फुड्स'

नमस्कार वाचक मंडळी,
आपण मागच्या महिन्यात 'शरा फुड्स' यांच्या विषयी जाणून घेतलं होतं. आणि त्याला निमित्त होतं ते दिवाळी नंतर पुन्हा एकदा झटपट लाडू आपण कसे करू शकतो यासाठीचं. पण मला सांगा, आपण मागच्या ब्लॉग मध्ये जसं बोललो की, घरी कोणी कधी पटकन आलं किंवा आपल्याला भूक लागली तर घरी केलेले हे लाडू बाहेरच्या पिझ्झा- बर्गर पेक्षा कधीही चांगले. 

पण तुम्हाला गंमत माहितेय का? 
हा ब्लॉग वाचकांपर्यंत पोहोचल्यावर त्यांना हा ब्लॉग आवडला, शरा फुड्स चा ब्रँड सुद्धा आवडला. अनेकांनी लाडू करून सुद्धा पाहिले. मेल ला अनेक वाचकांचा चांगला रिप्लाय  सुद्धा आला. सगळचं लाडवासारखं गोड गोड होतं. 
पण मग काही वाचकांनी जेव्हा मला बोलता बोलता सांगितलं की, 'अगं, लाडू वगैरे सगळं ठीक आहे गं. पण आमच्या  घरी कोणालाच गोड आवडत नाही. माझा मुलगा तर लाडवाकडे पाहात सुद्धा नाही. त्याला सगळचं तिखट आणि स्पायसी वगैरे आवडतं.' 
अशाप्रकारे एक दोन वाचकांनी त्यांची खंत वजा तक्रार माझ्याकडे केली.
खरतरं त्यांच्यासाठी ती तक्रार आणि खंत होती पण माझ्यासाठी मात्र तो एक उत्तम अभिप्राय ठरला. हा अभिप्राय सगळ्यात अधिक लक्षात राहिला. कारण  गोड आवडत नाही हे समीकरण अनेक घरी असूच शकतं ही गोष्ट मला मनोमनी पटली. आणि म्हणूनच 'शरा फुड्स' च्या डायरेक्टर शलाका राऊत यांच्याकडे हा अभिप्राय मी बोलून दाखवला. आणि म्हणतात ना, 'जे होतं ते खरचं चांगल्यासाठी'. माझ्या वाचकांनी त्यांचं खरं मत व्यक्त केल्यामुळे मला अजून त्यांच्यासाठी माहितीपूर्ण असं  काहीतरी लिहिण्याची प्रामाणिक संधी त्यांनीच मला दिली. कारण  शलाका मॅडम आणि माझी  घाईघाईत भेट झाली होती आणि दिवाळी दरम्यान  त्यांच्या इन्स्टंट लाडू विषयी उत्सुकता निर्माण झाली आणि मी त्याविषयी लिहिलं. आणि नंतर मात्र या अभिप्रायानंतर आम्ही भेटलो आणि मला त्यांच्या इतर अनेक पदार्थांविषयी समजलं. या भेटीमुळे मला एक खात्री झाली की, माझ्या ज्या वाचकाने मला सांगितलं कि लाडूची कल्पना छान आहे पण घरी  कोणालाच आवडत नाही  यावरून अशा गोड अजिबात न आवडणाऱ्या अनेकांसाठी त्यांचे तिखट आणि चमचमीत असे खास इन्स्टंट  पदार्थ कसे आहेत याविषयी माहिती पोहोचवण्याचा विचार मनात आला.

तिखट आणि चमचमीत पदार्थांमध्ये जर आपल्याला झटपट नाश्ता तयार करायचा असेल तर आपण ढोकळा नक्कीच करू शकतो. 


त्यांनी या प्रॉडक्टवर ती कृती दिलेली आहे त्यापद्धतीने जर आपण हा ढोकळा केला तर सर्वात आधी तर तो अतिशय मऊ होतो. ढोकळा, मेदुवडा यांसारख्या पदार्थांमध्ये त्याच्या पूर्वतयारीतले घटकपदार्थ आणि त्याचं योग्य प्रमाण या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. आणि जरा वेळखाऊ असल्यामुळे करायचा थोडा कंटाळा येतो. त्यामुळे ढोकळा आवडत असूनसुद्धा तो सर्रास
केला जात नाही. पण जर पूर्वतयारीच सोपी झाली तर मात्र आपण हा ढोकळा चवीचवीने खाऊ शकतो. 


या पदार्थाच्या पूर्व तयारीची सोय शरा फुड्स यांनी केलेली आहे. त्यामुळे आता चमचमीत चव आणि पटकन तयार होऊ शकणारा हा ढोकळा झटपट नाश्त्याचा एक उत्तम पर्याय होऊ शकतो.





खरं पाहता, नाश्ता म्हंटल कि आजकाल तो आपण  सगळेच जरा घाई घाईत करतो. मग एखाद्या रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी मात्र जरा शांतपणे मस्त चमचमीत ब्रेकफास्ट करायची इच्छा होते. सुट्टीच्या दिवशीचा फॅमिली ब्रेकफास्ट जसा इन्स्टंट ढोकळा ठरू शकतो त्याचप्रमाणे इन्स्टंट मुगभजी सुद्धा ठरू शकते. 


या भजीची गंमत अशी आहे की, याला सुद्धा व्यवस्थित पूर्वतयारी लागते शिवाय  एवढचं नाही तरं  काहीशा निरीक्षणावरून असं सुद्धा वाटत की, ही भजी सहज सगळीकडे उपलब्ध होतेच असंही नाही. काही ठराविक ठिकाणी आपल्याला  ही खाता येते. आणि ती ठराविक ठिकाणं काहीवेळा अशी असतात कि ती शांतपणे आरामात बसून वगैरे खाणं अजिबात होत नाही. काहीवेळा मूगभजी गाडीवर मिळते त्यामुळे तो पर्याय सुद्धा अनेकांच्या बाबतीत मागे जातो.


वास्तविक, मूग  हे  आरोग्यास अतिशय चांगले पण नेमका हाच पदार्थ खाण्याचा योग कमी येतो. आपल्या सगळ्यांचा भजी खाण्याचा योग मात्र अनेकवेळा आला आहे. पण नेहमी बेसनच त्यात आपण वापरतो. शेवटी चमचमीत होत असली तरी बेसनामुळे शरीराला त्रास होऊ शकतो. इथेच मूगभजी वरचढ ठरते. कारण ती पचायला सोपी असते. 

काय मग विचार बदलला का? आजच मुगभजी करूया असा विचार पटकन वाचता वाचता मनात येऊन गेला का? अहो, तुमच्याच काय..लिहिता लिहिता माझ्याही मनात आला. गरम गरम मुगडाळ भजी खाण्यात एक वेगळीच मजा आहे. आणि जर आपल्याला ही कमी वेळात घराच्या घरी करता आली तर अजूनच धमाल.....मग  मुगडाळ भिजवायची चिंता नाही आणि काही नाही. सोपी सुटसुटीत भजी आपण कधीही खाऊ शकतो.

आणि विशेष म्हणजे आज इन्स्टंट फूड मध्ये काम करणाऱ्या शरा फुड्स या कंपनीने त्याचं प्रत्येक प्रॉडक्ट तयार करताना त्यात पोषण मुल्यांचा विचार केला आहे. शिवाय हे पदार्थ असे आहेत की कधी आपण बाहेर गेलो, कधी ट्रेकिंगला गेलो तरी पटकन तयार करून खाऊ शकतो.


शरा फुड्सच्या अजून एका yummy पदार्थाविषयी लिहिणार आहे...पण पुढच्या ब्लॉगमध्ये....

संपर्क: 
शलाका राऊत ( डायरेक्टर ऑफ शरा फुड्स)
Mb- 9820904315/ 8080633607
consumercare@sharafoods.com
www.sharafoods.com
fb page- @sharafoods

4 comments:

  1. आमच्या जीभेचे चोचले चांगलेच पुरवते आहेस.
    Waiting for your future blog.
    Thanks

    ReplyDelete
  2. Shara foods manchurian is the best
    Also , moong dal bhaji is awesome
    -Varsha utekar

    ReplyDelete