आणि ट्रेन बोलू लागली......
नेहमीप्रमाणे दिवसाची
धावपळीत सुरुवात झाली. पण त्यादिवशीची धावपळ फक्त माझीच होती . बाकी सगळ्यांसाठी तो दिवस सगळ्यांचा आवडता , लाडका असा होता .. अर्थात
रविवार. पण मला माझ्या काही कामानिमित्त रविवार नेहमीच्या वारांप्रमाणेच धावपळीत
घालवण्याच भाग्य त्यादिवशी लाभल होत. भाग्य म्हणण्याच विशेष कारण असं कि
मुंबईकरांसाठी रोजची धावपळ हाच एक व्यायाम असतो जो ते अगदी नियमितपने करतात. आणि त्यामुळे माझा रविवारचा व्यायाम
चुकणार नव्हता हेच केवढे मोठे भाग्य !!
असो...पण माझा दिवस जरी सगळ्यांच्या आधी सुरु
झाला असला तरी रविवार म्हणजे सगळच आरामात असत .नेहमी स्टेशन वर असणारी भयानक गर्दी..
कोणालाही कोणाची नसलेली फिकीर...मी आणि माझी ट्रेन हेच काय ते नात आणि हेच समीकरण आणि
हाच काय तो स्टेशन वरचा आयुष्यभर मनात कोरून ठेवलेला पास. अश्या पद्धतीने
सगळ्यांचा वावर....या दृश्याला त्यादिवशी छोटीशी सुट्टी होती. ट्रेन आली
...शांतपणे चढले ...आणि नेहमीप्रमाणे मोबाईलमध्ये डोक खुपसून बसले. नेहमी ट्रेन
मध्ये असणारी गर्दी नसल्यामुळे आज ट्रेनला बहुतेक चुकल्याचुकल्या सारखे वाटल
असणार....काही वेळाने ट्रेन च माझ्याशी बोलू लागली....
आज गर्दी नाहीये म्हणून मला
तू दिसलीस तरी......ट्रेन थोड हसतच म्हणाली....
मला काही क्षण विश्वासच
बसला नाही....की छे....ट्रेन कशी बोलू शकते...काही काय....मला उगाच भास
होत्यात....असं काहीस मनात घोळत असतानाच ट्रेन ने ओळ्खल आणि म्हणाली , ‘’
अग...इतका विचार का करतेयस ?’’ मी खरच ट्रेन बोलतेय .....आणि साहजिक आहे ग...तुला
असं काहीस वाटण पण मी एरवी काही बोलले तर बाकी गर्दीत माझा आवाज येतोय कुणाला ऐकू
?? ट्रेन हे सुद्धा हसत म्हणाली...
आता मला थोड नाही जरा
जास्तच आश्चर्य वाटल...ट्रेन ला आम्ही प्रवासी इतकी नाव ठेवतो...साध काही एक दोन
मिनिट तिला यायला मागे पुढे झाली की तिच्यावरच राग काढतो...साध नुकतच वेळापत्रक
बदललं तरीसुद्धा राग राग करतो....कधी बसायला मिळाल नाही किंवा सिग्नल लागला , पंखे
चालत नसतील तरी तिलाच बोलतो....एकूणच काय तर तिला बोलायची तशी एकही संधी आम्ही
कोणीच सोडत नाही पण तरी ती आमच्याशी किती हसून , आनंदाने बोलते.....
तिच्या या अश्या स्वागतार्ह
बोलण्यामुळे मला ट्रेन शीच ट्रेन मध्ये गप्पा माराव्याश्या वाटण आता अगदीच साहजिक
आहे यात काही नवल नाही.....नाही का ??
तर अशी झाली आमच्या
गप्पांची सुरुवात.......
मग तिला सुद्धा माझ्याशी
बोलावस वाटल कारण माझा काहीसा विश्वास बसलाय हे तिच्या लक्षात आल. आणि कोणतेही
आढेवेढे ण घेता किंवा औपाराचारीकता ण ठेवता तिने बोलायला सुरुवात केली....
“ शेवटी कस असत ना ...सगळ
काही विश्वासावर च चालत असतं..आज जर तू माझ्यावर विश्वास ठेवला नसतास तर मला तुझ्याशी
सगळ्यांची प्रवासी प्रतिनिधी म्हणून ज्या गप्पा मारायच्या आहेत त्या मारताच आल्या
नसत्या......
माझं मान डोलावण पाहून तीच
पुढे बोलत होती....
तुला खर सांगू का ?....मला
ट्रेन असल्याचा अभिमान आहे. कारण आज माझी अनेकांना गरज आहे. आज अनेकांना त्यांच्या
कर्मभूमी पर्यंत नेण्याचं काम मी रोज नियमितपणे करते. पण हो....मला माझ्या या
लाडक्या प्रवाश्यांच थोड वाईट सुद्धा वाटत कि वर्षातले काही दिवस माझ काही
बिनसलं....मी वेळेवर नाही पोचू शकले तर माझी कीव कोणीच करत नाही. शिवाय आज
कर्मभूमी पर्यंत येतात जातात....पण पासाच्या रांगेत उभे राहून मला दोन पैसे देताना
मात्र चिडतात...भांडतात...सुखाने पास कधीच काढत नाही....
माझा तेव्हा पडलेला चेहरा
पाहून ट्रेनलाच वाईट वाटल आणि लगेच म्हणाली....” अग वेडे , पण मी तक्रार अजिबात
करत नाहीये....
तेव्हा मी तिला
म्हंटल....कि अग हो ...पण तरी आम्ही रांगेत उभे राहतो तो तुझ्यावर राग म्हणून
नाही....पास काढताना तुझ्यावर राग का असेल...?
अग राणी....पण तिकीट घर
सुद्धा माझ घरच झाल कि....माझ्या घरात भांडण झालेली मला आवडतील का ? नाही
ना.....मग ??? आणि कस आहे ...आम्ही निर्जीव म्हणून आम्ही कोणीच नाही असा समाज दूर
होईल ना तेव्हा त्याचा फायदा तुम्हालाच होईल.
म्हणजे ?? काय बोलतेयस अग ?
मी गोंधळून विचारल.
अग , तुमच काय होत माहितेय
का ...तुम्ही आहे त्या गोष्टीला तसच्यातस स्वीकारत नाही. त्यात चुका काढत
बसता...असच नाही ..तसच असत तर बर झाल असत वगेरे...पण अर्थात सगळे असे नसतात.असं
काहींच्याच बाबतीत होत. पण तरी....आणि तुम्ही जर प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मकतेने
पाहिलं ना कि दिवसाची सुरुवात पण छान होते...आणि मुळात सकारात्मक च राहील पाहिजे
की....
हो...म्हणजे आमचा राग
तुझ्यावर निघणार नाही...म्हणून म्हणतेयस ना ??....मी खट्याळ स्वरात म्ह्टल.
आणि ती सुद्धा अगदी खळखळून
हसू लागली....जस खूप वर्षांनी जुनी मैत्रीण भेटली आहे . आणि अनेक वर्षांच्या गप्पा
राहिल्या आहेत....
आमच्या गप्पांना आता मस्त
रंग चढला होता......
मी खूप उत्सुकतेने
विचारलं...तुझ्यासाठी खास अशी आठवण कोणती आहे ??
अरे बापरे...खूपच कठीण आहे
प्रश्न खरतर....अनेक आठवणी आहेत...म्हणजे जेव्हा माझा जन्म झाला...९ डबा, बारा
डबा, आणि आता १५ डबा अशी माझी प्रगती झाली. नवीन गाड्या आल्या आहेत...नवीन पंखे...या
सगळ्याच मस्त आठवणी आहेत.
पण खर सांगू....हे माझे
लाडके प्रवासी जेव्हा माझ्यासोबत सण साजरे करतात, वाढदिवस म्हणा, भोंडले म्हणा,
सकाळची आरती म्हणा...एखाद देवूळ लागल कि सगळे एकत्र हात जोडतात... या आठवणी जास्त
छान असतात. माझेच प्रवासी मला कधीच एकट वाटू देत नाहीत.
ट्रेन मध्ये बोलता बोलता
थांबली......
मला कळलंच नाही.अग काय झाल?
अग कशाला काय होईल...तुला
उतरायचं आहे...या पुढे गाडी जात नाही. आल सीएसटी....
अरे...आल सुद्धा स्टेशन ?
अग पण आपल्या बऱ्याच गप्पा राहिल्या आहेत. कारण खर सांगू...तुझ्याकडून खूप काही
शिकण्यासारख आहे.
अग....बस काय आता.....एवढी
कठीण भाषा नाही समजत मला...
पण असो...भेटू पुन्हा...!!
मी उतरले...हसून तिला bye
केल...खरतर ट्रेनला च....कोण काय म्हणेल..याचा विचार कारावासाच वाटला नाही....
जाता जाता एकच वाटल.....या
निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत सकारात्मक अर्थ दडला आहे....हा अर्थ प्रत्येक
ठिकाणी शोधूया...जपूया.
पुढे या नवीन ट्रेन
मित्रीणीशी गप्पा होतीलच....
No comments:
Post a Comment