चला दिवस वाचूया....
aaingggg.......'चला दिवस वाचूया'....हा काय प्रकार आहे ? ही काय भानगड आहे रे देवा.... , दिवस येतो न जातो...तो वाचायचा कसा ? आत्तापर्यंत पुस्तकवाचन माहित होत...फारफार तर माणसं वाचता आली पाहिजेत हे सुद्धा माहित आहे ...पण दिवस वाचायचा म्हणजे नक्की काय म्हणायचंय या मुलीला असा प्रश्न तुमच्या मनात आला असेलच...या प्रश्नच उत्तर अगदी सोप . जे खरतर तुमच्याकडेच आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांकडे. फक्त असा गमतीशीर प्रश्न टाकण्याची गरज होती इतकच. असो....विषयांतर नको.
मुद्दा हा आणि असा कि , २४ तासाचा दिवस सगळ्यांना मिळतो. पण आपण जर तो रात्री झोपताना एकदा वाचला तर ? खूप मजा येते. करून बघा. म्हणजे करायचं इतकच की गेलेला संपूर्ण दिवस आठवून बघायचा. दिवसभरात आवडलेल्या गोष्टी , शिकण्यासारख्या घटना काही प्रसंग अगदी काहीही असेल पण महत्वाच इतकच की ते आपल्या मनाच्या गुड बुक्स मध्ये save करून टाकायचं. आणि नावडत्या घटना सुद्धा काही कारण मधून घडल्या असतील ...माझ्याच चांगल्यासाठी असतील असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं. एकदम सिंपल फंडा !!
नव्या दिवसासाठी नवं काहीतरी.......करून बघूया.

लहानपणी शाळेपासूनच आपल्याला सवय असते दैनंदिनी लिहिण्याची. आपण अनेकवेळा म्हणतोसुद्धा की दैनंदिनी / रोजनिशी लिहायला पाहिजे. पण ते काही फारस जमत नाही. किंवा आपण असं म्हणू कि ते जमूनच येत नाही. त्याचा श्रीगणेशा फक्त 'करायला पाहिजे ', 'लिहायला पाहिजे' या कल्पनेतच राहतो.
म्हणून जरा विचार केला की बदलत्या काळाप्रमाणे मनातली स्वतःची , स्वतःशी संवाद साधणारी , दिवस वाचणारी दैनंदिनी असली तर....?? तर या सोप्या आणि उत्तम गोष्टीचा आणि मागे पडलेल्या चांगल्या सवईचा श्रीगणेशा व्हायला नक्कीच वेळ लागणार नाही....नव्या दिवसासाठी नवं काहीतरी.......करून बघूया.
SUNDAR BLOG. GAYATRI TU SUNDAR LIHITES !! TU SATATYANE ROJ LIHIT RAHA.
ReplyDelete