Wednesday, December 2, 2015

असाही एक प्रवास !!

     
असाही एक प्रवास !!

       पुण्यावरून येतानाचा परतीचा प्रवास करत होते. एक क्षण डोळे मिटले तेव्हा सगळा प्रवास आणि पुण्यातली एक दिवसाची मजा झटाझट आठवत गेली पण तरी त्यात एक शांतता होती. तेव्हा क्षणभर विचार केला की एका दिवसात इतका धुडगूस घातला , मजा केली , काही भेटी गाठी झाल्या ...इतक सगळ पटापट ठरलं अन  जाऊन पण आले. म्हणजे सगळच घाईघाईत पण तरी इतक शांत वाटावं. क्या बात !! या शांततेच श्रेय कदाचित पुण्याच्या वातावरणालाच द्याव लागेल. आणि एकूणच lifestyle ला.......
 यासोबतच अनोळखी ठिकाणी जाताना आपल्याला कोणीच ओळखत नसत त्यामुळे नकळत आपण स्वतःच्या धुंदीतच असतो....
     तीच स्वतःमध्ये रमवणारी धुंदी , कधी कधी वेड्यासारखे येणारे बालिश झटके, अगदी छोट्यातल्या छोट्या किंवा फार काही खास नसलेल्या जोक वर सुद्धा भरभरून हसण, एकमेकांची नक्कल , हक्काने त्रास देण, आवडणारी खादाडी करण, भटकण , गाता येत असो नसो पण time पास म्हणून गम्मत म्हणून गाणी गाण आणि एवढच नाही तर लगेचच ती रेकोर्ड करण आणि लगेचच ती ऐकण ....असा अगदी हवा तसा वेडसरपणा करून खरच शांत वाटत...कारण आपल्यातलं लहान मुल अशावेळी अचानक जन्म घेत आणि आपल्याला refresh करत जात.
        अशा पद्धतीने फ्रेश होण्यातही एक वेगळा अनुभव आहे. रस्ता जातोय तसं भटकत राहण आणि रस्ता चुकलोय हे कळल्यावर अजिबात दुखः न होण....याउलट अरे वाह ! बरच झाल . जरा अजून फिरता येईल अस म्हणून परत चालत राहण. आता कोणत्या गल्लीत जाऊया....म्हणजे कुठे पोचू...आपण कुठून आलो होतो...हो बरोबर ...आपण आत्ता इथूनच वळलो होतो. अशी स्मरणशक्तीला जरा चालना देत देत   finally मुख्य रस्त्याला लागलो की अचानक चालूच असणार्या गप्पांमधून एक pause घेऊन रस्ता मिळाल्याचा आनंद व्यक्त करून...पुन्हा back to गप्पा....अशी सरमिसळ नकळत मनाला उत्साही करत राहते. मग तो प्रवास काही दिवसांचा असो किंवा काही क्षणांचा . refresh करणारा असतो एवढ नक्की.
          या सगळ्यामध्ये जास्त भर असते ती  आपल्यातल्या  लहान मुलाची. रस्त्यावर छोटासा  दगड दिसला तर  साधारणतः त्याला काहीच महत्व नसत. पण कितीही वयाने मोठ झालो तरी लहान मुलासारखी धमाल करायची असेलच तर हा छोटासा दगड सुद्धा पुरतो. एका पायाने पुढे ढकलायचा. मग दुसर्याने. अस करत करत संपूर्ण रस्ता तुम्ही आणि खेळायला घेतलेला दगड. तुमचा सहप्रवासी !!
          आपणच शोधून काढलेला हा दगडासोबतचा नवीन गेम खेळताना स्वतःमध्ये आपण रमलेलो असताना जरी कोणी पाहिलं...आणि मनात म्हंटलं कि काय वेड्या मुली आहेत ? तरी त्याक्षणी कोणाला काय वाटत हे अजिबात महत्वाच नसत. आपण कशाततरी रमलेलो असतो...आणि आपण आपल्याच बालिश , निरागस , किंवा वेडसर वागण्याची मजा घेत असतो.....आणि नकळत स्वतःला ताजतवान करत जात असतो.
          त्यामुळे असं वाटत की खरच  हीच ताकद असते कोणत्याही प्रवासात ...मग तो अगदी १० मिनिटांचा असेल किंवा १० तासांचा . आपण आपल्याच प्रवासाचे सहप्रवासी कसे बनतोय ..यावरच सगळ अवलंबून असत. आणि अशा पद्धतीने प्रवास जगताना क्षणचित्रांचा अल्बम मनात आपोआप तयार होतो. एवढच कशाला परतीचा प्रवास झाल्यावर क्षणभर  बंद केलेले डोळे  उघडताना एका क्षणात प्रवास वर्णन उभ राहत आणि आपण नकळत ते आठवणीच्या कप्प्यात save करत जातो .....
         तुमच्या आठवणीच्या कप्प्यात तुम्ही सुद्धा असा प्रवास save केला असेल  , कधीही delete न होणारा प्रवास...
मी आठवून पहिला....तुम्ही सुद्धा आठवून बघा.

     
       
         

6 comments:

  1. PRAVASCHA ANUBHAV GAYATRI TU CHHAN VARNAN KELA AHES. LEKHANACHI TUJHI HATOTI SUNDAR AHE ! TUJHA PRAVAS DOLYANSAMOR UBHA RAHATO. TU ASHICH LIHIT RAHA !!

    ReplyDelete
  2. हा वेडसरपणा असाच कायम राहू दे.

    ReplyDelete
  3. Nice thought provoking article..though written in an easy paced simplistic non-assuming style...Explores ones thinking process & goes on to touch the child in you-which is the source of real joy!The allegory of the functionality of the human mind with functions of the modern Computer is also an interesting application of concept.

    ReplyDelete