Monday, July 11, 2016

स्वयंपाकघराचा नवा चेहरा ....


स्वयंपाकघराचा नवा चेहरा ...

  
     आजकाल अनेकवेळा आपण युवा पिढीकडून ऐकत असतो की त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यात, करियरमध्ये काहीतरी वेगळ करियर करायचं असत. नोकरी, व्यवसाय करताना सुद्धा ते नवीन नवीन कल्पनांचा शोध घेत असतात. कारण काहीतरी हटके, भन्नाट आणि समाधान देणारं करियर करणारी आजची युवा पिढी आहे असं म्हणायला काहीच हरकत नाही. असाच एक करियरचा वेगळा रस्ता निवडला आहे श्रुती जोशी या युवा उद्योजीकेने.
    स्टेनलेसस्टील, हिंडालियम भांड्यांच्या काळात पुन्हा एकदा पूर्वीच्या मातीच्या भांड्यांची निर्मिती करून रोजच्या वापरात आणण्याची मूळ संकल्पना ही गुजरात येथील मनसुखभाई प्रजापती यांची आहे. त्यांच्या या संकल्पनेला हातभार लावण्याचं महत्त्वाच काम सध्या श्रुती या नव्या व्यवसायाच्या वाटेने करत आहे. “मृदगंध” उपक्रमांतर्गत तिने ही मातीची भांडी विकण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यामुळे मनसुखभाई प्रजापती यांची “मिट्टीकूल” प्रोडकट्सची कल्पना आता फक्त गुजरातपर्यंत मर्यादित राहिलेली नाही. संपूर्ण मुंबई मध्ये मिट्टीकूल प्रोडकट्स विकणारी ती एक authorised distributor आहे.
   त्यामुळे आता पुन्हा एकदा मुंबईकरांच्या स्वयंपाकघरात मातीची भांडी दिसू लागतील. कारण मातीच्या भांड्यांच महत्त्व इतर भांड्याच्या तुलनेत आजही तसूभर सुद्धा कमी झालेलं नाही. फक्त नव्याने पुन्हा ती भांडी वापरण्याची सवय होण्याची गरज आहे. कारण मातीच्या भांड्यांमुळे जेवणाला येणारी वेगळी चव आणि त्यामुळे होणारी एक अनोखी खवय्येगिरी हे याच खास वैशिष्ट्य तर आहेच पण शिवाय मातीमध्ये असणारे सगळे गुणधर्म अन्नात मिसळल्यामुळे आरोग्याला उपयुक्त ठरणारी ही मातीची भांडी आहेत. तसच अनेक आजारांच प्रमाणसुद्धा  यामुळे कमी होऊ शकत.
एवढच नाही तर आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याला आपण मातीच्या भांड्यांमध्ये जेवू खाऊ घातलं तर एका वेगळ्या पद्धतीने स्वागत केल्याची मजा सुद्धा अनुभवता येऊ शकते. त्यामुळे आता modern kitchen मध्ये हा मातीच्या भांड्यांचा नवा लुक एकदा पाहायला काहीच हरकत नाही.

विशेष आकर्षण : मातीचा फ्रीज ( विजेची पूर्ण बचत )



Contact details
Shruti Joshi
Mrudgandh

Mobile No-9920721327/8983057517

Designation:-Authorized Distributor of Mitticool Products for Mumbai region.

Digital Minds
Gayatri Kashelkar
Content writer-developer.

1 comment: