रंगू दे श्रावण.....जरा हटके....
श्रावण महिना आता अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. खरतरं या महिन्याची
गंमत जरा निराळीच आहे. सुरु होण्याआधीच वातावरणात ते जाणवू लागलय...म्हणजे
थोडक्यात सांगायचं तर सणांची होणारी बरसात आणि त्यासाठी आवश्यक उत्साह आणि एकूणच
तयारी आता हळू हळू दिसू लागली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे हौस-मौज याच pan
card फक्त स्त्री वर्गाकडे असल्याप्रमाणे या महिन्यांमध्ये त्यांची खरेदी चालू
असते. मग ती स्त्री कितीही busy असली तरी सुद्धा विशेष व्यवस्थापन कौशल्य तिला
देवाने दिलेलच आहे. त्यामुळे ऑफिसच काम, घरदार, सगळे सण-वार सांभाळून ती सगळच करत
असते. आणि ही गोष्ट किंवा “ती” ची सगळ नीट करण्याची सवय पूर्वापार चालत आली आहे.
त्यात नवीन असं काही वाटत नाही पण हो कौतुक कायमच आहे. पण या वर्षी सगळ्या महिला
वर्गाला त्याच्या “हौस-मौज” या pancard वर काहीतरी नवीन try करायचं असेल तर
मेहेंदीबद्दल बोललच पाहिजे....
आता तुम्ही म्हणाल कि, श्रावण महिन्यात मेहेंदी तर प्रत्येक स्त्री काढून
घेते. त्यात काय नवीन ? अगदी बरोबर...........पण
विशेष आणि नवीन हेच कि, दरवर्षी आपल्या हातावर पारंपारिक , अरेबिक , इंडोअरेबिक
असेच प्रकार आपणच कितीतरी वेळा पहिले आहेत. पण जर आपल्या हातावर या सगळ्यापेक्षा अगदी
वेगळी आणि कल्पक अशी मेहेंदी असेल तर कोणाला नाही आवडणार ??
पारंपारिक मेहेंदी हातावर काढण्यापेक्षा आपली मराठी परंपराच हातावर रंगवली तर
नक्कीच काहीतरी भन्नाट कल्पना आपल्या हातावर रंगल्याच अनुभव घेता येईल. मग यामध्ये
, नऊवारी साडीतली बाई, जात्यावर दळण दळणारी बाई, शिवाय गोपाळकाला, पाडवा असे सगळेच
सण-उत्सव, विटी दांडू सारखा खेळ, परकर-पोलक घातलेल्या लहान मुली, लावणी सारखी एक अनोखी
परंपरा. झांज वाजवणार पथक अशा मराठमोळ्या संस्कृतीच चित्रण तुम्ही एका संपूर्ण
हातावर पाहू शकता. अर्थातच, मेहेंदीच पुस्तक घेऊन मेहेंदी काढून पूर्ण झाली असं न
होता. तुमच्यासाठी तुम्हाला आवडणारी customized designs बनवणारी एक उत्तम मेहेंदी designer तुमच्या
मेहेंदीला एक अर्थ आणू शकतात.
निर्मिती सावंत, मीरा मोडक, मधुगंधा कुलकर्णी, प्राजक्ता माळी, सोनाली
खरे, अदिती सारंगधर अशा सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकारांच्या हातावर मेहेंदी काढून
स्वतःची खास ओळख ज्यांनी निर्माण केली आहे त्या डोंबिवलीच्या रिया पांचाळ. ज्या
उत्तम मेहेंदी डीझायनर आहेत. मराठी संस्कृतीला मेहेंदीच्या रुपात रंगवण्याची मूळ त्यांची
कल्पना आहे. या संस्कृतींच चित्रण करताना त्यांनी फुगडी खेळणाऱ्या बायकांच्या
चित्रणात थ्री डी effect सुद्धा आणण्याचा प्रयत्न केला आहे. यावर्षी त्या श्रावण
स्पेशल मेहेंदीचे डिझाईन करत आहेत....
नवीन कल्पनांच्या निर्मितीसोबतच त्यांची कला ते दुसऱ्यांना सुद्धा शिकवत
असतात. “प्रवरा आर्ट” या नावाने त्यांचे क्लासेस आणि त्यांची कला प्रसिध्द आहे.
तुम्हाला सुद्धा त्यांच्याकडून ही कला शिकून घ्यायची असेल किंवा या वर्षीची
मेहेंदी सगळ्यांपेक्षा कल्पक आणि अर्थपूर्ण करायची असेल तर रिया पंचाळ यांच्याशी
नक्की संपर्क करू शकता.
रंगू दे .... श्रावण .....यावर्षी.....दणक्यात.....
Contact details --
‘प्रवरा आर्ट’
Riya panchal
Mobile No- 9769719916 / 9167957911
Designation:- Mehendi Designer.
Digital
Minds
Gayatri
Kashelkar
Content
writer-developer.
गायत्री, छान. फोटो पोस्ट केलेस तर...
ReplyDeleteअतिशय सविस्तर माहिती.....
ReplyDeleteढोल-ताशे मेहेंदी स्वरूपात पाहाणे वेगळाच अनुभव असेल......
अतिशय सविस्तर माहिती.....
ReplyDeleteढोल-ताशे मेहेंदी स्वरूपात पाहाणे वेगळाच अनुभव असेल......