sizzle desi -- खास आणि खुसखुशीत गप्पा.
शेफ पराग जोगळेकर यांच्यासोबत मारलेल्या sizzle
desi बद्दलच्या खास आणि
खुसखुशीत गप्पा...
आरजे गायत्री : Sizzle Desi हे हॉटेलचं नावच खूप interesting आहे. या नावामागची काही
गंमत??
शेफ पराग जोगळेकर : हो नक्कीच, माझ्या
मुलीने हे नाव सुचवलं आहे म्हणून अर्थातच ते मला जवळच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे
आमच्या हॉटेलचा USP या नावामध्ये आलेला आहे.
गायत्री : अरे वा !! हा USP अर्थातच, Sizzle
Desi च्या नावाची आणि पदार्थांची खासियत
आम्हाला पण जाणून घ्यायला आवडेल.....
शेफ पराग जोगळेकर: yes. नक्की. Sizzle
Desi चा USP अगदी एका
वाक्यात सांगायचा झाला तर world cuisine with desi touch. Sizzler
plate मध्ये खवय्यांना नेहमी पाहायला मिळेल असा आगळावेगळा देसी टच आपल्याकडे असतो.
गायत्री : सर, हा world cuisine
with desi touch प्रकार ऐकून इतका भन्नाट आणि हटके आहे तर खाताना किती मजा
येईल....आणि या देसी टच मध्ये नेमके कोणते पदार्थ येतात?
शेफ पराग जोगळेकर: हो...खाताना काहीतरी
वेगळ टेस्ट केल्याचा feel प्रत्येकालाच येतो...यात बघ, Paneer grilled
with garlic paper sauce, corn and cheese balls with barbeque sauce, धुवे वाली
बिर्याणी असा जरा वेगळा twist असतो. spanish paella rice या रेसिपीच सुद्धा एक वेगळ preparation या आपल्या
sizzle Desi मध्ये होत असतं. शिवाय अशा बऱ्याच veg पदार्थांसोबतच nov-veg सुद्धा
पदार्थ आहेत.
गायत्री : कमाल !! sizzleres मध्ये इतका
वेगळेपणा असू शकतो याची कल्पनाच नव्हती केली. मग या देसी फीलच्या खवय्येगिरी मध्ये
आपले मराठमोळे पदार्थ पण असतीलच ना?
शेफ पराग जोगळेकर: हो, yes. ते तर अगदी
हमखास....आपल्याकडे उपवासाचे sizzleres, भरल्या वांगीचे sizzleres, पुरणपोळी stuff
with रबडी topped with vanilla ice cream and topped with hot
chocolate sauce.
गायत्री: अफलातून.....पुरणपोळी काय...उपवासाचे पदार्थ
काय...भरली वांगी....म्हणजे आता सीझलर विथ मराठी टच आणि twist म्हणूया.....
शेफ पराग जोगळेकर: आणि हे उपवासाचे पदार्थ
आमच्याकडे चार प्रकारचे आहे....अगदी आपण घरी करतो तसे सगळेच उपवासाचे पदार्थ
आपल्याकडे आहेत....साबुदाण्याची खिचडी,वरी तांदूळ, रताळ्याचा किस, साबुदाणा वडा,बटाट्याची
भाजी, काकडीची कोशिंबीर वगैरे सगळचं...पण जेव्हा हे सगळे पदार्थ sizzling
platter वर येतात तेव्हा तो येणारा चुरर्र......र्रर्र असा आवाज
आणि एक अप्रतिम sizzling effect अनुभवायला आणि खायला
मिळतो. आणि आम्ही मागच्या वर्षी किवी, पायनॅपल,चॉकलेट हे सिझलिंग मोदक सुद्धा केले
होते. एक वेगळा प्रयोग !!
गायत्री: तुमच्या सगळ्याच कल्पना खूपच छान आहेत. हे
उपवासाचे सीझलर्स खायला मी तर येणारच आहे....नेहमी असतो का हा खास बेत?
शेफ पराग जोगळेकर: दर आषाढीला हा बेत असतो
आणि आता १९ तारखेला म्हणजेच चतुर्थीला हा बेत असणार आहे...
गायत्री : अरे वा !! सीझलिंग इफेक्ट सोबत उपवास करायला
आणि या भन्नाट उपवासाच्या पदार्थांवर ताव मारायला नक्कीच मजा येईल....
शेफ पराग जोगळेकर: yes. नक्कीच !!. always
welcome
गायत्री: आणि इथे अतिशय चांगली गोष्ट ही आहे कि
व्यवस्थित गाडीला पार्किंग आहे आणि सर्विस रोड असल्यामुळे शांतता सुद्धा जाणवते.
शेफ पराग जोगळेकर: हो...ते खरयं.
गायत्री: उपवासाचे sizzlers खायला नक्की येणारे....म्हणजे
हं १९ तारखेला...चला येते. bye.
शेफ पराग जोगळेकर: हो नक्की या. yes bye.
sizzle Desi- एक वेगळी आणि हटके खवय्येगिरी.
( पदार्थ ) मूळ संकल्पना : शेफ पराग जोगळेकर.
1,Trishul Apt, Besides
Celebration Hall, Eastern express Highway, service road,Panchpakhadi , Thane
4000602
Hotel no: 022-25339741/51
written by Gayatri
kashelkar.
DigitalMindS’pace
Must plan a visit some time.
ReplyDeleteMust plan a visit some time.
ReplyDeleteSure
DeleteSure
DeleteLooking fwd
ReplyDelete