परदेशी शिक्षण भाग २
नियोजन या विषयावर लिहिलेल्या ब्लॉगमुळे वाचकांना त्याचा खूप फायदा झाला
त्यामुळे या भागात आपण त्यांना तुम्ही देत असलेल्या सगळ्याच सुविधांबद्दल सांगणार
आहोत.
जाणून घेऊया IE ची खासियत......
आर.जे गायत्री: IE (Interedwise Education) या संकल्पनेची सुरुवात
कधी आणि कशी झाली?
रुपाली ठाकूर : आपल्याकडे विद्यार्थी परदेशी शिक्षणाचा विचार करतात पण त्यांना
सगळ्या गोष्टींची माहिती आणि अवेअरनेस नाहीये असं आमच्या लक्षात आलं. कोर्सेसची
माहिती नसते, कसं अप्लाय करायचं हे माहित नसतं. त्यामुळे खरतरं आम्ही Interedwise
Education Pvt Ltd ची स्थापना केली. जेणेकरून आम्ही विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करू
शकू. त्यामुळे आज IE तर्फे मार्गदर्शन घेऊन परदेशात जाताना मुलांना आणि पालकांना
प्रश्न नसतात कारण त्यांना आमच्याकडून तिकडची संपूर्ण माहिती दिली जाते.
आर.जे गायत्री: तुम्ही विसा विषयी मार्गदर्शन करता त्याविषयी आम्हाला सांगा.
रुपाली ठाकूर: सुरुवातीला आम्ही funds balance कसा ठेवता येईल याविषयी
सांगतो. काही देशांमध्ये तीन तर काही ठिकाणी सहा महिने असे फंड्स जाण्यापूर्वीच ठेवावे
लागतात. FD’s, PPF, शैक्षणिक कर्ज(Education loan) कसं घेणार आहेत हे आम्ही
पाहतो. शिवाय प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असतात. मेडिकल फॅसिलिटीज कोणत्या
देशाला काय नेमकं हवं आहे ते पहावं लागतं. कधी कधी देशाचे official
consultant असतात त्यांच्याकडूनच आपल्याला मेडिकल करून घ्यावी लागते या सगळ्या विसाशी
संबंधित गोष्टी असतात. यात देशाचे नियम, आधी किती पैसे deposite करावे लागतील, या
सगळ्या गोष्टी आधी सांगणं गरजेच असतं. आणि अर्थात त्याचं मार्गदर्शन IE तर्फे केलं
जात.
आर.जे गायत्री: देश निवडताना, कोर्स ठरवताना विद्यार्थ्यांना तुमची कशी मदत
होत असते?
रुपाली ठाकूर: आम्ही त्या विद्यार्थ्याची आवड, प्रोफाईल, धेय्य या सगळ्या
गोष्टी जाणून घेतो. अनेकवेळा मुलांच हे निश्चित असतं की आम्ही युके किंवा यूएसलाच
जाणार पण त्यावेळी आम्ही विद्यार्थ्यांना त्यांच्या कोर्सला अनुसरून असणारे इतर योग्य
देश याविषयी सुद्धा आम्ही सांगतो आणि योग्य ते निवडायला मदत आणि मार्गदर्शन
करतो.प्रत्येक देशातला वर्क विसा, भविष्यातल्या संधी, त्यांच्या कोर्सला धरून
कोणते जॉब्स असू शकतात हे आम्ही सांगतो.
आर.जे गायत्री: विद्यार्थ्यांसोबत पालकांना तुम्ही काय मार्गदर्शन करता?
रुपाली ठाकूर: पालकांना आर्थिकदृष्ट्या तयारी करायची असते...म्हणजे अगदी FD
पासून ते Immovable Property पर्यंत सगळ्याच गोष्टी येतात याची त्यांना आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या तयारी
करावी लागते. विद्यार्थ्यांना सगळ्या
प्रकारची कागदपत्रं नीट ठेवावी लागतात, वेगवेगळ्या परीक्षा असतात शिवाय त्याची
तयारी कशी करावी याविषयी आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो..
Contact no: 022-65150555 – MOB: 9820383118
ADD: C-105, 1st Floor, Sai Classic Bldg; 90 Feet Road,
Mulund – 400 081
Email : mulund@ieplcareer.com
URL: www.ieplcareer
ADD: C-105, 1st Floor, Sai Classic Bldg; 90 Feet Road,
Mulund – 400 081
Email : mulund@ieplcareer.com
URL: www.ieplcareer






No comments:
Post a Comment