प्रत्येकजण या जगात आल्यापासून दोन अक्षरी शब्दाशी कायमचा जोडला जातो ते
म्हणजे ‘घर’.
या घराशी प्रत्येकाचं एक वेगळं नातं तयार होत असतं. मग ती जागा लहान
असेल वा मोठी, प्रत्येकासाठी आपलं घर हे खास असतंच. मग त्यात स्वयंपाकघर, हॉल, ती जागा, आजूबाजूचा परिसर, आपल्या घरातली गॅलरी अशा एक
ना अनेक जागा स्वतःपुरत्या तरी नक्कीच विशेष असतात. आणि ज्यात प्रत्येकाच्या काहीना
काही आठवणी सुद्धा असतातच. याला अपवाद कोणीच नाही.
त्यामुळे थोडक्यात काय तर, घर हे ‘खास’च असतं.
त्यामुळे थोडक्यात काय तर, घर हे ‘खास’च असतं.
आता घर खास आहे म्हंटल्यावर काळानुसार आपण त्यात बदल करतो. काही बदल हे फक्त
गरज लक्षात घेऊन केलेले असतात किंवा कधी गरज आणि घराचा एक डौलदार लुक या दोन्ही
गोष्टींसाठी आपण आपल्या घरामध्ये बदल करत असतो. घराचा एक वेगळा बाज येण्यासाठी आपण
घराचं इंटिरियर डिझाईन करण्यावर भर देतो.
मग कधी मॉडयुलर किचन असेल किंवा वेगळ्या
पद्धतीची सिटींग अरेंजमेंट असेल, कधी भारतीय बैठकच असेल पण ती सुद्धा जरा वेगळा
लुक डिझाईन करून असेल शिवाय यासोबत संपूर्ण घराची रंगसंगती हा विषय सुद्धा महत्त्वाचा
त्यामुळे अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही सुद्धा इंटिरियर डिझाईन करून घेतल्या असतीलच.
पण जरा कल्पना करा की,
- तुम्ही ऑफिस वरून घरी परत आल्यावर तुमचं आवडीचं गाणं अपोआप लागलेलं असेल.
- तुम्हाला हव्या त्या वेळी एसी/ पंखे चालू होतील.
- तुमची मुलं घरी एकटी असतात त्यामुळे अर्थातच घराबाहेर पडताना तुम्हाला त्यांची काळजी असते अशावेळी जर नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तुम्ही मोबाईलवर तुमच्या मुलांना पाहू शकलात तर तुमची चिंता मिटेल.
- तुम्ही ऑफिसमध्ये आहात पण घराची सुरक्षा तर महत्त्वाची आहेच अशावेळी आपली व्यक्ती घरी असताना त्यांच्या सुरक्षेची तुम्ही काळजी घेऊ शकता म्हणजेच दारावरची बेल वाजली तर ऑफिस मध्ये बसून तुम्ही दार उघडायचं किंवा उघडायचं नाही यावर नियंत्रण ठेवू शकता.
- तुमच्या मूडप्रमाणे घरातल्या दिव्यांचा प्रभाव कमी जास्त करू शकता.
अशा अनेक गोष्टी आपण आता करू शकतो. म्हणजे ही फक्त कल्पना नाही तर
हे ऑटोमॅटिक घर तुम्ही नक्की करू शकता. ज्याला ‘होम ऑटोमेशन’ म्हणतात.
सध्या अन्न, वस्त्र, निवारा यासोबत इंटरनेट म्हणजेच वायफाय ही चौथी गरज निर्माण
झाली आहे. डिजिटल इंडियाला आपलाही पाठींबा आहेच. पण जर इंटरनेट गरजेच असेल तर विजेची
बचत आणि विजेची निर्मिती या दोन्ही गोष्टी सुद्धा तितक्याच महत्वाच्या आहेत.
यासाठी घरच्या घरी आपण सोलारची (सौरऊर्जा) सोय करू शकतो. त्यामुळे मोठ्या
प्रमाणावर उर्जेची बचत आणि त्यायोगे उर्जेची निर्मिती होत राहील. या सगळ्या ‘घर’
या व्याखेशी जोडणाऱ्या काही नव्या कल्पना आहेत ज्यामुळे आपण आपलं घर इंटेरियर सोबत
आपण स्मार्ट करू शकतो.
याचा फायदा असा कि, हे स्मार्ट होम तुम्ही नवीनच घरात करायला हवं असं अजिबात
नाही तर अगदी आहे त्या घरालाच या स्मार्ट होमने जरा वेगळा आणि हटके असा लूक तुम्ही
आणू शकता. म्हणजे स्वतःच्या आवडीप्रमाणे तयार केलेलं तुमचं हक्काचं घर अजूनच खुलून
दिसेल. याला आपण अगदी पर्सनलाईज किंवा कस्टमाइज होम म्हंटलं तरी अतिशोयोक्ती ठरणार
नाही.
‘मी मला हवं त्याप्रमाणे माझं घर सजवलं आहे’ ही भावना तुमच्या मनात येणार हे
नक्की. कारण यामध्ये सगळ्यात मोठा आणि आताच्या काळातला महत्वाचा प्रश्न म्हणजे
सुरक्षेचा. जेव्हा तुमचं घर हे स्मार्ट पद्धतीने सजलेलं असेल तेव्हा घराच्या बाहेर
असतानाही तुम्ही घरावर नीट लक्ष ठेवू शकाल.
जाता जाता थोडक्यात स्मार्ट होम्स विषयी माहिती देणाऱ्या आणि सुनियोजित घरं
बांधणाऱ्या या कंपनीविषयीची माहिती-
(वरील फोटो हे याच कंपनीने केलेल्या इंटेरियर डीझाइनचे आहेत.)
“एम.आर.कशेळकर अॅंड कंपनी” ही आर्किटेक्चरल फर्म डोंबिवलीमध्ये गेली ३५ वर्ष कार्यरत आहे. आर्किटेक्ट माधव कशेळकर यांनी या कंपनीची सुरुवात केली.
(वरील फोटो हे याच कंपनीने केलेल्या इंटेरियर डीझाइनचे आहेत.)
“एम.आर.कशेळकर अॅंड कंपनी” ही आर्किटेक्चरल फर्म डोंबिवलीमध्ये गेली ३५ वर्ष कार्यरत आहे. आर्किटेक्ट माधव कशेळकर यांनी या कंपनीची सुरुवात केली.
डिझाइन हा हातखंडा असलेल्या
या कंपनीने डोंबिवली, पनवेल, चेंबूर, पंढरपूर, अलिबाग ते अगदी राजस्थान पर्यंत
स्थापत्य प्रकल्प त्यांच्या डिझाईनच्या वैशिष्ट्याने पूर्ण केले आहेत. हॉटेल्स,
कारखाने, शाळा, कॉलेज, बंगले, फार्म हाउस, हॉस्पिटल आणि अनेकविध मंदिर त्यांनी
बांधली. आणि विशेषतः त्यांचे सर्व प्रकल्प हे वास्तुशात्राचा विचार करून पूर्ण झालेले आहेत.
नवीन पिढीच्या येण्यामुळे आता या कंपनीला आणखीन एका संकल्पनेची मजबूत साथ मिळाली आहे. मास्टर्स इन आर्किटेक्ट असलेला कौस्तुभ कशेळकर याने या कंपनीला नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने नवीन संकल्पनांशी जोडले आहे. शिवाय “इनसाइड स्टोरी” म्हणजेच इंटिरियरचे अनेक प्रकल्प त्याने त्याच्या अनोख्या शैलीने पूर्ण केले. याविषयी बोलताना कौस्तुभ कशेळकर म्हणाले, “घराला मनासारखं सजवून प्रोजेक्ट पूर्ण करून निघताना आणि हातात चावी देताना कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून हे निश्चित लक्षात येते की पवई हिरानंदानी पासून मुंबईतल्या वेगवेगळ्या भागात “इनसाइड स्टोरी” ने स्वतःची वेगळी छाप उमटवली आहे."
त्यामुळे “एम.आर.कशेळकर अॅंड कंपनी” व “इनसाइड स्टोरी” दांडगा अनुभव आणि
कौशल्य या जोरावर गेली अनेक वर्ष सुनियोजित व सुरेखीत वास्तूत राहण्याचा आनंद अनेकांना
देत आहेत.
तुम्हालाही सुनियोजित, सुरेखीत वास्तूत राहायची इच्छा आहे?
आहे त्यात घराला स्मार्ट होम मध्ये बदलायचं आहे?
नवीन घर घेतलं आहे पण तुम्ही तुमच्या विचाराने काही करण्याचं निश्चित केलं असेल पण कोणाच्यातरी सल्ल्याची गरज आहे?
तुम्हाला तुमचं घर वास्तूप्रमाणे निटसं करायचं आहे?
अशा अनेक प्रश्नांसाठी “एम.आर.कशेळकर अॅंड कंपनी” व “इनसाइड स्टोरी” नक्की तुमच्यासोबत असेल.
आहे त्यात घराला स्मार्ट होम मध्ये बदलायचं आहे?
नवीन घर घेतलं आहे पण तुम्ही तुमच्या विचाराने काही करण्याचं निश्चित केलं असेल पण कोणाच्यातरी सल्ल्याची गरज आहे?
तुम्हाला तुमचं घर वास्तूप्रमाणे निटसं करायचं आहे?
अशा अनेक प्रश्नांसाठी “एम.आर.कशेळकर अॅंड कंपनी” व “इनसाइड स्टोरी” नक्की तुमच्यासोबत असेल.
Contact
Architect Kaustubh Kashelkar
(M.Arch)
(M.Arch)
9920951511













No comments:
Post a Comment