Saturday, March 18, 2017

मिट्टीकुल

हाय फ्रेंड्स, 
आज या ब्लॉगची सुरुवात जरा वेगळ्या पद्धतीने करायची आहे. 
 मी तुम्हाला काही प्रश्न विचारतेय. तुम्ही वाचता वाचता मनातल्या मनात त्याची उत्तर द्या.
 तर, पहिला प्रश्न असा की, तुम्ही तुमच्या घरी काही ना काही  नवीन बदल करत असता का?
 यात खास करून तुम्हाला स्वयंपाकघराचा (किचनचा) लुक  बदलण्याची इच्छा आहे का?
तुम्ही तुमचं आरोग्य नीट रहावं यासाठी दररोज व्यायाम किंवा कोणती ना कोणती activity करता का? उदा. रोज सायकलिंग, व्यायाम, योगासने, डाएट, रोजचे चालणे वगेरे वगेरे....
आता तुम्ही म्हणाल की, हे सगळे प्रश्न तर किती वेगळे आहेत...याचा एकमेकांशी काहीच संबंध नाहीये. पण हे प्रश्न जरी मिळतेजुळते नसले तरी सुद्धा याचं उत्तर मात्र या सगळ्या प्रश्नांना सामावून घेणारं आहे...ते म्हणजे मातीची भांडी वापरून पहा.
तुम्ही म्हणाल की, मातीची भांडी वापरणं आणि आरोग्याची काळजी, किचनचा नवा लुक या सगळ्याचा काय संबंध? अहो, अगदी जवळचा संबंध आहे....तो कसा हेच सांगणारा आजचा ब्लॉग.

मला सांगा तुमच्या घरी पाणी पिण्याचा माठ सोडून इतर मातीची भांडी आहेत का??

वाचता वाचता अनेकांनी नकारार्थी माना डोलावल्या असतील. बरोबर ना? ह्म्म्म....हे चित्र जरी अनेक घरोघरी असलं तरीसुद्धा तुम्ही एकदा क्षणभर डोळे बंद करून कल्पना करा की, तुमच्या किचन मध्ये नेहमीच्या फ्रीजपेक्षा जर मातीचा फ्रीज असेल तर कसं वाटेल?
काय लूक बदलेलं तुमच्या घराचा...अहो, एवढचं कशाला मातीचा तवा, पाण्याची बाटली, डीनर सेट, मातीचा कुकर अशा सगळ्या गोष्टी जर तुमच्या स्वयंपाकघरात असतील तर फक्त तुमच्या किचनचा लुकच बदलणार नाही तर आरोग्याच्या दृष्टीने अतिशय गुणकारी अशी ही मातीची भांडी वरदान ठरतील.

कारण आपल्या सगळ्यांच्या घरी आजकाल अल्युमिनियम आणि स्टीलची भांडी असतात पण मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यामुळे मातीमध्ये असणारे आणि शरीराला उपयोगी ठरणारे सगळे गुणधर्म आपल्या शरीराला उपयुक्त ठरु शकतात.
जसे की, आयन, कॅल्शियम, फोस्फरस, मॅग्नेशियम, सल्फर. तसचं अनेक आजारांचं प्रमाणसुद्धा यामुळे कमी होऊ शकतं.


एवढचं नाही तर आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्याला आपण मातीच्या भांड्यांमध्ये जेवू खाऊ घातलं तर एका वेगळ्या पद्धतीने स्वागत केल्याची मजासुद्धा अनुभवता येऊ शकते. त्यामुळे आता Modern kitchen मध्ये हा मातीच्या भांड्यांचा नवा लुक एकदा पाहायला काहीच हरकत नाही.

 मला असं वाटतय की, तुम्हाला सुद्धा माझं म्हणणं आता पटतयं. आणि आता प्रश्न आहे की, फ्रीज पासून ते अगदी ताटं-वाट्यांपर्यंत सगळं घ्यायचं कुठून??

यासाठी बेस्ट पर्याय आणि नावाजलेला Brand म्हणजे मिट्टीकुल.


मिट्टीकुल विषयी बोलायचं झालं तर आपल्याला थोडी गुजरातची सफर करावी लागेल. कारण गुजरात मधील मनसुखभाई प्रजापती यांनी १९८८ मध्ये मातीचा तवा तयार करणारी factory उभी केली. पण २६ जानेवारी २००० साली गुजरात मध्ये झालेल्या मोठ्ठ्या भूकंपामुळे त्या सगळ्या साठ्याचं नुकसान झालं. तरी न डगमगता पुन्हा एकदा नवी सुरुवात झाली आणि २००४ साली त्याचं तुटलेल्या मातीच्या साठ्यातून मातीचा फ्रीज जन्माला आला. ज्याची आज जगभरात पसंती आहे. आता त्यांच्याकडे ५० पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या मातीच्या वस्तू आहेत. आता रवी प्रजापती आणि राज प्रजापती याचा सर्व कारभार पहातात. त्यांच्या एकूण पद्धतींविषयी बोलताना राज प्रजापती म्हणाले की,''आम्ही जी माती वापरतो ती नैसर्गिक माती असते, ती refine केली जाते, कोणत्याही प्रकारे केमिकल राहणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते. त्याचं व्यवस्थित टेस्टिंग आम्ही नेहमी करतो आणि मातीची सगळी भांडी कशी सुंदर दिसतील तसचं त्याचा वापर कसा सोपा होईल यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो.”

Contact :
info@mitticool.com
Mobile Android App- Mitticool
http:mitticool.com


Content writer and developer- RJ Gayatri Kashelkar



No comments:

Post a Comment