Thursday, June 1, 2017

INFORMATION- IELTS,PTE,GMAT,GRE,TOEFL

हॅलो फ्रेंड्स....

'परदेशी शिक्षण' या विषयावर मार्गदर्शनपर मुलाखती( परदेशी शिक्षण भाग १,२,३ ) तुम्ही नक्कीच वाचल्या असतील. या मुलाखती अंतर्गत INTEREDWISE EDUCATION च्या रुपाली ठाकूर आणि वृष बर्वे  यांनी आपल्याला परदेशी शिक्षणाकरीता जाण्यासाठी काय विचार करावा? तयारी कशी करावी? नेमकी कोणती तयारी करावी?  यांसारख्या अनेक प्रश्नांवर मार्गदर्शन केले.
पण आज  मला  माझ्या सगळ्या विद्यार्थी-पालक मित्र-मंडळींना  इंग्लिश प्रोफिशियंन्सीच्या क्लास बद्दल माहिती सांगायची आहे.

परदेशी शिकायला जायचा विचार पक्का झाला की,विद्यार्थी त्या तयारीला लागतात. म्हणजे वेगवेगळ्या पूर्व परीक्षांची तयारी हा त्यातला सगळ्यात मोठा विषय.परदेशी जायचं म्हणजे इंग्रजी भाषेची उत्तम तयारी हे समीकरण आलचं. या पूर्वपरीक्षांची नावं आपण या आधी सुद्धा ऐकली आहेत.

जसे की,                                 आईएलटीएस,पिटीई,टोफेल,जीआरई,जीमॅट.

 



प्रत्येक देशाचे वेगवेगळे नियम असतात.
 आईएलटीएस (IELTS- International English Language Testing) 
 पिटीई(PTE)
 टोफेल( TOEFL Test of foriegn language), 
 जीआरई - (Graduate Record Examination )
 जीमॅट - Grade Managment Admission Test.

या परीक्षांविषयी अधिक माहिती:

परदेशी शिक्षणाकरता जाण्यासाठी  पूर्वपरीक्षा असतात. जगभरात वापरली जाणारी पूर्वपरीक्षा म्हणजे IELTS . ही पूर्वपरीक्षा  एकूण ९ bands ची असते. व पास होण्यासाठी  एकूण ९ bands पैकी कमीतकमी ६ bands आवश्यक असतात. 

entrance exam  format: Reading, speaking, writing. Listening

ही पूर्वपरीक्षा मुख्यतः techniques and tricks वर अवलंबून असते. या पूर्वपरीक्षांचा निकाल हा २ वर्ष valid असतो. जर पहिल्या प्रयत्नात विद्यार्थ्यांना ही पूर्वपरीक्षा पास करता आली नाही तर विद्यार्थी पुन्हा प्रयत्न नक्कीच करू शकतात. ही पूर्वपरीक्षा  विद्यार्थी कितीही वेळा देऊ शकतात. 


TOEFL 

ही  इंग्रजी भाषेची पूर्वपरीक्षा यूएसए या देशात मुख्यतः गरजेची असते .  
 १२० मार्कांची असलेल्या या परीक्षेमध्ये १०० मार्क मिळवणं आवश्यक असतं. 

PTE
Pearson Test Of English. ९० गुणांपैकी ५८ गुण आवश्यक असतात. 

GMAT
Management  कोर्सेस ला जाणारे विद्यार्थी GMAT साठी तयारी करतात. 

GRE
 इंजिनिअरिंग चे विद्यार्थी GRE साठी प्रवेश घेतात. गणित, बुद्ध्तीमत्ता म्हणजेच logical reasoning,  इंग्रजी या विषयांची उत्तम जाण असणं आवश्यक असत. यात  विद्यार्थ्यांना बर्यापैकी मोठे व्यवहार हे  कॅलक्युलेटर शिवाय  करायचे असतात. त्यामुळे टेक्निक आणि ट्रिक वापरून या पूर्वपरीक्षा देणं आवश्यक असत.



या सर्व परीक्षा कशापद्धतीने दिल्या जातात?

IELTS पेन पेपर - ऑफलाईन परीक्षा.

TOEFL इंटरनेट वर आधारित 

PTE- कॉम्पुटरवर आधारित 

या पूर्वपरीक्षांच्या तारखांबद्दल माहिती :

IELTS ची पूर्वपरीक्षा दर शनिवार आणि रविवारी देता येते. पण पूर्वपरीक्षेला अनेक विद्यार्थी अप्लाय करत असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना तारीख मिळण्यासाठी थांबावं लागतं. 

TOEFL आणि PTE या पूर्वपरीक्षेला विद्यार्थी कधीही बसू शकतात. 


आता तुमच्या मनात येईल की, विद्यार्थी या पूर्वपरीक्षांचा अभ्यास घरी सुद्धा करू शकतात तर क्लास लावायची काय गरज? 

मुळात क्लास लावल्याने विद्यार्थ्यांना बऱ्याच अर्थी फायदा होतो.  

INTEREDWISE EDUCATION  इंग्लिश प्रोफिशियंन्सी च्या क्लासेस मध्ये विद्यार्थ्यांची सर्व प्रकारची तयारी करून घेतात. यासाठी प्रोफेशनल ट्रेनर्स असतात. सर्व प्रकारची पुस्तकं शिवाय अभ्यासक्रम याची संपूर्ण माहिती यामुळे नीट मिळते तसेच विद्यार्थ्यांच्या सोयीप्रमाणे शनिवार रविवारी सुद्धा याचे क्लासेस घेतले जातात. शिवाय अशा प्रकारे मार्गदर्शन घेऊन केलेल्या तयारीमुळे विद्यार्थी पहिल्या फटक्यात परीक्षा पास होऊ शकतात.  

INTEREDWISE EDUCATION या सर्व परीक्षांच्या मुख्य केंद्रांचे  ऑफिशिअल पार्टनर आहेत. 


मुख्य केंद्रांमध्ये त्यांच्या प्रवेश प्रक्रियेत कधी कधी काही बदल होतात किंवा काही गोष्टी नव्याने येतात त्यामुळे जेव्हा विद्यार्थी अशा क्लासेस सोबत जोडलेले असतात तेव्हा या गोष्टी त्यांना आपसूकच कळतात.

शिवाय क्लासेस तर्फे संस्थामध्ये भरली जाणारी पूर्वपरीक्षांची फी त्यांच्यातर्फे केले जाणारे पेमेंट यामध्ये विद्यार्थ्यांना थोडा अवधी मिळतो. नाहीतर क्लासशिवाय जेव्हा विद्यार्थी फी भरतात त्यावेळी त्यांना लगेच  पैसे भरणं आवश्यक असतं. 

शिवाय यासाठी येणारे स्टडी मटेरीअल या व्यतिरिक्त इतर अभ्यासाची पुस्तके या क्लास मधून विद्यार्थ्यांना प्रॅकटीस साठी  मिळतात. 





 या परीक्षांच्या बाबतीत सांगायचं झालं तर विद्यार्थी एका ठराविक स्टेज पर्यंत पोहोचू शकले नाहीत तर त्यांना परत तयारी करावी लागते. त्यामुळे एका झटक्यात पुढे जाण्यासाठी या परीक्षा खूप महत्त्वाच्या असतात. आपल्याला इंग्रजी जरी येत असलं तरीसुद्धा या परीक्षांमध्ये पास होण्यासाठी विशेष तयारीची गरज असते. काही विद्यार्थी याचा अभ्यास घरी करतात पण काही विद्यार्थ्यांना जर या इंग्लिश प्रोफीशियंन्सीसाठी मदत लागणार असेल तर यासाठी त्यांचे विशेष ट्रेनिंग देण्यासाठी हे क्लासेस असतात.


त्यापैकीच एक म्हणजे INTEREDWISE EDUCATION. 
क्लास फी- ६५००/- 

हे क्लासेस रविवारी १० ते १२ आणि ९ ते ११ या वेळेत असतात आणि इतर वारी संध्याकाळी ६ ते ८ या वेळेत असतात. 


अधिक माहितीसाठी संपर्क:

Contact no:  022-65150555 –   MOB: 98 20 38 31 18/ 93 22 15 05 47 
ADD: C-105, 1st Floor, Sai Classic Bldg; 90 Feet Road, gavanpada opposite sabnis hospital Mulund – 400 081  


2 comments:

  1. उपयुक्त माहिती. धन्यवाद.

    ReplyDelete
  2. उशीरा वाचला
    फार छान माहिती
    काही विद्यार्थ्यांना पाठविली लिंक

    ReplyDelete