Wednesday, August 30, 2017

Good Parenting Habits

हॅलो....नमस्कार ...नमो नमः
आजच्या ब्लॉगची सुरुवात थोडी हटके

आज मला तुम्हा सगळ्यांपर्यंत अतिशय माहितीपूर्ण ब्लॉग पोहोचवायचा आहे. यासाठी मी 
Parenting Coach  दीप्ती गाला ( Founder at Confident-U) यांचे विशेष आभार मानू इच्छिते. 
आणि आज थोडं वेगळ्या विषयवार लिहित असल्यामुळे एक वेगळा आनंद आहे. 
तर मूळ विषयाकडे वळते......



मी ठाण्यातील TMPC म्हणजेच  Traders, manufacturers, professionals , consultants या बिझनेस ग्रुपमध्ये दर मंगळवारी मिटिंगला जाते.  या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे इथे अनेक व्यावसायिक फक्त बिझनेस, पैसा यासाठी या मिटिंगला येत नाहीत. तर याठिकाणी व्यवसाय वाढीसोबतच प्रत्येकाचा  सर्वांगिण विकास होण्याकडे अधिक भर दिला जातो. यासाठी असतो Education Slot आणि Mentor slot. आजपर्यंत या दोन्हींमधून माझ्यासारख्या नवव्यावसायिकांपासून ते अनेक वर्ष व्यवसाय करणाऱ्या सर्वांना याचा खूप फायदा झालेला आहे. 


आजच्या मिटिंग मध्ये झालेल्या mentor slot विषयी मी आज लिहिणार आहे. 
मघाशी म्हंटल्याप्रमाणे आजच्या Chief Guest होत्या दीप्ती गाला मॅडम. आणि त्यांनी Good parenting Habits या विषयावर माहिती दिली. 


त्यांनी दिलेली  माहिती तुम्हा वाचकांसाठी उपयुक्त ठरेल यात शंका नाही...

जेव्हा प्रत्येक घरी लहान मुलं असतात तेव्हा ते घर खऱ्या अर्थाने हसतं बोलतं घर बनतं. एखाद्या दाम्पत्याला जेव्हा बाळ होतं तेव्हा ते त्याचे आई - बाबा नक्कीच होतात...ही तर नैसर्गिक गोष्ट आहे. पण आई-बाबा झाल्यानंतर त्यांचे  पालक होणं गरजेच असतं. आई - बाबा आणि पालक या दोन्ही गोष्टी सारख्या वाटल्या तरी या संकल्पना वेगळा करणारा त्यात एक बारीक धागा सुद्धा आहे. समजून उमजून पालकत्व स्वीकारलं तर सोप आहेच...पण त्याकडे फारसं लक्ष दिलं नाही तर मात्र तुमच्या मुलांमधली आणि तुमच्यामधली नाजूक सुसंवादाची रेष तुम्हाला कधीच सापडणार नाही. 










तुम्ही तुमच्या व्यस्त दिनक्रमात, कंपनीच्या टार्गेट मागे, तर तुमची मुलं त्यांच्या  क्लासेस, शाळांमध्ये अडकलेली दिसतील,  आणि संवादासाठी कोणीच समोर नसल्यामुळे त्यांच्याकडे असणारे स्मार्ट फोन्स आणि त्यावरील गेम हेच त्यांचे खरे मित्र बनतील. 



आजची  परिस्थिती काहीशी अशीच झाली आहे. पॅरेंटिंग कोच दीप्ती गाला यांनी सांगितल्याप्रमाणे एक गोष्ट मनोमनी पटली ती म्हणजे जशी लहान मुलं ही लहान असतात त्याप्रमाणे त्यांचे पालक सुद्धा एक आई-वडील या नात्याने नवीनच असतात. 

समजा, ( एक उदाहरण म्हणून आर्या  हे एक नाव घेत आहे) आर्या ६ वर्षांची आहे. तर तिचे आई बाबा या नात्याने ते सुद्धा ६ वर्षांचे आहेत . त्यामुळे आर्या एक मुलगी म्हणून तर  तिचे आई बाबा एक पालक म्हणून या नात्यात योग्य सुसंवाद साधत पुढे गेले पाहिजेत. 

कधी कधी आई वडील मुलांसाठी खूप काही फक्त करत जातात करत जातात आणि फक्त करत जातात. पण फक्त त्यांच्यासाठी काही करण्याने त्यांच्यातील नाते खऱ्या अर्थाने फुलणारे नसते. 
Doing Doing and Not Being अशी अवस्था होऊन जाते. यासाठी पालकांनी treasure अर्थातच तुमच्या पाल्याची मौल्यवान किंमत जाणून घ्यावी आणि त्याप्रमाणे तुमच्या पाल्याशी असलेले नाते फुलवावे असे दीप्ती गाला त्यावेळी म्हणाल्या. हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरेल ते म्हणजे sensitivity ची संकल्पना.

त्यांनी सांगितल्याप्रमाणे , ०-८ वर्षापर्यंत मुलांच्या मेंदूची  वाढ ८०%  होते. त्यामुळे ही वर्ष महत्त्वाची मानली जातात. आजकालच्या धकाधकीच्या दिनक्रमात प्रत्येक आई- वडिलांच्या मनात एक गोष्ट कायम सतावत असते की, 'मी माझ्या मुलाला/मुलीला वेळ देऊ शकत नाहीये.' हे गिल्ट त्यांच्या मनात असल्यामुळे ते त्यांच्यासाठी खूप काही करण्याचा प्रयत्न करत राहतात ज्यामुळे त्यांच्या मुलांना त्यांनी एखादी वस्तू वगैरे काही आणून दिले तर मुले लगेच खुश होतील. पण का कोण जाणे पालकांनी लगेच त्यांच्यासाठी काही करणं हे खूपच  क्षणिक असू शकतं.
       
     उदाहरण घेऊन समजून घेऊ- आर्यन सात वर्षांचा आहे. त्याचे आई वडील मोठ्या आयटी कंपनीमध्ये काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे  पैशाची नाही तर  मुलाला द्यायच्या वेळेची कमी आहे. आपण आर्यनला वेळ देऊ शकत नाही हे त्याच्या आई- वडिलांच्या मनात सारखं येत राहतं. त्यामुळे ते त्यांच्याही नकळतपणे इंस्टट  ग्रॅटीफीकेशनकडे वळले जातात. यात कधी आई म्हणते, 'मी आज तुला हवं ते जेवायला बनवते, बाबा म्हणतात ठीके, मी तुला तो व्हिडीओ गेम घेऊन देतो, कधी महागातले मोबाईल. तर कधी भरपूर क्लासेस ना मी माझ्या मुलाला घातलं आहे याचं आईला झालेलं समाधान....पण ते समाधान एवढंच असतं की, मी माझ्या मुलासाठी /मुलीसाठी काहीतरी केलं इतकचं. DOING DOING AND ONLY DOING.

या सगळ्यात कोणत्याही प्रकारचं नातं तयार होत नाही.लहानपणी  वेळ न दिल्यामुळे आणि त्यांच्यासाठी फक्त भौतिक गोष्टी केल्यामुळे हीच मुलं मोठी झाली की, त्यांच्याशी संवाद साधत नाहीत. आणि आई- वडिलांची तक्रार असते की मुलं आमच्यासोबत काही share करत नाहीत. 

खरतरं नात्यातली संवादाची गुंतवणूक  ते नातं नवीन असतानाच व्हायला हवी हे ही तितकचं खरं आहे. 

पण मग यासाठी काय उपाय असू शकतात...??????

कोणत्याही प्रकारचे सल्ले न देता, जजमेंटल न राहता मुलाचं ऐकलं पाहिजे. जेव्हा त्यांना काहीतरी सांगायचं आहे तेव्हा तुम्ही त्यांचे सगळ्यात पहिले listener अर्थातच श्रोते व्हा. 
झोपायच्या वेळी चांगल्या चांगल्या गोष्टी सांगा. त्यांचे कुतूहल बंद करू नका. 
त्यांना प्रश्न विचारू देत. 

तुम्ही त्यांचे Role Model असणार आहात, त्यामुळे तुमची मुलं तुमचचं अनुकरण करणार आहेत. हे पालकांनी लक्षात ठेवण्यासारखे आहे. तुमच्या हातात सतत मोबाईल आहे आणि तुम्ही मुलांना म्हणत आहात की, मोबाईल बाजूला ठेवं. तर या दोन अतिशय विरुध्द बाजू आहेत. 

तुम्हाला तुमच्या पाल्यामध्ये जे गुण पाहायचे आहेत त्याविषयी त्यांच्याशी नकळतपणे संवाद साधत राहा.  उदा. 'रिया गुणी आहे. ती कोणावरही चिडत नाही, सगळ्यांशी नम्रतेने वागते.' असं  आपले आई बाबा म्हणत आहेत म्हंटल्यावर मुलांना याचा विशेष आनंद होतो. आणि जर कधी चिडचिड केलीच तर ते स्वतःच थांबतात. कारण मी नम्र आहे हे त्यांच्या मनावर कोरलं गेलेलं असतं. त्यांच्यावर नकळत संस्कार झालेला असतो. त्यांना 'हे करू नको, ते करू नको' असे सांगून मुलं लगेचच तीच गोष्ट करायला जातील. त्यांच्या कुतूहलतेला आव्हान देऊ नका. 

केल्या जाणाऱ्या छोट्या मोठ्या संस्कारांची सवय मुलांना होत आहे का ते पाहायचे असल्यास अर्थातच, त्यांच्या अंगी चांगले गुण बाणवण्यासाठी पालक स्टार शीटचा वापर करू शकतात. उदा. टिव्ही न पाहता जेवणे. किंवा सगळ्यांमध्ये मिसळून खेळणे. अशा गोष्टींसाठी त्यांनी ती गोष्ट केल्यावर स्टार द्या. त्यामुळे जास्तीत जास्त स्टार मिळवण्याची त्यांना सवय लागेल. त्यांच्याविषयी त्या वहीत तुम्ही स्वतः लिहिलत तर तुमच्या मुलांसाठी ते कोणत्याही अवाॅर्ड पेक्षा कमी नाही. 

मुलांशी तुम्ही Authentic राहा. उदा. तुम्हाला ऑफिस मधून फोन आला आहे..किंवा ऑफिसच काम आहे. त्यामुळे तुमचं आणि तुमच्या मुलाचं चालू असलेलं बोलणं अर्धवट राहीलं आहे. तर अशावेळी काम झाल्यावर त्यांच्याशी संवाद साधा. आणि अर्धवट राहिलेला संवाद पूर्ण करा. 'सॉरी, मला त्या कामामुळे तुझ्याशी बोलता आलं नाही. तू काय म्हणत होतास?' 

एखाद्या गेट टू गेदरला किंवा फिरायला जायचे असेल तर घेतलं मुलांना आणि गेले असे न करता त्यांना आपण कुठे जात आहोत हे Introduce करा. त्याची ओळख करून द्या. आणि मग घेऊन जा.  

या आणि अशा बऱ्याच गोष्टी या विषयात आहे. पण मिटिंग मध्ये त्या स्लॉट मध्ये असलेल्या वेळेमध्ये दीप्ती मॅडम यांनी वरील नमूद केलेली माहिती दिली. ही माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा छोटासा प्रयत्न.   



 
    


2 comments:

  1. That was a good of you to write on this subject. Essentially we have to treat a child as any other person with extra ordinary demands.

    I hope you know that RC Dombivli East is conducting a Workshop on this subject on 10th Sept.

    ReplyDelete
    Replies
    1. हल्लीच्या पालकांना खरच हे सांगायची गरज आहे २७वर्ष बालवाडी चालवताना पालकांना Qualitative time & Quantitative time yayla farak सांगत आले

      Delete