Wednesday, September 13, 2017

उद्योग सफर भाग २ - OASIS - सुमुख जोशी


उद्योग सफर भाग - २ मध्ये सर्व वाचकांचं मनापासून स्वागत.......


  एक उद्योजक किंवा व्यावसायिक म्हटलं की, 'अनेक अडथळे पार करत उभं केलेलं स्वतःचं साम्राज्य'- असं काहीसं चित्र नेहमीच आपल्या सर्वांसमोर येतं. आज उद्योग सफर मध्ये आपण अशाच एका व्यक्तीचा/ उद्योजकाचा  प्रवास जाणून घेणार आहोत.


'पुढे जाऊन व्यवसायचं करायचा' हे लहानपणीच ठरलेलं. पण शिक्षण चालू असताना वडिलांच्या अचानक आलेल्या आजारपणामुळे आहे तो व्यवसाय सांभाळण्याची गरज लक्षात घेऊन वयाच्या अठराव्या वर्षी त्याने शिक्षण अर्धवट सोडून  'व्यवसाय' वा 'उद्योजक' अशा कोणत्याही व्याख्यांची ओळख नसतानासुध्दा वडिलांचा  व्यवसाय पुढे चालविण्याची तयारी दाखवली आणि तो व्यवसाय सामर्थ्याने  सांभाळला. आणि आजही उत्तमरित्या जो आपल्या व्यवसायात प्रगती करीत आहे, तो म्हणजे ठाण्याचा सुमुख जोशी. 

सुमुख जोशी 
बाजारात विशेष नाव प्रस्थापित केलेल्या कंपन्यांसोबत सुमुखच्या कंपनीची  डिस्ट्रिब्युटरशीप आहे. विशेषतः इंडस्ट्रीअल स्टोरेज प्रॉडक्ट, रॉ-मटेरिअल्स, ऑफिसेसच्या सेटअपसाठी लागणारे प्लॅस्टिकचे शेल्फ, शाळा-कॉलेजांमध्ये लागणारे बेंचेस, बोर्ड्स (फळे) अशा सर्व उत्पादनांची डिस्ट्रिब्युटरशीप सांभाळणारी सुमुखची कंपनी अर्थात ओयासीस .











आपल्या सारख्या सर्वसामान्यांसाठी किंवा ज्यांचा 'डिस्ट्रिब्युटर' या शब्दाशीसुद्धा कधी आजपर्यंत  संबंध आला नाही अशा सर्वांना कदाचित हे क्षेत्र म्हणजे  तसा 'सोपा' व्यवसाय वाटू शकतो. अनेकवेळा काही व्यवसायांच्या संकल्पना आपल्या डोळ्यात पक्क्या झालेल्या असतात. त्यापैकीच 'डिस्ट्रिब्युटर' हा व्यवसाय. 

एका ठिकाणाहून सामान विकत घेऊन दुसऱ्या ठिकाणी विकणे ही संकल्पना मनात बसलेली असते आणि अनेकांना ती सोपीही वाटते. पण मुलाखती दरम्यान या सगळ्या विषयी बोलताना लक्षात आलं की, त्यात असणारी मेहनत, जबाबदारी खूप मोठी आहे. शिवाय ज्या उत्पादनाची डिस्ट्रिब्युटरशिप आहे त्या  उत्पादनाच्या कंपनीचे नाव असतानासुद्धा आपण त्यात सिंहाचा वाटा घालून काम करत राहाणं आवश्यक असतं. यासोबतच त्या विशिष्ट उत्पादनाचे (product) सतत बदलणारे नियम लक्षात घेऊन काम करावे लागते. 


अनेक उत्पादनांची  डिस्ट्रिब्युटरशीप असताना खरा कस लागतो ते विश्वासाने माणसे (ग्राहक) जोडताना आणि  टिकवतानासुद्धा. कारण उत्पादक असतो जो माल तयार करतो, त्यांनतर तो माल रिटेलर आणि ग्राहकांपर्यंत पोहोचवायची जबाबदारी घेतो तो वितरक अर्थात डिस्ट्रिब्युटर/होलसेलर, मग तो माल पुढे दुकानांमध्ये जातो आणि मग ग्राहकांकडे. यात लक्षात घेण्यासारखे म्हणजे  डिस्ट्रिब्युटर खऱ्या अर्थाने मुख्य कंपनी आणि ग्राहक यांच्यामधला अतिशय महत्त्वाचा  'मिडल मॅन' झालेला असतो. आणि  सुमुख एक डिस्ट्रिब्युटर या नात्याने असणारा व्यावसायिक म्हणून अनेक गोष्टी  सामर्थ्याने सांभाळत आलेला आहे.


आजच्या उद्योग सफरमध्ये आपण त्याने त्याच्या व्यवसायात घेतलेली मेहनत, त्याला आलेले अडथळे, त्यावर त्याने एक व्यावसायिक म्हणून ग्राहकांची जिंकलेली मतं, त्याचं यश या सगळ्या गोष्टींवर नजर टाकणार आहोत.

सुमुख 'उद्योग सफर' या मालिकेत तुझं मनापासून स्वागत !! 

सुमुख जोशी : मुलाखत 


सुमुख : धन्यवाद  गायत्री !! 

गायत्री: मघाशी म्हंटल्याप्रमाणे व्यवसाय करायचं निश्चित होतं. पण परिस्थितीने तुला खरतरं लवकरच व्यवसायात आणलं..काय सांगशील याविषयी...
सुमुख: माझे वडील रमेश जोशी (Founder- OASIS) यांची तब्येत जेव्हा अचानक बिघडली तेव्हा मी अठरा वर्षांचा होतो. जबाबदारी होती. तेव्हा खरतरं काहीच माहित नव्हतं. पण नोकरी करायची नव्हतीच. हा निर्णय मी त्या वयात घेऊ शकलो याचं खर श्रेय मी माझ्या कुटुंबियांना देईन. कारण लहानपणापासूनच आमच्या घरी व्यवसायाचं वातावरण होतं. त्यामुळे नोकरीचा विचारचं कधी मनात आला नाही. व्यवसायचं करायचा  हे अगदी पक्क होतं.त्यामुळे परिस्थितीनेच व्यवसायात आणलं असं म्हणता येईल. पण हो, त्याचं दुखः वगैरे अजिबात मनात नाही. आजही वडिलांचा पाठींबा असतोच. आणि मी हे अभिमानाने सांगीन की, माझ्या वडिलांचं वय ७० वर्ष आहे पण तरीही ते ऑफिसला येतात आणि सगळ्यात जास्त वेळ तेच असतात. 

   गायत्री: ohh... छान!! खरे आदर्श !


गायत्री: जशी सिनेसृष्टीतली एक चंदेरी दुनिया असते तिथे सुद्धा एक टर्निंग पॉइंट महत्त्वाचा ठरतो. त्याचप्रमाणे आपल्या व्यवसायाच्या दुनियेत सुद्धा एक टर्निंग पॉइंट आपलं आयुष्य बदलून टाकतो. त्याविषयी मला सांग.. तुझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट कोणता असं तुला वाटतं?
सुमुख: खरं सांगायचं तर, वयाच्या अठराव्या वर्षी व्यवसायात येणं ही गोष्ट माझ्यासाठी टर्निंग पॉइंट पेक्षा कमी नव्हती. जेव्हा सुरुवात केली तेव्हा व्यवसायाची विशेष माहिती नव्हती. पण आज जेवढी आहे ती कोणतीही कॉलेजची पुस्तकं वाचून कमावलेली नाही. तर थेट व्यवहारज्ञान लक्षात घेत घेत शिकत आलो याचं सुद्धा एक वेगळं समाधान मनात आहे. याशिवाय सांगायचं झालं तर, व्यवसायाचा श्रीगणेशा जेव्हा केला तेव्हा काही वर्षातच उत्पादकाने (Producer/Manufacturer) मिटींगसाठी बोलावलं होतं आणि ४ पट  टर्न ओव्हरची इच्छा व्यक्त केली होती. ती गोष्ट आमच्यासाठी एक आव्हान होतं आणि आणि लगेचच ते आव्हान मी स्वीकारलं. आता मागे वळून पाहताना लक्षात येतंय की, ते आव्हान स्वीकारणं खरंच सोपं नव्हतं. पण मी स्वीकारलं होतं. आणि  सांगायला आनंद होतो की, त्यावर्षी आम्ही डबल टर्न ओव्हर केला. शिवाय सुमुखला व्यवसायातलं काहीच कळत नाही अशी अनेकांच्या मनात आपोआप तयार झालेली मानसिकता लगेचच  पुसली गेली.   


गायत्री: खरचं कौतुक आहे. आव्हानं पूर्ण करणं म्हणजे स्वतःचीच एक परीक्षा असते. पण यामुळे तुझा स्वतःवरचा आत्मविश्वास अधिक वाढला असेल.  
सुमुख:  हो, हे खरं आहे. 

गायत्री: तू आव्हानाबद्दल सांगितलसं पण असाच एखादा लक्षात राहिलेला प्रसंग किंवा एखादे व्यवसायातले डील, याविषयीची एखादी आठवण? 
सुमुख: हो आहे असा एक प्रसंग. एकदा बंगळूरवरून  फोन आला. 'बीन्स' या उत्पादनाची मागणी त्यांनी केली ५००० नग. खरतरं लोकल डिस्ट्रीब्युटरकडे  आजपर्यंत एवढी मोठी ऑर्डर आली नव्हती. त्यावेळी कंपनीचा   सेल्स मॅनेजर ऑर्डर बघून थक्क झाला. ती ऑर्डर लक्षात राहणारी होती कारण तेव्हा आम्ही ३ ट्रक भरून पार्ट पार्ट मध्ये ऑर्डर पूर्ण केली. एक आगळा वेगळा अनुभव होता.

गायत्री: आज मागे वळून बघताना काय वाटत की, व्यवसायात कोणतं आव्हान होतं आणि कोणतं आजही आहे? 
सुमुख : एकतरं, वडिलांनी कमावलेला विश्वास जो निश्चितच  टिकवायचा होता. कारण वडील- रमेश जोशी यांचा वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेताना त्यांनी सर्वांचा कमावलेला विश्वास टिकवणं, ही माझी  मोठी जबाबदारी आणि माझ्या समोरचं आव्हान आहे, असं मला वाटतं. एकदा एकाएकी उत्पादकाने फॅक्स पाठवला होता आणि आमचे मुलुंडला असलेले काम बंद करून टाकले होते. त्यावेळी खूप मोठे प्रश्न उभे राहिले होते. तेव्हा मग प्रश्न होते पगार, ऑफिसचे भाडे हे सगळे खर्च कसे करायचे ? खूप विचित्र परिस्थिती आली होती...पण कुटुंबाचं महत्त्व आपल्याला  त्यावेळी खऱ्या अर्थाने पटतं. वडील त्यावेळी खंबीरपणे पाठीशी होते. त्यांनी कधीच मार्ग दाखवला नाही पण मार्ग काढायला शिकवलं. मग पुन्हा श्रीगणेशा केला.नवीन उत्पादकाची टीम उभी केली.नवीन ग्राहक.सगळं नवीन.पुन्हा A B C D पासून सुरुवात केली. त्यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचा  दौरा केला होता.खूप फिरलो होतो. तो माझा पहिला मोठा प्रवास होता. त्याआधी काहीच अनुभव नाही. त्यामुळे माझी फसवणूक सुद्धा झाली आहे.

गायत्री: अरे बापरे ! फसवणूक ? काय झालं होतं? 
सुमुख: एकदा चिपळूण वरून परतताना एसीचं तिकीट हातात असतानाही एम/पीम चा गोंधळ करून मला फसवण्यात आलं. आणि मध्यरात्री १२ वाजता मला खाली उतरवलं गेलं. काय करायचं माहित नव्हतं. त्यामुळे शेवटी जनरल डब्याच्या बाथरूम बाहेर बसून प्रवास पूर्ण केला. पण  तिथल्या मार्केट स्टडीचा खूप फायदा झाला. 

गायत्री: तुझं आणि पर्यायाने तुझ्या कंपनीचं (OASIS) पुढचं स्वप्न काय आहे? 
सुमुख : प्रत्येक दारात आमचं प्रॉडक्ट गेलं पाहिजे. चांगल्या उत्पादनांबद्दल ग्राहकांना माहिती मिळाली पाहिजे, आणि आजपर्यंत जसा केला तसाचं प्रामाणिकपणे व्यवसाय करायचा आहे. 

एक डिस्ट्रिब्युटर या नात्याने सुमुखकडे असणारी उत्पादने (Products) यावर एक नजर ...




















गायत्री: वाह !! एका वाक्यात उत्तर. म्हणजे तुझ्या स्वप्नापर्यंत पोहोचायचा तुझा विचार इतका क्लियर आहे  त्यामुळे प्रश्नचं नाही. तुला पुढच्या वाटचालीसाठी 'माझी लेखणी' तर्फे खूप खूप शुभेच्छा !!

सुमुख: धन्यवाद  गायत्री !!

सुमुखची   डिस्ट्रिब्युटरशीप असलेल्या कंपनी पुढीलप्रमाणे: 






गायत्री: व्यवसायाच्या चौकटीतला सुमुख कसा आहे...त्याची मेहनत या व्यवसायाच्या मागे  काय होती आणि आहे  हे लक्षात आलं. पण उद्योजक सुमुख जोशी एक उत्तम कलाकार सुद्धा आहे.
सुमुख : हो, शाळेपासून अॅक्टिंगची आवड होती. वेगवेगळ्या नाटकात काम केलं. आणि लेखनही केलं. अनेक एकांकिका, एकपात्री अभिनय, दोन अंकी तर कधी तीन अंकी नाटकात सहभागी व्हायचो. उत्सवात वेगवेगळ्या कार्यक्रमात, नाटकात कामं केली. ह्यातच करियर करायचं म्हणून प्रयत्न सुद्धा सुरु केले होते.

'लक्ष्य' मालिकेतील भूमिका
'तुमचे आमचे गाणे' - नाटक 

'उंच माझा झोका' मालिकेतील भूमिका 




'सारीपाट हा संसाराचा', 'लक्ष्य', 'उंच माझा झोका','स्वप्नांच्या पलीकडे' अशा वेगवेगळ्या मालिकांमधून कामं केली. हिंदी मध्ये 'क्राइम पेट्रोल' मध्ये काम केलं. मराठी सिनेमात छोटीशी भूमिका करण्याची संधी मिळाली. प्रशांत दामले फॅन फाउंडेशन तर्फे राज्यनाट्य स्पर्धेत प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली होती. 






गायत्री : अरे वा!!  उत्तम कलाकार आणि आता पूर्ण वेळ व्यवसाय.
गायत्री: एक कलाकार, व्यावसायिक, आणि एका बिझनेस ग्रुपचा प्रेसिडंट हा सुद्धा तुझ्या प्रगतीच्या आलेखात नमूद करण्यासारखा मुद्दा आहे. बिझनेस ग्रुपचा प्रेसिडंट या नात्याने तुझी जबाबदारी काय असते?
TMPC ची सात वर्ष 
सुमुख : मी चालू व्यवसाय पुढे नेतोय. अनेक लोकांना व्यवसाय करायचा असतो पण कशी सुरुवात करावी हे लक्षात येत नाही. किंवा कोणाच्यातरी सल्ल्याची गरज असते. म्हणून मी व माझ्या वडिलांनी TMPC (ट्रेडर्स,मॅन्यूफॅक्चरर्स, प्रोफेशनल्स, कंस्लटंट) ह्या संस्थेची स्थापना केली. हे असे दालन आहे की जिथे वेगवेगळे व्यापारी एकत्र येतात. व्यवसाय वाढवण्यासाठी एकमेकांना मदत करतात. आठवड्यातून एकदा भेटणे.     संस्थेच्या माध्यमातून पुस्तकं वाचणे, बडी बनवणे. 'वन टू वन' करून व्यवसायात बदल घडवणे. रेफरन्स  देणे. हा आमचा  सर्वांचा मुख्य उद्देश असतो. 





गायत्री: मस्त  !! तुझा एकूणच सगळा प्रवास, तुझी धडपड ही  
नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे. 
                  तुझ्या पुढच्या  वाटचालीसाठी शुभेच्छा !! 

   सुमुख: धन्यवाद !! 




Sumukh Joshi
9892867209

Oasis
10 Pawar Ind Estate, 
Edulji Road,charai, Thane west

No comments:

Post a Comment