Wednesday, October 25, 2017

'मसाज थेरेपिस्ट' - अनुप ठोसर

मसाज घेणं ही आज  काळाची गरज बनली आहे. का बनली आहे? 'मसाज थेरेपिस्ट' हे क्षेत्र नेमकं कसं आहे? मसाज करून घेण्याचे फायदे कोणते? आज अशा कोणत्या अडचणींचा सामना मुंबईकर करत आहे ज्यामुळे त्यांना  मसाज घेण्याची अधिक गरज निर्माण होत आहे ..
या सगळ्याविषयी जाणून घेऊया 'मसाज थेरेपिस्ट' अनुप ठोसर याच्याकडून....

अनुप ठोसर गेली सात वर्ष या क्षेत्रात काम करत आहे...मसाजविषयी अधिक माहिती जाणून घेऊया या ब्लॉग मधून...



    

गायत्री : 'मसाज थेरेपिस्ट' म्हणून या क्षेत्रात काम करायचं कधी ठरवलसं?
अनुप : खरंतर त्याची सुरुवात स्वतःपासून झाली...झालं असं की,मला स्वतःला मसाज घ्यायला खूप आवडायचं. स्वतःला खूप रिफ्रेश वाटायचं, मी रिलॅक्स फिल करायचो. आणि तेव्हा कुठेतरी या मसाजबद्दल कुतूहल निर्माण झालं. आपण जो मसाज घेतोय, ज्यामुळे आपल्याला खूप छान वाटतंय, आराम पडतोय तर आपण याचं प्रोफेशनल शिक्षण घ्यावं असं त्यावेळी मनात आलं. स्वानुभव खूपच उत्तम आल्यामुळे मी खऱ्या अर्थाने 'मसाज थेरेपिस्ट' या क्षेत्राकडे वळलो. 

गायत्री : अरे वा !! स्वतःमधली मसाजबद्दलची आवड, पॅशन तुला स्वानुभवातून शोधता आली असं म्हणता येईल. 

गायत्री: कुठे घेतलसं मग याचं शिक्षण? आणि खरी प्रोफेशनल सुरुवात कशी केलीस?
अनुप : माझं शिक्षण  बी. कॉम पर्यंत झालं आहे. जसं मी आत्ताच म्हंटल  
त्याप्रमाणे एक आवड म्हणून मसाज थेरेपिस्ट या क्षेत्राकडे प्रोफेशनली वळायचं ठरलं. मग     मी      सीमा इनस्टीट्युट अँड सलोन मधून
CIDESCO स्पा डीप्लोमा कोर्स पूर्ण केला. सुरवातीला मी एका डॉक्टरांकडे काम केलं होतं. शिवाय प्रोफेशनली शिकल्यामुळे मसाज थेरेपिस्ट म्हणून मी काम करण्यासाठी एलिजिबल झालो. आणि मग मी स्वतः  व्यवसाय म्हणून कामं घ्यायला सुरुवात केली. 

गायत्री: मसाज आणि फिजीओ मधला नेमका फरक काय?
अनुप: यात,बराच फरक आहे. फिजीओ मध्ये व्यायामावर अधिक भर असतो. त्यात फिजीओ थेरेपिस्टला हाडांचा पूर्ण अभ्यास असतो आणि मसाज म्हणजे आपल्या शरीराची लवचिकता. दोन्ही वेगळे आहेत तरी परस्परपूरक आहेत असं म्हंटलं तरी चालेल.  

गायत्री : वा !! तू अगदी थोडक्यात याचा अर्थ नेमका सांगितलास...

गायत्री : मसाज थेरेपिस्ट म्हणून तू स्वतःचा व्यवसाय करतो आहेस..तुझ्या व्यवसायाच्या स्वरूपाबद्दल आम्हाला सांग. 
अनुप :व्यवसायाचं स्वरूप म्हणाल तर जे कोणी मसाज करण्यासाटी उत्सुक असतात ते फोन करतात. त्यांना मी घरी जाऊन मसाज देतो. त्यांना भेटून त्यांच्या शरीराची प्रकृती लक्षात घेऊन  त्याप्रमाणे मसाज करतो. आपल्या शरीराच्या प्रकृतीप्रमाणेच मसाज करण्यावर मी अधिक भर देतो. कोणी वर्किंग क्लायंट असतात तर कोणी खेळाडू .. अशाप्रकारे कोणत्या क्षेत्रात आहेत ते  सुद्धा मी बघतो. सकाळ व  संध्याकाळ या वेळी  मसाज  करणं अधिक चांगलं असतं, 
त्यामुळे त्याप्रमाणे वेळ ठरवली जाते.      साधारणतः १ तास १५ मिनिटं मसाज करतो. आणि प्रकृतीप्रमाणे मसाज ट्रीटमेंट देतो. 

गायत्री: १ तास १५ मिनिटं मसाज..आणि तो सुद्धा कुठेही न जाता. वा!! तुझ्या क्लायंटसना खूपच आराम पडत असेल. 

अनुप: हो...त्यांना खूप आराम पडतो. 
   
गायत्री : मसाजचे कोणकोणते प्रकार असतात ? 
अनुप : मी मसाजचे १३ प्रकार शिकलो आहे. काही मसाज करण्यासाठी साधनांची आवश्यकता असते. 
सध्या  मी  स्विडीश मसाज, डीप टिशू मसाज, स्पोर्ट्स मसाज आणि 
आयुर्वेदिक मसाज असे चार मसाजचे प्रकार करतो. हे चारही  प्रकार फूल बॉडी मसाज आहेत शिवाय  खूप रिलॅक्स फील करून देणारे आहेत. 

गायत्री: या चारही मसाजच्या प्रकारांबद्दल आम्हाला विस्तृत जाणून घ्यायला आवडेल. 
अनुप: स्विडीश मसाज यामध्ये रिलॅक्सशन मिळतं. युरोपियन पद्धतीचा 
हा मसाज आहे आणि त्यामध्ये सगळी गंमत ही मूव्हमेंन्टवर असते आणि मसाज  व्यवस्थित केला कि खूप छान आणि रिलॅक्स वाटत.
डीप टिशू मसाज हा फिटनेस फ्रिकर्स जे असतात, जे बॉडी कॉंशियस, फिटनेस कॉंशियस असतात त्यांच्यासाठी केला जातो.
जिमला जाणारी मंडळी,  त्यांच्यासाठी हा मसाजचा प्रकार आम्ही करतो. त्यांच्या बॉडी टोनला यामुळे खूप फरक पडतो. तेज निर्माण होतं. एक चमक निर्माण होते. जे नेहमी व्यायम करत नाहीत त्यांना हा मसाज आम्ही करत नाही कारण पाठीचा कणा, पूर्ण बॉडीवरचं प्रेशर कमी अधिक ठेवून  तो मसाज आम्ही करतो. जे नेहमी व्यायाम करतात त्यांना ते कठीण वाटत नाही. पण नेहमी व्यायाम न करणाऱ्यांना ते थोडं त्रासदायक होऊ शकतं. यासोबत, स्पोर्ट्स मसाज सुद्धा सगळ्या खेळाडूंना उपयोगी असतो. धावपटू, ऑलिम्पिक, मॅरेथॉन मध्ये भाग घेणारे  खेळाडूं किंवा जिम रनर्स  अशा सगळ्याच खेळाडूंना उपयोग होईल असा हा स्पोर्ट्स मसाज आहे. यात सामन्याच्या आधीचा मसाज आणि नंतरचा मसाज असे दोन प्रकार पडतात. त्यात  अपर थाय आणि लोअर थाय असे काही प्रकार असतात त्यामुळे खेळाडूच्या नसा खुलायला मदत होते. ह्याचा मुख्य उद्देश असा आहे कि खेळाडूंना इंज्यूरीपासून प्रीव्हेंट करायला मदत होते. चौथा सगळ्यांना आवडणारा असा मसाज आहे तो म्हणजे आयुर्वेदिक मसाज. पाय, पाठीचा कणा, हात, पोट, कान , अगदी कंठ, हेड मसाज  या सगळ्या गोष्टी येतात.आयुर्वेदिक मसाजमुळे वात कमी होतो. १ तास १५ मिनिटं आयुर्वेदिक मसाज घेतल्यानंतर खरंच अनेकांचा अभिप्राय असतो की, आम्हांला खूप शांत वाटतयं आणि ही  शांतता माझ्या मते, आजच्या  काळात खूप महत्त्वाची आहे आणि गरजेची आहे.

गायत्री : मसाज घेतल्यावर  कोणकोणत्या प्रकारचे फायदे आपल्या शरीराला आणि पर्यायाने आपल्याला जाणवतात? 
अनुप : खूप फरक जाणवतो. रिलॅक्स, आणि शांतपणा लक्षात येतो . 
एकतरं माझा सगळा भर संपूर्ण मसाज मध्ये तेल जिरण्यावर असतो.  तेल शरीरात जिरलं की, त्यांना हलकेपणा जाणवतो. रिलीफ जाणवतो. 
आपल्या शरीरातला सरक्युलेशन फ्लो चांगला होतो. ताण कमी होतो. 
बॉडी स्ट्रेचिंग, इलॅस्टीसिटी खूप चांगली होते. शरीराची लवचिकता वाढते. 

गायत्री: मघाशी तू क्षेत्रानुसार मसाज देण्याबद्दल उल्लेख केलास, तर याच क्षेत्रानुसार सांगायचं झालं तर कोणकोणत्या क्षेत्रातील लोकांनी या मसाजचा उपयोग करावा असं तुला वाटत?
अनुप: खरतरं, सगळ्यांनी मसाज घ्यावा. आराम पडतो. पण मुख्यत्वे, ज्याचं काम सतत उभं राहून आहे. उदा. शेफ, दुकानांत काम करणारी व्यक्ती ,केक शॉप. शिवाय , रात्री उशिरा झोपण्याचं प्रमाण हल्ली वाढलेलं आहे. त्यामुळे पुरेशी झोप मिळत नाही. कामाचा थकवा वैगरे जाणवतो. खेळाडूंना मसाजचा फायदा तर होतो. शिवाय   नर्मदा परिक्रमा किंवा वारकरी मंडळी यांनी सुद्धा मसाज हा घ्यावाचं. 

गायत्री : अनुप मला अजून एक विचारायला आवडेल कि, तुझ्या कामाचा  युएसपी ( USP) तुला काय वाटतो ?
अनुप : मी माझ्या कामात क्रिएटिव्हिटी जपण्याचा प्रयत्न करतो. मसाज  मी एक आर्ट म्हणून करतो. फुल बॉडी मसाज अधिक  वेळ देण्यावर माझा  भर असतो . त्यामुळे समोरच्या व्यक्तीला खूप आराम पडतो. ते पाहून मला चांगलं वाटतं.

गायत्री :  मसाज फिल्ड मधल्या तुझ्या  अनुभवाबद्दल  आता 
थोडसं बोलूया...

कोणकोणत्या अडचणी आहेत म्हणून लोकं मसाज घेण्याकडे वळत आहेत? तुझा सात वर्षांचा अनुभव काय सांगतो?
अनुप : अडचणी तर खूप आहेत. आपल्या मुंबईचं जनजीवन खूप धावपळीचं आणि दगदगीचं झालं आहे. सध्याच्या काळात,सगळ्यात मोठी अडचण 
 म्हणजे मुंबईचा ट्रॅफिक.एकसारखं एक्सलेटर आणि क्लच यामुळे खूप त्रास होतो.चमक भरते, सूज येते, कधी गुडघा दुखतो. 
पाय जड होतो  या आणि अशा अनेक अडचणी येतात.
त्याचबरोबर बँकेत किंवा बैठे काम करणारी मंडळी जी असतात त्यांना तासन‍‌्तास एसी आणि पीसी समोर बसून रहावं लागतं. मान,
पाठ आणि कंबर दुखून येते. शिवाय घरातलं टेन्शन किंवा काही वेळा स्ट्रेस असतो. आजकाल तरुण मुला-मुलींना त्यांचा अभ्यास- करियरचं  खूप टेंन्शन येतं. स्ट्रेस येतो. शिवाय अगदी लहान वयापासूनच वजन वाढण्याचं प्रमाण सुद्धा खूप वाढलं आहे.स्त्रियांना अनेकवेळा फ्रोजन शोल्डरचा, पाठीचा  त्रास जाणवतो. वर्किंग स्त्रियांच्या 
एका हातात पर्स आणि एका हातात पिशवी असते. या आणि अशा अनेक अडचणी जाणवतात. 

गायत्री : मसाज या गोष्टीकडे कस पाहावं असं तुला वाटत?
अनुप:  मला असं वाटत कि मसाज घेणं ही कोणतीही लॅव्हिश गोष्ट नाही. मला वाचकांना थोडक्यात सांगायला आवडेल की, आपण आपल्या करियरमध्ये, चांगलं आयुष्य जगण्यासाठी  इतकी दगदग आणि इतकी मेहनत करतो, तर कुठेतरी स्वतःसाठी आणि आपल्या शरीराला त्याचा स्वतःचा असा खास थोडा वेळ देण्याची गरज आहे. स्वतःसाठी घ्या थोडा वेळ, स्वतःच्या शरीराला विश्रांतीसाठी द्या थोडा वेळ... ज्यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटेल. 
           'हेल्थ इज वेल्थ' ही गोष्ट कायम लक्षात ठेवूया. 

गायत्री : क्या बात है…!! मसाज ही कुठलीही  लॅव्हीश  गोष्ट नाही.  कायम चिरतरुण दिसण्यासाठी आणि आपल्या शरीराला कायम ताजतवानं ठेवण्यासाठी योगासनं, सूर्यनमस्कार जसे आपण करू शकतो त्याचप्रमाणे  मसाज करून घेणं हा सुद्धा आवश्यक पर्याय झाला आहे. शरीराला थोडी विश्रांती देणं ही आपल्याला दिनक्रमाची आता एक गरज निर्माण झाली आहे. जी आपण लक्षात घेतली  पाहिजे.   

गायत्री: तुझे तुझ्या व्यवसायातले पुढचे प्लॅन्स काय आहेत?  
अनुप :  क्रिएटिव्ह राहून नवीन शिकत राहण्याचा प्रयत्न करणार आहे. आत्ता 'मसाज थेरेपिस्ट' म्हणून हॉस्पिटल मध्ये सुद्धा  मी जातो आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी वाढवत न्यायच्या आहेत. 

गायत्री : धन्यवाद !!! 'मसाज थेरेपिस्ट' या नात्याने तुझ्याकडून या क्षेत्राबद्दल खूप छान आणि उपयुक्त माहिती मिळाली. 

                माझी लेखणी तर्फे खूप शुभेच्छा !!  






12 comments:

  1. All da Best to Mr. Anoop Thosar.
    Best Regards to Miss.Gayatri Mam

    ReplyDelete
    Replies
    1. Thank u so Much. Anoop here.

      Delete
    2. धन्यवाद राकेश सर...

      Delete
  2. Very nice...I experience that Anoop is a professional & dedicated massage therapist..

    ReplyDelete
    Replies
    1. Thank U so Much Tushar.Anoop Here

      Delete
  3. It is from own experience Anup is well learned professional therapist. I will suggest everybody to take experience.

    ReplyDelete
  4. Thank you so much Vaibhav.Anoop here

    ReplyDelete
  5. खूप छान प्रकारे मसाज नक्की काय असतो आणि तो किती महत्वाचा आहे हे सांगितलं आहे.. हा ब्लॉग वाचल्यानंतर त्याचे कोणते प्रकार आहेत आणि त्याचा कोणाला कसा उपयोग होऊ शकतो हे ही लक्षात आले... Thank you so much अनूप and गायत्री for sharing this blog...

    ReplyDelete
    Replies
    1. Thank U So Much Sayee.Anoop Here.

      Delete
  6. खूप छान प्रकारे मसाज नक्की काय असतो आणि तो किती महत्वाचा आहे हे सांगितलं आहे.. हा ब्लॉग वाचल्यानंतर त्याचे कोणते प्रकार आहेत आणि त्याचा कोणाला कसा उपयोग होऊ शकतो हे ही लक्षात आले... Thank you so much अनूप and गायत्री for sharing this blog...

    ReplyDelete