नमस्कार ...
गायत्री: वेगवेगळे उद्देश डोळ्यासमोर ठेवून साॅफटवेअर तयार केली जातात. तशी निरनिराळ्या कारणांसाठी तू साॅफटवेअर म्हणा किंवा वेबसाईट तयार केली आहेस. अशी एखादी वेबसाईट किंवा प्रोजेक्ट जे तुला तुला मनापासून आवडलं, आणि त्याचा उद्देश पूर्णतः सफल होताना दिसतोय ...असं एखादं लक्षात राहिलेलं प्रोजेक्ट ?
वैभव: तशी सगळी प्रोजेक्ट्क्स माझ्यासाठी खास आहेतच पण मी मघाशी याचा उल्लेख केला, ऑनलाइन लायब्ररीची वेबसाईट केली होती. ते माझ्यासाठी एक वेगळं प्रोजेक्ट होतं. ही वेबसाईट विद्यार्थ्यांना अतिशय उपयोगी पडणारी आहे. ते एक ऑनलाइन पोर्टल आहे. एकूण सगळ्या पुस्तकांची लिस्ट विद्यार्थी तिथे पाहू शकतात. शिवाय कोणतं पुस्तक लायब्ररीत आहे पण आत्ता कोणाकडे तरी वाचनासाठी गेल्यामुळे ते लगेच त्याला मिळू शकणार नाही तर अशी कोणती पुस्तकं आहेत हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजू शकतं. समजा, एखादा विद्यार्थी विशिष्ट पुस्तकं शोधत असेल पण ते लायब्ररीत उपलब्धच नसेल तर विद्यार्थी पुस्तकं सजेस्ट
(suggest) सुद्धा करू शकतात.
गायत्री: वा !! मस्तच..म्हणजे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
आणि मला सांग, तुझं सध्या एका अॅप्लिकेशनवर सुद्धा काम चालू आहे...त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
वैभव: हो, 'कारपूलअरीना.कॉम' असं त्या अॅप्लिकेशनचं नाव आहे. कार शेअरिंग ही संकल्पना त्यात आहे. आपल्याला 'उबेर' आणि 'ओला' सारखे अॅप्स माहित आहेत. त्यांच्या सारखीच पण त्यांच्यापेक्षा थोडी निराळी संकल्पना आहे. आणि याच्या मूळ संकल्पनेचं श्रेय हे रमेश जोशी सरांना जातं. तर, ही 'कारपूलअरीना.कॉम' म्हणजे आपण दुसऱ्यांची गाडी भाड्यावर घेण्यापेक्षा स्वतःची गाडी कार पूल करू शकतो. एक उदाहरण देऊन सांगतो, समजा एखाद्याचं ऑफिस वाशीला आहे. आणि तो रोज गाडीने ऑफिसला जात असेल. तर त्याला स्वतःला पेट्रोल किंवा टोल हे सगळे खर्च साहजिकपणे एकट्यावर पडतात. पण प्रवास सुखाचा होतो कारण, शेवटी तो गाडीतून प्रवास करतो. पण या अॅप्लिकेशनचा फायदा असा की, आपली स्वतःची गाडी आणि चार इतर प्रवासी घेऊन आपण जाऊ शकतो. आपली गाडी शेअर करू शकतो. यासाठी त्या व्यक्तीला फक्त अॅप्लिकेशनवर स्वतःला रजिस्टर करायचं असतं. मग दोन पर्याय असतात, त्यात स्वतःची माहिती आणि गाडीची माहिती असते. ज्याच्याकडे गाडी नाही तो कारपुल केलेली गाडी बुक करेल, आणि ज्याने कारपूल केली आहे तो त्यांना घेऊन जाईल. यात फायदा हा कि कोणतेही ठरवलेले निश्चित असे पैसे नाहीत. यात तो ५०% पैसे घेईल किंवा काहीच घेणार नाही. किंवा ज्याने कार पूल केली आहे तो जे पैसे सांगेल तसे. पण फायदा यात तसा दोघांचा आहे.
गायत्री: अप्रतिम संकल्पना...म्हणजे आता कार शेअर केल्याने जाता येताना कंपनी सुद्धा मिळेल आणि जाण्या- येण्याच्या प्रवासाचा प्रश्न सुद्धा सुटेल.
मुलाखतीच्या शेवटाकडे वळताना मला हे विचारायला आवडेल की,
गायत्री: Trivia Softwares चे पुढचे प्लान्स काय आहेत?
वैभव : आत्तापर्यंत Trivia Softwares इतर कंपन्यांचे साॅफटवेअर्स तयार करत होती. पण आता आम्ही हळूहळू स्वतःचे काही साॅफटवेअर्स तयार करत आहोत. मोबाईल अप्लिकेशन, बिझनेस ऑटोमेशन साॅफटवेअर्स यावर सुद्धा अधिक भर देऊन काम करायचे आहे. आणि आम्ही लवकरच आमचा ईआरपी ब्रँड तयार करणार आहोत. शिवाय ठाण्यात स्वतःच ऑफिस आणि इतर शाखा कोकण भागात काढायचा विचार आहे.
गायत्री: अरे वा!...माझी लेखणीतर्फे तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !!
contact : Vaibhav Shete
TRIVIA SOFTWARES
A1/703 Golden Park, 7th Floor,
pages/Trivia-Softwares/
Website: http://www.triviasoftwares.in
परदेशात शिक्षण घेऊन तिथे नोकरी आणि व्यवसायाच्या संधी असतानासुद्धा ज्याने भारतात येऊन स्वतःचा व्यवसाय सुरु केला आणि
१४ वर्षांचा साॅफटवेअरच्या क्षेत्रातला अनुभव पाठीशी घेऊन आता नवउद्योजकांना काळानुसार त्यांना आवश्यक असणाऱ्या डिजिटल प्रेझेंन्ससाठी जो उद्योजक मदत करत आहे तो म्हणजे ठाण्याचा वैभव शेटे .
जाणून घेऊया Trivia Softwares चा व त्याच्या मेहनतीचा एकूण प्रवास या
या उद्योग सफर भाग -३ मध्ये.
उद्योग सफर भाग -३ मध्ये सर्व वाचकांचं मनापासून स्वागत ....
गायत्री: आज आपल्या प्रत्येकाला आणि विशेषतः उद्योजकला त्याचा डिजिटल प्रेझेन्स कायम ठेवावा लागतो.आणि त्याचसाठी तुझी कंपनी अर्थातच Trivia softwares काम करते. त्याविषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल.
वैभव- खरं सांगायचं तर, आजच्या डिजिटलच्या काळात साॅफटवेअर हे प्रत्येक कंपनीसाठी आवश्यक आहे. मग ती कंपनी लहान असो वा मोठी. पण नवउद्योजकांना स्पर्धात्मक वातावरणात टिकून राहण्यासाठी सुरुवातीला साॅफटवेअर पासून ते संपूर्ण डिजिटल प्रेझेंन्स मध्ये रहाणं आवशयक असतं. मग वेबसाईटपासून त्यांना त्यांच्या क्षेत्राप्रमाणे आवश्यक असणारी साॅफटवेअर तयार करून ती आम्ही त्यांना देतो. यासाठी त्या कंपनीचा एकूण प्रवास आणि आणि भविष्यातील एक्सपांन्शस
(expansions) आम्ही समजून घेतो. बिझनेस ऑटोमेशनशी संबंधित साॅफटवेअर्स आम्ही तयार करतो. मुख्यतः ईआरपी (ERP) आणि सीआरएम (CRM). कारण प्रत्येक कंपनीच्या रिसोर्सेसचं प्लानिंग असतं. आम्ही ईआरपी (ERP) मध्ये त्यांच्या व्यवसायाची संपूर्ण प्रोसेस एका ठिकाणी ऑटोमोटेड करतो. आणि जो मी सीआरएम (CRM) चा उल्लेख केला त्यात कंपनीची कस्टमर रिलेशनशीप मॅनेजमेंटशी संबंधित असलेल्या सेल्स आणि सपोर्ट विभाग (डीपार्टमेंट)मध्ये असलेल्या गोष्टी या वेबसाईट मध्ये आणतो. ज्यामुळे कंपनीला काम करणं अधिक सोपं जातं. त्यांचा वेळ वाचतो. कामाची उत्पादकता वाढते. या सगळ्यात Trivia Softwares काम करते.
गायत्री: तुझ्या कंपनीला चार वर्ष झाली पण तुझा या क्षेत्रातला अनुभव मात्र १४ वर्षांचा आहे. तुझ्या कंपनीला अर्थातच Trivia Softwares ला अनेक वर्षांच्या अनुभवाची उत्तम जोड मिळाली आहे. त्याविषयी काय सांगशील..
वैभव: हो, ते खरं आहे. कारण मी 'बॅचलर इन साॅफटवेअर इंजिनिअरिंग' केल्यावर एक वर्ष अमेरिकेत होतो. आणि शेवटचं वर्ष मी तिथे पूर्ण केलं. इथे आल्यावर आम्ही एक पार्टनरशिप फर्म चालू केली. आणि १० वर्ष ते काम केल्यानंतर मी गेल्या चार वर्षांपासून स्वतःची प्रोप्रायटरी चालू केली. आणि आता Trivia Softwares ला चार वर्ष झाली. १० वर्षांचा अनुभव असल्यामुळे सुरुवात करणं कठीण नव्हतं. पण नवीन सुरुवात असल्यामुळे पुन्हा श्रीगणेशा करताना, नवीन क्लायंट मिळवताना मेहनत घ्यावी लागली. आणि त्याची पूर्ण मानसिक तयारी होतीच.
गायत्री: तू आत्ता म्हणालास की, तू एक वर्ष अमेरिकेत राहून तुझं शिक्षण पूर्ण केलंस. तिथे सुद्धा तुला नोकरीच्या संधी होत्या पण तरीही तू भारतात येऊन तुझी स्वतःची कंपनी सुरु केलीस. त्यावेळी मनात काय विचार होता ?
वैभव: खरतरं, अमेरिकेत मला अनेक संधी होत्या. अगदी नोकरी आणि व्यवसाय सुद्धा तिथे करू शकलो असतो. पण तिथे राहून एक जाणवलं की, तिकडच्या विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय करण्याची भूमिका खूप आहे. तेव्हा मी पण भारतात येऊन, आपल्या देशात येऊन, आपला स्वतःचा व्यवसाय पुढे सुरु ठेवायचा असा विचार केला. तेव्हा नोकरीचा कोणताही अनुभव न घेता मी सुरु केलेला हा व्यवसाय आहे.
गायत्री: नोकरीचा अनुभव नाही पण फक्त आत्मविश्वास आणि ज्ञान या दोन्हीच्या जोरावर तू स्वतःचा व्यवसाय सुरु केलास. हे खरंच कौतुकास्पद आहे. आणि तुझा मायदेशी येऊन काम करण्याचा निर्णय तर त्याहून अधिक...
गायत्री: सगळ्या गोष्टी नवीन असताना तुझ्या व्यवसायात तू काय आणि कशी मेहनत घेत पुढे आला आहेस?
वैभव: अगदी खर सांगायचं झालं तर नवीन contact मिळवण्यापासून मेहनत होती. Rebranding म्हणू शकतो आपण. सुरुवातीचे ६ महिने कठीण होते. पण हळूहळू व्यवसायात जोर पकडला. नवीन ऑफिस, नवा सेटअप केला. आता वेबसाईट डेव्हलपमेंट पासून ते ब्रँडिंग पर्यंत सगळं Trivia Softwares पाहते.
गायत्री: मेहनतीशिवाय कोणत्याच गोष्टीत यश मिळत नाही. पण जेव्हा आपल्या मेहनतीचं फळ दिसायला लागतं, तेव्हा आपल्याला आनंद तर होतोच शिवाय त्या सगळ्या कष्टांना योग्य ती पोचपावती मिळते. एकूण चौदा वर्ष तू साॅफटवेअरच्या क्षेत्रात काम करतो आहेस, मेहनत घेतोयस..असा एखादा प्रसंग किंवा ऑर्डर किंवा एखादं काम जे आजही त्या मेहनतीमुळे तुझ्या कायम आठवणीत राहीलं आहे ?
वैभव: हो, खरचं एक अविस्मरणीय प्रसंग आहे जो मला सांगायला आवडेल. जेव्हा आम्ही ऑनलाईन वेबसाईटचं काम केलं तेव्हा त्या कामातून अजून एका दुसऱ्या कामासाठी विचारणा झाली. आणि ती ऑर्डर आणि कंपनी दोन्ही खूप मोठे होते. त्या कंपनीचं नाव इन्फोमिडीया. आम्ही तेव्हा नुकतीच सुरुवात केली होती. त्या कंपनीसाठी काम करण्यात आमच्यासारखे अनेकजण अर्थातच उत्सुक होते. त्या इतरांचा अनुभव आमच्यापेक्षा नक्कीच तेव्हा अधिक होता. आमचं त्या कंपनीच्या डायरेक्टर समोर प्रेझेंन्टेशन झालं. त्यांना तेव्हा वाटलं कि, ही मुलं नवीन आहेत. त्यामुळे आम्हाला त्यांनी ७ दिवसांचा अवधी दिला. आणि एक प्रायोगिक तत्वावर ते प्रोजेक्ट आम्ही घेऊन गेलो. दिवस रात्र जागून त्या प्रोजेक्ट साठी आम्ही मेहनत घेतली. आणि त्या मेहनतीचं फळ मिळालं. ती ऑर्डर तेव्हा तीन ते चार लाखाची होती.
Trivia Softwares कंपनीने केलेली कामे पुढीलप्रमाणे:
(वेबसाईट) गायत्री: वेगवेगळे उद्देश डोळ्यासमोर ठेवून साॅफटवेअर तयार केली जातात. तशी निरनिराळ्या कारणांसाठी तू साॅफटवेअर म्हणा किंवा वेबसाईट तयार केली आहेस. अशी एखादी वेबसाईट किंवा प्रोजेक्ट जे तुला तुला मनापासून आवडलं, आणि त्याचा उद्देश पूर्णतः सफल होताना दिसतोय ...असं एखादं लक्षात राहिलेलं प्रोजेक्ट ?
वैभव: तशी सगळी प्रोजेक्ट्क्स माझ्यासाठी खास आहेतच पण मी मघाशी याचा उल्लेख केला, ऑनलाइन लायब्ररीची वेबसाईट केली होती. ते माझ्यासाठी एक वेगळं प्रोजेक्ट होतं. ही वेबसाईट विद्यार्थ्यांना अतिशय उपयोगी पडणारी आहे. ते एक ऑनलाइन पोर्टल आहे. एकूण सगळ्या पुस्तकांची लिस्ट विद्यार्थी तिथे पाहू शकतात. शिवाय कोणतं पुस्तक लायब्ररीत आहे पण आत्ता कोणाकडे तरी वाचनासाठी गेल्यामुळे ते लगेच त्याला मिळू शकणार नाही तर अशी कोणती पुस्तकं आहेत हे सुद्धा विद्यार्थ्यांना समजू शकतं. समजा, एखादा विद्यार्थी विशिष्ट पुस्तकं शोधत असेल पण ते लायब्ररीत उपलब्धच नसेल तर विद्यार्थी पुस्तकं सजेस्ट
(suggest) सुद्धा करू शकतात.
गायत्री: वा !! मस्तच..म्हणजे विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.
आणि मला सांग, तुझं सध्या एका अॅप्लिकेशनवर सुद्धा काम चालू आहे...त्याविषयी जाणून घ्यायला आवडेल.
वैभव: हो, 'कारपूलअरीना.कॉम' असं त्या अॅप्लिकेशनचं नाव आहे. कार शेअरिंग ही संकल्पना त्यात आहे. आपल्याला 'उबेर' आणि 'ओला' सारखे अॅप्स माहित आहेत. त्यांच्या सारखीच पण त्यांच्यापेक्षा थोडी निराळी संकल्पना आहे. आणि याच्या मूळ संकल्पनेचं श्रेय हे रमेश जोशी सरांना जातं. तर, ही 'कारपूलअरीना.कॉम' म्हणजे आपण दुसऱ्यांची गाडी भाड्यावर घेण्यापेक्षा स्वतःची गाडी कार पूल करू शकतो. एक उदाहरण देऊन सांगतो, समजा एखाद्याचं ऑफिस वाशीला आहे. आणि तो रोज गाडीने ऑफिसला जात असेल. तर त्याला स्वतःला पेट्रोल किंवा टोल हे सगळे खर्च साहजिकपणे एकट्यावर पडतात. पण प्रवास सुखाचा होतो कारण, शेवटी तो गाडीतून प्रवास करतो. पण या अॅप्लिकेशनचा फायदा असा की, आपली स्वतःची गाडी आणि चार इतर प्रवासी घेऊन आपण जाऊ शकतो. आपली गाडी शेअर करू शकतो. यासाठी त्या व्यक्तीला फक्त अॅप्लिकेशनवर स्वतःला रजिस्टर करायचं असतं. मग दोन पर्याय असतात, त्यात स्वतःची माहिती आणि गाडीची माहिती असते. ज्याच्याकडे गाडी नाही तो कारपुल केलेली गाडी बुक करेल, आणि ज्याने कारपूल केली आहे तो त्यांना घेऊन जाईल. यात फायदा हा कि कोणतेही ठरवलेले निश्चित असे पैसे नाहीत. यात तो ५०% पैसे घेईल किंवा काहीच घेणार नाही. किंवा ज्याने कार पूल केली आहे तो जे पैसे सांगेल तसे. पण फायदा यात तसा दोघांचा आहे.
गायत्री: अप्रतिम संकल्पना...म्हणजे आता कार शेअर केल्याने जाता येताना कंपनी सुद्धा मिळेल आणि जाण्या- येण्याच्या प्रवासाचा प्रश्न सुद्धा सुटेल.
मुलाखतीच्या शेवटाकडे वळताना मला हे विचारायला आवडेल की,
गायत्री: Trivia Softwares चे पुढचे प्लान्स काय आहेत?
वैभव : आत्तापर्यंत Trivia Softwares इतर कंपन्यांचे साॅफटवेअर्स तयार करत होती. पण आता आम्ही हळूहळू स्वतःचे काही साॅफटवेअर्स तयार करत आहोत. मोबाईल अप्लिकेशन, बिझनेस ऑटोमेशन साॅफटवेअर्स यावर सुद्धा अधिक भर देऊन काम करायचे आहे. आणि आम्ही लवकरच आमचा ईआरपी ब्रँड तयार करणार आहोत. शिवाय ठाण्यात स्वतःच ऑफिस आणि इतर शाखा कोकण भागात काढायचा विचार आहे.
गायत्री: अरे वा!...माझी लेखणीतर्फे तुला पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा !!
contact : Vaibhav Shete
TRIVIA SOFTWARES
A1/703 Golden Park, 7th Floor,
Near Majiwada Flyover
L.B.S.Marg, Thane
Maharashtra, India 400601
Tel: 91-22-4131 8100
Mobile: 9702 837301
Facebook: https://www.facebook.com/L.B.S.Marg, Thane
Maharashtra, India 400601
Tel: 91-22-4131 8100
Mobile: 9702 837301

thanks
ReplyDelete