नमस्कार
वाचक मंडळी,
तुम्हाला
आठवत असेल काही महिन्यांपूर्वी मिट्टीकुल या कंपनीची माहिती देणारा ब्लॉग आपण
वाचला होतात. आजच्या ब्लॉगमधून या कंपनीच्या
उत्पादनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
उत्पादनांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
मिट्टीकुल
कंपनीकडून तयार होणारी मातीची भांडी खरतरं अनेक आहेत. त्यांच्याकडे पन्नास पेक्षा अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या
मातीच्या वस्तू तयार होतात. गुजरात मधील मनसुखभाई
प्रजापती यांनी १९८८ मध्ये मातीचा तवा
तयार करणारी फॅक्टरी उभी केली. पण २६ जानेवारी २०००
साली गुजरात मध्ये झालेल्या मोठ्या भूकंपामुळे त्या सगळ्या साठ्याचं
नुकसान झालं. पण तरी न डगमगता पुन्हा एकदा नवी सुरुवात झाली आणि २००४ साली त्याच
तुटलेल्या मातीच्या साठ्यातून मातीचा फ्रिज जन्माला
आला. ज्याची आज जगभरात पसंती आहे. ज्या वस्तूने स्वतःची खास ओळख निर्माण केली आहे आणि ज्याच्या निर्माण होण्यातच एक वेगळेपणा आहे
त्याविषयी आज सुरुवातीला लिहिणार आहे.
मातीचा
फ्रिज
जर आपण
आपल्या घरी मातीचा फ्रिज आणणार असू तर आपल्याला जागेची सोय करता यावी व त्याचा
अंदाज यावा म्हणून ही संपूर्ण माहिती या ब्लॉग मधून:
मातीचा कुकर
मातीच्या
फ्रिजची उंची- २७ इंच आणि रुंदी- १५ इंच इतकी
असून ५० लि.इतकी या फ्रिजची क्षमता आहे. भाज्या आणि फळे या फ्रिजमध्ये ५ ते ६ दिवसांपर्यंत व्यवस्थित राहतात. आणि शिजवलेलं अन्न २४ तासांपर्यंत टिकू शकतं.
आता
आपल्याला प्रश्न पडला असेल की, हा फ्रिज नक्की काम कसं करतो? रेफ्रिजरेटर
बाष्पीभवनाच्या तत्त्वावर काम करतं. त्याच्या शिरोभागी आणि तळाशी एक टाकी आहे आणि तिची धारणक्षमता अंदाजे 20लि. पाण्याइतकी
आहे. खाद्यपदार्थ व्यवस्थित राहावेत यासाठी एक स्वतंत्र कप्पा सुद्धा त्यात आहे. उन्हाळ्यात थंडगार पाण्यासाठी जशी मातीची मडकी वापरतात त्याचप्रमाणे फ्रिजमधील या पाण्याच्या टाक्या फ्रिजच्या आतील सर्व बाजूंना थंड ठेवतात. फ्रिजच्या शिरोभागी टाकी आहे, त्यामुळे टाकीतील पाणी सर्व बाजूंना ओघळतं आणि तेव्हा तिथली उष्णता खेचून घेत असल्याने फ्रिजचा अंतर्गत(आतील) भाग थंड राहतो. त्यामुळे जास्तीत-जास्त दिवस अन्न टिकून राहण्याची शक्यता वाढते. यात पांढऱ्या रंगाचा फ्रिज उपलब्ध होऊ शकतो.
आहे. खाद्यपदार्थ व्यवस्थित राहावेत यासाठी एक स्वतंत्र कप्पा सुद्धा त्यात आहे. उन्हाळ्यात थंडगार पाण्यासाठी जशी मातीची मडकी वापरतात त्याचप्रमाणे फ्रिजमधील या पाण्याच्या टाक्या फ्रिजच्या आतील सर्व बाजूंना थंड ठेवतात. फ्रिजच्या शिरोभागी टाकी आहे, त्यामुळे टाकीतील पाणी सर्व बाजूंना ओघळतं आणि तेव्हा तिथली उष्णता खेचून घेत असल्याने फ्रिजचा अंतर्गत(आतील) भाग थंड राहतो. त्यामुळे जास्तीत-जास्त दिवस अन्न टिकून राहण्याची शक्यता वाढते. यात पांढऱ्या रंगाचा फ्रिज उपलब्ध होऊ शकतो.
मातीच्या
फ्रिजची किंमत रु. 5000/- ते रु.6000/-
ही वस्तू
तर आपल्या स्वयंपाकघराचा
महत्त्वाचा घटक आहे. मिट्टीकुलच्या कुकरची उंची- १२.५ इंच, रुंदी-११ इंच इतकी आहे.
हा
कुकर एका मातीच्या प्रकारापासून बनविलेला आहे. त्यात अन्न शिजविताना निर्माण होणारा
अतिरिक्त वायुदाब बाहेर सोडण्यासाठी त्यावर शिटी बसविली आहे. कुकरच्या मागे ते
धरण्यासाठी एक दांडी असून त्याचं झाकण व्यवस्थित बंद होण्यासाठी त्याला दोन पकड आणि रबर रींग आहेत. लाल रंगात
आपल्याला हा पाहायला मिळतो. याची क्षमता- 3 लि.
इतकी आहे.
किंमत दर- रु.900/- ते रु.1000/-
सर्वात
महत्त्वाचे म्हणजे मातीची भांडी आपण आपल्या रोजच्या दिनक्रमात वापरू लागलो तर
आपल्याकडून पर्यावरणाला कमालीचा हातभार लागणार आहे. पर्यावरणदृष्ट्या असणारे महत्त्व लक्षात घेऊन मिट्टीकुल या कंपनीने त्यांची उत्पादनं इकोफ्रेंडली
बनवली आहेत.
वाचकहो, लिहिता लिहिता पटकन मनात आलं...कदाचित थोडं भावनिक वाटेल पण भावना मात्र
खरी आहे. तुम्ही पण विचार करून पाहा, निसर्ग आपल्याकडे
काहीही न मागता आपल्याला खूप काही देत असतो. याकडे आपलं लक्ष कधीच जात नाही. कारण आज आपण सगळेच करियर, पैसा, स्थैर्य याचं विचारात कायम जगत असतो. यात
चूक काही नाही. पण आपण जिथे राहतो त्या समाजासाठी आणि निरपेक्ष अशा निसर्गासाठी
आपण काहीतरी केलचं पाहिजे. कारण ती आपली नैतिक जबाबदारी आहे. आज धावपळीमुळे आपण
फार काहीच करू शकत नसलो तरी मातीची भांडी वापरून किंवा कोणाला भेट म्हणून देऊन आपण
एकप्रकारे पर्यवरणासाठीच काम करत असल्याचा भास तुम्हाला होईल. ते एक वेगळं समाधान
आपल्या मनात राहील...म्हणतात ना, काहीच न करण्यापेक्षा
काहीतरी केलेलं नक्कीच चांगलं.
आज रवी प्रजापती आणि राज प्रजापती मिट्टीकुल कंपनीचा सर्व कारभार पाहतात. त्यांच्या
एकूण पद्धतींविषयी बोलताना राज प्रजापती म्हणाले की,''आम्ही
जी माती वापरतो ती नैसर्गिक माती असते, ती refine केली जाते, कोणत्याही प्रकारे केमिकल राहणार
नाही याची विशेष काळजी घेतली जाते. त्याचं व्यवस्थित टेस्टिंग आम्ही नेहमी करतो
आणि मातीची सगळी भांडी कशी सुंदर दिसतील तसेच त्याचा वापर सोपा कसा होईल यासाठी आम्ही
प्रयत्नशील असतो.”
पुढच्या
ब्लॉग मध्ये आपण नॉन
स्टिक तवा, माठ, पाण्याची बाटली,साधा तवा या उत्पादानंविषयी अधिक जाणून घेऊ.
Contact :
info@mitticool.com
Mobile Android App- Mitticool
http:mitticool.com




gooood one
ReplyDelete