नमस्कार वाचक मंडळी.. कसे आहेत?
आता दर रविवारी 'माझी लेखणी' तुमच्यासाठी घेऊन येणारे..प्रवासाचे काही खास अनुभव...
प्रवास करताना आलेले विचार, आलेले अनुभव, आवडलेल्या तर कधी गमतीशीर वाटलेल्या गोष्टी, कधी एखाद्या ठिकाणाविषयी, तर कधी अमेरिकेतल्या चालीरीती, पद्धती, इथले शिष्ठाचार, वेगवेगळे खाण्याचे पदार्थ, इथली माणसं, इथलं वातावरण .... अशा अनेक पैलूंना एकत्र करून 'मी पाहिलेली अमेरिका' ही ब्लॉग सिरीज घेऊन येतेय..खास माझ्या वाचकांसाठी.
आणि हो..या सगळ्यात तुम्ही सुद्धा सहभागी होणार आहात. कारण या सिरीज मध्ये आपण सगळे कायम एकत्र प्रवास करणार आहोत..आणि प्रवास म्हंटलं की प्रवासात गप्पा गोष्टी या आल्याचं... त्यामुळे मी प्रत्येक सिरीज नंतर माझ्या मनातले प्रश्न, माझे काही विचार तुमच्यासोबत शेअर करीन.. त्यात तुमचे विचार आणि तुमचे अनुभव मला सांगत राहा...
थोडक्यात सांगायचं तर, माझ्या लेखणीतून होणारा संवाद आणि तुमच्या अभिप्रायांमधून होणारा संवाद एकत्र करून आणि अर्थात सोबत घेऊन मला हा प्रवास करायला आवडेल..
आणि हो..या सगळ्यात तुम्ही सुद्धा सहभागी होणार आहात. कारण या सिरीज मध्ये आपण सगळे कायम एकत्र प्रवास करणार आहोत..आणि प्रवास म्हंटलं की प्रवासात गप्पा गोष्टी या आल्याचं... त्यामुळे मी प्रत्येक सिरीज नंतर माझ्या मनातले प्रश्न, माझे काही विचार तुमच्यासोबत शेअर करीन.. त्यात तुमचे विचार आणि तुमचे अनुभव मला सांगत राहा...
थोडक्यात सांगायचं तर, माझ्या लेखणीतून होणारा संवाद आणि तुमच्या अभिप्रायांमधून होणारा संवाद एकत्र करून आणि अर्थात सोबत घेऊन मला हा प्रवास करायला आवडेल..
अनोळखी, अपरिचित आणि नवीन
![]() |
| भारतातून निघताना... काही 'हळवे' तरी 'हसरे' क्षण |
सगळे फोनवर विचारायचे...'झालीस का adjest?' 'झालीस का सेटल?'...तेव्हा मी उत्तर द्यायचे.. होतेय हळू हळू. आणि माझ्याही नकळत सांगायचे..मला काय काय आणि किती किती गोष्टी इथे नव्या वाटत आहेत.तेव्हा जाणवायचं किती गोष्टी नवीन आहेत माझ्यासाठी..
त्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला नव्या वाटत होत्या हे तर खरं पण काही प्रमाणात अपरिचित आणि काहीश्या अनोळखी सुद्धा. अगदी पावलोपावली हा अनुभव सुरुवातीच्या काळात आला.
एका ध्रुवावरून दुसऱ्या ध्रुवावर आले, सात समुद्र पार झाले. देश बदलला आणि सगळंच बदलत गेलं. तेव्हा अशा गोष्टी घडत गेल्या ज्याचा विचारचं मी आयुष्यात पहिल्यांदी करत होते .
प्रत्येक देशाचे काही अलिखित नियम असतात.. रीतिरिवाज, चालीरीती असतात. त्यामुळे ही गोष्ट कशी करू आणि इथे कसं असतं यापासून विचारांची मालिका सुरू झाली थेट लंडन विमानतळापासूनच. २ तासांचा हॉल्ट होता.
बऱ्यापैकी माणसांच्या आणि दुकानांच्या गर्दीने भरलेलं एअरपोर्ट.
वेगवेगळ्या देशातली आणि वेगळी दिसणारी माणसं मी त्या ठिकाणी पहिल्यांदी पाहात होते.
भूक लागली म्हणून खायला घेणार तर पदार्थ सगळेच वेगळे. भाषा जरी इंग्लिश असली तरी भरभर काय बोलतायत ते काही कळेना. ![]() |
| लंडन विमानतळावर ब्रेकफास्ट करताना |
असं सगळं असलं तरी मनात येत होतं, हे सगळंच मला खूप 'अनोळखी' आणि 'अपरिचित' वाटतंय असं अनेक ठिकाणी मला जाणवत होतं. फ्लाईटमध्ये काही हवं असेल तर एअर होस्टेसला बोलवण्यासाठी बटण असतं. सीट बेल्ट बांधण्यापासून ते एअरपोर्ट मध्ये कुठून कुठे कसं जायचं हे सुद्धा माहित नव्हतं. त्यानंतर 'लंडन टू सिऍटल' हा प्रवासही खूप छान झाला.
सिऍटल एअरपोर्ट पासून घरा पर्यंतचा प्रवास कसा वाटला ते तुम्ही वाचू शकाल पुढच्या भागात म्हणजेच पुढच्या रविवारी.
जात जाता ... हा प्रश्न
'अनोळखी, अपरिचित आणि नवीन' अशा मिश्र भावनांचा तुमचा कधी प्रवास झाला आहे का? अनुभव ऐकायला आवडेल.




मी नुकतीच ताईकडे लंडनला जाऊन आले त्यामुळे तू जसे वाटले अगदी तसाच अनुभव मी ही नुकताच घेतला.ताईकडून अनेक गोष्टी ऐकल्या तरी प्रत्यक्षात अनुभवताना वेगळंच वाटलं.
ReplyDeleteम्हणजे असा अनुभव घेणारी मी एकटी नाही तर... मला आधी असं वाटलं होतं.
Deleteधन्यवाद अभिप्राय सांगितलंस त्याबद्दल..
येत्या भागात मी तुझ्या या अनुभवाचा नक्की उल्लेख करीन .
Khup chan gayu mast anubhav mi kalala us madil anubhav ha sudha doghni jani cha manatil ?? 1 hote manatil vichar blog superb chan vachatana majja ali
ReplyDeleteमनापासून आभारी आहे.. पण मला तुमचे नाव दिसत नाहीये. unknown म्हणून आले आहे. कृपया आपले नाव कळले तर बरं होईल.
Deleteगायत्री खूप छान लिहलं आहेस. पुढल्या रविवारची वाट पाहते आहे.
ReplyDeleteस्मृती खाडिलकर
मनापासून आभारी आहे.. या रविवारच्या भागाचा विषय आता पोस्ट करीन.
DeleteI dont know how to type in Marathi but still, great work..keep it up.. hope USA will keep giving you new and nice experiences to write about. Keep sharing.✍️
ReplyDeleteYes... Thanku Gaurav. For me... everything is new.. thats why every new thing is subject for me to write..once again thnku.
DeleteSuperb. Looking forward to next Sunday's blog.. Keep it up. Lots of love from India 😍
ReplyDeletehey really thnku dear.. Writing next blog..
Deleteफार सुंदर ब्लॉग. गायत्री छान लिहितेस. मी भाग २ वाचायला उत्सुक आहे. तुझ्या ब्लॉग लेखनाला हार्दिक शुभेच्छा. यू ट्यूब वर या ब्लॉगचं अभिवाचनही तू छान केलंस.
ReplyDeleteमनापासून आभारी आहे.. या रविवारच्या भागाचा विषय आता पोस्ट करीन. अभिवाचन आवडले.. ऐकून छान वाटले. आणि हो.. आरजे म्हणून fm gold वर काम करताना सुद्धा तुम्ही नेहमी शुभेच्छा आणि अभिप्राय द्यायचात ... त्याबद्दल सुद्धा धन्यवाद
DeleteGayatri khup chan lihilays.... Pudhachya Sunday chi wat baghatey aata...
ReplyDeleteमनापासून आभारी आहे.. पण मला तुमचे नाव दिसत नाहीये. unknown म्हणून आले आहे. कृपया आपले नाव कळले तर बरं होईल.
DeletebaaLat asnyat kay majja aste na
ReplyDelete