जंगल बुक – जंगल गप्पा - भाग १.
मैत्रेयी : hello गायत्री, काय करतीयेस? ( संध्याकाळी ६
वाजता केलेला फोन)
गायत्री : बोला Madam....काय म्हणताय? आज हमारी याद
कैसे?
मैत्रेयी: भेटूया का ? मी जिमखान्यावर जातेय....
गायत्री: अरे वा...जा जा...
मैत्रेयी: जा जा नाही...तू पण चल. तुला खोट्या AC मधून
बाहेर काढून natural AC मध्ये घेऊन जाण्याची जबाबदारी मला निसर्गाने दिली आहे...
गायत्री: (हाह्हाहा) होss का? बरं...लहान मुलांपुढे तसही
मोठ्यांच काही चालत नाही...ऐकावं लागणार.
मैत्रेयी : आत्ता कसं....मनातलं बोललीस...
गायत्री: हं राहूदेत...बास आता. बरं ऐक... हातात घेतलेलं
काम पूर्ण करते. मला ऑफिसच्या खाली भेट.
( डोंबिवली जिमखाना....मोठा परिसर....संध्याकाळची ताजतवान
करणारी हवा...अनेक आजी –आजोबा वेळ घालवण्यासाठी त्यांच्या मित्र मैत्रिणींसोबत
गप्पा मारण्यात दंग...काही तरुण मंडळी कानात आजकालचा आवडता अलंकार घालून जॉगिंग करण्यात मग्न...काही
जण संध्याकाळच्या मोकळ्या हवेत व्यायाम करत्यात...जॉगिंग ट्रेकच्या मध्यभागी
क्रिकेटच लहान मुलाचं ट्रेनिंग चालू आहे...अशा गजबजलेल्या तरी अजिबात गर्दी गोंधळ
न वाटणाऱ्या वातावरणात गायत्री आणि मैत्रेयी पाय मोकळे करायला जातात.)
गायत्री : wow....मस्त वाटतंय. एकदम फ्रेश...आवडला तुझा
natural AC.
मैत्रेयी: नशीब माझं. गायत्री....ही हवा एवढी आवडते तर खऱ्याखुऱ्या
निसर्गात कधीच का येत नाहीस गं...?
गायत्री: कारण सांगणारच नाही....मला माहितेय ओरडशील मला.(हाहाहा)
मैत्रेयी: तुला वेळ नाही हे कारण तर मी गृहीतच धरलं आहे.
गायत्री: अगं राणी...नाही गं. मला आवडेल. पण याबाबतीत मी
जरा घाबरट आहे. ते ट्रेकिंग...गड चढणं... बापरे !!! त्यात ते तू जातेस तसं जंगल
सफारी वगैरे तर शक्यच नाही...
मैत्रेयी: अगं....जंगल घाबरण्याची गोष्ट नाहीये. ती तर
एन्जोय करण्याची गोष्ट आहे.
गायत्री: enjoy ????? ( जरा आश्चर्याने )
मैत्रेयी: हो...खरचं. अशा निसर्गात गेलो की, आपले दृशिकोन
बदलतात. चाकोरीबाहेरचं जग आपण जवळून पाहू शकतो....तुला तुझ्या सोप्या भाषेत
सांगायचं तर तुला लिहायला खूप विषय मिळतील...
गायत्री: काय सांगतेस ??? खरचं ? उगाच नाही ना बोलतेस...
मैत्रेयी: अजिबात नाही....
गायत्री: ह्म्म्म...तो सोचना पडेगा....(सर्व गप्पा ...चालता चालता)
पण मला सांग...दृशिकोन बदलेल म्हणजे काय?
मैत्रेयी: see...तू म्हणालीस मघाशी की, जंगल सफर करायला
तुला भीती वाटेल... अगं पण तू त्या प्रवासाला जंगल सफर म्हणून पहात्येस...
बर ते सोड.. मला सांग, जंगलाची व्याख्या तू काय करशील ?
जंगल म्हणजे काय ?
गायत्री: ammmm....जंगल म्हणजे जंगल...प्राणी, पक्षी, मोठी
झाडं, झुडूपं असं बरच काही.
मैत्रेयी: हे आहेच...पण फक्त याच गोष्टी म्हणजे जंगल नाही...यापेक्षा
कितीतरी वेगळ्या गोष्टी सुद्धा यात आहेत...त्या वेगळ्या गोष्टी आपल्याला तेव्हाच
दिसतात जेव्हा आपल्याला जंगल वाचता येत.
गायत्री: जंगल वाचता येत म्हणजे???? (खूपच आश्चर्याने...आणि
आता कुतूहल सुद्धा)
मैत्रेयी: जंगल दोन प्रकारे पाहता येतं. तू vertically जंगल पाहू शकतेस किंवा horizontally .
गायत्री: ohhhhh...yahhh. Interesting.
मैत्रेयी: जेव्हा तू vertically जंगल पाहशील तेव्हा तुला
छोट गवत, मोठ गवत, वेली, ओर्कीडस दिसतील...आणि horizontally पाहशील तेव्हा तलाव, डोंगर,
माळरान अशा गोष्टी....
गायत्री: हो यार.... मैत्रेयी...this is quite
interesting.
मैत्रेयी: मगं आहे की नाही..... Interesting. उगाचं घाबरतेस. म्हणजे
मुद्दा एवढाच की, हे सगळ मिळून बनतं ते जंगल. आणि जंगल वाचता आलं की खूप मजा
येते....
गायत्री: तू जे म्हणतेयस ना की, जंगल वाचता आलं पाहिजे.. ते
माझ्या डोक्यात बसलयं आता...पण खरं सांगू तर म्हणजे नेमकं काय हे काही माझ्या
छोट्याश्या मेंदूला अजून कळलं नाहीये हा भाग वेगळा. (हाहाहा) पण हा विषय आवडलाय...
मैत्रेयी: ते आपण प्रत्यक्ष जाऊ तेव्हाच कळले madam...असं
जिमखान्यावर फेऱ्या मारता मारता जंगल कसं वाचू शकशील....( हाहाहा)
गायत्री: हाहाह.....hmmmm. ये भी सही है!!!
आता तू मला सांग....तू इतकं फिरली आहेस....तू जंगलाची
व्याख्या काय करशील?
मैत्रेयी: good question dear...but sorry. मी तुला याचं उत्तर देणार
नाहीये.
गायत्री: का ??????????????? (खूप मोठ्या आवाजात)
मैत्रेयी: अगं ee....हळू नां...किती मोठ्याने !! मी तुला इतक्या
लगेच तरी सांगणार नाहीये. कारण तू विचार करायचा थांबवशील..
गायत्री:: बरं माझे आई....जशी आपली इच्छा.
मैत्रेयी: धन्यवाद !! ते असो...मी मघाशी सांगत होते की,
जंगलात अगदी वाळवीपासून हत्तीपर्यंत मगं अगदी बुरशी, वाघ, हरीण,कीटक अशा कितीतरी
गोष्टी आहेत जंगल या ३ अक्षरात.
गायत्री: जायला पाहिजे गं एकदा.....
मैत्रेयी: नक्कीच जायला पाहिजे....आणि गायत्री, अजून एक मला सांग wild म्हणजे काय?
गायत्री: हा काय प्रश्न झाला....wild म्हणजे वन्य
प्राणी...वाघ, सिंह, हत्ती सगळे मोठे मोठे प्राणी....
मैत्रेयी: no dear....जे प्राणी आपण पाळू शकत नाही ते
wild....मगं यात अगदी डास सुद्धा येतो.
गायत्री: काय ?? डास wild animal मध्ये मोडतो ?
मैत्रेयी: मोडतो नाही गं उडतो....hahah
गायत्री: eee गप गं. पकाऊ विनोद नको. मैत्रेयी....जाऊया गं,
एखाद्या जंगलात. मला तर असं पक्क वाटतंय आता की, माझे खूप दृष्टीकोन
बदलतील....नवीनच माहिती मिळेल मला...आणि तू जे म्हणतीयस ते जंगल वाचता सुद्धा
येईल.....
मैत्रेयी: बघ हां....नंतर plan chnage नाही करायचा. मग show
आहे..काम आहे...वगैरे कूच नही चलेगा...आणि घाबरायचं तर अजिबात नाही.
गायत्री: म्हणजे आपण जंगलात जातोय हे पक्का ना...
मैत्रेयी: जाऊया....अरण्य वाचन काय आहे....हे actually पाहता येईल तुला.
गायत्री: चल...आता आधी डोंबिवलीतला आपापल्या घरातला रस्ता
वाचूया का...
मैत्रेयी: hahah...हो. चलं...मी सोडते तुला पटकन गाडीने..चलं.
( आता गायत्री आणि मैत्रेयी कोणत्या ठिकाणी जायचं...कधी
जायचं या सगळ्या गोष्टी ठरवत ठरवत
गाडीवरून जातात....)
वाह... सुरुवात तर झकास झालेली आहे..!!पुढच्या गप्पा वाचायच्या(!) आहेत आता पटकन...!!
ReplyDeleteवाह... सुरुवात तर झकास झालेली आहे..!!पुढच्या गप्पा वाचायच्या(!) आहेत आता पटकन...!!
ReplyDeletenice start ..
ReplyDelete.. font रेखीव असेल तर बरं .. italic वाचायला त्रास होतो
अजून एक ..
Deleteचित्र / फोटो / स्केचेस .. असं काही सोबतीला असेल तर बरं !
Very Interesting...Eager to read next....
ReplyDelete