हाय फ्रेंड्स, आज मी थोड्या वेगळ्या विषयवार या ब्लॉग मार्फत तुमच्याशी बोलणार
आहे.
नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने आपली वेगवेगळ्या क्षेत्रातल्या व्यक्तींशी ओळख
किंवा भेटीगाठी होत असतात. मलाही माझ्या व्यवसायामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात काम
करणाऱ्या व्यक्तींना भेटता येतं.
त्याचं एका वेगळ्या भेटीविषयी आणि पर्यायाने
लक्षात राहिलेल्या त्या अनोख्या क्षेत्राविषयी आज मी ब्लॉग लिहिणार आहे.
कदाचित हे
क्षेत्र तुम्हाला नवीन नसेल.पण म्हणतात ना, काही वाक्य आपल्या डोक्यात इतकी बसतात
कि त्याविषयी विचार करावा, किंवा माझ्याबाबतीत सांगायचं झालं तर लेखणी घेऊन ते सरळ
लिहून काढावं अशी भावना येते. तर असो, मूळ मुद्याकडे वळते....आणि त्यासाठीच हा
ब्लॉग.
आपल्या शरीरातल्या महत्त्वाच्या ज्ञानेंद्रीयांपैकी एक म्हणजे अर्थातच ‘डोळा’. अतिशय नाजूक, सतेज, बोलका
आणि जन्मानंतर जगाशी ओळख करून देणारा अवयव. अशा तर अनेक आणि हव्यातेवढ्या त्याच्या
व्याख्या करता येतील. पण दुर्दैवाने काही जणांच्या बाबतीत हाच डोळा जेव्हा
आयुष्यात अर्धवट साथ देऊन अचानक निघून जातो तेव्हा त्याचं काय होत असेल?? अंगावर
काटा उभा राहतो. कधी अपघाताने तर कधी आजारामुळे आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर जेव्हा
डोळे काही कारणामुळे निकामी होतात तेव्हा त्या व्यक्तीचं खरचं काय होत असेल?? कालपर्यंत दिसणाऱ्या गोष्टी आज आपण पाहू शकत नाहीयोत.
बापरे !! विचारही करता येत नाहीये. असं म्हणताना जन्मतः अंध असणाऱ्या
व्यक्तींबद्दल सहानुभूती नाही असं अजिबात नाही. पण त्यांनी स्वतःहून त्यांच्या आयुष्यातलं
सत्य – FACT स्वीकारलेली असते. आणि दिसत नसतानाही दूरदृष्टी ठेवून त्यांनी त्यांच्या
आयुष्यातली प्रगतीची वाट धरलेली असते.
कधी ऐन तारुण्यात तर कधी बालपणीच, कधी अपघाताने तर कधी गंभीर अशा आजाराने
जेव्हा एक डोळा किंवा दोन्ही डोळे गमावलेल्यांची स्थिती वाईट म्हणण्यापेक्षा
विचित्र होऊन जाते. ना धड त्यांना पुढे जाणं शक्य होत ना धड मागे.पण तुमच्या मनात
विचार येईल कि आता मेडीकल सायन्स/ वैद्यकीय शास्त्र इतकं पुढे गेलं आहे की या
सगळ्या गोष्टी बऱ्या होऊ शकतात. पण तरी काही वेळा केसेस पूर्णपणे बऱ्या होण्याची
शक्यता कधी कधी कमी असते. मग पुन्हा चिंता, काळजी आणि मनातल्या दु:खाची तर कशाशीच
तुलना होऊ शकत नाही. शिवाय आत्मविश्वास जातो, भीती निर्माण होते, एकाच डोळ्याने
दिसत असल्यामुळे चेहरा वेगळा दिसायला लागतो, एवढच नाही तर करीयर, लग्न यात अडचणी
यायला सुरुवात होते. अडचणींची रांग लागते असं म्हटलं तरी अतिशोयोक्ती ठरणार नाही.
कारण असं म्हटलं जात की, शारीरिक दुखापतीपेक्षा मानसिक दुखापत जास्त वेदना देते.
आणि यामध्ये तर दोन्ही गोष्टींच्या वेदना एकाच वेळी जाणवत असतात.
खरतरं हे सगळ
लिहिण्याचा हेतू म्हणजे एका कार्यशाळेच्या निमित्ताने नव्या मैत्रिणीशी ओळख
झाली. Ocularist ऐश्वर्या जुवेकर. आपापल्या क्षेत्रांविषयी बोलताना गप्पा रंगत होत्या. आणि
“डोळा” हा विषय शिवाय वर लिहिलेल्या बऱ्याच गोष्टींचा सारांश आमच्याही बोलण्यात आला
तेव्हा आमच्याच गप्पा हळू हळू गंभीर होत गेल्या. कारण, विषय अर्थातच तेवढा गंभीर
होता. पण बोलता बोलता ती म्हणाली की, 'जेव्हा पेशंटचे सगळे प्रयत्न करून सुद्धा
हवा तसा मार्ग मिळत नाही तेव्हा शेवटचा पर्याय राहतो तो Cosmetic Appearance चा.
याचाच अर्थ असा की, जर काही कारणांमुळे Eye Translpant होणं कठीण असणार आहे. सगळे
प्रयत्न करून आता मात्र काहीच उपाय दिसत नाहीये. मग आता करणार तरी काय? जे आहे ते
स्वीकारावं लागणार...असा विचार त्यांच्या मनात येतो. चेहऱ्यामध्ये झालेला बदल आणि
कुठेही वावरताना वाटणारी भीती किंवा लाज या सगळ्या गोष्टी आता आयुष्याचा भाग
बनणार...पण यावेळी Cosmetic Appearance हा एक उत्तम पर्याय असू शकतो याची कल्पना सर्वांना
नसते.
Cosmetic Appearance या पर्यायानुसार नवीन लावलेला कृत्रिम डोळा हा नेहमीच्या डोळ्यासारखाचं तयार केला
जातो. आपण हसलो कि डोळाही हसतो, रडतो आणि थोडक्यात म्हणजे बोलका होतो. ह्या
कृत्रिम डोळ्याची लेन्स प्रमाणे कालघाड होते. १५ दिवसातून एकदा हा लेन्स प्रमाणे
दिसणारा कृत्रिम डोळा काढता घातला येतो. या कृत्रिम डोळ्याची सुद्धा हालचाल व्यवस्थित होऊ शकते. कधी कधी रेडीमेड डोळा घेण्याकडे सुद्धा अनेकांची पसंती असते.
तज्ञांच्या मते, 'स्वच्छतेच्या दृष्टीने आणि इतर फायदे लक्षात घेता Custom Eye बनवून घ्यायला जास्त पसंती
असते'.
आज याच क्षेत्रात काम करणाऱ्या मैत्रिणीशी ओळख झाल्यामुळे माझ्या सर्व
वाचकांपर्यंत ही माहिती मी पोहचवत आहे.
Ocularist ऐश्वर्या जुवेकर हिच्याविषयी सांगायचं झालं तर ती स्वतः या क्षेत्रात गेली
चार ते पाच वर्ष अतिशय प्रामाणिकपणे आणि मनापासून काम करतेय. Optometry चं शिक्षण
घेण्यापूर्वी कॉलेजमध्ये तिच्या सिनियरकडून कृत्रिम डोळे(Artificial eye) बसवण्याची प्रक्रिया आणि
पद्धत तिने पहिली.
आणि त्यानंतर त्या पेशंटचा नीटस झालेला चेहरा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या चेहऱ्यावर झालेला आनंद पाहून तिने याच क्षेत्रात करियर करायचा निर्णय घेतला. आजपर्यंत तिने अनेक केसेस
यशस्वी केलेल्या आहेत. तिच्याकडे अगदी दूर दूर वरून पेशंट येत असतात. पेशंटची
मानसिकता समजून घेऊन त्यांना सांभाळून ती हे अतिशय मोठं काम या क्षेत्रात करते आहे.
आज तिचे सगळे पेशंट आपापल्या क्षेत्रात आत्मविश्वासाने काम करत आहेत.
![]() |
(ब्लॉगवर फोटो टाकण्यासाठी पेशंटने परवानगी दिलेली आहे.)
गला पूर्णविराम देण्याआधी मी माझ्या सर्व वाचकांना सांगीन की, तुमच्या
ओळखीत अशी कोणती व्यक्ती असेल कि तिला अशा प्रकारच्या मदतीची गरज आहे तर तुम्ही Ocularist ऐश्वर्या जुवेकरला नक्की
संपर्क करू शकता.
तिचा संपर्क जोडत आहे.
Ocularist Aishwarya Juvekar
Svadha Prosthetics Centre
9004024124
ash.potnis33@gmail.com






No comments:
Post a Comment