Monday, June 19, 2017

मेकअप आर्टिस्ट: रिया पांचाळ

मेकअप म्हटलं की, आपल्यासमोर एक चित्र उभं राहातं. त्यात रंगांचा भडकपणा म्हणा किंवा आपण मेकअप केल्यावर अगदी वेगळेच दिसू अशी काहीशी मनात आलेली भावना... असे काहीसे विचार  'मेकअप' संकल्पनेशी जोडलेले आहेत असं कधी कधी वाटत. पण असे विचार आपल्या मनातून क्षणातच निघून जातात जेव्हा आपण एका योग्य आणि जाणकार अनुभवी मेकअप आर्टिस्टला भेटतो. तेव्हा खऱ्या अर्थाने 'मेकअप' या शब्दाशी असलेल्या अनेक व्याख्या नव्याने कळतात आणि चूकीच्या संकल्पना लगेचच पुसल्याही जातात. 
खरं पाहायला गेलो तर, मेकअपसाठी लागणारं संपूर्ण साहित्य हे  प्रत्येक मेकअप आर्टिस्टसाठी सारखंच असतं. 
पण खरी कमाल असते ती त्या आर्टिस्टच्या हातात. मेकअप कसा करायचा, कोणता करायचा  यापेक्षा त्या व्यक्तीला कसा सूट होईल हा विचार योग्यपद्धतीने करणाऱ्या मेकअप आर्टिस्टच्या हाती खरी कमाल असते असं मला वाटतं. अशाच अनेक मेकअपच्या संकल्पनांविषयी गप्पा मारताना मला मेकअप आर्टिस्ट मधल्या खऱ्या जाणकार कलाकाराला भेटता आलं.
कलेवर मनापासून प्रेम करणारी, सुंदरतेने नटवण्याच्या प्रयत्नात त्यातलं  नैसर्गिक सौंदर्य विशेषतः जपणारी, नवनवीन प्रयोग करणारी, आणि अभ्यासपूर्ण मेकअप करणारी आर्टिस्ट  म्हणजे रिया पांचाळ.


भार्गवी चिरमुले 

मेकअप करताना तिचा विशेष भर असतो तो त्या व्यक्तीचं नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवून मेकअप करण्यावर. यासाठी ती  त्या व्यक्तीच्या चेहऱ्याचा अभ्यास करते. कारण  प्रत्येकाची त्वचा वेगळी त्यामुळे स्कीन टोनचा विचार करून ती मेकअप करते. मेकअप करताना वेगवेगळे रंग वापरले जातात पण त्याच्या वेगवेगळ्या शेड्स म्हणजे  लाईट,डार्क या सर्व बारीकसारीक  गोष्टी सांभाळून कोणती शेड त्या व्यक्तीला परफेक्ट मॅच होईल यावर ती नेहमीच लक्ष देते.

मेकअप करायची काय गरज?  असे विचार जेव्हा अनेकांच्या मनात येतात त्या अनुषंगाने मी तिला प्रश्न विचारला तेव्हा मेकअप का करायचा याविषयी तिने सांगितलं की, 'कोणत्याही लग्न समारंभात आपण जर मेकअप केला असेल तर आपली एक वेगळी छाप त्याठिकाणी पडते. आपल्यातले जे काही वीक मुद्दे आपल्याला वाटत असतील तर ते लक्षात सुद्धा येत नाहीत. आणि एक वेगळा लुक मिळाल्यामुळे आपण उठून सुद्धा दिसतो'. असं ती म्हणते.

एक अनुभवी मेकअप आर्टिस्टच काम जेव्हा पाहायला मिळत त्यावेळी लक्षात येत की, मेकअप केला आहे हे लक्षात आणून न देता जेव्हा तो मेकअप आर्टिस्ट मेकअप करतो तेव्हा ते त्याचं खर स्कील असतं. 

मेकअपविषयी तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की, डोळ्यांचा मेकअप हा खरतरं सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. त्यात अगदी आयशडो वापरण्याची पद्धत सुद्धा फार महत्त्वाची मानली जाते.

रिया मेकअप करताना डोळ्यांच्या मेकअपकडे सुद्धा अधिक लक्ष देते. नेहमीच्या मेकअप करण्यापलीकडे ती नेहमी  नवनवीन प्रयोग सुद्धा करत आली आहे. एकदा तर मेकअप करताना  स्कीन खूप रफ असल्याचं तिच्या लक्षात आलं. पण कौशल्याने तिने त्या स्कीनला स्मूथ  करण्यासाठी  एअर ब्रशचा वापर केला.

यासोबत HD मेकअप करणे ही सुद्धा तिची खासियत आहे. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे  एक प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे उत्तमोत्तम उत्पादनं ( products) वापरण्यावर तिचा अधिक भर असतो. कारण मेकअप करून घेणारी प्रत्येक व्यक्ती उत्पादनांविषयी नेहमीच जागरूक असते. 
















रियाच्या काम करण्याच्या पद्धतीमधला वेगळेपणा आपण पहिला पण हा वेगळेपणा टिकवताना मात्र खूप गोष्टी कराव्या लागतात. फक्त कला आणि कल्पना असून त्या पुरेश्या पडू शकत नाहीत. त्यामुळे या कला आणि कल्पनांसोबत बाजी जिंकावी लागते ती खऱ्या मैदानावर. अर्थातच, लग्न कार्यात मेकअप आर्टिस्टला खूप तत्पर असाव लागतं.  या लग्न समारंभातल्या कार्यक्रमात सगळेचजण शांत असतात पण आपण जर नीट निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की,फक्त मेकअप आर्टिस्ट फास्ट काम करत असतो. त्यांना ती सगळी वेळेची  गणितं सांभाळायची असतात.
याच  गणितांविषयी बोलताना रिया म्हणाली की, 'आम्हाला मेकअप पटकन करून द्यावा लागतोच. आम्हाला तिथे  घाई असते पण तरी खूप शांतपणे आणि संयम ठेवून आम्ही काम करतो. कारण मेकअप घाई करून केला तर तो नीट होऊ शकत नाही. त्यामुळे घाई असताना सुद्धा शांतपणे काम करणं आमच्यासाठी मोठा टास्क असतो. ती वेळेची  तत्परता आणि सगळ्यात महत्त्वाचं  संपूर्ण व्यवस्थापन योग्यरीतीने करण्यावर आम्ही भर देतो.'


रिया संपूर्ण मेकअप ४५ मिनिटांमध्ये पूर्ण करते. तिने आजपर्यंत महाराष्ट्रीयन सोबतच  ख्रिस्चन ब्रायडल...साउथ इंडियन ब्रायडल मेकअप सुद्धा केला आहे. शिवाय  आजपर्यंत  प्रोडकट माॅडेलिंग मध्ये सुद्धा  तिने काम केलेलं आहे.आणि यापुढे तिची विशेष आवड म्हणजे ब्रायडलमध्ये सुद्धा अधिक काम करायचा तिचा मानस आहे.
तिने आजपर्यंत नियती राजवाडे, भार्गवी चिरमुले,तेजा देवकर, शर्वाणी  पिल्लई, नम्रता आवटे अशा लोकप्रिय अभिनेत्रींचा मेकअप केलेला आहे...

भार्गवी चिरमुले 




तेजा देवकर 

रियाच्या मेहेंदीविषयी थोडक्यात ,

       मेकअप म्हटला की, मेहेंदी तर आलीच. रियाची मेहेंदी म्हणजे एक वेगळीच खासियत .पारंपारिक मेहेंदी तर सगळेच काढतात पण रियाने मात्र जरा वेगळा विचार केला. हातावर आपली मराठी संस्कृती तिने रंगवली. त्यात अगदी नऊवारी साडी नेसलेली बाई, जात्यावर दळण दळणारी स्त्री यासोबत गोपाळकाला, पाडवा असे सण-उत्सव , विटी दांडू सारखे खेळ, परकर -पोलक घातलेल्या लहान मुली, लावणी सारखी एक अनोखी परंपरा,झांज वाजवणारं पथक रियाने मेहेंदीच्या रुपात हातावर रेखाटलं.

त्या मेहेंदीच्या  रंगांमधून एक वेगळीच कलाकृती तिने स्वतःच्या कल्पकतेतून निर्माण केली. थोडक्यात, रियाने नेहमी कस्टमाईज मेहेंदीचा प्रयत्न केला आहे आणि तो यशस्वी सुद्धा केला आहे.

आजपर्यंत तिने अनेक कलाकारांना मेहेंदी काढलेली आहे. उदा. निर्मिती सावंत, नियती राजवाडे( मीरा मोडक), मधुगंधा कुलकर्णी, प्राजक्ता माळी, सोनाली खरे, अदिती सारंगधर, भार्गवी चिरमुले, नम्रता आवटे, तेजा देवकर यांसारख्या सिनेसृष्टीतल्या अनेक कलाकरांच्या हातांवर रियाने  तिच्या या अनोख्या कलेने मेहेंदी काढली आहे. शिवाय तिने थ्री डी डीझाइन्सवर सुद्धा अनेक प्रयोग केलेले आहेत.

सोनाली खरे 

अदिती सारंगधर










प्राजक्ता माळी

या क्षेत्रात यशस्वीपणे काम करताना ती तिचे  या क्षेत्रातले  गुरु म्हणजे पंढरीदादा जुकर व मुकेश पाटील  यांचे सुद्धा मनापासून आभार मानते.

तिच्या पुढच्या वाटचालीसाठी 'माझी लेखणी' या ब्लॉगतर्फे खूप खूप शुभेच्छा!! 



रिया पांचाळ


(या ब्लॉगमध्ये वापरलेले फोटो परवानगी घेऊन प्रकाशित करत आहोत.)


Contact Details - 
9167957911 / 9769719916
Riya Panchal 

20 comments:

  1. छान लिहिले आहे.
    'मेकअप करताना तिचा विशेष भर असतो तो त्या व्यक्तीचं नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवून मेकअप करण्यावर.'
    अशी तिची खासियत दाखविणारी वर्णने महत्वाची.
    मेहंदीचे फोटो दिले तर वेगळेपण चटकन जाणवेल.

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायाबद्दल मनापासून आभारी आहे.

      Delete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete

  3. madhav j joshi,DombivliJune 22, 2017 at 2:59 AM
    छान लिहिले आहे.
    'मेकअप करताना तिचा विशेष भर असतो तो त्या व्यक्तीचं नैसर्गिक सौंदर्य कायम ठेवून मेकअप करण्यावर.'
    अशी तिची खासियत दाखविणारी वर्णने महत्वाची.
    मेहंदीचे फोटो दिले तर वेगळेपण चटकन जाणवेल.

    Reply

    UnknownJune 25, 2017 at 11:01 PM
    रिया..रियाच्या कलागुणांविषयी सांगायचे तेवढे कमीच आहे. रिया म्हणजे perfection. रियाने माझ्या भाचीचा मेकअप केला आहे (फोटो blog मध्ये आहे़).

    ReplyDelete
    Replies
    1. अरे वा !! छान !! अभिप्रायाबद्दल आभारी आहे.

      Delete
  4. Very true. Riya madam is very talented specially in bridal makeups and mehendi. She can turn any ordinary looking girl into a princess. I wish a very prosperous career to her. You can surely consider her without any kind doubt in the mind.

    ReplyDelete
  5. Hi
    Riya
    Congrats to you n your hard work.
    Normally all work hard to get success but always observed Riya is working hard by put her HEART IN ALL WORK.
    n yes there you get success little late but Sure n Concreate base success.
    Now you Reach to noticable result of success.
    Now I wish surely soon the your name will be there with stardum welknown people always on screen.
    The God is great always n wish you grand success in your future venture.
    Vijay
    MINAGO TRAVELS 8108900522

    ReplyDelete
  6. Riya hi shalepaaunach Chitrakala ani hastakala ya vishayat hushar ahe. Tine prayatnapurvak ani mehenatine ya kshetra madhe yash milavile ahe. Ya mulakhatimadhe tichya prayatnachi ani mehenatichi yogya ti dakhal ghetali yacha Anand watala. Riya ne yapudhehi asech bharpur yash milavale asha sadichha deto ani punha ekada Riyache Manpurvak abhinandan karato.
    Saurabh Modak

    ReplyDelete
  7. रिया खरंच खूप सुंदर मेकअप करते, पण नुसता मेकअप च नाही तर इतरही beauty treatments उत्तम करते. अतिशय शांत, संयमी आणि जात्याच कलाकार असलेली रिया घर, दोन गोड मुली सांभाळून आपल्यातल्या कलाकाराला न्याय देत असते. मेंदी तर ती खूपच छान काढते. तिच्यावर छानसा लेख लिहून तुम्ही खुप चांगले काम केले आहे. रियाला आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा

    ReplyDelete
  8. Good minal
    I am proud of you, my good wishes is always with you. You are great artist all time. Best of luck for your future.
    Sarita Jagtap

    ReplyDelete
  9. Riya mam is super talented and a brilliant make up artist.She did my prewedding and wedding make up.Her dedication towards work is mind blowing.I was very much happy with the look she gave me on my wedding day. My best wishes to u mam and thnk you so much :)

    ReplyDelete
  10. Riya's mehendi designs are unique.
    Awesome Riya, keep up the good work !!

    ReplyDelete
  11. Riya Didi is a superb make up artist..she has tremendous dedication towards her work and her commitment to quality is mind blowing..my marriage make up was done by her.. I have never looked so beautiful in my life..!! All credit goes to Riya Didi.. Thanks a lot and all the best.. Keep up the good work

    ReplyDelete
  12. Hi
    Heartiest congrats.
    Feeling proud of u. U hv reached upto this level just coz of ur hardwork and sincere efforts. Kip it up..

    Our best wishes are always with u..

    ReplyDelete
  13. Hi
    Heartiest congrats.
    Feeling proud of u. U hv reached upto this level just coz of ur hardwork and sincere efforts. Kip it up..

    Our best wishes are always with u..

    ReplyDelete
  14. Great work and a talented artist.

    ReplyDelete
  15. Riya mam is awesome makeup artist.i feel very proud i got such makeup artist for my wedding ceremony.love you..mam..my good wishes always with u..All the best for your future

    ReplyDelete
  16. Riya mam is awesome makeup artist.i feel very proud i got such makeup artist for my wedding ceremony.my good wishes always with you..All the best for your future.

    ReplyDelete
    Replies
    1. Riya is very good makeup artist. She is very cool and calm while doing makeup and finishes work very neatly in time. My best wishes for her.. Thanks!!

      Delete
  17. मस्त रिया मस्त वा चांगलं वाटत असं काही कौतुकास्पद वाचल्यावर आणि तू मुकेश पाटील चे जे दर वेळी आभार मानातेस त्या बद्दल तुझ कौतुक अशीच या शेत्रत नाव कामावं तथास्तु

    ReplyDelete