नवे 'टास्क'- नवी 'निरीक्षणे'
तर वर नमूद केलेल्या या सगळ्या गोष्टी होत्या ज्या मला नव्या रुटीनमध्ये सेट होताना टास्क वाटत होत्या..
पण शेवटी 'वेळ हेच सगळ्याच औषध असतं' म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी हळूहळू जमायला लागल्या. घरातला वावर, आजूबाजूचा परिसर, शिवाय इथली आजूबाजूची फॉरेनर मंडळी आणि काही इंडियन्स अशा सगळ्यांच्या नव्याने झालेल्या ओळखी या सगळ्यामुळे अर्थातच एक 'कम्फर्ट' येऊ लागला.
यंदाच्या इथल्या माझ्या पहिल्या दिवाळीत मी जेव्हा घरासमोर रांगोळी स्टिकर आणि पणत्या ठेवत होते तेव्हा शेजारी राहणारी अमेरिकन लेडी हे सगळं पाहून मला आपल्या या सणाबद्दल विचारात होती. तिला खूप उत्सुकता सुद्धा होती. त्यामुळे आम्ही आपला दिवाळी फराळ इथल्या आमच्या फॉरेनर मित्र-मैत्रिणींना सुद्धा दिला. यात त्यांना शंकरपाळे आणि चकली विशेष आवडली असं सुद्धा त्यांनी सांगितलं.
त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर या नव्या वातावरणात रुळायला लागल्यावर माझं एकटीने बाहेर पडणं सुद्धा सहज होऊ लागलं. कारण आता रस्ता आत्मविश्वासाने क्रॉस करता येत होता. आजूबाजूचे रस्ते माहित झाले होते. माझा इथला मोबाईल नंबर वगैरे या सगळ्याच गोष्टी आता होत्या. त्यामुळे अडचण काही आलीच तर विराज ला फोन करू शकत होते. कोणत्याही गल्लीबोळातून एकटीने चालत जायचं नाही मुख्य रस्त्यावरून जायचं हे विराजने मला सांगून ठेवलं होतं.
त्यामुळे कुठे मी कधी जाणार असेल तर आम्ही कसं जायचं यावर आधी बोलायचो... मग गुगल मॅप वर पाहायचे.. जर कधी मोबाईल ला काही प्रॉब्लेम झाला तर..म्हणून saferside त्याचे screenshots मी काढून ठेवायचे. तर अशी सगळी तयारी करून मी बाहेर पडू लागले.
एकटी बाहेर पडून प्रवास करायला लागले तशी माझ्या डोक्यात फिट बसली ती म्हणजे मी केलेली माझी काही निरीक्षणं ...
मला जाणवलेल्या.. दिसलेल्या, वेगळ्या गोष्टी आणि काही निरीक्षणं आज तुमच्यासमोर मांडणार आहे.
१. साधारण डाउनटाऊन च्या भागात ऑफिस ला जायच्या वेळेत खूप माणसं दिसतात पण त्यांनतर रस्त्यावर अगदी ३... ४ माणसं पाहायला मिळतात.
२. रस्त्यावर कोणीही रस्ता क्रॉस करणारं जरी नसलं तरी गाडी चालवणारे रस्त्याचे नियम पाळतात.
३. इथे रस्त्यावरून चालताना अनोळखी व्यक्ती सुद्धा एकमेकांकडे पाहून हसतात.
४. इथे आकाराने लहान दुकानं ही संकल्पना नाहीच. सगळ्या दुकानांचा आकार हा बऱ्यापैकी मोठाच असतो.
५. इथे 'बिल काउंटर' सोबत 'सेल्फ चेकआउट' चा सुद्धा पर्याय असतो.
६. इथे वस्तू खरेदी केल्यानंतर जर आपल्याला आवडली नसेल तरी आपण काही दिवसात परत करू शकतो. त्याचे पैसे परत केले जातात. इथली एक्ससेन्ज पॉलिसी चांगली आहे.
एकदा आम्ही आणलेलं दूध खराब होतं. तेव्हा विराज त्या दुकानात दूध घेऊन परत गेला तेव्हा त्यांनी फक्त पावती मागितली.. पैसे परत केले. बाकी काहीच प्रश्न विचारले सुद्धा नाहीत.
७. हॉटेल मध्ये प्रत्येक पदार्थ हा अधिक प्रमाणात येतो. त्याची quantity अधिक असते.
८. इथे खाण्याचा पदार्थ पार्सल करताना to go हा शब्द वापरला जातो. आणि to go बॉक्स मध्ये तो दिला जातो.
९. इथे सुद्धा मॉल बाहेर 'बेघर' आणि आर्थिक परिस्थिती कमकुवत असणारे लोकं बसलेली असतात.. चेंज आहेत का ते विचारतात.. फक्त फरक इतकाच ते इंग्रजी भाषेतून पैसे मागतात.
१०. इथे उन्हाळा जुने ते सप्टेंबर पर्यंत असतो. तेव्हा रात्री ८ .. ९ वाजेपर्यंत संध्याकाळ असते. आणि अचानक रात्रीच्या ९. ३० ला वगैरे अंधार पडतो.
११. इकडचा हिवाळा हा खरा हिवाळा असतो. शिवाय हिवाळ्यात ३. ...४ वाजताच अंधार पडायला सुरुवात होते.
१२. इथे आपले सगळे सण शनिवार- रविवारी साजरे केले जातात.
१३. आपल्या इथे चहा ला जेवढं महत्त्व आपण देतो तेवढच महत्त्व इथे कॉफी ला दिलं जात.
१४. अनेकवेळा चालत चालत कॉफी पिण्याऱ्यांची संख्या सुद्धा अधिक प्रमाणात दिसून येते.
१५. इथे बाहेर ..मोकळ्या हवेत लॅपटॉप घेऊन किंवा पुस्तकं घेऊन काम करण्याची आवड अनेकांना असते.
१६. दुधाचे अनेक प्रकार असतात. फॅट फ्री, १% , २% मिल्क, होल मिल्क.
१७. इथे कुत्रा पाळण्याचे वेड अधिक आहे.
१८. प्रत्येक घरी एक तरी कुत्रा पाळला आहे हे दिसून येते.
१९. इथे लहान बाळांचे आई वडील आणि ज्यांनी कुत्रा पाळला आहे ते मालक यांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांच्या लहान बाळांना आणि पाळलेल्या कुत्र्यांना आपण हात लावू शकत नाही किंवा त्यांच्याशी खेळू शकत नाही.
२०. कुठेही जाण्यासाठी इथे गुगल मॅप वापरला जातो.
२१. इथे झाडांना स्प्रिंकलर्स ने पाणी दिलं जातं.
२२. स्त्रियांचं सिगरेट ओढण्याच प्रमाण सर्रास दिसून येतं.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
वाचकांचे अभिप्राय
मागच्या भागातला प्रश्न - तुमच्यासाठी 'रुटीन' या शब्दच महत्त्व किती आहे.
अभिषेक काटदरे (रत्नागिरी)- "रूटीन" म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाशी आणि वेळेशी आपल्या Emotions ची होत जाणारी Connectivity....
सुकन्या धुमाळ (कल्याण) - रुटीन म्हणजे 'धाकधूक'. कारण एका विशिष्ट ब्रेक मधून किंवा सुट्टीहून परतताना एकच शब्द माझ्या डोक्यात सतत फिरत असतो तो म्हणजे रुटीन. बसेल की नाही .. आपण back to the pavilion सेट होऊ ना ..? हीच काय ती गमतीशीर धाकधूक.
नवं 'रुटीन' हे जसं एक नवं 'आव्हान' होतं. त्याचप्रमाणे, स्वतःचा रोल बदलल्यावर ओघाने बदललेल्या गोष्टी सुद्धा आता नव्या दिनक्रमात बसवायच्या होत्या. तुम्हाला खरं सांगू ? नवा दिनक्रम बसवण्याचा हा आटापिटा सलग तीन महिने चालू होता. शिवाय सतत डोक्यात एकच विचार.. 'करियरची नवी घडी बसवणे'. गंमत म्हणजे घरच्यांशी आणि विराजशी बोलताना अनेकवेळा माझा हाच विषय असायचा. मनात नेहमी विचार यायचा करियरची नवी घडी बसवतांना घरातल्या गोष्टींकडे सुद्धा दुर्लक्ष करायचं नाहीये. 'करियर आणि संसार' यातला समतोल यशस्वीरित्या सांभाळायचा होता. कारण या दोन्ही तितक्याच महत्त्वाच्या गोष्टी... त्यामुळे याचा परफेक्ट बॅलन्स हा सुद्धा एक नवा टास्क होता.
मी मागच्या भागापासून सतत हेच म्हणतेय..हेच लिहितेय.. हा सुद्धा एक नवा टास्क होता.. तो सुद्धा टास्क होता.. ते एक खरंच आव्हान होतं .. वगैरे वगैरे. पण मी तर काय करू... इथे आल्यावर कितीतरी छोट्या गोष्टी माझ्यासाठी 'टास्क'च होत्या.
माफ करा... पण पुन्हा आता मी माझ्या या लाडक्या शब्दावर येणार आहे..
अर्थातच समोर आलेल्या अजून काही आव्हानांबद्दल सांगणार आहे..
खरं पाहायला गेलं तर, जेवण करता येत होतं. पण आता 'रोज' जेवण करायचंय ही गोष्ट नवी होती. पूर्वी तसं पाहायला गेलं तर सगळं हातात मिळायचं. पण आता.. भाजी कोणती करायची या विचारापासून ती आणून, चिरून, फोडणीला टाकून... शिवाय छान चव आणून आपल्यालाच तयार करायची आहे.
इथे ना कोणी 'मेड' इथे सगळंच सेल्फ मेड. आपल्याइथे भारतात एखादी स्वयंपाकीण काकू घरी येऊन जेवण करतात ती संकल्पना इथे अगदीच कमी. त्यामुळे A to Z सगळं आपल्यालाच ठरवायचं असतं आणि आपल्यालाच करायचं असतं. अगदीच कधी कंटाळा आला तर नवऱ्याची साथ ही असतेच पण मॅक्सिमम गोष्टी या घरातल्या मुख्य स्त्रीला पाहाव्या लागतात. अर्थात, या विचाराचा कधीच त्रास वाटला नाही पण एक जबाबदारी म्हणून नवी होती.
कालपर्यंत रोज जेवायचं आहे एवढच माहित होतं.. पण आता रोज स्वतः जेवण करून मग जेवायचं आहे ही गोष्ट आता माझ्या रुटीन मध्ये कायमस्वरूपी add झाली होती.
सुरुवातीला जेवण करायला खूप वेळ लागायचा.. साधारण दोन तास वगैरे... पण आता सरावाने हा स्पीड साधारण १ तासावर आला आहे. आणि जेवणानंतरची आवराआवर जशी अनेक स्त्रियांना कंटाळवाणी वाटते त्याला मी सुद्धा अपवाद नव्हते. शिवाय घरात काय आहे आणि काय संपलं आहे याकडे लक्ष ठेवून ते वेळेत घेऊन येणं तसच अतिशय महत्त्वाचं म्हणजे किती जिन्नस आणायचं? या सगळ्याचा अंदाज आणि ही सगळी गणितं डोक्यात बसायला सुद्धा वेळ द्यावा लागतो.
तर, आपल्या नेहमीच्या जेवणात असणारी पीठं, डाळी अशा सगळ्या गोष्टी इंडियन स्टोअर मधेच मिळतात. एक दुकान आहे ते आमच्या घरापासून अर्धा तासाच्या अंतरावर आणि बाकी प्रॉपर इंडियन स्टोअर आहेत ती दीड तासाच्या अंतरावर...
घराजवळ अमेरिकन ग्रोसरी स्टोअर आहे त्याचं नाव 'सेफ वे'. इथे सगळ्या गोष्टी मिळतात पण भाज्या आणि फळं सोडली तर बाकी अमेरिकन फूड म्हणजे फ्रोझन किंवा ब्रेड बटर चीज यांसारखे पदार्थ आपल्या जेवणात रोज तर नसतातचं. त्यामुळे फळं भाज्या सोडून बाकी आपल्या जेवणात असणारी पिठं डाळी वगैरे यांसारखे पदार्थ विशेष वेळ काढून आणायचे ही सुद्धा दिनक्रमात नव्याने आलेली ऍक्टिव्हिटी.
आता मागे वळून पाहताना जाणवतंय की, या सगळ्या नव्या गोष्टी सांभाळत सांभाळत रुटीन लावताना खरतरं दिवस कधी निघून जायचा तेच लक्षात यायचं नाही. भारतात बाकी सगळ्या नातेवाईकांना, मित्र-मैत्रिणींना फोन करायची लिस्ट कधी प्रत्यक्षात उतरतच नसे. कारण जसं मी मघाशी म्हंटल त्याप्रमाणे इथे सगळ्या गोष्टी स्वतःलाच कराव्या लागतात.. अगदी पॅकेज रूम मध्ये जाऊन स्वतःच पार्सल आणण्यापासून ते घरातलं फर्निचर स्वतः इन्स्टॉल करण्यापर्यंत सगळंच..त्यामुळे फोन आणि विरुद्ध वेळा हा सुद्धा एक कायमस्वरूपी असलेला टास्कच...
पण एक गोष्ट मी इथे आवर्जून नमूद करेन ती म्हणजे सगळं स्वतः करण्यात सुद्धा खूप मजा असते. फक्त फरक इतकाच की ही सगळी कामं आपल्याला विशिष्ट वेळ देऊन करावी लागतात. कारण अशा सगळ्या बारीक सारीक गोष्टी स्वतः करताना जेव्हा आपलं स्वतः काम म्हणजे माझ्या बाबतीत माझं लिखाण फक्त २०% व्हायचं तेव्हा लक्षात यायचं आता या नव्या वाढलेल्या गोष्टींना धरून रुटीन सेट केलं पाहिजे.
तर वर नमूद केलेल्या या सगळ्या गोष्टी होत्या ज्या मला नव्या रुटीनमध्ये सेट होताना टास्क वाटत होत्या..
पण शेवटी 'वेळ हेच सगळ्याच औषध असतं' म्हणतात त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी हळूहळू जमायला लागल्या. घरातला वावर, आजूबाजूचा परिसर, शिवाय इथली आजूबाजूची फॉरेनर मंडळी आणि काही इंडियन्स अशा सगळ्यांच्या नव्याने झालेल्या ओळखी या सगळ्यामुळे अर्थातच एक 'कम्फर्ट' येऊ लागला.
यंदाच्या इथल्या माझ्या पहिल्या दिवाळीत मी जेव्हा घरासमोर रांगोळी स्टिकर आणि पणत्या ठेवत होते तेव्हा शेजारी राहणारी अमेरिकन लेडी हे सगळं पाहून मला आपल्या या सणाबद्दल विचारात होती. तिला खूप उत्सुकता सुद्धा होती. त्यामुळे आम्ही आपला दिवाळी फराळ इथल्या आमच्या फॉरेनर मित्र-मैत्रिणींना सुद्धा दिला. यात त्यांना शंकरपाळे आणि चकली विशेष आवडली असं सुद्धा त्यांनी सांगितलं.
त्यामुळे थोडक्यात सांगायचं तर या नव्या वातावरणात रुळायला लागल्यावर माझं एकटीने बाहेर पडणं सुद्धा सहज होऊ लागलं. कारण आता रस्ता आत्मविश्वासाने क्रॉस करता येत होता. आजूबाजूचे रस्ते माहित झाले होते. माझा इथला मोबाईल नंबर वगैरे या सगळ्याच गोष्टी आता होत्या. त्यामुळे अडचण काही आलीच तर विराज ला फोन करू शकत होते. कोणत्याही गल्लीबोळातून एकटीने चालत जायचं नाही मुख्य रस्त्यावरून जायचं हे विराजने मला सांगून ठेवलं होतं.
त्यामुळे कुठे मी कधी जाणार असेल तर आम्ही कसं जायचं यावर आधी बोलायचो... मग गुगल मॅप वर पाहायचे.. जर कधी मोबाईल ला काही प्रॉब्लेम झाला तर..म्हणून saferside त्याचे screenshots मी काढून ठेवायचे. तर अशी सगळी तयारी करून मी बाहेर पडू लागले.
एकटी बाहेर पडून प्रवास करायला लागले तशी माझ्या डोक्यात फिट बसली ती म्हणजे मी केलेली माझी काही निरीक्षणं ...
मला जाणवलेल्या.. दिसलेल्या, वेगळ्या गोष्टी आणि काही निरीक्षणं आज तुमच्यासमोर मांडणार आहे.
१. साधारण डाउनटाऊन च्या भागात ऑफिस ला जायच्या वेळेत खूप माणसं दिसतात पण त्यांनतर रस्त्यावर अगदी ३... ४ माणसं पाहायला मिळतात.
२. रस्त्यावर कोणीही रस्ता क्रॉस करणारं जरी नसलं तरी गाडी चालवणारे रस्त्याचे नियम पाळतात.
३. इथे रस्त्यावरून चालताना अनोळखी व्यक्ती सुद्धा एकमेकांकडे पाहून हसतात.
४. इथे आकाराने लहान दुकानं ही संकल्पना नाहीच. सगळ्या दुकानांचा आकार हा बऱ्यापैकी मोठाच असतो.
५. इथे 'बिल काउंटर' सोबत 'सेल्फ चेकआउट' चा सुद्धा पर्याय असतो.
६. इथे वस्तू खरेदी केल्यानंतर जर आपल्याला आवडली नसेल तरी आपण काही दिवसात परत करू शकतो. त्याचे पैसे परत केले जातात. इथली एक्ससेन्ज पॉलिसी चांगली आहे.
एकदा आम्ही आणलेलं दूध खराब होतं. तेव्हा विराज त्या दुकानात दूध घेऊन परत गेला तेव्हा त्यांनी फक्त पावती मागितली.. पैसे परत केले. बाकी काहीच प्रश्न विचारले सुद्धा नाहीत.
७. हॉटेल मध्ये प्रत्येक पदार्थ हा अधिक प्रमाणात येतो. त्याची quantity अधिक असते.
८. इथे खाण्याचा पदार्थ पार्सल करताना to go हा शब्द वापरला जातो. आणि to go बॉक्स मध्ये तो दिला जातो.
९. इथे सुद्धा मॉल बाहेर 'बेघर' आणि आर्थिक परिस्थिती कमकुवत असणारे लोकं बसलेली असतात.. चेंज आहेत का ते विचारतात.. फक्त फरक इतकाच ते इंग्रजी भाषेतून पैसे मागतात.
१०. इथे उन्हाळा जुने ते सप्टेंबर पर्यंत असतो. तेव्हा रात्री ८ .. ९ वाजेपर्यंत संध्याकाळ असते. आणि अचानक रात्रीच्या ९. ३० ला वगैरे अंधार पडतो.
११. इकडचा हिवाळा हा खरा हिवाळा असतो. शिवाय हिवाळ्यात ३. ...४ वाजताच अंधार पडायला सुरुवात होते.
१२. इथे आपले सगळे सण शनिवार- रविवारी साजरे केले जातात.
१३. आपल्या इथे चहा ला जेवढं महत्त्व आपण देतो तेवढच महत्त्व इथे कॉफी ला दिलं जात.
१४. अनेकवेळा चालत चालत कॉफी पिण्याऱ्यांची संख्या सुद्धा अधिक प्रमाणात दिसून येते.
१५. इथे बाहेर ..मोकळ्या हवेत लॅपटॉप घेऊन किंवा पुस्तकं घेऊन काम करण्याची आवड अनेकांना असते.
१६. दुधाचे अनेक प्रकार असतात. फॅट फ्री, १% , २% मिल्क, होल मिल्क.
१७. इथे कुत्रा पाळण्याचे वेड अधिक आहे.
१८. प्रत्येक घरी एक तरी कुत्रा पाळला आहे हे दिसून येते.
१९. इथे लहान बाळांचे आई वडील आणि ज्यांनी कुत्रा पाळला आहे ते मालक यांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांच्या लहान बाळांना आणि पाळलेल्या कुत्र्यांना आपण हात लावू शकत नाही किंवा त्यांच्याशी खेळू शकत नाही.
२०. कुठेही जाण्यासाठी इथे गुगल मॅप वापरला जातो.
२१. इथे झाडांना स्प्रिंकलर्स ने पाणी दिलं जातं.
२२. स्त्रियांचं सिगरेट ओढण्याच प्रमाण सर्रास दिसून येतं.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
वाचकांचे अभिप्राय
मागच्या भागातला प्रश्न - तुमच्यासाठी 'रुटीन' या शब्दच महत्त्व किती आहे.
अभिषेक काटदरे (रत्नागिरी)- "रूटीन" म्हणजे आजूबाजूच्या वातावरणाशी आणि वेळेशी आपल्या Emotions ची होत जाणारी Connectivity....
सुकन्या धुमाळ (कल्याण) - रुटीन म्हणजे 'धाकधूक'. कारण एका विशिष्ट ब्रेक मधून किंवा सुट्टीहून परतताना एकच शब्द माझ्या डोक्यात सतत फिरत असतो तो म्हणजे रुटीन. बसेल की नाही .. आपण back to the pavilion सेट होऊ ना ..? हीच काय ती गमतीशीर धाकधूक.
No comments:
Post a Comment